#छत्रपती संभाजी नगर मूलभूत प्रश्न आणखीन सुटलेले नाहीत,
आजही रहवासी भागातील रोड झालेले नाहीत,
काँग्रेस ने खुप विकास केला अस म्हणतात
#मुरूमचे प्रसिध्द पत्रकार रामलिंग पुराणे,
त्यांना विकास शोधायचा आहे तर त्यांनी मुरुम शहरातल्या भागात जाऊन पाहणी करा विकास कळेल..
#यावेळी मात्र छत्रपती संभाजी नगर मध्ये काँग्रेस ची सिट निवडून येणार नाही अशी शक्यता आहे
आम्ही मुरूमकर
संभाजी राजे ग्रूप,मुरुम
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from संभाजी राजे ग्रूप,मुरुम, College & University, Pune.
16/11/2018
#प्रधानमंत्री_आवास_योजना_(PMAY)
मुरूम मधील सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहे की, आवास योजनेचे फॉर्म भरत असताना आकारले जाणारे शुल्क *बँकेचे चलन ५१० रु + नॉटरी 300 रु* असे शुल्क रद्द करण्यात आले आहे....
यासंदर्भात जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना सामाजिक संभाजी ब्रिगेड मुरूम व *ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन (AISF)* यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले होते, याबाबतीत नगराध्यक्षा *अंबर मॅडम* व *CO आशिष लोकरे* यांच्याशी चर्चा झाली असून, (५१० रु व ३०० रु) असे शुल्क आकारने रद्द करण्यात आले आहे.....
तरी मुरूममधील सर्व नागरिकांना *सामाजिक संभाजी ब्रिगेड* व *AISF मुरूम* तर्फे आव्हान करण्यात येत आहे की (PMAY) आवास योजनेचे फॉर्म भरताना वरील *शुल्क देऊ नये...*
.....आपला साथी✊🏻
कॉ लखन, कॉ आकाश,कॉ गणेश,कॉ अमर
🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
18/03/2018
.
*🚩छत्रपती शंभुराजे आणि गुढीपाडवा🔮*
मराठा-बहुजन समाजाला भावनीक करुन त्यांच्या माध्यमातून गुढीपाडवा साजरा व्हावा अन् शंभुराजांचे सतत अवमुल्यन होत रहावे ह्या उद्देशाने मनुवादी लोक अन् त्यांच्या नाजायज अवलादी किडे हे संभाजी ब्रिगेडच्या महत्वाच्या मुद्दाचे खंडन करु शकत नसल्यामुळे गुढीपाडव्याचा कुठेही व कसाही संदर्भ जोडुन बहुजंनाना कसे गोंधळवुन टाकता येईल ते पाहत आहेत. याचीच साक्ष म्हणजे आजपर्यंत मनुवाद्यांनी गुढीपाडवा साजरा व्हावा ह्यासाठी वेगवेगळी उदाहरणे दिली. त्यांच्या प्रश्नाला संभाजी ब्रिगेडची दणकेबाज उत्तरे खंडन स्वरुपात.....,
▪मनुवादी प्रश्न व ब्रिगेडी छाव्यांची उत्तरे▪
•मनुवादी :- रामाने रावणाला हरवले अन् तो भारतात परतला. हा आंनदाचा दिवस आहे म्हणुन गुढीपाडवा साजरा करावा.
•ब्रिगेडी :- रामाने रावणाला हरवून भारतात आल्यावर हा आनंदाचा दिन आहे तर तो फक्तं महाराष्ट्रात व मराठी भाषिक भागाच्या पट्यातच का साजरा होतो...?
•मनुवादी :- अनेक संतांच्या अंभंगामध्ये गुढी ह्या शब्दाचा उच्चार आहे, म्हणुन आपण गुढीपाडवा साजरा करावा.
•ब्रिगेडी :- अभंग ४६) आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥ पुढे पाठविले गोविंदे गोपाळा । देउनि चपळा हाती गुढी ॥२॥ तुकोबांच्या ह्या वरील अभंगात असे लिहले आहे की वारीला जात असताना जी व्यक्ती चपळ वा चंचल आहे त्याच्याच हाती गुढी द्यावी म्हणजे तो सर्वात पुढे चालत राहील. संताच्या अभंगातील गुढीचा अर्थ एक पताकी वारकरी ध्वज होय. आपण उभी करण्यास सांगता ती गुढी नव्हे. (मराठी शब्दकोष तपासा.)
•मनुवादी :- शालीवाहन शकातही गुढी उभारली जायची, गौतमीपुत्र सातकर्णी ह्यांनीही गुढी उभारली होती, म्हणुन आपणही गुढीपाडवा साजरा करावा.
•ब्रिगेडी :- शालीवाहन शकात अथवा सातकर्णी यांनी जी गुढी उभारली होती ती विजयी मोहीमेच्या निमित ध्वज उभारला जायचा.
•मनुवादी :- औरंगजेबाच्या समकालीन ग्रंथामध्ये गुढीचा उल्लेख आहे, म्हणुन आपण गुढीपाडवा साजरा करावा.
•ब्रिगेडी :- गुढीचा समानार्थी शब्द म्हणजे ध्वज होय त्याचाच उल्लेख औरंगजेबाच्या समकालीन ग्रंथात वापरला आहे.
•मनुवादी :- गुढीपाडवा हा हिंदुंचा नववर्ष आहे म्हणून तो साजरा करावा.
•ब्रिगेडी :- भारत देशात ८० कोटी हिंदु राहतात मग जर गुढीपाडवा हा हिंदुचा नववर्ष असेल तर तो देशभरात नववर्ष म्हणुन साजरा व्हायला हवा पण तो फक्तं महाराष्ट्रातच साजरा होतो.
•मनुवादी:- संभाजीची हत्या ही मनुस्मृतीनुसार झालेली नसुन तर ती मुस्लीमांचा धर्मग्रंथ कुराण प्रमाणे झाली आहे.
•ब्रिगेडी :- आम्ही कुराण हा मुस्लीमांचा धर्मग्रंथही पुर्ण वाचुन काढला. त्यामध्ये तर असे लिहीले आहे की कोंबडीला गरम पाण्यातुन काढणे व तिच्यावर सुरी चालवणे हे अक्षम्य चुकीचे आहे. जर प्राण्यांच्या बाबतीत इतके सकारात्मक विचार लिहिले आहेत तर जिवंत माणसाला मारण्याबाबत लिहणे ही दुरची गोष्ट होय.
मनुवाद्यांच्या वरील सर्व मुद्यांचासंभाजी ब्रिगेडच्या मर्दानी अभ्यासुपणे वाचन करुन हे सर्व मुद्दे चर्चेने पुराव्यानिशी खोडुन दाखवले. तरीही ज्या मनुवाद्यांना, त्यांची भडवेगीरी करणाऱ्या दलालांना विनंती की तुमचे समाधान झाले नसेल तर मी व आमचे सहकारी कधीही चर्चेला बसण्या सदैव तयार आहोत. मनुवाद्यांनी संभाजी ब्रिगेडचे खालील काही मोजके मुद्दे पुराव्यानिशी खोडुन दाखवावे. आम्हाला अपशब्द वापरुन बोललात तरी चालेल.
▪आमचे मुद्दे :-
१) शुभदिनी व आनंदी कार्यात पुजाविधी साठी सरळ ठेवला जाणारा कलश (तांब्या) गुढीपाडव्याच्याच दिवशी बांबुवर उलटा का लटकवतो...?
२) घरात किंवा इतर ठिकाणी पायताण (चप्पल वगैरे) उलटे झाल्यास ते न सांगता अशुभ असते म्हणुन सरळ केले जाते. जर आपण पायताण लवकर सरळ करता मग तांब्याचे काय...?
३) पूजाविधी किंवा मंगल, शुभ कार्यात कलश सरळच असतो उलटा का नाही...?
४) गुढीला महिलांचे नेसुचे वस्त्र साडी-चोळीच का लटकवतो...?
५) गुढीला पुरुषांचे शर्टपीस, पॅंटपीस हेही लटकवुन समानतेचा संदेश का देत नाही...?
६) कडुलिंबाचा पाला हा एखादा व्यक्ती मेल्यानंतर घरी आणला जातो, मग त्या शुभ दिवशीच गुढीवर का टांगावा...?
७) बांबुचा वापर हा माणुस मेल्यावर तिरडीसाठी केला जातो मग गुढीपाडव्याच्या शुभदिनी असे अनर्थ कार्य का करायचे...?
८) मृत झालेल्या माणसाला भिंतीला चिटकावुन पाटावर बसवले जाते अन् गुढीपाडवा हा आनंदाचा दिवस असताना अपशकुनी कार्य त्या दिवशी का करतो....?
९) जिजाऊ, शहाजीराजे, तुकोबाराय, शिवराय यांनी गुढीपाडवा साजरा केल्याचा कुठेही पुरावा नाही...!!
याची उत्तरे मनुवाद्यांनो तुम्ही देऊ शकणार नाहीत याची मला खात्री आहे. असो.., माझ्या बहुजन समाज बांधवानो गुढीपाडव्या दिवशी घरावर गुढी न उभारता एक पताकी भगवा ध्वज फडकवावा जेणेकरुन संभाजी महाराजांना अभिवादन होईल. किंवा शिवधर्मगाथेत सांगीतल्याप्रमाणे बळीराजाची नियमनाची गुढी/ध्वज उभारावी.
गुढीपाडवा व शंभूराजे हत्या यांचे पुरावे जे मनुस्मृतीतील ज्या श्लोकाप्रमाणे हत्या झाली ते श्लोक खालीलप्रमाणे देत आहे.
🔹 *सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी मनूच्या नावाने सुमती भार्गव या ब्राह्मणाने रचलेल्या मनुस्मृती* या ग्रंथात सापडते.
मनुस्मृती म्हणते,
*शतं ब्राह्मणमाक्रुश्य क्षत्रियो दंडमर्हति ।*
*वैश्योप्यर्धशतं द्वे वा शूद्रस्तु वधमर्हती ।।*
(अध्याय ८, श्लोक २६७)
अर्थ - ब्राह्मणाबद्दल अपशब्द वापरल्यास क्षत्रियाला शंभर पण(नाणे) दंड योग्य आहे. वैश्याला दीडशे किंवा दोनशे पण आणि शूद्राला वेताने मारणे योग्य राहील.
*एकजातिर्द्विजातींस्तु वाचा दारुणया क्षिपन् ।*
*जिव्हाया: प्राप्नुयाच्छेदं जघण्यप्रभवो हि स: ।।*
(अध्याय ८, श्लोक २७०)
अर्थ - एखाद्या शूद्राने द्विजाला (ब्राह्मण) उद्देशून अपशब्द उच्चारले, तर त्याची जीभ छाटावी; कारण तो जन्मजात नीच आहे.
*नामजातिग्रहं त्वेषामभिद्रोहेण कुर्वत:।*
*निक्षेप्योयोमय: शंकुर्ज्वलन्नासे दशांगुल:।।*
(अध्याय ८, श्लोक २७१)
अर्थ - जो शूद्र द्विजाला (ब्राह्मण) नाव व जातीच्या उच्चारणासह अपशब्द वापरील, तर त्याच्या तोंडात गरम केलेला दहा बोटे लांब असा लोखंडाचा खिळा ठोकावा.
*धर्मोपदेशं दर्पेण विप्राणामस्य कुर्वत: ।*
*तप्तमासेचयेत्तेलं वक्त्रे श्रोत्रे च पार्थिव: ।।*
(अध्याय ८, श्लोक २७२)
अर्थ - जो शूद्र अहंकाराने ब्राह्मण धर्माचा उपदेश करील, त्याच्या तोंडात आणि कानात राजाने गरम तेल सोडावे. मनुस्मृतीच्या उपरोक्त नियमान्वयेच छ. संभाजीराजेंची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
🔹खालील सर्व पुस्तके व ग्रंथात गुढीपाडवा संदर्भातील पुरावे उपलब्ध आहेत.
▪नामांतर औरंगाबाद आणि पुण्याचे - कॉ. शरद पाटील
▪शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण - कॉ. शरद पाटील
▪दास-शूद्रांची गुलामगिरी खंड-१, भाग-१ - कॉ. शरद पाटील
▪गुढीपाडवा कशासाठी? - प्रा. अशोक राणा
▪शाक्तवीर संभाजीराजे - प्रा. अशोक राणा
▪ छत्रपती शिवाजी महाराज (सचित्र) - श्रीमंत कोकाटे
▪छत्रपती संभाजीमहाराजांची संघर्षगाथा - इंजि. चंद्रशेखर शिखरे
▪ 'किताब उल हिंद' - अल बेरुनी (कयामुद्दीन अहमद द्वारा केलेले हिंदी भाषांतर)
▪लीळाचरित
▪तुकाराम गाथा
शब्दांकन :-
*✍🏽...शिवश्री मोहन जाधव.*
*तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड उमरगा.*
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pune