Khelghar Pune

Khelghar Pune Khelghar is a project of Palakneeti Pariwar considering concept of social parenting at its core Khelghar is one of the projects of Palakneeti Pariwar.

Khelghar is based on the concept of social parenting, which extends idea of parental care from individual to public sphere. The essence of social parenting lies in helping those in need. Khelghar is founded and built on this idea. Khelghar works with children from Laxminagar slum in Kothrud area of Pune city. The children here are deprived of a childhood as it should be. Khelghar aspires to alter this situation by creating an environment where learning is an enjoyable and meaningful experience!

06/11/2025
15/05/2025

आनंदाची बातमी
खेळघरातील दहावी आणि बारावीची सर्व मुले पास झाली. दहावीची परीक्षा दिलेली एकूण 15 मुले अणि 12 वीची परीक्षा दिलेली एकूण 4 मुले
पास झाली.
*10th रिजल्ट*
77% - 1 children
70-75% - 2 children
60-70% - 4 children
50-60% - 4 children
40-50% - 4 children
*12th रिजल्ट *
60-70% - 2 children
50-60% - 2 children
मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी त्यांच्या पुढील शिक्षणासंदर्भात संवाद चालू आहे.

19/10/2024

नोव्हेंबर एंडला खेळघरात मुलांचे gatharing करायचे आहे. तयारी सुरू झाली आहे.
आपल्याला मुलांची नाटके, गाणी, डान्स किंवा इतर काही कार्यक्रम बसवून घेण्यासाठी मुलांबरोबर काम करण्यात रस असेल तर जरूर संपर्क करा .
शुभदा ( ९८२२०९४०९५ )

27/09/2024

*गम्माडी गंमत*
चिकू piku हे मासिक खेळघरात मुलांना फार आवडते. त्यामुळे अमृता कावणकरताईंनी जेव्हा, "आपण गम्माडी गमंत हा प्रोग्राम खेळघरात करू या का?" असे विचारले तेव्हा आम्ही उडीच मारली. बेस्ट! लहान मुलांना पर्वणीच!
गाणी, खेळ आणि गोष्टी म्हणजे धम्माल येणार हे सरळच होते.
खेळघरातदेखील आम्ही याच गोष्टींचा हात धरून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतो.
२० सप्टेंबरला प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी मोठी चित्रे असलेले standy आणि वाद्ये अशी तयारी पाहून मुले, मोठी माणसे न बोलवताच जमा झाली.
धम्माल गाणी आणि ती देखील वाद्य आणि अभिनयासह ! मुले एकदम खुश होऊन गेली.
सुरवातीला टाळीचा खेळ,सशाचे आणि सांग सांग भोलानाथ हे गाणं, सा रे ग म प ध नी सा ची गोष्ट हे सारे सादरीकरण मुलांना गोष्टींच्या जगात घेऊन गेले.
त्यानंतर मुलांशी गप्पा झाल्या, तुमच्या हातात जादू आली तर कोणते प्राणी तयार कराल जोडून गाणं झालं - हातात माझ्या जादू आहे ...
ऊ ची गोष्ट तर कमाल होती.
मुलं हे सारं अनुभवण्यात दंग होऊन गेली होती. एक तास झाला तरी कंटाळली नाहीत, की दंगा केला नाही.
सादरीकरण करणारी मंडळी एकदम energatic होते. त्यांनी मुलांना कधी आपलेसे करून घेतले कळलंच नाही.
समिरण बर्डे, परितोष ठाकर,आदित्य मराठे, मृण्मई, कल्याणी देशपांडे, बद्रीष कट्टी, अभि पाठक, विकी कांबळे आणि सगळ्या कार्यक्रमाचा धागा जोडणाऱ्या
स्वरा ताई यांचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि कौतुक!
चिकू piku ची आमच्याशी हा स्नेहबंध असाच रहावा अशी मनापासून इच्छा!
सारिका जोरी

04/09/2024

लिपीचा उंबरठा ओलांडताना मुलांना मदत होईल असे एक मस्त शैक्षणिक साधन खेळघराने तयार केले आहे, ‘चित्रांचा हात धरून...’यासाठीची चित्रे अपर्णा कमलाकर यांनी तयार केली आहेत. व्हिडिओ बघून त्याची कल्पना येईल. एका संचाची किंमत रु. १०००/- एका संचात ११ laminated चित्रं आहेत. ( कुरिअरचा खर्च वेगळा असेल )संपर्क - ९७६३७०४९३०

*२६ जुलैचा थेट भेट कार्यक्रम*२५ तारखेला लागून राहिलेल्या संततधार पावसाने कार्यक्रम करता येतोय की नाही असा पोटात गोळा आला...
27/07/2024

*२६ जुलैचा थेट भेट कार्यक्रम*

२५ तारखेला लागून राहिलेल्या संततधार पावसाने कार्यक्रम करता येतोय की नाही असा पोटात गोळा आला होता. पण पावसावर विश्वास ठेवला आणि पावसाने साथ दिली...कार्यक्रम उत्तम पार पडला.

कार्यक्रमाची आखणी आणि कार्यवाही खेळघराच्या युवक गटाच्या मुला - मुलींनी मिळून केली होती.

मुले आणि पाहुणे यांच्या प्रश्र्नोत्तरांच्या रुपातल्या संवादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
त्यानंतर दहावी, बारावी आणि डिग्री परीक्षा पास झालेल्या मुलांना त्यांच्या उपयोगाची छोटी गिफ्ट देऊन कौतुक केले.

नंतर गेल्या वर्षभरात युवक गटात केलेल्या उपक्रमांच्या बद्दल मुलांनी PPT chya माध्यमातून प्रेझेंटेशन केले.

दरवर्षी मुले नर्मदा जीवनशालांच्या
बालमेळयाच्या कार्यक्रमात मदत करायला चार दिवसांसाठी जातात. मुलांसाठी हा एक भारावून टाकणारा अनुभव असतो. मुलांनी या विसीटची एक छोटी फिल्म तयार केली होती. मुले अगदी भरभरून बोलत होती त्यांच्या अनुभवाबद्दल! लोकशाही उत्सव, मित्र मिलाफ कार्यक्रम, त्यांच्या सहली, workshops याबद्दल मुलांनी मांडणी केली. Wipro run च्या कार्यक्रमात मुलांनी जो डान्स केला होता तो इथेही करून दाखवला.

यानंतर हिरम्मा या आमच्या सीनिअर विद्यार्थिनीने तिच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल इंग्लिशमधून केलेली मांडणी आम्हा सगळ्यानाच चकित करून टाकणारी होती.
विवेकने त्याच्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्सच्या अनुभवाबद्दल सांगितले. हे सीनिअर विद्यार्थी नुकत्या दहावी झालेल्या मुलांसमोर रोल मॉडेल आहेत.

मुलांची energy, उत्साह आणि आनंद आम्हा सगळ्यांना देखील उमेद देऊन गेला.

आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचे खेळघरावर निरतिशय प्रेम आहे. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास आणि उत्साह त्यानाही खूप समाधान देऊन गेला.

ज्यांना कार्यक्रमाला काही कारणाने येता आले नाही त्यांच्यासाठी थोडक्यात लिहिले आहे ...

Address

Guruprasad Apartment, 23 Anand Niketan Society
Pune
411052

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khelghar Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Khelghar Pune:

Shortcuts

Share

Category