30/06/2025
आदरणीय मुख्याध्याप श्री. लिंगायत सर,
आज आपल्या शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा दिवस आहे.
आपण शाळेतून सेवानिवृत्त होत आहात. आपल्या अथक परिश्रमामुळे, मार्गदर्शनामुळे आणि शैक्षणिक योगदानाने, शाळेने खूप प्रगती केली आहे. आपले विद्यार्थ्यांवर आणि शाळेवर असलेले प्रेम, तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेले प्रयत्न नेहमीच स्मरणात राहतील.
तुम्ही संस्थेशी दाखवलेली बांधिलकी आणि आपुलकी रायपाटण गावकरी अखंड स्मरणात राहील, सदा हसत राहणे हे तूमच व्यक्तिमत्व.
आपण आता निवृत्त होत आहात, याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे. आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदी आणि स्वस्थ जीवन जगावे, अशी आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे🙏.
आपण शाळेला आणि विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहावे, हीच आमची इच्छा आहे.
या पुढील प्रत्येक क्षण आनंदात जावो हीच ईश्वरचरणी पार्थना.
🙏💐💐💐💐🙏