25/10/2024
वंचित विकासच्या आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी प्रदर्शनात उद्या साडे चार ते साडे सात बाल मेळावा व गंमत जत्रा! तुमच्या मुलांना घेऊन नक्की या! याच बरोबर पणती रंगवा आणि घरी नेऊन दिवाळी साजरी करा!
Our aim is that there should not be need for NGO's like Vanchit Vikas, and development and upliftment should take place peacefully. Vilas Chaphekar.
VANCHIT VIKAS
JANEEV SANGHATANA
Janeev Sanghatana, established in the year 1982, was the culmination of relentless work of 15 years, in various strata particularly the deprived class of society; by Mr. The experience gathered during those 15 years led to the foundation of Janeev with the Mission – Development of the most deprived people. Janeev strives to bring change through constructive work
25/10/2024
वंचित विकासच्या आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी प्रदर्शनात उद्या साडे चार ते साडे सात बाल मेळावा व गंमत जत्रा! तुमच्या मुलांना घेऊन नक्की या! याच बरोबर पणती रंगवा आणि घरी नेऊन दिवाळी साजरी करा!
24/10/2024
आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी प्रदर्शनात आकर्षक दरात सुकामेवा खरेदी करा!
19/10/2024
आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी तुम्ही भाग घेऊ शकाल होम मिनिस्टर स्पर्धेत! प्रदर्शनाला जरूर भेट द्या.
17/10/2024
वंचित विकासचा आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी या प्रदर्शनानिमित्त अनोखा उपक्रम!
14/10/2024
या प्रदर्शनात आम्ही आपली वाट पाहणार आहोत!
10/10/2024
या वर्षी परत एकदा वंचित विकास घेऊन येत आहे दिवाळीच्या खरेदीसाठी अप्रतिम प्रदर्शन! जरूर भेट द्या 🙏🏼
09/10/2024
दिनांक: 6 ऑक्टोबर 2024
स्थळ: गावडे समाज मंदिर, जनता वसाहत, पर्वती, पुणे
वेळ: दुपारी 2.30 ते 6.30
कार्यशाळा : Saksham skill development
लाभार्थी: 50 मुली (दत्तमंदिर, शिवमंदिर,कांदेआळी,राजीव गांधीनगर,चुनाभट्टी, गावडे समाज मंदिर,दत्तवाडी आणि एकता मित्र मंडळ अभिरुची वर्गातील मुली)
डॉ. पोर्णिमा गौरी आणि त्यांच्या 9 स्वयंसेवकांनी अभिरुची वर्गातील 10 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींसाठी कार्यशाळा घेतली.
सुरुवातीला मुलींना विचार, भावना याविषयीची पूर्व चाचणी सोडविण्यास दिली.
नंतर संवाद कौशल्य, राग आणि ताण कसा हाताळला पाहिजे असे अनेक विषय games, group action आणि role play च्या माध्यमातून मुलींपर्यंत पोचवण्यात आल्या.
सुरेखा मोरे आणि रुपाली कदम यांच्या विशेष मदतीने कार्यक्रम छान पार पडला.
सर्वांना केळी आणि लाडू असा खाऊ दिला.
09/10/2024
वंचित विकास, एकता मित्रमंडळ ट्रस्ट, व वीर शिवराज मित्रमंडळ आयोजित
अभया (एकल) ज्येष्ठ महिलांचा “ भोंडला व गरबा रास ”
वंचित विकास, एकता मित्रमंडळ ट्रस्ट, व वीर शिवराज मित्रमंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने नवरात्री निमित्त दि. ६ सप्टेंबर २०२४ रोजी, सुरभी मंगल कार्यालय, तावरे कॉलनी,अरण्येश्वर, पुणे येथे एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वंचित विकास अभया (एकल) महिलांसाठी मागील १० वर्षांपासून काम करत आहे. एकल महिला अजूनही अशा सामुहिक कार्यक्रमात जाणे टाळतात. चाळीशी ओलांडलेल्या व ज्येष्ठ महिला वयाची कारणे पुढे करून जाणे टाळतात. त्यामुळे खास अशा महिलांसाठी त्यांच्या मुला-मुली, नातवंडे यांसोबत या आगळ्यावेगळया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तावरे कॉलनी,कसबा पेठ, मंगळवार पेठ, अप्पर इंदिरानगर, चव्हाण नगर, तळजाई वसाहत, इ. वस्त्यांमधील १५० हून अधिक ज्येष्ठ महिलांनी भोंडला व गरब्याचा मनसोक्त आनंद लुटला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ ही साजरा करण्यात आला.
अरण्येश्वर अखिल तावरे कॉलनी मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय हिंद मित्र मंडळ, वंचित विकास वृद्धमित्र प्रकल्पाचे सर्व कार्यकर्ते तसेच सर्व गणेश मंडळातील कार्यकर्ते, मुले व महिला यांनी मोठ्या संखेने सहभाग नोंदवला. अखिल मंडई मंडळाचे विश्वस्थ विश्वास भोर,हिरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक भैईलुमे सर, जय हिंद मित्र मंडळ अध्यक्ष विजय ओवाळे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
वीर शिवराज मित्रमंडळचे अध्यक्ष किरण सोनिवाल यांच्या तर्फे उपस्थितांना उपवास फराळाचे आयोजन करण्यात आले होते. एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढमाले व वंचित विकासच्या तेजस्विनी थिटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
02/10/2024
दिनांक: 2 ऑक्टोबर, बुधवार
स्थळ: विठ्ठल मंदिर, विश्रामबाग वाड्या समोर, पुणे
कलातीर्थ विद्यालया कडून आयोजित असलेल्या या कार्यशाळेत श्री. अमोल काळे यांनी मुलांना पणत्या रंगवायला शिकवल्या. मुलांनी आपल्या आवडीचे रंग वापरून पणती रंगकाम केले. हे सर्व करण्यात मुलं मग्न झाली होती. पणत्या आणि रंग मुलांना कार्यशाळेत देण्यात आले होते. रंगवलेल्या 4 पणत्यांपैकी 2 पणत्या मुलांना आणि 2 पणत्या सैनिकांना देण्यासाठी ठेवल्या. मुलांना खूप मजा आली. 8 अभिरुची वर्गातील 40 मुलांनी यात सहभाग घेतला.
02/10/2024
मधमाशी पालन शिबीर
दि. ३ ते ५ सप्टेंबर २०२४ रोजी वंचित विकास व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित विकास संचालित नीहार आनंद निवास, पुणे येथे मधमाशी पालन व संवर्धन परिचय शिबीर झाले. श्री संजय मारणे यांनी मधमाशी पालन इतिहास, मधमाशी पालन आणि फुलोरा, (कोणत्या वनस्पती व फुलझाडे लावावीत), श्रीमती जयश्री पाथरकर यांनी कृषी आणि मधमाशी पालन, मधमाशी पालन व्यवस्थापन, शहरी भागातील मधमाशी पालन, श्री शंकर खंदारे यांनी मधपेटी हाताळणी, मध केंद्र योजना या विषयावर सत्र घेतले. शिबिराच्या उद्घाटनाच्या व समारोपाच्या वेळी संस्थेच्या संचालक श्रीमती मीनाताई कुर्लेकर श्रीमती सुनीताताई जोगळेकर तसेच भाजपचे माजी शहर प्रमुख श्री योगेश गोगावले उपस्थित होते. पुणे, मावळ, भोर, या तालुक्यातील शेतकरी, इतर व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती व नीहार आनंद निवास येथे काम करणारे कार्यकर्ते अशा एकूण १६ शिबिरार्थींनी शिबिरामध्ये सहभाग घेतला. सर्वांना मधमाशी पालन संदर्भात सखोल माहिती तसेच मधमाशांची पेटी प्रत्यक्षात उघडून राणीमाशी, कामकरी माशी, नरमाशी या सर्वांची व्यवस्थित माहिती देण्यात आली.
नीहार आनंद निवास येथे सध्या मधमाशांच्या एकूण ५ पेट्या आहेत. त्यांची योग्य देखभाल केली जाते. वेगवेगळ्या फुलांचा फुलोरा येथे असून गरज असेल तेव्हा साखरेचा पाक बनवून माशांसाठी ठेवला जातो. संबधित लोकांना बोलवून वेळोवेळी पेट्यांची तपासणी केली जाते. अजून पेट्या वाढवायच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
श्री किरण कोतूळकर यांनी मोकळ्या वेळेत सेंद्रिय शेती कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शन करून परिसर मधील रानभाज्या कोणकोणत्या असतात त्याचे फायदे काय ? फळझाडे, फुलझाडे, पालेभाज्या याची देखभाल कशी करावी याची माहिती सांगितली.
24/09/2024
मौजे दशमी गाव तालुका वाशी येथे वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने अभिरुची वर्ग घेण्यात आला. खेळ, गाणी, गोष्टी शिकवण्यात आल्या. यावेळी वंचित विकास जाणीव संघटनेचे कार्यकर्ते रामभाऊ लगाडे, बगाडे सर, कवडे मॅडम, पांचाळ सर उपस्थित होते.
23/09/2024
या वर्षी परत एकदा वंचित विकास आयोजित आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी ! स्टॉल बूकिंग साठी त्वरित संपर्क करा!
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |