The Unique Foundation

The Unique Foundation Social intervention through education The Unique Foundation has been established under the aegis of The Unique Academy, Pune.

The Unique Academy is renowned for imparting quality coaching for UPSC/MPSC exams since last ten years. The Academy is driven by the broader goal of ushering in a fundamental change in the face and substance of the civil services in India. In order to broaden its horizons and strive towards the aim of positive social intervention to bring about social transformation, the Unique Academy is launchin

g the new initiative namely The Unique Foundation. It has been established with the core purpose of creating and widening the space for a positive intervention in the public realm with the motive of substantiating democracy and ultimately securing human emancipation through it. The main aim of The Unique Foundation is ‘Social intervention through Education, Research and Training’. Though the idea of the Foundation Center has been triggered off by a deep and minute understanding of the socio-political as well as economic condition of the state of Maharashtra and an urge to bring a positive transformation in it, by no means the Foundation wishes to confine itself to the study of Maharashtra per say, and definitely has a broader, national perspective in mind. In fact, the predicament that is facing Maharashtra is more or less similar to the kinds of problems being faced by the country as a whole. The famous ‘Tryst with Destiny’ has not been entirely fulfilled as per the expectations of the founding fathers of the Indian Constitution. We, as a nation, are still far off from the stated goals during the national freedom struggle namely, socio-economic equality and a life of dignity to one and all. The transition from the mixed and state-controlled economy to an open market/liberalized economy has put forth serious challenges in the process of achieving these goals. Hence, it is all the more necessary to reclaim the Indian state and ensure its accountability and responsibility towards its citizens in the wake of the alleged ‘withdrawal of the state’ in the era of globalization. The efforts of The Unique Foundation would be focused in this direction, as it wishes to make a positive intervention in the public arena through its activities in the area of education, research and training.

◆सांस्कृतिक क्षेत्रातील परिवर्तनवादी शस्त्र म्हणजे त्रैमासिक विचारशलाका : आ. ह. साळुंखे---------------------------------...
16/08/2026

◆सांस्कृतिक क्षेत्रातील परिवर्तनवादी शस्त्र म्हणजे त्रैमासिक विचारशलाका : आ. ह. साळुंखे
-------------------------------------------------------------------------------
◆ निवडक विचारशलाका ग्रंथसंच १ ते ६ ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू...
◆ संपादक प्राचार्य नागोराव कुंभार संपादित विचारशलाका या वैचारिक त्रैमासिकाचे मागील ४० वर्षातील निवडक लेख सहा खंडात "द युनिक फाउंडेशन" प्रकाशित करीत आहे.
◆ समकालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीत वैचारिक हस्तक्षेप करण्यासाठी महत्त्वपूर्ण लेख एकञित आणणे आणि ते तरूण पिढीपर्यंत पोहोचविणे हा संपादक व प्रकाशकांचा प्रामाणिक हेतू आहे.
◆ कृपया हे खंड आजच सवलतीत बुक करा,ही नम्र विनंती.
आपले विनित :

प्रा. नागोराव कुंभार | मुक्ता कुलकर्णी | डॉ. विवेक घोटाळे

Macro Economics आता मराठीतून उपलब्ध.....----------"स्थूल अर्थशास्ञ : एक परिचय" हे पुस्तक विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांन...
21/07/2026

Macro Economics आता मराठीतून उपलब्ध.....
----------
"स्थूल अर्थशास्ञ : एक परिचय" हे पुस्तक विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना देताना आम्हास आनंद होत आहे.अर्थशास्ञाचे नामवंत अभ्यासक व लेखक डॉ.अँलेक्स एम.थॉमस (अझीम प्रेमजी विद्यापीठ,बंगळुरू ) यांचे मूळ इंग्रजी पुस्तक केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केले असून त्याचा मराठी अनुवाद संशोधक शशांक पाटील यांनी केला आहे.
मूळात अर्थशास्ञ विषय अवघड,क्लिष्ट व तांञिक समजला जातो पण या पुस्तकाचा अनुवाद सुलभ झाल्याने विषय समजून घेण्यास सोपा जात आहे.अर्थशास्ञ व समष्टी अर्थशास्ञाची संकल्पना,चलन व व्याजदर,उत्पादन व व्याजदर,उत्पादन व रोजगाराचे स्तर,आर्थिक वृध्दी,आर्थिक सिध्दांत मांडणीचे महत्त्व,संपूर्ण रोजगाराचे धोरण उद्दिष्ट,महागाई दर कमी करणे,चांगल्या अर्थशास्ञाच्या दिशेने वाटचाल इत्यादी घटकांची सविस्तर व संदर्भासहीत मांडणी प्रस्तुत पुस्तकात करण्यात आली आहे.

पुस्तक मागविण्यासाठी संपर्क : 9922608687 / 8484086887

amazon वरही उपलब्ध : स्थूल अर्थशास्त्र एक परिचय | Macro Economics
https://amzn.in/d/06u1ZBe8

📘लवकरच प्रकाशित करत आहोत...--------------उपवर्गीकरण की125 पिढ्यांचा हिशोबलेखक - मिलिंद किर्ती---------------📘महाराष्ट्र ...
29/06/2026

📘लवकरच प्रकाशित करत आहोत...
--------------
उपवर्गीकरण की
125 पिढ्यांचा हिशोब

लेखक - मिलिंद किर्ती
---------------
📘महाराष्ट्र राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली आणि या समितीने मार्च 2026 मध्ये सरकारला अहवाल सादर केला. राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागामार्फत जनतेकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत.
📘या अहवालाच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट तयार झाले असून राज्यात याविषयांवर सर्वत्र चर्चा, परिसंवाद होत आहेत. मोर्चेे निघत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार, लेखक मिलिंद कीर्ती यांनी आपला दृष्टिकोन मांडणारी पुस्तिका लिहिली आहे.
---------------
📞 पुस्तिका मागविण्यासाठी संपर्क
8484086887 / 9922608687

📘'युनिक फाउंडेशन प्रकाशना' मार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास (NEP -2020) लागू होणारी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्य...
28/06/2026

📘'युनिक फाउंडेशन प्रकाशना' मार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास (NEP -2020) लागू होणारी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) बदललेल्या अभ्यासक्रम व नवीन पॅटर्ननुसार पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहे.
-------------------------------------------------------------------
📖ज्ञानप्राप्तीसाठी अभ्यासक्रम आणि त्याच्याशी सुसंगत पाठ्यपुस्तके (Text Books) असणे आवश्यक असते. शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत पाठ्यपुस्तके ही ज्ञान निर्मितीसोबतच सार्वजनिक दृष्टिकोन आकारास येण्यासाठीचे मूलभूत साधन असते. पाठ्यपुस्तकांचे महत्त्व व आवश्यकता लक्षात घेऊन ‌‘युनिक फाउंडेशन प्रकाशना' मार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास (NEP -2020) लागू होणारी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) बदललेल्या अभ्यासक्रम व नवीन पॅटर्ननुसार काही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहे.
📘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP-2020) सर्वच विद्यापीठांचे आणि स्वायत्त महाविद्यालयांचे अभ्यासक्रम बदलले आहेत. त्यानुसार बी.ए. आणि एम.ए. अभ्यासक्रमाची काही विषयांवरील पुस्तके संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात आली आहेत. संस्थेने यापूर्वी काही महत्त्वपूर्ण विषयांवर संशोधन करून त्याचे अहवाल प्रकाशित केले आहेत. शिवाय, काही सामाजिक-शैक्षणिक प्रश्न आणि वैचारिक मंथन करणारी पुस्तके प्रकाशित केली आहेत. आता विषयतज्ज्ञ अभ्यासकांच्या सहकार्याने अभ्यासक्रमावर आधारीत काही पुस्तके प्रकाशित केली आहे. गाईड किंवा नोट्स स्वरूपातील पुस्तकांच्या तुलनेत वेगळे, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना विषय समजण्याच्या दृष्टीने पुस्तकातील मजकुराची भाषा खूप क्लिष्ट-तांत्रिक न ठेवता सोपी व सुलभ ठेवली असून तसे करताना विषयाच्या आशयाला धक्का लागू नये याची काळजी घेतली आहे. लेखकांनी पुस्तक लेखनासाठी दर्जेदार मराठी आणि इंग्रजी संदर्भग्रंथांचा उपयोग केला आहे.
ही पुस्तके प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांना उपयुक्त ठरतील, अशी आम्हास आशा आहे.
-------------
🔸वरील सर्व पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येतील.
🔸युनिक फाउंडेशन प्रकाशनाची पुस्तके सवलतीच्या दरात मागविण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.
📞 8484086887 / 9922608687

📘डॉ. बाबासाहेब आंबेडकर :जातिनिर्मूलन, धम्‍म आणि लोकशाही-----------✍️ संपादक :डॉ. अशोक चौसाळकर-----------✍️अस्पृश्यता निव...
14/04/2026

📘डॉ. बाबासाहेब आंबेडकर :
जातिनिर्मूलन, धम्‍म आणि लोकशाही
-----------
✍️ संपादक :
डॉ. अशोक चौसाळकर
-----------
✍️अस्पृश्यता निवारण्याच्या बाबतीत अस्पृश्य श्रमजीवी जनतेचे हितसंबंध स्पृश्य श्रमजीवी जनतेच्या हितसंबंधातून वेगळे किंवा परस्परविरुद्ध असल्यामुळे अस्पृश्यवर्गाला आपला लढा लढविणे क्रमप्राप्त होते. याची कबुली देऊन आर्थिक लढ्यात मात्र स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी-कामकरी वर्गाचे हितसंबंध एकजीव आहेत. अर्थात, श्रमजीविकांना आपला लढा यशस्वी रितीने लढावयाचा असेल, तर जात-पात, धर्म, देश, वगैरे भेद मनात न आणता मजूर तेवढे सारे एक ही वर्गभावना मनात ठसवून घेऊन त्यांनी आपली अभेद्य संघटना केली पाहिजे.
- डॉ. रावसाहेब कसबे

✍️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, लोकशाही ही एक अशी जीवनपद्धती आहे ज्यामध्ये लोक सामूहिकरीत्या जीवन जगतात. त्या जीवनाची अनुभूती प्राप्त करतात. सर्व मानवमात्रांना मानव म्हणून एक प्रकारची प्रतिष्ठा प्रदान करण्याची ही पद्धत आहे. त्यातूनच विकसित व प्रगल्भ असा नागरी समाज विकसित होतो. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तीन तत्त्वे त्या समाजाचा पाया आहेत.
- डॉ.अशोक चौसाळकर

✍️स्वातंत्र्य व समतेच्या प्रस्थापनेत बाबासाहेबांचे राजकारण सामावलेले असते. आता व्यक्तीच्या क्षमतेच्या विकासासाठी अनुकूल परिस्थितीत समता असेल, तर व्यक्तीच्या विकासासाठी प्रतिकूल परिस्थिती मग विषमता ठरते. म्हणजेच ज्यात स्वातंत्र्य व समता नसते, ती विषमता असते. याच निकषाने बाबासाहेब हिंदू समाजरचनेत स्वातंत्र्य व समता नाही, म्हणजेच हिंदू समाज विषमतेवर रचित झालेला आहे, अशी मांडणी करतात.
- सुधाकर गायकवाड

✍️जातिबाह्य विवाहांऐवजी (Exogamy) आंतरजातीय विवाह (Endogamy) केले, तर जात व जातिप्रथा नामशेष होईल ही गोष्ट उघड आहे; पण याला लोकांचा विरोध आहे. कारण, त्यामागे त्यांचे हितसंबंध, अज्ञान आणि अंधविश्वास दडून बसलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विषय Annihilation of Caste (1936) - या पुस्तकात चर्चिला आहे. वास्तविक हा जातिअंताचा जाहीरनामाच आहे, असे माझे मत आहे.
- डॉ. जनार्दन वाघमारे
-----------
एकूण पाने - 328
किंमत - रु. 360/-
30% सवलतीत उपलब्‍ध
(पोस्‍टेज्‌ चार्जेस वेगळा लागेल)
-----------
पुस्‍तक मागविण्यासाठी संपर्क :
अक्षरनंदन शाळेजवळ, प्राईड पोर्टल बिल्‍डींग, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रोड, जे. डब्‍ल्‍यू. मॅरिएट हॉटेलमागे, बहिरटवाडी, शिवाजीनगर पुणे - 411005
📞8484086887, 9922608687

'लातूरच्या जिल्हाधिकारी यांनी लिहिलेले 'फायलींच्या पलीकडे...' पुस्तक हे ललित आणि प्रशासकीय स्वरूपाचे आहे. हे पुस्तक म्हण...
03/04/2026

'लातूरच्या जिल्हाधिकारी यांनी लिहिलेले 'फायलींच्या पलीकडे...' पुस्तक हे ललित आणि प्रशासकीय स्वरूपाचे आहे. हे पुस्तक म्हणजे एक प्रशासकाची लातूर डायरी आहे,' असे मत ज्येष्ठ साहित्यिक कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लिहिलेल्या 'फायलींच्या पलीकडे...' या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सायंकाळी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी इतिहासाचे अभ्यासक डॉ. सोमनाथ रोडे होते. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, प्रा. गणेश घुगे, द युनिक संस्थेच्या अश्विनी घोटाळे-बोरगांवकर व्यासपीठावर उपस्थित होते.
#फायलींच्या_पलीकडे... या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना लेखिका जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या, 'माझा शासकीय प्रवास हा मानवी प्रवास असतो. कागदाच्या मागचा मानवी चेहरा नेहमी जपला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.'
----
फाउंडेशनच्या इतर प्रकाशनांप्रमाणेच या पुस्तकाचेदेखील आपण चिकित्सकपणे स्वागत कराल, ही खात्री आहे.

द युनिक ॲकॅडमीने गेल्या २० वर्षापासूनची यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. केंद्रिय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी...
07/03/2026

द युनिक ॲकॅडमीने गेल्या २० वर्षापासूनची यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. केंद्रिय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी ही संस्था व्यापक प्रयोग व प्रयत्न करत असते. केवळ परीक्षेत यश मिळविण्यापुरते मार्गदर्शन व ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व व्यापक विचार - दृष्टिकोन तयार करण्याचे आणि एक कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील, तळपातळीपर्यत, दुर्बल-वंचित घटकांपर्यत धोरण अंमलबजावणी करणारा अधिकारी निर्माण करण्याचे काम संस्था करते.

Congratulations to all the successful students, their parents, mentors, directors Tukaram Jadhav and Malhar Patil, all the faculty and all the staff.

27/02/2026
द युनिक फाउंडेशन प्रकाशित  आणि अभ्यासकांनी संदर्भ ग्रंथम्‍हणून नावाजलेला ग्रंथ...! -----📘 महाराष्ट्र वार्षिकी : 2026✍️ स...
17/02/2026

द युनिक फाउंडेशन प्रकाशित
आणि अभ्यासकांनी संदर्भ ग्रंथ
म्‍हणून नावाजलेला ग्रंथ...!
-----
📘 महाराष्ट्र वार्षिकी : 2026
✍️ संपादक -
तुकाराम जाधव, विवेक घोटाळे, मुक्‍‍ता कुलकर्णी
-----
✍️ 2008-2009 सालापासून ‌‘महाराष्ट्र वार्षिकी' हा संदर्भ ग्रंथ आकारास येत आहे. ‌‘टीम युनिक‌‘ आणि ‌‘युनिक ॲकॅडमी-युनिक फाउंडेशन'शी संबंधित हितचिंतक, लेखक, अभ्यासक, प्राध्यापक, पत्रकार, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र वार्षिकीचा सतरावा अंक आम्ही प्रकाशित करीत आहोत. प्रस्तुत ग्रंथात 2025 या वर्षातील घटना-घडामोडी-समस्यांची कारणपरंपरा आणि उपाय सुचविणाऱ्या आशयसंपन्न सविस्तर आणि विश्लेषणात्मक मांडणी करणाऱ्या लेखांचा समावेश केला आहे. प्रस्तुत ग्रंथात एकूण 15 विभागांत 81 लेखांचा आणि 57 सविस्तर नोंदींचा समावेश करण्यात आला आहे.
✍️ प्रस्तुत महाराष्ट्र वार्षिकीचा नव्या स्वरूपातील अंक विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या विविध टप्प्यांसाठी, विशेषतः एमपीएससीच्या नवीन पॅटर्न व अभ्यासक्रमानुसार तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, वेगवेगळ्या परीक्षेच्या मुलाखतीसाठी आवश्यक चिकित्सक व व्यापक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी उपयुक्त ठरेल. याशिवाय प्राध्यापक, संशोधक, पत्रकार, राजकीय पक्ष व सामाजिक चळवळी यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनाही उपयुक्त ठरत आला आहे. याही वर्षाच्या ‌‘महाराष्ट्र वार्षिकी' या संदर्भ ग्रंथाचे आपण चिकित्सक स्वागत कराल, ही अपेक्षा आहे.
-----
📘 एकूण पाने - 458
💰 एकूण किंमत - रु. 450/-
-----
📦 30 % सवलतीत उपलब्‍ध
(पोस्‍टेज चार्ज वेगळा)
-----
अधिक माहितीसाठी संपर्क
📞 8484086887
📞 9922608687
www.theuniquefoundation.co.in

लवकरच प्रकाशित करत आहोत...📘 द युनिक फाउंडेशन प्रकाशित  आणि अभ्यासकांनी संदर्भ ग्रंथम्‍हणून नावाजलेला ग्रंथ...!-----📘महार...
13/02/2026

लवकरच प्रकाशित करत आहोत...
📘
द युनिक फाउंडेशन प्रकाशित
आणि अभ्यासकांनी संदर्भ ग्रंथ
म्‍हणून नावाजलेला ग्रंथ...!
-----
📘महाराष्ट्र वार्षिकी : 2026
✍️संपादक -
तुकाराम जाधव, विवेक घोटाळे, मुक्‍‍ता कुलकर्णी
-----
महाराष्ट्र वार्षिकी : 2026 हा अभ्यासकांनी 'संदर्भ ग्रंथ' म्हणून नावाजलेला ग्रंथ (मराठी इयर बुक) वाचकांच्या हाती 18 फेब्रुवारीपर्यंत देत आहोत. प्रस्तुत ग्रंथात एकूण 15 विभागात 81 विशेष लेख व 57 नोंदी समाविष्ट आहेत.
-----
एकूण पाने - 458
एकूण किंमत - रु. 450/-
-----
अधिक माहितीसाठी संपर्क
📞8484086887
📞9922608687
www.theuniquefoundation.co.in

Address

C/O The Unique Academy, Sancheti Hospital Chowk, Behind Mitcon, Shivajinagar
Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Unique Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to The Unique Foundation:

Shortcuts

Share