28/07/2026
सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना येथे प्रथमोपचार प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न!
आपत्कालीन परिस्थिती कधीही सांगून येत नाही, पण त्या वेळी योग्य ज्ञान आणि कौशल्य एखाद्याचे जीवन वाचवू शकते.
सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यात आयोजित केलेल्या प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कर्मचाऱ्यांना CPR, Choking Management, रक्तस्त्राव नियंत्रण, भाजणे, फ्रॅक्चर, अपघातातील प्राथमिक मदत आणि आपत्कालीन प्रतिसाद याबाबत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.
कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिकण्याची जिद्द आणि सुरक्षिततेप्रती असलेली सकारात्मक भावना कौतुकास्पद होती.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी प्रथमोपचार प्रशिक्षणाला महत्त्व देणाऱ्या सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार.
"प्रत्येक कर्मचारी प्रशिक्षित असेल, तर प्रत्येक कार्यस्थळ अधिक सुरक्षित होईल."
जीवन वाचविण्याचे कौशल्य प्रत्येकाकडे असणे ही काळाची गरज आहे.
#प्रथमोपचार