24/10/2021
ऐका मंडळी एक गोष्ट सांगतो
--------------------------------------
एक जंगल जंगलात वाघ. वाघांचा कळप. कळपाचा एक म्होरक्या.
जंगलात इतरही अनेक प्राणी त्यांच्या त्यांच्या कळपात राहत असतात. जसं जसं प्रत्येक कळपातील प्राण्यांची संख्या वाढत जाते तसतसे प्रत्येक कळपाला आम्हीच शक्तिशाली आहोत असे वाटू लागते. प्रत्येकजण आपापला स्वार्थ बघायला सुरवात करतो.
यामुळे, वेगवेगळ्या प्राण्यांच्या कळपात सारखे खटके उडायला सुरवात होते त्यामुळे जंगलात एक हिसंक वातावरण तयार होते आणि यामुळे जंगलाचे नुकसान होण्यास सुरुवात होते आणि त्याचबरोबर बाकी इतर लहानसहान प्राण्यांचा जीव जायला सुरवात होते. कोणीच माघार घेण्यास तयार होत नसते त्यामुळे जंगलात एक असंतोषाचे वातावरण तयार होते. एक दिवस वाघांच्या कळपाचा म्होरक्या इतर प्रत्येक प्राण्यांच्या कळपातील म्होरक्यांना भेटायला बोलावतो आणि अगदी प्रेमाने व आदरयुक्तपणे सर्वांना एकत्रित राहण्याची विनंती करतो. शेवटी त्याच्या विनंतीला यश येते आणि जंगलातील वातावरण शांत होते व सर्वकाही सुरळीत चालू होते.
यावर म्होरक्याचे पिल्लू त्याला विचारते, "पप्पा, पप्पा तुम्ही वाघ आहात तरीही या सर्वांना अगदी हात जोडून विनंती करत होता, असे का केले तुम्ही" यावर वाघ म्हणतो "मी वाघ आहे म्हणून हात जोडण्याचे धाडस माझे झाले आणि जर माझ्या हात जोडण्याने जंगलाचे भले होत असेल तर मी रोज हात जोडायला तयार आहे!".
सांगायचे एवढेच, "अखंड संसारात एक कोणतरी शेरदिल माणूस लागतो जो सर्वांना एकत्र आणण्याची ताकद ठेवतो".
बाकी काय तेच, "जय महाराष्ट्र!!"