Rashtrasant Tukdoji Maharaj Vidyalaya, Laxminagar

Rashtrasant Tukdoji Maharaj Vidyalaya, Laxminagar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rashtrasant Tukdoji Maharaj Vidyalaya, Laxminagar, School, Laxminagar, near Sai mandir, Umarkhed Road, Pusad.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा, लक्ष्मीनगर बोरगडी ता. पुसद जि. यवतमाळ ही ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळ, फुलवाडी ता. पुसद जि. यवतमाळ यांच्या अंतर्गत आहे. डी.एस.पी.एम. ही २५ वर्षांहून अधिक जुनी शैक्षणिक संस्था आहे.

04/09/2025

आज शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती... त्यामध्ये शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला...

28/08/2025
आज आमच्या शाळेत बाप्पाचे आगमन झाले....🌹🙏
27/08/2025

आज आमच्या शाळेत बाप्पाचे आगमन झाले....🌹🙏

*अभिनंदन ..!    अभिनंदन..! *अभिनंदन* ...!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्...
26/08/2025

*अभिनंदन ..! अभिनंदन..! *अभिनंदन* ...!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ. फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद व तालुका क्रीडा संघटना पुसद .यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा सन 2025/ 26 स्थळ डहाणूकर सभागृह फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद. दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित 14 वर्ष वयोगट आतील 57 किलो वजनी गटात *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर* *बोरगडी* येथील *वैभव प्रकाश करण* वर्ग सातवा या विद्यार्थ्याने जिल्हास्तरावर विजय प्राप्त करून *विभागीय स्तरावरिल शालेय कुस्ती स्पर्धेसाठी *पात्र*झाला आहे*. त्याबद्दल,ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळ फुलवाडी चे अध्यक्ष मा.प्रा. डॉ. दीपक चव्हाण साहेब सचिव मा. श्री राजेंद्र चव्हाण साहेब शाळा समिती अध्यक्ष मा. श्री.ईशान चव्हाण सर शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री नितेश चापके सर क्रीडा मार्गदर्शक श्री.नरेंद्र पाटील सर क्रीडा विभाग प्रमुख श्री. किशोर खरे सर तथा शाळेतील शिक्षक श्री पंकज राठोड सर श्री चेतन राठोड सर श्री साहिल जयस्वाल सर शाळेतील शिक्षिका सौ .श्रुती चव्हाण मॅडम सौ.दिपाली काटेकर मॅडम सौ शारदा वायकुळे मॅडम सौ.जयश्री खुळे मॅडम सौ.सुषमा रहांगडाले मॅडम कर्मचारी सौ.ज्योतीताई अंभोरे सौ .उज्वला काळबांडे यांनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत.....!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर, बोरगडी ता.पुसद येथे दिनांक १६/०८/२०२५ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्स...
26/08/2025

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर, बोरगडी ता.पुसद येथे दिनांक १६/०८/२०२५ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला.
कृष्ण व राधा च्या वेशभूषा करून चिमुकल्यांनी नृत्य सादर करून आनंद व्यक्त केला..

दिनांक १२/०८/२०२५ रोजी गुणवंतराव देशमुख माध्यमिक विद्यालय पुसद येथे आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2025 मध...
26/08/2025

दिनांक १२/०८/२०२५ रोजी गुणवंतराव देशमुख माध्यमिक विद्यालय पुसद येथे आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2025 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा,लक्ष्मी नगर पुसद शाळेने विज्ञान विषयावर आधारित भूकंप दर्शक मॉडेल तयार करून प्रदर्शित केलं यावेळी शाळेतील वर्ग 8 वी चा विद्यार्थी कृष्णा राठोड मॉडेल विषयी प्रशिक्षकांना माहिती देताना दिसत आहे.प्रयोग मार्गदर्शक म्हणून सौ दीपाली सोनुने यांनी मार्गदर्शन केले.*

दिनांक १५ ऑगस्ट २०२५ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा लक्ष्मी नगर पुसद येथे ७९ वा भारतीय स्वतंत्र दिन उत्साहात सा...
26/08/2025

दिनांक १५ ऑगस्ट २०२५ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा लक्ष्मी नगर पुसद येथे ७९ वा भारतीय स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळ फुलवाडी तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा लक्ष्मी नगर पुसद चे सचिव मा.श्री राजेंद्रजी चव्हाण साहेब होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक नितेश चापके व पालक प्रतिनिधी म्हणून श्री पंडित दादा हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.राजेंद्रजी चव्हाण साहेब यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रसंगी शाळेतील इयत्ता बालवाडी ते इयत्ता 8 वीतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व गीते सादर केलीत.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना मा.श्री राजेंद्रजी चव्हाण साहेब यांनी दोन बक्षिस जाहीर केलीत,जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्र होतील त्यांना रोख रु 1100 व नवोदय परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना रु 3100 बक्षीस जाहीर करण्यात आली. तसेच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सुद्धा यथोचित सन्मान करण्यात येईल असे जाहीर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहायक शिक्षक नरेंद्र पाटील यांनी उत्कृष्टपणे केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सहा.शिक्षक पंकज राठोड,कु.श्रुती राठोड,किशोर खरे,चेतन राठोड,दीपाली काटेकर,साहिल जयस्वाल,सुषमा रहांगडाले, शारदा साखरे,कु.जयश्री भुरके,ज्योती अंभोरे,उज्वला काळबांडे यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.*

दिनांक २६/०७/२०२५ रोजी फुलवाडी ता. पुसद येथे तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये राष्ट्रसंत ...
28/07/2025

दिनांक २६/०७/२०२५ रोजी फुलवाडी ता. पुसद येथे तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर बोरगडी पुसद येथील इयत्ता ८ वी चा विद्यार्थी पवन सुनील राठोड व इयत्ता ७ वी चा विद्यार्थी वैभव प्रकाश करण हे दोन्ही विद्यार्थी अंतिम सामन्यात विजयी होऊन त्यांची निवड जिल्हा स्तरीय स्पर्धे साठी झाली आहे. त्या बद्दल त्यांचे संस्थे तर्फे व शाळेतर्फे हार्दिक अभिनंदन.....💐💐

Address

Laxminagar, Near Sai Mandir, Umarkhed Road
Pusad
445215

Opening Hours

Monday 10:30am - 5pm
Tuesday 10:30am - 5pm
Wednesday 10:30am - 5pm
Thursday 10:30am - 5pm
Friday 10:30am - 5pm
Saturday 7am - 11am

Telephone

7588589727

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rashtrasant Tukdoji Maharaj Vidyalaya, Laxminagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Rashtrasant Tukdoji Maharaj Vidyalaya, Laxminagar:

Shortcuts

Share

Category