09/04/2024
अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षांबाबत चर्चासत्र
पिंपरी, ता. ८ : ‘सकाळ विद्या’ व ‘एक्सिड’च्या (एक्सलंट एज्युकेशन) वतीने अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विज्ञान क्षेत्रातील करिअर, प्रवेश परीक्षांबाबत मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित केले आहे.
रविवारी (ता. १४) मयूर कॉलनी, कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिरात होणाऱ्या या चर्चासत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा आणि एनएसओ, आयएमओ, एनटीएसई, होमी भाभा परीक्षांची तयारी कशी करावी?, त्यांचा अभ्यासक्रम, इंजिनिअरिंग, मेडिकल व सायन्समधील करिअरच्या संधी व प्रवेश परीक्षांची कशी तयारी करावी? या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
परीक्षांचे स्वरूप व अभ्यासक्रम, त्यांची तयारी; आगामी काळात अभ्यासक्रमात होणारे बदल; अकरावी, बारावीसह सीईटी, जेईई, नीट परीक्षांची तयारी, अभ्यासक्रमाचे नियोजन, देशातील नामांकित संस्था आयआयटी, एनआयटी, बीआयटी, व्हीआयटी, आयआयएससी, आयआयएसईआर, एनआयएसईआर व त्यांची प्रवेश प्रक्रिया याबाबतच्या शंकांचे निरसन चर्चासत्रातून होणार आहे. यामध्ये दहावी, अकरावी, बारावीसह सहावी ते नववीपर्यंतचे विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. करिअर व समुपदेशन क्षेत्रातील २० वर्षांचा अनुभव असलेले प्रा. आशिष दुबे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच सीईटी, जेईई, नीट आणि सीयुईटी या प्रवेश परीक्षांची तयारी तसेच अभ्यासाचे नियोजन कसे करावे? आयआयटी, एनआयटी, बीट्स, व्हीआयटी, आयआयएससी, आयसर, एनआयएससीआर या सारख्या देशभरातील नामांकित शिक्षण संस्था व त्यांच्या प्रवेशप्रक्रिया यांबाबत मार्गदर्शन केले जाईल.
चर्चासत्राबाबत
काय? : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रम तयारी
कधी? : रविवारी १४ एप्रिल २०२४
केव्हा? : सकाळी १० वाजता
कुठे? : बाल शिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड
प्रवेश : विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य
संपर्क : ८३७८९८७८३६
अशी करा नोंदणी
या चर्चासत्रामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. सोबत दिलेल्या क्यू आर कोडवर ऑनलाइन नोंदणी करता येईल.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScyo4IKpfxdoyg-Wkjrz-bFbmFMW2yOFrc-MK8624PkKZeg1Q/viewform?usp=sf_link