05/09/2026
𝗚𝗿𝗼𝘂𝗽 𝗔𝘃𝘁𝗶𝘃𝗶𝘁𝗶𝗲𝘀
स्वानंदमध्ये इतक्या Group Activities का घेतल्या जातात? 🌿
काही activities अशा असतात, ज्या आई-बाबा मुलांसोबत घरीही सहज करू शकतात. मग त्या Daycare मध्ये सगळ्या मुलांना एकत्र घेऊन करण्यामागचा उद्देश काय?
🖌️🤾♂️🤸♀️🤾♀️😍🎨👯🧸🎴🎭
आपण मोठी माणसंही आपल्या वयोगटातील मित्र-मैत्रिणींमध्ये जास्त रमतो.
आजी-आजोबांनाही त्यांच्या समवयस्कांसोबत वेळ घालवायला आवडतो. मग मुलांनाही त्यांच्या वयाच्या मित्रांची गरज असणारच ना? ❤️
शाळेत समवयस्क मुले असतात, पण तिथे अभ्यास, वेळापत्रक आणि शिस्त यांना महत्त्व असते.
📕📚🖌️🖍️🗒️📉📚📒📖📙📕📚📒📝
पण मुलांना अशीही एक जागा हवी — जिथे घरासारखे मोकळे वातावरण असेल, जिथे आपल्या वयाच्या मित्रांसोबत मनसोक्त खेळता येईल, एकमेकांकडून शिकता येईल, छोट्या छोट्या गोष्टी share करता येतील, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे… मनमोकळेपणाने खुलता येईल. 🌈
👬👬👬👬👬👬👬👬👬👬👬👬👬👬👬👬👬
म्हणूनच स्वानंदमध्ये Group Activities म्हणजे केवळ Art & Craft किंवा एखादी Activity पूर्ण करणे नाही.
एकत्र खेळणे, एकत्र शिकणे, एकमेकांना समजून घेणे आणि मैत्रीचा आनंद अनुभवणे — हा त्यामागचा खरा उद्देश आहे.
आपल्या मुलांना घरासारखी माया आणि समवयस्क मित्रांचा सहवास — दोन्ही मिळावेत…
हीच स्वानंद Daycare ची कायम इच्छा. ❤
सप्टेंबर मध्ये घेतल्या जाणाऱ्या Events चे Time table दिले आहें
सर्वं पालकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा 👍