Growing Dots

Growing Dots Growing Dots - For Students, Teachers and Schools

नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून सोशल मिडियापासून दूर होतो.  आता पुन्हा अॅक्टिव होत आहे. काल औद्योगीक शिक्षण मंडळाच्...
01/09/2024

नमस्कार मित्रांनो

बऱ्याच दिवसांपासून सोशल मिडियापासून दूर होतो. आता पुन्हा अॅक्टिव होत आहे.

काल औद्योगीक शिक्षण मंडळाच्या (ASM) जुनियर कॉलेज मधील मुलांची Fresher's Party होती. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते.

कार्यक्रमाला सोबत ASM ग्रुप चे चेअरमन डॉ. संदीप पाचपांडे, होप या संस्थेचे संस्थापक डॉ. विजय मोरे, पोलिस इंस्पेक्टर श्री. डोंगरे आणि प्रिन्सिपल मॅडम कविता उपलंचिवर उपस्थित होत्या.

त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे..

15/04/2024
नमस्कार मित्रांनो दिनांक १४/१५ मार्च रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी - अटल इंकूबेशन सेंटर, नीती आयोग - भारत सरकार, Forum f...
18/03/2024

नमस्कार मित्रांनो

दिनांक १४/१५ मार्च रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी - अटल इंकूबेशन सेंटर, नीती आयोग - भारत सरकार, Forum for Innovation & Application यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मीरा भाईंदर येथे आयोजित केलेल्या आयडियाबाज 2024 या संमेलनात राज्यभरातील 101 कल्पक, आयडीयाबाज उद्याजकांनी भाग घेतला. शिक्षण, शेती, नागरी विषय आणि उद्योग या चार क्षेत्रात प्रकल्पांचे सादरीकरण झाले. या विषयातील प्रत्येकी दोन उत्कृष्ठ सहभागी प्रकल्पांना पुरस्कार देण्यात आला.

त्यात इंडियन इंस्टीट्यूट ऑफ नॉलेज (IIK) यांच्या Growing Dots - परख उपक्रमाला शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ठ सहभागी प्रकल्प म्हणून सन्मानित करण्यात आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी चे कार्यकारी संचालक श्री जयंत जी कुलकर्णी आणि भारतीय किसान संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री श्री चंदन जी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार घेतांना IIK चे संस्थापक निलेश छडवेलकर, सचिन नालापुरे आणि निलीमा प्रशांत कोठावदे.

Atal Innovation Mission NITI Aayog Rambhau Mhalgi Prabodhini Atal Incubation Centre- Rambhau Mhalgi Prabodhini
#कल्पकमित्रांचेराज्यस्तरीयसंमेलन #स्टार्टअप #उद्योजकता #नवकल्पना #महाराष्ट्र

नमस्कार मित्रांनोनुकताच आपली संस्था  इंडियन इंस्टीट्यूट ऑफ नॉलेज (Growing Dots) आणि जगातील सर्वात मोठी रेडियो टेलिस्कोप ...
16/03/2024

नमस्कार मित्रांनो

नुकताच आपली संस्था इंडियन इंस्टीट्यूट ऑफ नॉलेज (Growing Dots) आणि जगातील सर्वात मोठी रेडियो टेलिस्कोप GMRT यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन विज्ञान प्रयोग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. या प्रदर्शनात भारतातील 13 राज्यामधून 1060 विद्यार्थ्यांनी 699 विज्ञान प्रयोग प्रदर्शित केले. आता पर्यन्त या ऑनलाइन प्रदर्शनाचे 40000 पेक्षा जास्त views झाले आहेत. आपणही आपल्या मुलांना दाखवा. Growing Dots app डाउनलोड करा. लिंक : https://bit.ly/3e2QQyB

या कार्यक्रमाला Dr. Afroz Chishti, Director, Geological Survey of India (GIS), प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोबत Prof. Ishwara Chandra (Dean, GMRT), Dr. J. K. Solanki (Head A&F, NCRA) आणि Shri. A. B. Jondhale (Administrative Officer, GMRT)उपस्थित होते.

त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे..

नमस्कार मित्रांनो28 फेब्रुवारी 24, नाशिक येथे सायन्स फोरम (नाशिक), इंडियन इंस्टीट्यूट ऑफ नॉलेज (Growing Dots) (पुणे), एल...
10/03/2024

नमस्कार मित्रांनो
28 फेब्रुवारी 24, नाशिक येथे सायन्स फोरम (नाशिक), इंडियन इंस्टीट्यूट ऑफ नॉलेज (Growing Dots) (पुणे), एलजी मोबाइल सायन्स लॅबोरेटरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे) यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विज्ञानगंगा - राज्यस्तरीय शालेय अभ्यासक्रमावरील विज्ञान अॅक्टिविटी व्हिडिओजच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला.

बाल वैज्ञानिक महोत्सवात मुलांचे प्रयोग बघायला मिळाले. ज्ञानात भर पडली. एक चांगला अनुभव मिळाला.

या कार्यक्रमाच्या वेळी श्री. डॉ. राजेंद्र वडणेरे, निवृत्त रजिस्टार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक, श्री. जयकृष्ण पुराणिक, जेष्ठ इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियंता आणि रविद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या सोबत मला उपस्थित राहता आले.
त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे..

विज्ञानगंगा - राज्यस्तरीय शालेय अभ्यासक्रमावर आधारित विज्ञान अॅक्टिविटी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे निमंत्रणका...
27/02/2024

विज्ञानगंगा - राज्यस्तरीय शालेय अभ्यासक्रमावर आधारित विज्ञान अॅक्टिविटी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे निमंत्रण

कार्यक्रमाची वेळ दि. २८ फेब्रु २०२४ वेळ दुपारी ३.३० वाजता

ऑनलाइन कार्यक्रमाची लिंक: https://youtube.com/live/hkTDGd_deTY

शालेय अभ्यासातील विज्ञान विद्यार्थ्यानी कृतीतून शिकावे या उद्देशाने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते.
पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थी आणि विज्ञान शिक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अश्या या अतिशय वेगळ्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रवींद्र शिक्षण प्रसारक मंडल, संभाजी चौक, द्वारका, नाशिक येथे आयोजित केला आहे.
शाळेचे लोकेशन
https://maps.app.goo.gl/8tNQVTJs535LNR3t9?g_st=iw
ही राज्य स्तरीय स्पर्धा असल्याने ज्यांना येणे शक्य नाही त्यांनी ऑनलाइन पद्धतीने हा कार्यक्रम जॉइन करावा ही विनंती.

उपक्रमाची ठळक वैशिष्टे
# # मूलभूत वैज्ञानिक संकल्पनावर आधारित विज्ञान प्रयोग
# # एकूण सहभागी विद्यार्थी आणि प्रोजेक्ट - १८५
# # सहभागी शाळा - २८

Note: ही संपूर्ण माहिती, आपल्या शाळेतल्या तसेच आपल्या परिचयातील इतर शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, विद्यार्थी यांच्या पर्यंत पोहोचवावी ही विनंती.

संपर्क
डॉ. प्रवीण जोशी - 94239 68110 , नोमन बागवान - +81497 47524

आयोजक
सायन्स फोरम (नाशिक), इंडियन इंस्टीट्यूट ऑफ नॉलेज (पुणे), एलजी मोबाइल सायन्स लॅब्रोटरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे)

आमंत्रण - विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अश्या तीन शैक्षणिक सेवांच्या उद्घाटनाचे आणि गर्जा महाराष्ट्र - महाराष्ट्राची ग...
05/08/2023

आमंत्रण - विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अश्या तीन शैक्षणिक सेवांच्या उद्घाटनाचे आणि गर्जा महाराष्ट्र - महाराष्ट्राची गौरव गाथा या राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल

१) Growing Dots - परख
२) Growing Dots - Scholar
३) कृतीतून विज्ञान (Activity based Science Learning) - शालेय अभ्यासक्रमावरील विज्ञान प्रयोग स्पर्धा

वरील उपक्रमांचे उद्घाटन आणि

४) गर्जा महाराष्ट्र - महाराष्ट्राची गौरव गाथा स्पर्धेच्या निकाल

वेळ: रविवार दि. ६ ऑगस्ट २०२३ सकाळी १० वाजता
online कार्यक्रमाची लिंक: https://www.youtube.com/watch?v=-41pazfCR8Y

कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक
मा. श्री. प्रकाश जावडेकर, खासदार, राज्यसभा

प्रमुख पाहुणे
मा. श्री. अ. ल. देशमुख, जेष्ठ शिक्षण तज्ञ
मा. श्री. विक्रम अडसूळ, राज्य संयोजक, ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र
मा. श्रीमती बेबीताई गायकवाड, मराठी भाषा प्रचारक, सामाजिक कार्यकर्त्या

विद्यार्थी आणि शाळांसाठी अतिशय उपयुक्त शैक्षणिक उपक्रम महाराष्ट्र स्तरावर सुरु होत आहेत. या उद्घाटन सोहळ्याला आपण उपस्थित राहून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे उपक्रम पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती.

निमंत्रक
लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम | विमल आपटे शैक्षणिक ट्रस्ट | मराठी शाळा संस्था चालक संघ | सायन्स फोरम, नाशिक | प्रिया नहार यांचे यश क्लासेस | दृष्टी व्हिजन फॉर फ्युचर | हेर्बायू वेलनेस इंडिया प्रा. लि. | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज, पुणे
www.growingdots.com

 # Talk with Scientist - Final ReminderJointly organized by GMRT - NCRA and Indian Institute of Knowledge, Puneनमस्कार,व...
27/11/2021

# Talk with Scientist - Final Reminder

Jointly organized by GMRT - NCRA and Indian Institute of Knowledge, Pune

नमस्कार,
विद्यार्थ्यांमधील curiosity वाढविण्यासाठी, विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी, भविष्यातील विविध करियर संधींबाबत जाणून घेण्यासाठी आजचा Talk with Scientist आपल्या मुलांना नक्की दाखवा. आणि आपल्या सर्व परिचित ग्रुप मध्ये share करा.

विशेष आकर्षण: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्र (Astronomy) या विषयावर विचारलेल्या प्रश्नांची प्रो. यशवंत गुप्ता यांची उत्तरे

दिनांक: आज 27th Nov 2021 - सायंकाळी 5 वाजता

Guest Scientist: प्रो. यशवंत गुप्ता, Centre Director, NCRA-TIFR, Department of Atomic Energy, Govt of India

Youtube Live: https://youtu.be/NpNcPGpCSwQ
Reminder set करायला विसरू नका.

निलेश छडवेलकर
www.growingdots.in

Indian Institute of Knowledge

A webinar Series for School Students jointly organized by NCRA - Department of Science & Technology, Government of India & Indian Institute of Knowledge, Pune

 # महत्वपूर्ण सूचना # शेवटचे ५ दिवस..गर्जा महाराष्ट्र - महाराष्ट्राची गौरव गाथा या स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची संधी....
11/05/2021

# महत्वपूर्ण सूचना
# शेवटचे ५ दिवस..

गर्जा महाराष्ट्र - महाराष्ट्राची गौरव गाथा या स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची संधी..

आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, गाणे, नृत्य, चित्रकला, acting या सारख्या कलागुणांना उत्तम वाव देणारी संधी उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती.

सहभागी होण्याची शेवटची तारीख: 15 मे 2021

सहभागी होण्यासाठी आजच download करा मोबाईल ऍप Growing Dots
Download करण्यासाठी https://bit.ly/3e2QQyB या link वर click करा८

Garja Maharashtra - State Level Online Video Completion अधिक माहिती साठीं Visit https://fb.watch/5bozVCxvyb

Note: आपले सर्व friends, शाळेचे सर्व group, नातेवाईक आणि परिचयातील सर्वांपर्यंत हा मेसेज आणि सोबतचा व्हिडिओ नक्की share करावा ही विनंती.

आयोजक
- Indian Institute of knowledge, Pune
- Lions Club of Pune Supreme, Pune
- Vimal Apte Education Trust, Goa
- Snehalay-Yuvanirman, Ahmadnagar
- Drushti Vision for Future, Pune
- Apple Media Works, Pune

30/04/2021

गर्जा महाराष्ट्र – महाराष्ट्राची गौरव गाथा️ : राज्यस्तरीय ऑनलाइन व्हीडीओ स्पर्धा🎖️

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात कंटाळलेल्या मुलांना Activity मध्ये गुंतवा आणि आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली गोष्टींची ओळख करून द्या.

सहभाग घेण्यासाठी लगेच Growing Dots App download करा. link: https://bit.ly/3e2QQyB

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या गौरवशी निगडीत ऐतिहासिक घटना, ठिकाणे, व्यक्ती, प्रसंग, उत्सव, संस्कृती, खेळ, यांच्यावर आधारित स्वतःच्या परफॉर्मन्सचा किंवा ऍक्टिव्हिटी चा 3 ते 4 मिनिटाचा व्हिडीओ विद्यार्थ्यांना ग्रोइंग डॉटस या मोबाईल ऍप वर अपलोड करायचा आहे. (व्हिडिओ upload करण्याची शेवटची तारीख 15 मे 2021: extended date)

त्यात भाषण, presentation, गाणे, डान्स, ऍक्ट, क्राफ्ट, आर्ट, चित्रकला, प्रोजेक्ट किंवा विद्यार्थ्यांना जे सुचेल, आवडेल ते त्यांनी सादर करावे.

१ ली ते १२ वी पर्यंतच्या ४ गटांसाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एका गटासाठी (प्रत्येकी) पहिले बक्षीस ५००० रुपये, दुसरे ३००० रुपये, तिसरे २००० रुपये आणि ५० उत्तेजनार्थ बक्षि‍सांसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल.

स्पर्धेचे सर्व नियम समजून घेण्यासाठी Growing Dots App download करा. link: https://bit.ly/3e2QQyB

महाराष्ट्रातील नव्या generation ला महाराष्ट्राची नव्याने ओळख करून देणाऱ्या या अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रमा मध्ये सहभागी होऊ या आणि महाराष्ट्राभिमान रुजवूया

आयोजक: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज (पुणे), लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम (पुणे), विमल आपटे एज्युकेशन ट्रस्ट (गोवा), दृष्टी - व्हिजन फॉर फ्युचर, स्नेहालय – युवानिर्माण (अहमदनगर), अॅपल मिडिया वर्क्स (पुणे)

Note:. आपले सर्व friends, शाळेचे सर्व group, नातेवाईक आणि परिचयातील सर्वांपर्यंत हा मेसेज आणि सोबतचा व्हिडिओ नक्की share करावा ही विनंती.

Address

D P Road
Pune
411007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Growing Dots posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Growing Dots:

Shortcuts

Share

Category