07/01/2026
"ए. सी. दिवेकर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने"उद्योजकता विकास कार्यशाळेचे" आयोजन =
ए. सी. दिवेकर महाविद्यालयात दिनांक 5-जानेवारी 2026 रोजी रसायनशास्त्र विभागाच्या वतीने "उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यशाळेचे" उद्घाटन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय विचारसरणी विकसित करणे व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त मा.अंकुश भाऊ दिवेकर होते.
कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शितोळे आणि प्रमुख पाहुणे नितीन बेंद्रे(उद्योजकता विकास केंद्र पुणे)यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्री. मोहन शितोळे(सीईओ सह्याद्री इलेक्ट्रीकल इंडस्ट्री बारामती)उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना उद्योजकतेचे महत्त्व, नवकल्पना, जोखीम घेण्याची तयारी आणि मेहनतीचे मूल्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले. “नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी देणारे बना,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.यावेळी श्री नितीन बेंद्रे यांनी "उद्योग व वित्तपुरवठा",श्री मोहन शितोळे यांनी,"मी उद्योजक कसा घडलो " ,डॉ. श्वेता काटे यांनी "व्यक्तिमत्व विकास" या विषयावर मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ.अनिल शितोळे यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्यविकास व उद्योजकता उपक्रमांची माहिती दिली. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना भविष्यात यशस्वी उद्योजक होता येईल, असे त्यांनी नमूद केले.उपप्राचार्य डॉ. शरद गाडेकर,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री सुजीत दिवेकर यांनी कार्यशाळेस शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमास IQAC समन्वयक प्रा डॉ सनिंधर गायकवाड, रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख व कार्यशाळे समन्वयक प्रा. डॉ कल्याण लांगोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा राणी नांदखिले ,प्रा. दीपाली थोरात व प्रा. काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ सुधीर पाटील यांनी मानले.
या उद्घाटन कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योजकता विकास कार्यशाळेच्या उद्घाटनाने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
07/01/2026
महाविद्यालया मध्ये शनिवार दिनांक ०३/०१/२०२६ रोजी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थीनी व उपस्थितींनी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ अनिल शितोळे, प्रा डॉ प्रविण आढाव, यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ नानासाहेब गोफणे यांनी मानले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेवक, राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
07/01/2026
वरवंड महाविद्यालयात Computer Science आणि Computer Application विभागाच्या वतीने Artificial Intelligence वरती गेस्ट लेक्चर आयोजित
शिक्षण संस्था संचलित एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालय वरवंड मध्ये कम्प्युटर विभागाच्या वतीने महाविद्यालयात दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी गेस्ट लेक्चर आयोजन करण्यात आले होते या लेक्चर चे गेस्ट वृषाली जाधव (मॅनेजर संभव फाउंडेशन) , त्रिवेणी जुरांगे (ट्रेनर), गायत्री लुंघे (एक्सपर्ट इन AI ट्रेनर) यांनी Artificial Intelligence विषयावरती खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये AI काय आहे, AI माध्यमातून निर्णय कसा घेऊ शकतो जसं की रोबोट्स, गेम खेळणे, त्याचबरोबर मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग काय आहे हे ही खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले.AI टूल्स काय आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा हे खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितले.AI चे टूल्स वापरून विद्यार्थ्यांना अभ्यास कसा सोपा होईल आणि विद्यार्थी कसे काळाच्या बरोबर चालतील हे खूप योग्य पद्धतीने समजावून सांगितले.
या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल शितोळे सर, BCA डिपार्टमेंट प्रमुख प्रा. प्रियंका शेळके , BCS डिपार्टमेंटचे प्रमुख प्रा. कुणाल दोशी , प्रा. सोनाली भगत, प्रा. प्रिया दिवेकर, प्रा. दीपिका जगताप, प्रा. मयूर दिवेकर, प्रा. प्रतिक्षा लोंढे, प्रा.ऐश्वर्या गवळी,प्रा. दिव्यानी दिवेकर ,प्रा.धनश्री बारवकर प्रा.अर्चना जगताप कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी कम्प्युटर सायन्स कम्प्युटर एप्लीकेशन डिपार्टमेंटचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.कुणाल दोषी यांनी केले व प्रा. प्रियंका शेळके यांनी आभार व्यक्त केले.
07/01/2026
बुधवार दिनांक ३१/१२/२०२५ रोजी महाविद्यालयातील NCC Unit ला कमांडीग ऑफीसर (2 MH BN Pune) कर्नल फिरदोश परवेझ दुबाश यांनी भेट दिली. NCC कॅडेट्स ने गार्ड ऑफ ऑनर देत त्यांचे स्वागत केले.कर्नल दुबाश यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करत त्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात ncc युनिट राबवताना शैक्षणिक कामकाजात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला आणि पुढील प्रगतीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी संस्थेचे चेअरमन मा.संजय आण्णा दिवेकर, विश्वस्त मा.अंकुश भाऊ दिवेकर, सुभेदार कुलवंत सिंह,नायब सुभेदार दयानंद, हवालदार के एस पन, प्राचार्य डॉ अनिल शितोळे,उप प्राचार्य डॉ शरद गाडेकर, कॅप्टन डॉ मंगेश पालवे,एनसीसी प्रमुख प्रा राणी नांदखिले व एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
07/01/2026
एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयातील वरवंड येथील मराठी विभागातील प्रा. डॉ. ज्योती सुबराव माने यांना रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाकडून लोकसाहित्य : वाड्मयीन संशोधन लेखन व वैचारिक प्रबोधन कार्याबद्दल लोकसाहित्य अभ्यासातील जेष्ठ विचारवंत दुर्गा भागवत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था व महाविद्यालया च्या वतीने हार्दिक अभिनंदन.
07/01/2026
महाविद्यालयातील गणित विभागातील माजी विद्यार्थीनी सौ पल्लवी अजित दिवेकर यांनी गणित विषया मध्ये Ph.D. हि पदवी संपादन केल्या बद्दल शनिवार दिनांक २७/१२/२०२५ रोजी त्यांचा संस्था व महाविद्यालया च्या गणित विभागाच्या वतीने संस्थेचे चेअरमन मा.संजय आण्णा दिवेकर, संस्थेचे विश्वस्त मा.अंकुश भाऊ दिवेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्री सागर दिवेकर यांनी महाविद्यालयास कुरकुंभ येथील अल्कली कंपनी कडून ८ लाख रुपये किंमतीची केमीकल मिळवून दिल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ अनिल शितोळे,श्री.अजित दिवेकर,श्री.सागर दिवेकर, प्रा आप्पासाहेब आढाव, प्रा . कुणाल दोशी, प्रा प्रियांका शेळके व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
17/09/2025
वरवंड महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागाच्या वतीने "AI in Education" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
09/09/2025
सोमवार दिनांक 08 -09-2025 रोजी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने *वाणिज्य विभागाअंतर्गत* वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी *Commerce Quiz* चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने बहुपर्यायी कॉमर्स प्रश्नमंजुषा स्पर्धा MCQ based 100 गुणांची घेण्यात आली.यामध्ये वाणिज्य शाखेतील 51 विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेचे आयोजन वाणिज्य विभाग प्रमुख व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा संगेश यादव , प्रा संगिता साळवे ,प्रा भारत उगाडे यांनी केले .
28/08/2025
महाविद्यालया मध्ये बुधवार दिनांक 20/08/2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना व महिला कक्ष विभागाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी डाॅ.योगिता तोडमल =वैद्यकीय अधिकारी (प्राथमिक आरोग्य केंद्र वरवंड )यांचे "युवतींचे अरोग्य "या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यातआले होते..महाविद्यालय विकास समीती सदस्य सौ योगिनीताई दिवेकर,प्रभारी प्राचार्य डाॅ.अनिल शितोळे यांनी मार्गदर्शन केले.स्वागत कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.नानासाहेब गोफणे,प्रा विद्या जगताप,प्रास्ताविक प्रा.डाॅ.ज्योती माने,सूत्रसंचालन प्रा संगिता साळवे,आभार प्रा हार्सुले यांनी मानले.यावेळी उप प्राचार्य डाॅ.शरद गाडेकर,कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.दत्तात्रय दुर्गाडे,प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.