Prajna Vikas Jnana Prabodhini

Prajna Vikas Jnana Prabodhini Prajna Vikas Program is run by Jnana Prabodhini Educational Activty and Research Centre in various slums of Pune and Roha district in Konkan.

It aims developing intellectually gifted students.

As a future-first organization, we understand the importance of reducing the gender gap and providing opportunities to t...
11/10/2021

As a future-first organization, we understand the importance of reducing the gender gap and providing opportunities to the girl child. Over the years, we have been working through our initiatives- Pratham covering 5200 girls, helping 900 girls and to create an environment of safety and learning. Moreover, we are also supporting 26 visually challenged girls from the , to realize their dream of higher .

This International Girls Child Day, we celebrate and honour the girl child and encourage everyone to do their part to make a safe and nurturing atmosphere for girls to grow. Bharat Forge will continue the work to help girl students in gaining education and providing them with necessary resources and skills to build a successful life to lead the future of our nation.



Pratham Education Foundation Vikas Program.
Shala

प्रज्ञा विकास चे १२ वीचे विदयार्थीरायगडावर
22/11/2020

प्रज्ञा विकास चे १२ वीचे विदयार्थी
रायगडावर

20/03/2020

२. *कु. विद्या दयानंद मखरे*- (वेताळबाबा वसाहत, हडपसर)
महात्मा फुले वसाहत येथे राहणारी विद्या हिचे मुळगाव इंदापूर हे आहे. तिचे वडील व त्यांचे भाऊ अन्य कुटुंबातील सदस्य कामधंद्यासाठी पुण्यात येऊन राहिले. काही वर्षे ते महात्मा फुले वस्ती येथे राहात होते, याच वर्षी ते उरळी देवाची येथे काही महिन्यांपूर्वी राहायला गेले होते. विद्याचे वडील टेंपो चालक आहेत. रोज काम मिळतेच असे नाही. त्यामुळे तिची आई देखील एका गोडाऊन मध्ये कामाला जाते, रोजचे १२५ ते १३० रु. मिळतात.
घरात तिघी बहिणी, एक दहावीला तर एक चौथीला. दोघींची शाळा उरळी देवाची येथे प्रवेश घेऊन सुरु झाली. विद्याने हडपसर येथील प्रज्ञा विकासच्या नियमित तासांना यायचा आग्रह ठेवला. हडपसर येथील विद्यानिकेतन शाळेतच राहायचे आहे असे तिने घरी सांगितले. त्यामुळे तिची प्रज्ञा विकासच्या वर्गांत नियमित उपस्थिती राहिली. देवाची उरळी या ठिकाणा वरून सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी देखील प्रज्ञा विकास वर्गाला नियमित उपस्थित राहिली. कामाचा वा अभ्यासचा कंटाळा न करणारी, सर्वांना समजून घेणारी, सर्वजण या वर्गाला यावे यासाठी वस्तीत धडपणारी, सर्वांचा आदर करणारी, वर्गात हसतमुख राहणारी विद्या दयानंद मखरे NMMS परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव आल्या बद्दल तिचे खूप खूप अभिनंदन.

20/03/2020

*यशस्वी विद्यार्थ्यांविषयी विशेष माहिती*:-
१. *कु. नम्रता शशिकांत पाटोळे* – (जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे)
मु. पोस्ट मेंढापूर, ता. पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील शशिकांत पाटोळे यांचे कुटुंब हे कामा निमित्ताने पुण्यात जनता वस्तीत राहायला आले. ते स्वतः हमालीचे काम करतात. नम्रताची आई चार – पाच घरी धुणीभांडीचे काम करते. त्यांना एकूण चार मुली व एक मुलगा, नम्रता कुटुंबात सर्वात मोठी. साहजिकच आई वडील दोघेही कामाला जात असल्यामुळे तीला घरातील स्वयंपाक, लहान बहीण भावंडाना सांभाळणे ही देखील कामे करावी लागतात. आणि त्यातून वेळ मिळेल तसा, अभ्यासाला वेळ देणे.
तिचे विशेष कौतुक करावेसे वाटते कारण तिच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची असताना देखील तिचे आई वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ती हुशार असल्यामुळे तिला आम्ही काही करून चांगले शिक्षण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असे विचार असल्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो. ती जनता वसाहतीत ज्या ठिकाणी राहते तेथील आजूबाजूची परिस्थिती पाहता असे यश मिळविणे खरंच कठीण वाटते.
अभ्यासाबरोबर उत्तम वक्तृत्व गुण, नेतृत्वगुण देखील वेळोवेळी ती वेगवेगळ्या उपक्रमामधून दाखवून देत असते. प्रज्ञा विकास कार्यक्रम (जनता वसाहत) मध्ये नियमित येणारी विद्यार्थिनी नम्रता शशिकांत पाटोळे हिने आपल्या चिकाटीने NMMS परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले त्याबद्दल तिचे, तिच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
तिच्या चिकाटीला योग्य मार्गदर्शन करणारे प्रज्ञा विकास कार्यक्रमची संपूर्ण टीम, स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी, शाळेतील मार्गदर्शक यांचे देखील अभिनंदन. विशेष म्हणजे म.न.पा. च्या जनता वसाहतीतील शाळेत ज्या पालकांची परिस्थिती हलाखिची आहे असेच पालकांचे मुले-मुली या शाळेत घालतात असे चित्र आहे. जनता वसाहतीतून रिक्षा व व्हॅन चा प्रवास करून बाहेर शाळेत जाणारे देखील बहुसंख्य विद्यार्थी आहेत.
यावर्षी ‘प्रज्ञा विकास कार्यक्रमातून’ विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेची माहिती देण्यात आली. तसेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेत देखील हि माहिती पोहचविली. प्रत्येक शाळेत एक पत्र देऊन विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसविण्याचे आवाहन केले. म.न.पा. च्या जनता वसाहतीतील शाळेने या आधी या परीक्षेला विद्यार्थी बसविले नव्हते. त्यामुळे प्रज्ञा विकास कार्यक्रमाचे शिक्षक व शाळेतील शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरले. पहिल्यांदा तेथून १८ विद्यार्थी या परीक्षेला बसविले गेले. त्यापैकी चार विद्यार्थी पास झाले होते. काल नम्रताला स्कॉलरशिप मिळाली याचा आनंद झाला. केलेल्या कष्टाचे चीज झाले. नम्रताला तिच्या उत्तम वाटचालीसाठी तिला *खूप खूप शुभेच्छा*💐💐

*ज्ञान प्रबोधिनी आणि भारत फोर्ज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने* सुरु असलेल्या*प्रज्ञा विकास कार्यक्रम* पुणे चे *NMMS परी...
20/03/2020

*ज्ञान प्रबोधिनी आणि भारत फोर्ज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने* सुरु असलेल्या
*प्रज्ञा विकास कार्यक्रम* पुणे चे *NMMS परीक्षेतील यशस्वी वाटचाल*
या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेला प्रज्ञा विकास कार्यक्रमातील तीस विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एकूण ११ विद्यार्थी यशस्वी झाले होते. यातून दोन विद्यार्थिनींची पुढील चार वर्षे शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे.
गेली सहा वर्षे पुण्यातील विविध वस्ती भागातील निवडक विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञा विकास कार्यक्रमा अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. विविध आर्थिक सामाजिक गटातील, जाती-धर्मातील विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी आहेत.
या वर्षी पहिल्यांदाच ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सहकार्याने NMMS परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊ शकतो असे ठरले. त्यानुसार मा. सविताताई कुलकर्णी (प्रमुख, स्पर्धा परीक्षा केंद्र) व मा. विवेकराव कुलकर्णी (मार्गदर्शक, स्पर्धा परीक्षा केंद्र) यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ३५-४० स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या(UPSC) विद्यार्थी गटाने यात विविध विषयांचे मार्गदर्शन वर्ग घेतले. ऑगस्ट ते नोहेंबर या कालावधीत एकूण दहा रविवार, सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या वर्गांमध्ये मार्गदर्शन सत्रे झाली. या मार्गदर्शन सत्रासाठी मार्गदर्शक विद्यार्थ्यानी अभ्यास साहित्य तयार केले. सर्व साहित्य सराव परीक्षेसाठीचे पेपर, चाचण्या प्रज्ञा विकासच्या कार्यालयात टंकित केल्या गेले. यासोबत विद्यानिकेतन (शुक्रवार पेठ पुणे) शाळेची मागणी आली, आमच्या शाळेतच वर्ग घ्यायला या तेथेही वर्ग सुरु झाले. अभ्यास पूरक तयार साहित्याचा उपयोग विद्यानिकेतन शाळेतील तासिका घेताना तसेच शैक्षणिक उपक्रम संशोधिकेच्या अन्य उपक्रमात देखील त्याचा वापर केला.
आपणा सर्वांना कळविण्यात आनंद होतो कि प्रज्ञा विकास मधील दोन विद्यार्थी व विद्यानिकेतन मधील पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र झाली आहेत. *सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन*.

21/02/2020

ज्ञान प्रबोधिनी आणि भारत फोर्ज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या अनुभव शाळेतील काही छायचित्र आपल्या सर्वांसाठी. सध्या महात्मा फुले वस्ती हडपसर, कम्युनिटी सेंटर केशवनगर व गायरान वस्ती केशवनगर येथे अनुभव शाळेचे वर्ग रोज सायंकाळी भरतात.

Shivjayanti celebrating at keshavnagar
19/02/2020

Shivjayanti celebrating at keshavnagar

डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते.. त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली..नंतर...
23/07/2019

डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते..
त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली..

नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की ,पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील 'एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग' ला प्रवेश घ्यावा लागतो !..
मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले !..खुप रडले!..

परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले !...

नंतर एयरोमॉटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली ,त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते !..

त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची !..

त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या!.अर्ज आठ !.. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर !..

ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!.

डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली!..
डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे,या निर्णयामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारले !..

डॉ. कलाम खुप हताश झाले !..

रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरीद्वारच्या मठात गेले !..

तेथील स्वामीजींनी सांगीतले, " का ऊदास होतोस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही !.. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल !..

डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले!..
दुस-या दिवशी पेपरमधे,"एयरोनाॅटीकल इंजीनियर पाहीजे" अशी जाहीरात होती, कुण्या विक्रम साराभाईंची !.. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट !..

ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कँडीडेट!..

एकच जागा !..

यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली !..

दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले, "सांगा विमान कुठे घेऊन जायचे?"..

विक्रम साराभाई म्हणाले, "आपल्या जवळ विमानच नाहीये ..आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील!"..

पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे !..

तर मित्रांनो !.. तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्ये़य मिळवू शकले नसाल, तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !...

कदाचित तुम्ही भारताचे भावी कलाम सर असाल !..

"जीवनात अयशस्वी जरी झालोत
तरी निराश होऊ नये
कारण,
F.A.I.L. चा अर्थ
First Attempt In Learning
असाच आहे..!!

प्रयत्नांना कधीही
शेवट नसतो
कारण,
E.N.D. चा अर्थ
Efforts Never Dead
असाच घेऊयात..!!

आयुष्यात कोणाकडूनही
नकार आला तरी
खचून जाऊ नये
कारण,
N.O. म्हणजे
Next Opportunity
म्हणून नेहमी आशावादी राहुयात
आणि
जीवनात पुढेच चालत राहुयात...........

07/01/2019

Prada Vikas program student singer

राजगडावर प्रज्ञा विकास कार्यक्रमातील निवडक मुलांसह. रात्री गडावर अंधारात चढलो. दुसऱ्या दिवशी सकाळी गड पाहून आलो.
05/12/2018

राजगडावर प्रज्ञा विकास कार्यक्रमातील निवडक मुलांसह. रात्री गडावर अंधारात चढलो. दुसऱ्या दिवशी सकाळी गड पाहून आलो.

English communication Keshavnagar
27/11/2018

English communication Keshavnagar

Address

Sadashiv Peth
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prajna Vikas Jnana Prabodhini posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Prajna Vikas Jnana Prabodhini:

Shortcuts

Share

Category