Manthan Education

Manthan Education Manthan means 'to churn'.... A thought provoking churning process in everybody's learning.

सुमंथनची अजून एक गणित प्रयोगशाळा पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात सुरु झाली.५ मे २०२६ रोजी कै. आशिष अरविं...
14/05/2026

सुमंथनची अजून एक गणित प्रयोगशाळा पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात सुरु झाली.

५ मे २०२६ रोजी कै. आशिष अरविंद चांदोरकर (ज्येष्ठ पत्रकार) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय येथे “गणित प्रयोगशाळेचे” उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या कार्यवाह माननीय स्वाती जोगळेकर यांच्या शुभ हस्ते झाले.

यावेळी शालासमितीचे अध्यक्ष मा. मिलिंद कांबळे सर , माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. वासंती बनकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री. प्रसाद लागू व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अपर्णा साने , गणित प्रयोग शाळेला आर्थिक सहाय्य करणाऱ्या सौ. अदिती भूषण कोकीळ व भूषण कोकीळ, 'सुमंथन' लॅबचे श्री. राहुल कोकीळ, शिक्षक, विद्यार्थी, पालक संघातील पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण व्हावी, संकल्पना अधिक प्रभावीपणे समजाव्यात आणि शिक्षण अधिक आनंददायी व्हावे, या उद्देशाने ही गणित प्रयोगशाळा साकारण्यात आली आहे. सौ. अदिती कोकीळ व श्री. भूषण कोकीळ यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे.

प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री प्रसाद लागू यांनी प्रास्ताविकात सर्वप्रथम पत्रकार कै .आशिष चांदोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या भगिनी सौ .अदिती भूषण कोकीळ यांनी या गणित प्रयोगशाळेसाठी केलेल्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच अत्यंत कमी वेळात प्रयोग शाळेचे कार्य पूर्ण केल्याबद्दल सुमंथन लॅबचे मा. श्री राहुल कोकीळ यांनाही धन्यवाद दिले. तसेच गणित प्रयोगशाळेची आवश्यकता सांगितली. शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. मिलिंद कांबळे सर यांनीही कै. आशिष चांदोरकर यांच्या काही आठवणी नमूद केल्या. तसेच त्यांच्या भगिनी सौ. अदिती भूषण कोकीळ व भूषण कोकीळ यांनाही धन्यवाद दिले. गणित वर्गाचा मुलांना कसा फायदा होईल यासंबंधी शालासमिती अध्यक्ष मा. मिलिंद कांबळे यांनी मार्गदर्शन केले. मा. राहुल कोकीळ यांनी बोटांच्या सहाय्याने पाढे कसे तयार करता येतात याचे प्रत्यक्ष कृतीयुक्त शिक्षण मुलांना दिले. या गणित प्रयोगशाळेत असणारी वेगवेगळ्या प्रकारची कोडी यासंदर्भात मार्गदर्शन केले.

विविध उदाहरणांच्या , गोष्टींच्या सहाय्याने नैसर्गिक संख्या, मूळ संख्या ही संकल्पना , गणित विषयातून विचारशक्तीला मिळणारी चालना अशा गोष्टींचे मार्गदर्शन मा. जोगळेकर मॅडम यांनी केले.

25/04/2026

This is the age where children begin to form a sense of who they are — what they feel, what they value, where they belong.

Inner Expedition is a space for them to explore their inner world 🌻

Happy PI day π !!
14/03/2026

Happy PI day π !!

Happy National Science Day! Let curiosity lead the way and innovation shape our future. 🔬✨
28/02/2026

Happy National Science Day! Let curiosity lead the way and innovation shape our future. 🔬✨

कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!      🚩
27/02/2026

कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

🚩

सुमंथनच्या गणित ग्रंथालय योजनेचा लाभ आणखी एका शाळेला व्हावा आणि त्यानेच वर्षाची सुरुवात व्हावी, ही आमच्यासाठी खूपच आनंदा...
16/01/2026

सुमंथनच्या गणित ग्रंथालय योजनेचा लाभ आणखी एका शाळेला व्हावा आणि त्यानेच वर्षाची सुरुवात व्हावी, ही आमच्यासाठी खूपच आनंदाची बाब!

पुण्याजवळील चिखली येथील दादासाहेब नाटेकर गुरूकुल या शाळेत १ जानेवारी पासून सुमंथनची गणित ग्रंथालय योजना सुरू झाली. त्यासाठी झालेल्या शिक्षक प्रशिक्षणात साधारण १५ शिक्षकांची उपस्थिती होती.

गणिताचे खेळ कसे वापरावे? यासंदर्भात प्रशिक्षण तर झालेच; पण आपण एखादी संकल्पना कशी शिकतो आणि त्याचे टप्प्याटप्प्याने आकलन होण्यासाठी शिक्षकाने कशाप्रकारे विचार करावा, याचे प्रशिक्षण देताना भागाकार, अवयव पाडणे, मूळ संख्या अशा मुलांसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या संकल्पनांच्या उदाहरणांचा उपयोग करण्यात आला.

मा. तेजस लिमये व गणित ग्रंथालय योजनेला आर्थिक पाठबळ देणारे मा. अमोल जोशी यांच्या सहकार्याने ही योजना चिखलीच्या शाळेत राबवता आली. त्यासाठी त्यांचे मन:पूर्वक आभार!

भारतीय जनमानसात स्वातंत्र्याची व नवरचनेची प्रेरणा निर्माण करणाऱ्या  योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंदांना विनम्र प्रणाम! ...
12/01/2026

भारतीय जनमानसात स्वातंत्र्याची व नवरचनेची प्रेरणा निर्माण करणाऱ्या योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंदांना विनम्र प्रणाम! 🙏🙏🙏

📐 २२ डिसेंबर – राष्ट्रीय गणित दिवस 📐🔢 श्रीनिवास रामानुजन : दक्षिण भारतातील साधा मुलगा ते जगप्रसिद्ध गणितज्ञ 🔢श्रीनिवास र...
22/12/2025

📐 २२ डिसेंबर – राष्ट्रीय गणित दिवस 📐

🔢 श्रीनिवास रामानुजन : दक्षिण भारतातील साधा मुलगा ते जगप्रसिद्ध गणितज्ञ 🔢

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी सध्याच्या तामिळनाडूमधील इरोड येथे झाला. त्यांचे बालपण अतिशय संघर्षमय होते. लहानपणापासूनच त्यांना संख्यांशी विशेष जिव्हाळा होता. इतर मुलं खेळण्यात रमलेली असताना, रामानुजन मात्र आकड्यांमध्ये रमायचे. सततच्या आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्या मनात संख्यांबद्दल विलक्षण आकर्षण निर्माण झाले. लहानपणीच ते घरातील हिशोब लक्षपूर्वक पाहत आणि क्षणार्धात उत्तरे सांगत.

प्राथमिक शाळेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अवघ्या १० व्या वर्षी त्यांनी इंग्रजी, तमिळ, भूगोल आणि अंकगणित या विषयांच्या परीक्षा जिल्ह्यातील सर्वोच्च गुणांसह उत्तीर्ण केल्या. पुढे टाऊन हायर सेकेंडरी स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांना औपचारिक गणिताची ओळख झाली. वयाच्या ११–१२ व्या वर्षीच त्यांनी मोठ्या विद्यार्थ्यांएवढे गणित आत्मसात केले होते. त्रिकोणमिती, भूमिती आणि अनंत मालिकांमध्ये त्यांना विशेष रस होता.

रामानुजन यांची प्रतिभा जशी विलक्षण होती, तसाच त्यांचा संघर्षही मोठा होता. गणिताव्यतिरिक्त इतर विषयांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. यामुळे त्यांची शिष्यवृत्ती गमावली गेली आणि शिक्षण खंडित झाले. गरिबी इतकी वाढली की अनेक वेळा त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी गणित सोडले नाही. कागद-पेन नसताना जमिनीवर, पाटीवर किंवा कोळशाने भिंतीवर ते सूत्रे लिहीत.

त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण म्हणजे १५–१६ व्या वर्षी मिळालेले G.S. Carr यांचे “A Synopsis of Elementary Results in Pure and Applied Mathematics” हे पुस्तक. या पुस्तकात हजारो सूत्रे होती, पण कोणतेही स्पष्टीकरण नव्हते. रामानुजन यांनी प्रत्येक सूत्रामागील तर्क स्वतः शोधण्याचा प्रयत्न केला. याच काळात त्यांनी नवी प्रमेये, बर्नौली संख्या आणि इतर महत्त्वपूर्ण गणिती निष्कर्ष मांडले.

आपल्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून त्यांनी इंग्लंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ प्रो. जी. एच. हार्डी यांना पत्र लिहिले. हार्डी यांनी रामानुजन यांच्या प्रतिभेची दखल घेतली आणि १९१४ मध्ये त्यांना केंब्रिजला बोलावले. तेथे हार्डी आणि लिटलवूड यांच्या सहकार्याने रामानुजन यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले.

पुढे ते रॉयल सोसायटीचे फेलो, तसेच ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजचे पहिले भारतीय फेलो ठरले. दक्षिण भारतातील एका साध्या घरातून निघालेला हा मुलगा जगप्रसिद्ध गणितज्ञ झाला.

रामानुजन यांचे गणितातील योगदान -
१९१४-१९१९ या ५ वर्षांत रामानुजन यांनी २१ शोधनिबंध लिहिले.
Pi च्या अनंत मालिकेच्या सूत्राचा शोध (Infinite series of Pi)
रामानुजन थिटा फंक्शन
रामानुजन-हार्डी संख्या – १७२९ ही संख्या ही ‘रामानुजन-हार्डी संख्या’ म्हणून ओळखली जाते.
p(n) साठीची अनंत मालिका, डग्लस-रामानुजन आयडेंटिटी, हायपर जॉमेट्रिक सिरीज, कंटिन्यूड फंक्शन, हार्डी-रामानुजन राउंड नंबर असे अनेक शोध सांगता येतील.

✨ रामानुजन यांचा जीवनप्रवास आपल्याला शिकवतो की प्रतिभा, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतीही मर्यादा ओलांडता येते.

📘 राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त या महान भारतीय गणितज्ञाला विनम्र अभिवादन!









For Std.3rd and 4th, we conducted Sumanthan games based on basic numerical processes. Many times, students are not pushe...
06/12/2025

For Std.3rd and 4th, we conducted Sumanthan games based on basic numerical processes. Many times, students are not pushed enough to go for mental Math which is super important in further learning in Mathematics. In this workshop we tried to push students for that and the good part of the story is that students responded quite enthusiastically to it.

For Std.5th-6th, the focus of the workshop was strengthening and achieving the concept of factors…. The workshop was a combination of activity and game. We feel that for students in Std.5 and 6, the concept of ‘factor’ would be a cake walk…. But in reality students are excellent in methods of deriving factors but not in understanding it as a concept. The workshop helped students realize the different shades of meaning of ‘factors’. The game that we conducted later on was the ‘Star’ of the workshop. Even though it pushed students for complex thinking and application of concepts, they thoroughly enjoyed it.

For Std. 7th-8th, the theme was ‘fraction’... Again a concept which they have already learnt….. This workshop churned students’ thinking a lot just with the help of a few cards, and simple A4 size paper. But we were very much happy to see that students sincerely tried to push themselves to understand the concept of ‘fraction’ along with its applicability. The game of ‘human fraction’ that we played later on was a challenge for students to actually apply fractions in real life. They not only enjoyed it but also jumped to share their ideas on it!

In all the workshops tried to highlight that in Math understanding a concept and its fluency both matter to build a strong foundation which can be achieved through simple Sumanthan game… Eagerly waiting for the next session to happen! We appreciate Sanskar gurukul’s efforts of going beyond textbooks and marks through such activities and are happy to be part of it even in future.


सोबत जे फोटो दिसतायत ते एका शिक्षक प्रशिक्षणाचे फोटो आहेत... अनेकदा मुलांना शिकण्याचा आनंद मिळावा यासाठी विविध प्रकारे प...
05/12/2025

सोबत जे फोटो दिसतायत ते एका शिक्षक प्रशिक्षणाचे फोटो आहेत... अनेकदा मुलांना शिकण्याचा आनंद मिळावा यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत राहतो. शिकणं त्यांच्या जगण्याची जोडता येईल, ते applicable करता येईल का? एका जागी बसून lecture पद्धतीने शिकण्याऐवजी कृती, उपक्रम, खेळ यांची जोड देता येईल का? दृक-श्राव्य माध्यमाचा वापर करता येईल का?... एक ना अनेक पर्यायांचा विचार करतो.

पण २९ नोव्हेंबरला मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर येथे झालेल्या शिक्षक प्रशिक्षणात सुमंथनला एक फार महत्वाचा मुद्दा गवसला... जे शिक्षण आनंददायी व्हावं यासाठी आपण धडपडतो आहोत, ते शिक्षण देणारे आपले शिक्षक त्या शिकवण्याचा आनंद घेऊ शकतायत का? जर ते साध्य करता आलं तर मुलांना शिकवण्याचा आनंद घेता येणं यासाठी फार काही वेगळं करावं लागणार नाही!

या प्रशिक्षणाचे फोटो बघताना प्रकर्षाने जाणवलं.... आपले खेळ शिकण्याचीच नाही तर शिकवण्याची प्रक्रियासुद्धा आनंददायी बनवू शकतात! कष्टांचं सार्थक झाल्याचा हाच तो क्षण असावा का?!

Address

Sumanthan, , C/o Kulkarni Construction Pvt. Ltd. , Vishwa Karma, Parvati, 529/3/1, Sinhgad Road, Anubandh Nagar, Dattawadi
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manthan Education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Manthan Education:

Shortcuts

Share

Category