Vaidya Physics Classes

Vaidya Physics Classes

Share

Learn 11th 12th Physics with more technical way

31/10/2024
24/10/2024

*दिवाळी १० वी १२ वी ची*
माझ्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार,
वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी जवळ आली आहे. आपल्या आजूबाजूला उत्साहाचं वातावरण आहे. आणि आपले महत्वाचे शैक्षणिक वर्ष देखील सुरु झाले आहे. काय करावे? मस्त दिवाळीचा आनंद लुटू ? का अभ्यासाच्या मागे लागू या विवंचनेत आपण सगळे असणार. इथे आपण एक मुख्य गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे दिवाळी दरवर्षी येते पण *१० वी/१२वी ची परीक्षा एकदाच येते.* तेव्हा दिवाळी पुढच्या वर्षी दुप्पट जोमाने साजरी करता येईल. सध्या अभ्यासाकडे नीट लक्ष देणे जास्त गरजेचे आहे.
मग पुढचा प्रश्न पडतो तो म्हणजे अभ्यास कसा करायचा? तर आत्ताच आपली सहामाही परीक्षा झालेली आहे. त्यात कमीतकमी प्रत्येक विषयाचा निम्मा पोर्शन तर नक्की होता. त्याचा अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे कोणत्या धड्यांची तयारी आपली उत्तम झालेली आहे आणि कोणते धडे अजून अभ्यासायला हवेत. आपण गणिते नीट सोडवू शकतो का नाही, लिखाणाचा वेग पुरेसा आहे का कमी पडतो या आणि अशा अनेक गोष्टींचा अंदाज या परीक्षेनंतर आपल्याला आलेला असेल. यातल्या कोणत्याही गोष्टीत किंवा सर्वच गोष्टीत जरी तुम्ही कमी पडत असाल तरी निराश होण्याचं, घाबरून जाण्याचं कारण नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आगामी काळात आपल्या तयारीतील त्रुटी लक्षात घेऊन त्या कमी करायचा प्रामाणिक आणि जोरदार प्रयत्न केलात तर त्यावर मात करणे शक्य होईल.
एक लक्षात घ्या की दिवाळीची सुट्टी २१ दिवस आहे. सुट्टी सुरु व्हायच्या आदल्या दिवशी आपल्या तयारीतील त्रुटी शोधून काढून त्या एका कागदावर लिहून काढा. त्या दूर करण्यासाठी करण्यासाठी काय करता येईल यावर विचार करा. वेळेचे नियोजन करा. आणि त्याप्रमाणे अभ्यास करा. या कामी तुमचे पालक आणि शिक्षक यांची पण मदत घ्या. या सुट्टीत तुम्हाला कॉलेज / शाळा नसेल. त्यामुळे तुम्हाला थोडा जास्त वेळ उपलब्ध असेल. २४ तासातले काही दिवाळी साजरी करण्याचे आणि मजेचे ४ तास आणि झोपेचे ७ तास सोडले तरी आपल्या हातात १३ तास शिल्लक आहेत. त्याचे नीट नियोजन करून अभ्यास केलात तरी २१ दिवसाचे २७३ तास मिळतील. त्याचा सुयोग्य वापर करून झालेले धडे इतके पक्के करा की झोपेतून उठवून कोणताही प्रश्न विचारला तरी सहज सोडवता येईल. आपल्या आजूबाजूच्या कॉलेज/ शाळे मधील मित्रांचे सहामाहीचे पेपर सुद्धा तुम्ही सराव म्हणून सोडवू शकता. सुट्टी संपताना कोणतेही काम pending राहिलेले नाही अशी वेळ आणा, म्हणजे पुढच्या गोष्टी नीट शिकता येतील आणि तयार करता येतील.
एक ठरवा. आत्ता फटाके कमी उडवलेत तर तुमचे यश पाहून तुमच्या साठी इतर लोकं फटाके उडवतील. उत्तम अभ्यास केलात तर आपल्याला भविष्यात नक्कीच उज्वल यश मिळेल यात शंका नाही. दिवाळीचा आनंद आणि सुट्टीतील अभ्यासाचा आनंद, दोन्हीसाठी शुभेच्छा.

*©ज्ञानेश वैद्य*
संचालक
*ज्ञानभास्कर सायन्स क्लासेस (7387627877)*

24/09/2023

*काका/सर मला वाचवा*
काल आमच्या क्लासच्या ऑफिसमध्ये एक पालक येऊन सांगत होते. त्यांच्या ओळखीमध्ये एक मुलगी आहे,तिने लाखो रुपये भरून क्लास लावला आहे. खास jee करता. पण आता ती रडते आहे. सप्टेंबर महिना संपत आला तरी तिची JEE ची तयारीही यथातथाच झाली आहे आणि jee करत असल्यामुळे बोर्डाकडे दुर्लक्ष झाले आहे. म्हणजे खरं तर सांगू का सर ना jee ची तयारीही नीट नाही झाली आणि ना बोर्ड. आता मात्र तिला टेन्शन आलंय. तर काही करता येईल का सर.
साधारण पणे सप्टेंबर नंतर दरवर्षी असे अनेक विद्यार्थी आमच्या कडे येतात. काही तरी करा.म्हणजेच काका/सर मला वाचवा.
खरं सांगायचं तर हातात फार कमी वेळ राहिलेला असतो. यावर उपाय एकच करावा लागतो आणि तो म्हणजे या पेशन्टला वाचवायला युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागतात. अर्थात यात पेशन्टचे पूर्ण सहकार्य, कष्ट करण्याची तयारी आणि अमच्यावरील पूर्ण विश्वास हवा.
मागील काही वर्षात तर ही संख्या प्रचंड वाढते आहे. यावर उपाय म्हणून आम्ही यावर्षी एक योजना तयार केली. पुढील महिन्यापासूनच एका विशिष्ट पद्धतीने मुलांकडून अभ्यास करून घ्यायचा आणि त्यावरआधारीत एक परीक्षा पद्धत राबवायची. ही योजना मुलांच्या पसंतीसही पडत आहे आणि त्याचा या मुलांना नक्की फायदा होईल असा विश्वास आहे.
जमेल तेवढे आणि जमेल तसे करत रहायचे.
ज्यांना कुणाला आजूनही मदत हवी असेल तर आम्ही मदत करायला तयार आहोत. वेळ निश्चित करून या. भेटा. आजून उशीर करू नका. वाळू हातातून निसटल्यावर काही उपयोग नसतो.

ज्ञानभास्कर सायन्स क्लासेस सदाशिव पेठ, पुणे ७३८७६२७८७७

09/11/2022

*DnyanaBhaskar Test Series.*

12 वी HSC बोर्डाच्या सरावासाठी

▪️1 सराव आणि 3 प्रत्यक्ष क्लासरूम पेपर्स
▪️बोर्ड पॅटर्न चे पेपर्स
▪️अनुभवी शिक्षकांकडून तपासणी
▪️पेपर तपासणी नन्तर विनामुल्य मार्गदशन
▪️बोर्डाला अपेक्षित आदर्श उत्तरे

*Fees*
3000/- प्रत्येक विषयासाठी(PCM)
विशेष सवलत 2000/- प्रत्येक विषयासाठी (मर्यादित जागा)
*संपर्क 9422063933*

Confirm your seat before 15 Nov.

*Test Series 21 नोव्हेंबर पासून सुरू.*

22/09/2022

The National Education Policy provisions that the entire education of a student be based on the mother tongue.

- Hon’ble Education Minister Shri Dharmendra Pradhan

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Pune
411030