Vishwa Marathi Parishad

Vishwa Marathi Parishad

Share

करोडो मराठी बांधवांना साहित्य, संस्कृती आणि उद्योजकता या माध्यमातून एकत्र जोडणारी संस्था

25/04/2026

🖋️ कथालेखन : तंत्र आणि मंत्र
विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
यशस्वी कथालेखक बना...!

👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/katha

👩‍🏫मार्गदर्शक : नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)

🗓️ 28 एप्रिल ते 1 मे, 2026
🕗 रात्री 8 ते 9
◽कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
◽ सहभाग शुल्क : रु. 799/-

◽कार्यशाळेतील विषय :
✅ लेखक व्हायचंय, काहीतरी सुचतंय, लिहावं वाटतंय, पण नेमकं काय?
✅ साहित्याचे विविध प्रकार कोणते?
✅ इसापनिती, बिरबलाच्या गोष्टी, कहाण्या ऐकत आपण मोठे होतो पण गोष्ट म्हणजे नेमकं काय?
✅ कथेत एक गोष्ट असते पण कथा म्हणजे गोष्ट नव्हे. गोष्ट आणि कथेत काय फरक असतो?
✅ कथेचे आवश्यक घटक कुठले?
✅ कथा बीज कसं निवडायचं?
✅ या बीजाचं कथेत रूपांतर कसं करायचं?
✅ कथेत व्यक्तिरेखा, वातावरण, घटना प्रसंग, संवाद यांचं योग्य मिश्रण कसं हवं?
✅ कथेची सुरुवात आणि शेवट याचा विचार कसा करावा?
✅ कथेला शीर्षक कसं द्यावं?

✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी:
https://vishwamarathiparishad.graphy.com/s/store
संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

🔂 हा संदेश अधिकाधिक लोक, मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती 🙏

|

25/04/2026

📚ग्रंथ, नियतकालिक, मासिक, शोध पत्रिका (रिसर्च जर्नल) प्रकाशित करा...
यशस्वी प्रकाशक बना...!
विश्व मराठी परिषद आयोजित
प्रकाशन संस्था नोंदणी पासून ते छपाई, जाहिरात, विक्री, वितरण आणि संपूर्ण अर्थकारण अशी अभिनव ऑनलाईन कार्यशाळा...
👉नोंदणी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/prakashan
📖 पुस्तक/नियतकालिक, निर्मिती, छपाई आणि प्रकाशन प्रक्रिया समजून घ्या. पूर्वी पुस्तक, ग्रंथ प्रकाशित करणे ही फार किचकट प्रक्रिया होती. स्क्रीप्ट प्रकाशकाला दिल्यावर त्याचे टायपिंग, डी.टी.पी., मुद्रीत शोधन करणे, संपादन त्यानंतर ते छपाईसाठी जायचे अशी प्रक्रिया होती. त्याचबरोबर प्रस्तावना, अभिप्राय, ISBN क्रमांक घेणे, वर्तमानपत्रांमध्ये परीक्षण पाठवणे हे करावे लागत असे. आज तंत्रज्ञान सोपे झाले आहे. डी. टी. पी.करणारे, मुद्रीतशोधक, संपादक, मुखपृष्ठ बनवणारे चित्रकार स्वतंत्रपणे उपलब्ध झाले आहेत. ISBN क्रमांक ऑनलाईन मिळवता येतो. त्यामुळे पुस्तक निर्मिती प्रक्रियेतील वेळ खूप कमी झाला आहे. तसेच प्रिंट ऑन डिमांड तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही पुस्तकाच्या पंचवीस ते पन्नास प्रतीही छापता येतात. त्यामुळे पुस्तकामध्ये फार मोठी रक्कम गुंतवून ठेवावी लागत नाही. तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखी पोर्टल निर्माण झाल्याने वितरण करणे सोपे झाले आहे. कार्यशाळेमध्ये पुस्तक, नियतकालिक, मासिक, रिसर्च जर्नल कसे प्रकाशित करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. नवोदित लेखक- कवी ज्यांना आपली पुस्तके स्वयं प्रकाशित Self Publish करायची आहेत, संपादक, प्राध्यापक तसेच पुस्तक/मासिक, नियतकालिक प्रकाशन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त अशी कार्यशाळा आहे.
यशस्वी प्रकाशक बना...
◻️मार्गदर्शक: भालचंद्र कुलकर्णी (ज्येष्ठ प्रकाशक, संपादक, मीडिया तज्ज्ञ, प्रिंट- डिजिटल नियकालिके नोंदणी व प्रकाशन तज्ज्ञ)
🗓️दिनांक: 27 ते 30 एप्रिल, 2026
🕗वेळ: संध्या. 8 ते 9
📹 ऑनलाईन वर्ग : Zoom द्वारे
👉सहभाग शुल्क : रु. 799/-
◻️ कार्यशाळेतील विषय :
✅कोणतेही वृत्तपत्र, मासिक कसे सुरू करावे?
✅ प्रकाशन संस्थेची नोंदणी प्रक्रिया कोणती?
✅ प्रकाशन संस्थेसाठी कोणते कायदे आहेत?
✅ नियतकालिकांसाठी लागू झालेला नवीन कायदा कोणता? त्यानुसार नोंदणी प्रक्रिया कशी आहे?
✅पुस्तकांसाठी नोंदणी प्रक्रिया (ISBN)
✅शोध पत्रिका (Research Journal) साठीची नोंदणी प्रक्रिया
✅लेखक आणि प्रकाशक यांच्यात करार कसा करावा?
✅पुस्तकाची किंमत कशी ठरवावी?
✅ नियतकालिकांचे आर्थिक व्यवस्थापन कसे करावे?
✅ पुस्तके व नियतकालिकांचे जाहिरात आणि मार्केटिंग
✅मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल
✅सर्वांना कार्यशाळेच्या सविस्तर नोटस् आणि रेकॉर्डिंग मिळेल
संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

23/04/2026

📖 पुस्तकांवर लिहू काही...
अर्थात पुस्तक परिचय/ परीक्षण ऑनलाईन कार्यशाळा
तुम्ही उत्तम वाचक आहात? वाचलेल्या पुस्तकाबद्दल मनात खूप काही साठलेलं असतं, पण ते शब्दांत कसं उतरवावं हे सुचत नाहीये का? मग विश्व मराठी परिषद आयोजित ही ऑनलाईन कार्यशाळा खास तुमच्यासाठी आहे!
👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/bookreview
शब्दांना देऊया अनुभूतीची जोड... आपल्याला आवडलेल्या पुस्तकाविषयी खूप बोलायला आवडतं... पण ते प्रभावीपणे 'लिहिणं' हे एक शास्त्र आणि कला आहे. कधी आपल्याला केवळ पुस्तकाची ओळख करून द्यायची असते, तर कधी त्याचा सखोल आस्वाद मांडायचा असतो. सोशल मीडिया - समाजमाध्यमांच्या युगात तर प्रत्येक वाचकाला एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध आहे. पण हे लेखन वाचनीय, तर्कसुसंगत आणि परिणामकारक कसं असावं?
'वाचक', 'परिचयकर्ता', 'परीक्षक' ते 'समीक्षक' या प्रवासातील नेमके टप्पे समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा एक सुवर्णसंधी आहे. आपल्या वाचनाला लेखनाची जोड देऊन, तुमच्यातील लेखकाला दिशा देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न! या कार्यशाळेत आपण काही तंत्र आणि काही मंत्र समजून घेऊ... म्हणजे पुस्तकांवर लिहिणे होईल अधिक आत्मविश्वासपूर्ण...अधिक समाधानकारक आणि अधिक आनंददायी ..!
👩‍🏫 मार्गदर्शक : डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी (प्रख्यात लेखिका, संपादिका, समीक्षक आणि अभिवाचक) Vandana Bokil-Kulkarni
🗓️ दिनांक : 26 ते 29 मे, 2026
🕗 वेळ : संध्या. 8 ते 9
📹 माध्यम : Zoom (ऑनलाईन वर्ग)
◽ सहभाग शुल्क : रु. 799/-
📍 या कार्यशाळेत आपण काय शिकणार आहोत?
✅ आस्वाद, परिचय आणि परीक्षण: या तिन्ही संकल्पनांमधील नेमका फरक आणि त्यांचे महत्त्व.
✅ दृष्टिकोन: परीक्षण करण्याच्या उद्देशाने पुस्तक कसे वाचावे?
✅ लेखनाची पूर्वतयारी: टिपणे काढण्यापासून ते आराखडा तयार करण्यापर्यंतचा प्रवास.
✅ परिणामकारक सुरुवात: वाचकाचे लक्ष वेधून घेणारी प्रस्तावना कशी लिहावी?
✅ विषयाची मांडणी: पुस्तकाचा गाभा आणि त्यातील आशयाचे तर्कशुद्ध विश्लेषण.
✅ पुस्तकांचे प्रकार : त्यानुसार घटक-चर्चा, विश्लेषण व निकष
✅ लेखनशैली: क्लिष्टता टाळून ओघवती आणि रसाळ भाषा कशी वापरावी?
✅ वस्तुनिष्ठता विरुद्ध व्यक्तिगत मत: परीक्षणात स्वतःचे मत मांडताना तोल कसा सांभाळावा?
✅ सोशल मीडिया लेखन: फेसबुक, इंस्टाग्राम आणि ब्लॉगसाठी 'शॉर्ट अँड स्वीट' रिव्ह्यूचे तंत्र.
✅ प्रत्यक्ष लेखन आणि सुधारणा: लेखनातील सामान्य चुका कशा टाळाव्या आणि स्वतःचे लेखन कसे तपासावे?
👥 ही कार्यशाळा कोणासाठी उपयुक्त आहे?
✔️ साहित्यप्रेमी आणि वाचक: ज्यांना आपले वाचन- अनुभव जगासमोर मांडायचे आहेत.
✔️ विद्यार्थी आणि शिक्षक/प्राध्यापक : ज्यांना मराठी साहित्याची समज वाढवून लेखनकौशल्य विकसित करायचे आहे.
✔️ नवोदित लेखक, साहित्याचे अभ्यासक : ज्यांना समीक्षाक्षेत्रातील बारकावे शिकून घेण्याची इच्छा आहे.
✔️ ब्लॉगर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स : ज्यांना पुस्तकांवर आधारित दर्जेदार कंटेंट तयार करायचा आहे.
✔️ ग्रंथ प्रकाशक : मार्केटिंगसाठी ज्यांना पुस्तकाचा प्रभावी परिचय करून द्यायचा आहे.
✨ कार्यशाळेचे स्वरूप : या कार्यशाळेत मार्गदर्शनासोबत लेखन प्रात्यक्षिक आणि प्रश्नोत्तरातून तुमच्या शंकांचे निरसन केले जाईल!
✅ ऑनलाईन नोंदणी करा. मर्यादित जागा !
✅ सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल
✅ सर्वांना कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल
📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
🔂 हा संदेश अधिकाधिक साहित्य प्रेमी, वाचक, लेखक, आपले मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती 🙏

13/04/2026

🎙️ यशस्वी निवेदक बना...
🎙️यशस्वी सूत्रसंचालक बना...
🎙️यशस्वी मुलाखतकार बना...
🎙️यशस्वी उद्घोषक बना...

विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखत
👉नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/nivedan

👨‍🏫 मार्गदर्शक: विघ्नेश जोशी
प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार
🗓️ दिनांक : 16 ते 18 एप्रिल, 2026
🕗 वेळ : रात्री 9.30 ते 10.45
🎥 ऑनलाईन वर्ग : Zoom द्वारे

👉कार्यशाळेतील विषय:
✅ निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
✅ निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
✅ दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
✅ कार्यक्रम स्वरूप व ठिकाणाची पूर्व तयारी
✅ कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
✅ निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
✅ कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
✅ निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
✅ आवश्यक नियमित व्यायाम व साधना
✅ विविध संकल्पना व प्रात्यक्षिके

◽सहभाग शुल्क : रु. 851/-

👉 त्वरित ऑनलाईन नोंदणी करा : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/nivedan

✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645


13/04/2026

एआय सर्वांसाठी
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

◻️मार्गदर्शक : अतुल कहाते (सुप्रसिद्ध लेखक, व्याख्याते, एआय व आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानातील तज्ज्ञ मार्गदर्शक)
👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/ai

आजच्या डिजिटल युगात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) ही काळाची गरज बनली आहे. तंत्रज्ञानाची ही ताकद आपल्या दैनंदिन कामात स्मार्ट पद्धतीने कशी वापरावी, हे शिकवण्यासाठी आम्ही 'सर्वांसाठी एआयचा वापर' ही विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे! यात तुम्ही ChatGPT आणि Gemini सारख्या टूल्सची सोपी ओळख व अचूक 'प्रॉम्प्ट' देण्याचे तंत्र शिकाल. शिक्षक उत्तम लेसन प्लॅन व प्रेझेंटेशन्स बनवायला शिकतील, तर लेखक आणि पत्रकार स्वतःची मूळ शैली जपत ब्लॉग, बातम्या आणि स्क्रिप्ट्स लीलया तयार करू शकतील. आकर्षक फोटो-व्हिडिओ निर्मिती, भाषांतर, रिसर्च आणि तथ्य पडताळणी (Fact-check) आता अधिक सोपी होईल. फेक न्यूज आणि डेटा प्रायव्हसी सांभाळून, लॅपटॉप व मोबाईलवर प्रत्यक्ष डेमोद्वारे सुरक्षित AI चा वापर शिकण्यासाठी आजच आपली नोंदणी निश्चित करा!

🗓️ 14 ते 17 एप्रिल, 2026
🕗 संध्या. 8 ते 9
🎥ऑनलाईन : Zoom द्वारे
◽सहभाग शुल्क : केवळ रु. 799/-

◽ ही कार्यशाळा कोणासाठी : नवोदित लेखक / संशोधकांसाठी, मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी (न्यूजरीडर, रिपोर्टर, ब्लॉगर), शिक्षक / प्राध्यापकांसाठी, आपल्या दैनंदिन जीवनात एआयचा प्रभावी वापर करू इच्छिणाऱ्या सर्व व्यक्ति, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी सर्वांसाठी...

◽कार्यशाळेतील विषय :
✅ AI कसे काम करते? Prompt म्हणजे काय? योग्य प्रॉम्प्ट कसा द्यावा?
✅ LLM म्हणजे काय? ChatGPT, Gemini सारखी साधने कशी काम करतात
✅ AIला लेखन सहाय्यक बनवून लेखाचा आराखडा, रिसर्च पेपरचा सारांश आणि अचूक संदर्भ कसे द्यावेत?
✅ आपली मूळ लेखनशैली जपत प्लॅजिअरिझम टाळून ब्लॉग/पुस्तक लिहिण्याच्या आयडिया कशा शोधाव्यात?
✅ बातम्यांची आकर्षक हेडलाईन, न्यूज स्क्रिप्ट, व्हिडिओ स्क्रिप्ट कसे बनवावेत?
✅ तथ्य पडताळणी (Fact-check basics) - AI आणि पत्रकारितेतील नैतिकता
✅ उत्तम लेसन प्लॅन, प्रश्नपत्रिका आणि विद्यार्थ्यांसाठी सोपी उदाहरणे कशी बनवावीत?
✅ आकर्षक प्रेझेंटेशन स्लाईड्स बनवून विद्यार्थ्यांच्या सर्व अवघड शंका कश्या सोडवाव्या?
✅ दैनंदिन कामात एआयचा स्मार्ट वापर - आकर्षक फोटो, व्हिडिओ बनविण्याचे तंत्रज्ञान
✅ अनुवाद आणि भाषांतरांसाठी एआयचा स्मार्ट वापर
✅ फेक न्यूज, डेटा प्रायव्हसी सांभाळून सुरक्षित AI कसे वापरावे?
✅ लॅपटॉप आणि मोबाईलवर प्रत्यक्ष डेमोद्वारे AI चा वापर शिका

✅ मर्यादित प्रवेश
✅ त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅ सर्व सहभागींना रेकॉर्डिंग व ईप्रमाणपत्र मिळेल...

📱संपर्क/व्हॉट्सॲप ✉️
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक
7507207645

09/04/2026

धन्यवाद 🙏🤗🎉

01/04/2026

📍विश्व मराठी परिषदेतर्फे आयोजित आगामी कार्यशाळा :
🗓️ 5 ते 8 एप्रिल, 2026
1⃣ गर्भसंस्कार

🗓️ 14 ते 17 एप्रिल, 2026
2⃣ एआय सर्वांसाठी

🗓️ 16 ते 18 एप्रिल, 2026
3⃣ निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत

🗓️ 21 ते 25 एप्रिल, 2026
4⃣ माईंडफुलनेस फेस योगा

🗓️ 27 ते 30 एप्रिल, 2026
5⃣ यशस्वी प्रकाशक बना

🗓️ 28 एप्रिल ते 1 मे, 2026
6⃣ कथालेखन : तंत्र आणि मंत्र

👉अधिक माहिती व नोंदणीसाठी
https://vishwamarathiparishad.graphy.com/s/store/courses/Live%20-%20April%202026

27/03/2026

गर्भसंस्कार कार्यशाळा
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/.../garbhasanskar
मार्गदर्शक : डॉ. पौर्णिमा काळे (आयुर्वेदाचार्य व गर्भसंस्कार तज्ज्ञ)
🗓️ दिनांक: 5 ते 8 एप्रिल, 2026
🕗 वेळ: रात्री 8 ते 9
◻️कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
◻️कार्यशाळेतील विषय:
1️⃣ दिवस
✅ मार्गदर्शन: गर्भसंस्कार म्हणजे काय, आई-बाळ Bonding आणि सकारात्मक गर्भधारणा विचार
✅ प्रॅक्टिकल: गर्भसंवाद ध्यान आणि आई-बाळ Connection B reathing
2️⃣ दिवस
✅ मार्गदर्शन: गर्भातील बाळाचा मेंदू विकास, आईच्या भावना व आवाजाचा परिणाम
✅ प्रॅक्टिकल: मेंदू विकासासाठी तंत्र — गर्भसंवाद, humming, मोठ्याने वाचन आणि positive visualization
3️⃣ दिवस
✅ मार्गदर्शन: आईच्या भावना व विचारांचा बाळाच्या स्वभावावर परिणाम, stress कमी करण्याचे मार्ग
✅ प्रॅक्टिकल: जल तत्त्व ध्यान आणि बाळासाठी सकारात्मक affirmations
4️⃣ दिवस
✅ मार्गदर्शन: प्रसूतीची मानसिक तयारी, भीती कमी करणे आणि आत्मविश्वास वाढवणे
✅ प्रॅक्टिकल: birth visualization, relaxation breathing आणि gratitude / blessings meditation
◻️प्रत्येक सत्राची रूपरेषा :
✅ मार्गदर्शन, प्रात्यक्षिक
✅ प्रश्न/ शंका निरसन
✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

18/03/2026

Big shout out to my newest top fans! 💎 Kishore Hasabnis

Drop a comment to welcome them to our community,

18/03/2026

दहावी बारावी नंतर पुढे काय ❓
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

◻️मार्गदर्शक : विवेक वेलणकर (सुप्रसिद्ध करियर मार्गदर्शक, लेखक, व्याख्याते, आजपर्यंत 'करियर प्लॅनिंग' या विषयावर दीड हजारहून अधिक व्याख्याने)
👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/careerplanning

🗓️ 24 मार्च, 2026 | 🕗 संध्या. 7 ते 9
🎥 ऑनलाईन : Zoom द्वारे

दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत विद्यार्थी व त्यांचे पालक आता पुढे काय? याचा विचार करत आहेत . हे दोन्ही टप्पे विद्यार्थ्यांच्या करीअरला निर्णायक वळण देणारे ठरतात. करोनानंतरचा काळ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वाढता प्रभाव व वापर यामुळे योग्य करीअरची निवड हे पालक व विद्यार्थी यांचे पुढील आव्हान आहे. करियर विषयक असंख्य प्रश्नांची उत्तरे ज्येष्ठ करीअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांचेकडून मिळण्याची सुवर्णसंधी...

◽ सहभाग शुल्क : केवळ रु. 200/-

◽विषय:
✅ दहावीनंतर शाखा निवड
✅ इंजिनीअरिंग डिप्लोमा की अकरावी/बारावी?
✅ काॅमर्स, आर्ट्स मधील संधी, लाॅ, सीए , सीएस, फाईन आर्टस्, डिझायनिंग, हाॅटेल मॅनेजमेंट मधील करीअर संधी
✅ सायन्स शाखेतून मेडिकल, इंजिनीअरिंग सोबत फार्मसी, मर्चंट नेव्ही, संशोधन, एव्हिएशन, आर्किटेक्चर, बायो टेक्नॉलॉजी यामधील करीअर संधी
✅ बारावीनंतर संरक्षण दलांमध्ये करीअर
✅ बारावीनंतर इंजिनीअरिंग शाखा निवड कशी ?
✅ मेडिकल मध्ये एमबीबीएस व्यतिरिक्त अन्य करीअर?

✅ मर्यादित प्रवेश
✅ त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅ सर्व सहभागींना मार्गदर्शन सत्राचे रेकॉर्डिंग मिळेल...

📱संपर्क/व्हॉट्सॲप ✉️
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक
7507207645

🔂 हा संदेश अधिकाधिक लोक, मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती

05/12/2025

🎼संगीतोपचार अर्थात म्युझिक थेरपी
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/musictherapy

👩‍🏫 मार्गदर्शक : डॉ. श्रुती गोडबोले (आयुर्वेदाचार्य, संगीत विशारद प्रथम, योगशास्त्र पदविका, Government Certified संगीतोपचार तज्ज्ञ)

🗓️ दिनांक: 9 ते 12 डिसेंबर, 2025
🕗 वेळ: रात्री 8 ते 9
◻️कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

भारतीय शास्त्रीय संगीतातील
कोणत्या स्वरांचा, रागांचा आपल्या शरीर क्रीया आणि मनावर कसा परिणाम होतो यावर आधारित उपचार म्हणजेच संगीतोपचार... ही थेरपी विविध प्रकारच्या मनोकायिक व्याधींवर अतिशय उपयुक्त अशी सहाय्यक किंवा पूरक उपचारपद्धती आहे.
आजच्या आधुनिक जीवनशैली मुळे काही आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. (उदा. निद्रानाश , बीपी, डायबिटीस, हार्मोनल इम्बॅलन्स, इ.) तर काही आजार दुर्धर आणि असाध्य आहेत . (उदा. हृदयरोग, स्मृतिभ्रंश, पार्कीन्सन्स, अल्झायमर, इ.) गतिमान जीवनशैली, मानसिक ताणतणाव यातून या व्याधी निर्माण झाल्या आहेत. अशा प्रकारच्या आजारावर उपयुक्त सहाय्यक थेरपी म्हणून म्युझिक थेरपी लोकप्रिय होत आहे.

👉ही कार्यशाळा कोणासाठी :
✅ संगीत क्षेत्रातील विद्यार्थी, गायक, वादक, कलाकार तसेच डॉक्टर्स, वैद्य, नर्सेस, थेरपीस्ट.
✅ विविध आजारांनी ग्रस्त अशा रुग्णांसाठी.
✅निरोगी लोकांमध्ये स्वास्थ्य टीकवून ठेवण्यासाठी.
✅ सर्वसामान्य लोकांसाठीही ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त...

◻️कार्यशाळेतील विषय:
✅ मानवी जीवनात संगीताचे महत्त्व.
✅ भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख.
✅ संगीतोपचार - संकल्पना, समज, गैरसमज.
✅ शास्त्रीय विवेचन. (Scientific aspects of music therapy)
✅ संगीतोपचार तंत्र
✅ संगीतोपचार कोणासाठी?
✅ शारीरिक मानसिक आजारांवर उपयुक्तता.
✅ संगीतोपचाराची व्याप्ती, उपयुक्तता आणि मर्यादा.
✅ संगीतोपचारातील करिअर संधी.

◻️प्रत्येक दिवसाच्या सत्राची रूपरेषा :
✅ पूर्वार्धामध्ये माहिती
✅ संगीतोपचार तंत्राचा प्रात्यक्षिक अनुभव
✅ प्रश्न/ शंका निरसन

◽सहभाग शुल्क : रु. 799/-

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/musictherapy

✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Hanuman Chouk, Deccan Gymkhana
Pune
411004

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6am
Wednesday 11am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm