02/07/2025
*गुंजाळवाडी येथे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन*
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कार्यरत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत रावे ग्रुप कुरण व गुंजाळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन गुंजाळवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भरत टेमकर (शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव - पीक व्यवस्थापन), श्री. गोपीनाथ दिवेकर (संस्थापक, शाश्वत शेती मॉडेल - माती व्यवस्थापन) आणि सहाय्यक कृषी अधिकारी सौ. मनीषा भवारी मॅडम यांनी शासकीय कृषी योजनांबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, विश्वस्त श्री. प्रकाश पाटे (ग्रामोन्नती मंडळ, नारायणगाव), डॉ. रोहित निरगुडे (सहाय्यक प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद भुजबळ, गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. दिव्या सोलाट, उपसरपंच श्री. विघ्नहर सोलाट तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्रा. गिरीष निंबारकर, प्रा. मयूर जाधव, प्रा. चिराग भुजबळ, प्रा. पाटीलबा खाडे व प्रा. निकिता गोरडे यांनी विद्यार्थ्यांसमवेत या कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी दूत जीवन ताम्हाणे, प्रितम माने, रामकृष्ण बुट्टे, समर्थ सुर्यवंशी, पवन शेळके, अनिकेत मडके, अभिषेक गाढवे, प्रथमेश माळशिखरे, गोवर्धन मंदाडे, धिरज गुंड, श्रावणी जाधव, समृद्धी आसवले, वैष्णवी लंबे, श्रावणी काळे, समीक्षा जोरे, प्रीती शिंदे, समृद्धी घारगे व ऋतुजा चितळकर यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी लंबे तर आभारप्रदर्शन समृद्धी आसवले या कृषी कन्यांनी केले .