WERC - A BJS Initiative 32 Years of Impact

WERC - A BJS Initiative 32 Years of Impact

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from WERC - A BJS Initiative 32 Years of Impact, Educational Research Center, BJS School Wagholi, Pune.

The Wagholi Educational Rehabilitation Centre (WERC), founded in 1993 by Bharatiya Jain Sanghatana (BJS), has been a sanctuary of hope for children affected by natural disasters and those from families impacted by farmer suicides.

26/09/2025

प्रफुल्ल पळसकर – शिक्षणातून समाजाला नवा दृष्टिकोन!

प्रफुल पळसकर हे मेलघाटच्या आदिवासी पार्श्वभूमीतले आहेत. BJS ने अशा अनेक विद्यार्थ्यांना WERC मध्ये आणून शिक्षणाची संधी दिली, त्यांना जबाबदार नागरिक बनवलं आणि भविष्यात स्वतःच्या समाजाला उभारण्यासाठी तयार केलं.
प्रफुल पळसकर 1997 ते 2004 या काळात WERC मध्ये राहिले आणि शिक्षण पूर्ण केले.
या व्हिडिओत ते संस्थापक श्री शांतिलालजी मुथ्था यांचे त्यांच्यावर आणि त्यांच्या समाजावर केलेल्या सकारात्मक बदलासाठी मनःपूर्वक आभार व्यक्त करतात.
हा प्रवास प्रेरणादायी आहे – एक विद्यार्थी, एक समाज, आणि शिक्षणातून निर्माण होणारी परिवर्तनशील शक्ती.
हा व्हिडिओ नक्की पहा आणि 30 सप्टेंबरच्या ‘नियतीचे चक्र’ कार्यक्रमासाठी तयार व्हा!

लातूर-उस्मानाबाद भूकंपाला आणि भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. 

या सेवेच्या प्रवासात केवळ प्रशासकीय नव्हे, तर सामाजिक जाणिवेने, विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या पुनर्वसन कार्यात पाठीशी उभे राहणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे ३० सप्टेंबर २०२५ रोजी वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे येथे होणार्‍या ‘नियतीचे चक्र’ या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधायला येत आहेत.त.
.
.
.
.
.

#नियतीचेचक्र #WERCTheUnbrokenSaga #BJSTearsToFrontiers #ThePhoenixGeneration #bharatiyajainsanghatana #देवेंद्रफडणवीस #फडणवीस #DevendraFadnavis #Devabhau #cmomaharashtra #bjp #bjp4india #BJP4Maharashtra

BJP Maharashtra Bjp4india 26/09/2025

लातूर-उस्मानाबाद भूकंपाला आणि भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. या सेवेच्या प्रवासात केवळ प्रशासकीय नव्हे, तर सामाजिक जाणिवेने, विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या पुनर्वसन कार्यात पाठीशी उभे राहणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे ३० सप्टेंबर २०२५ रोजी वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे येथे होणार्‍या ‘नियतीचे चक्र’ या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधायला येत आहेत.त. . . . . . #नियतीचेचक्र #WERCTheUnbrokenSaga #BJSTearsToFrontiers #ThePhoenixGeneration #bharatiyajainsanghatana #देवेंद्रफडणवीस #फडणवीस #DevendraFadnavis #Devabhau #cmomaharashtra #bjp #bjp4india #BJP4Maharashtra BJP Maharashtra Bjp4india

26/09/2025

अमर सुरेश बिराजदार – जेव्हा घटना बनते एका निर्णायक वळणाचं कारण!

1993 च्या लातूर भूकंपानंतर उद्ध्वस्त झालेल्या अनेक बालकांपैकी एक होते अमर.
1993 ते 2001 या काळात त्यांनी वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात (WERC) राहून आपलं शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण केलं.
संस्थापक श्री शांतिलालजी मुथ्था यांच्या या विचाराने — "घटना ही क्षणात नव्हे, तर एका निर्णायक वळणात रूपांतरित व्हावी." अमर यांना आयुष्याचा नवा अर्थ दिला आणि एक ठाम निर्णय घ्यायला प्रवृत्त केलं.
आज अमर स्वतः भूकंपग्रस्त मुलांसाठी कार्यरत आहेत – त्यांच्या गरजा पूर्ण करत, त्यांचं जीवन घडवत आणि त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत.
‘नियतीचे चक्र’ या विशेष कार्यक्रमात 30 सप्टेंबर रोजी ते पुन्हा एकदा WERCमध्ये सहभागी होणार आहेत.
त्यांचा हा प्रवास, ही परतफेड — नक्की पाहा, नक्की अनुभवा!

#नियतिचेचक्र #वाघोलीपुनर्वसन #1993भूकंप #लातूरभूकंप , ,

येत्या ३० सप्टेंबरला लातूर-उस्मानाबाद भूकंपाला आणि भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. १९९३ ला किल्लारी भूकंपाच्या कठीण काळात, पुनर्वसनाच्या कामात ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून आम्हाला थेट व निर्णायक साथ दिली असे आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब हे वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे येथे होणार्‍या ‘नियतीचे चक्र’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करायला येत आहेत.
तर भेटूयात ३० सप्टेंबर २०२५ रोजी!
.
.
.
.
.
.
#नियतीचेचक्र #WERCTheUnbrokenSaga #BJSTearsToFrontiers #ThePhoenixGeneration #bharatiyajainsanghatana #शरदपवार #साहेब #ncp #sharadpawar #sharadpawarsaheb #pawarsaheb #राष्ट्रवादी #werc

💪Sharad Pawar Fan Club💪 Sharad Pawar Yashwantrao Chavan Centre 25/09/2025

येत्या ३० सप्टेंबरला लातूर-उस्मानाबाद भूकंपाला आणि भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. १९९३ ला किल्लारी भूकंपाच्या कठीण काळात, पुनर्वसनाच्या कामात ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून आम्हाला थेट व निर्णायक साथ दिली असे आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब हे वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे येथे होणार्‍या ‘नियतीचे चक्र’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करायला येत आहेत. तर भेटूयात ३० सप्टेंबर २०२५ रोजी! . . . . . . #नियतीचेचक्र #WERCTheUnbrokenSaga #BJSTearsToFrontiers #ThePhoenixGeneration #bharatiyajainsanghatana #शरदपवार #साहेब #ncp #sharadpawar #sharadpawarsaheb #pawarsaheb #राष्ट्रवादी #werc 💪Sharad Pawar Fan Club💪 Sharad Pawar Yashwantrao Chavan Centre

24/09/2025

शिवानंद वैरागकर – नियतीवर मात करणारा, वाघोली केंद्राचा एक दीपस्तंभ!

1993 च्या भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याला नवा दिशा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांपैकी एक होते शिवानंद.
1994 ते 2004 या कालखंडात त्यांनी वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात (WERC) राहून शिक्षण पूर्ण केलं.
भारतीय जैन संघटनेच्या (BJS) प्रयत्नांमुळे त्यांना शिक्षण, आधार आणि आत्मभान मिळाले.
आज ते पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत आहेत.
‘नियतीचे चक्र’ या विशेष कार्यक्रमात 30 सप्टेंबर रोजी WERCमध्ये ते सहभागी होणार आहेत.
त्यांचा प्रवास, त्यांचे अनुभव – त्यांच्या तोंडून ऐका. हा प्रेरणादायी व्हिडिओ जरूर पाहा!

#नियतिचेचक्र #प्रेरणादायीप्रवास #नियतीचाचक्र #भूकंपस्मृती #शिक्षणाचीजादू

24/09/2025

भैरवनाथ लहोटकर – वाघोलीच्या प्रवासातून 𝙄𝙄𝙏 बॉम्बेपर्यंतचा आत्मविश्वासाचा आलेख!

1993 च्या लातूर भूकंपात बालपण गमावलेल्या हजारो मुलांपैकी एक होते भैरवनाथ.
1993 ते 2000 या काळात त्यांनी वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात (WERC) राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं.
भारतीय जैन संघटनेच्या (BJS) मिळालेल्या आधाराने भैरवनाथ यांनी त्याच प्रेरणेतून स्वतःची यशोगाथा घडवली.
आज भैरवनाथ लहोटकर IIT बॉम्बेमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत – एक संवेदनशील, प्रगल्भ आणि यशस्वी प्रशासक म्हणून.
30 सप्टेंबर रोजी ‘नियतीचे चक्र’ या विशेष कार्यक्रमात ते पुन्हा एकदा WERCमध्ये सहभागी होणार आहेत – त्या भूमीत जिथून त्यांच्या यशाची खरी सुरुवात झाली.
हा त्यांचा प्रवास – संघर्ष, संधी आणि सिद्धी यांचं जिवंत उदाहरण आहे.
हा प्रेरणादायी व्हिडिओ जरूर पाहा!

#नियतिचेचक्र



#संघर्षसिद्धी #प्रेरणादायीप्रवास #भारतीयजैनसंघटना #शैक्षणिकपुनर्वसन

24/09/2025

Watch a heartfelt message from Bharatiya Jain Sanghatana (BJS), Pune, Founder Shri Shantilal Muttha, about our upcoming WERC Event.

When destiny broke them, hope rebuilt them.

This project was never just about free food or free education. It was, and is, about transforming lives. For 32 years, WERC has sheltered and educated 2,500+ children like earthquake survivors, orphans, tribal kids, and children of farmer su***de victims.

These children stayed here for 5-10 years, studied, grew, and today, they are shaping society with their work and values. On 30th September at Wagholi, let’s come together to witness how hope rebuilds lives and how these children are now becoming the changemakers of our nation.

A historic gathering awaits, with the gracious presence of Hon. Shri Sharadchandra Ji Pawar, Hon. CM Devendra Ji Fadnavis, Hon. Deputy CM Ajit Ji Pawar, and Hon. Dr. Abhay Firodia ji.

#नियतीचेचक्र

23/09/2025

१९९३ साली किल्लारी भूकंपात होत्याचं नव्हतं झालं; पण भारतीय जैन संघटनेने आशेचा एक नवा अध्याय सुरू केला, तो म्हणजे वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प (WERC)! ३२ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास, आज शेकडो मुलांच्या यशाची गाथा सांगतो.

नियतीच्या चक्रातून होरपळून निघालेली हीच मुले आज समाजासाठी प्रेरणा ठरत आहेत. या विलक्षण परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वा. वाघोली येथे एकत्र येऊया.

आपण सादर आंमत्रित आहात.

#नियतीचेचक्र

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


BJS School Wagholi
Pune
412207