18/02/2023
*🔹 सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ* 🔹
आयोजित
🏆 *सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक २०२३*🏆
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा
✨ *अनुसरण यशोगाथेचे! दर्शन विचारसंपदेचे!*
*साद घालते पुन्हा एकदा! व्यासपीठ आपल्या हक्काचे!* ✨
🎙️ *वादाचा प्रस्ताव* 🎙️
*समान नागरी कायदा सबंध देशाला खऱ्या अर्थाने एकसूत्रात बांधेल.*
⏳ *वेळ* ⏳
८(६+२) मिनिटे
🏆 *पारितोषिके* 🏆
🥇प्रथम - रु.६०००/- , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
🥈द्वितीय - रु.४०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
🥉तृतीय - रु.२५००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
🏅उत्तेजनार्थ - रु.१०००/- व प्रमाणपत्र (२ पारितोषिके)
🔖 *सूचना* 🔖
१)स्पर्धेत सहभागी संघातील एका स्पर्धकाने विषयाची अनुकूल व दुसऱ्याने प्रतिकूल बाजू मांडावयाची आहे.
२)स्पर्धकास वैयक्तिक सहभाग देखील नोंदवता येईल.
३)वैयक्तिक पारितोषिक विजेते प्रथम फेरीच्या गुणांवरुन निवडण्यात येतील.
४)सांघिक करंडकासाठी नियोजित प्रथम फेरीच्या गुणांवरुन २ संघ अंतिम फेरीत निवडले जातील.
५)अंतिम फेरीत आयत्या वेळी वादाचा प्रस्ताव दिला जाईल.
६)नियोजित आणि उत्स्फूर्त फेरीच्या एकत्रित गुणांवरून सांघिक विजेते घोषित केले जातील.
७) स्पर्धेत वादग्रस्त विधाने करू नयेत; केल्यास पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही.
८) स्पर्धकांनी नाव नोंदणी करून, आपले आधार कार्ड आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र खाली दिलेल्या गूगल फॉर्म च्या लिंक मध्ये जोडणे बंधनकारक आहे.
९) प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ५० स्पर्धकांनाच स्पर्धेत सहभागी केले जाईल.
१०)सर्व स्पर्धकांनी आपल्या महाविद्यालयाचे संमतीपत्र व ओळखपत्र सोबत आणावे.
११)बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांनी दोन दिवस अगोदर संपर्क साधावा.
१२)दुपारच्या जेवणाची व्यवस्था आयोजकांमार्फत करण्यात आली आहे.
१३)स्पर्धेबाबतची पुढील माहिती What's app द्वारे कळवण्यात येईल.
१४)स्पर्धेच्या नियमांत ऐनवेळी बदल करण्याचे हक्क संयोजकांकडे राखून ठेवलेले आहेत.
*️⃣ *प्रवेश मूल्य*-*️⃣
प्रतिव्यक्ती - १०० रुपये
संघ - १५० रुपये
*विजेत्या संघास फिरता सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक 🏆 आणि वैयक्तिक पारितोषिके*
📆 *दिनांक* : ५ मार्च २०२३
⏰ *वेळ* :सकाळी १० वाजता
📍 *स्थळ* : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ,शिवाजीनगर पुणे ४११००५
📱 *संपर्क*-
हृषिकेश पोवार - ९६२३११०९६९
सार्थक कदम - ७७०९१५३६५१
18/02/2023
🔹 *सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ* 🔹
आयोजित
🌟सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक २०२३🌟
⚜️ *राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा* ⚜️
✨ *अनुसरण यशोगाथेचे! दर्शन विचारसंपदेचे!*
*साद घालते पुन्हा एकदा! व्यासपीठ आपल्या हक्काचे* !✨
🎙 *विषय* 🎙️
१} साहित्यकुपीतील एक वेगळा रंग - सुरेश भट
२}पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
३}Chatgpt एक प्रारंभ - अनंताकडे की अंताकडे...?
४} मानवी विकासाची वाढती आस, घेते धरणीचा घास
५}क्या हाल है; क्या दिखा रहे हो...
६} तो, ती,...'ते'..."श्शऽऽऽ!"
⌛वेळ: ७ (५+२) मिनिटे
🏆 *पारितोषिके* 🏆
🥇प्रथम - रु.६०००/- , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
🥈द्वितीय - रु.४०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
🥉तृतीय - रु.२५००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
🏅उत्तेजनार्थ - रु.१०००/- व प्रमाणपत्र (२ पारितोषिके)
🛑 *स्पर्धेचे नियम* 🛑
१} स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येईल.पहिली फेरी नियोजित वक्तृत्व आणि दुसरी फेरी उत्स्फूर्त वक्तृत्वाची असेल.
२} नियोजित स्पर्धेतून निवडक स्पर्धकांना उत्स्फूर्त वक्तृत्वासाठी पात्र ठरवले जाईल. त्यात ऐनवेळी दिल्या जाणाऱ्या विषयावर ३(२+१) मिनिटे वक्तृत्व सादर करावे लागेल.
३} नियोजित आणि उत्स्फूर्त फेरीच्या एकत्रित गुणांवरून विजेते घोषित केले जातील.
४} स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अगोदर नावनोंदणी करणे बंधनकारक आहे.
५} स्पर्धकांनी नाव नोंदणी करून, आपले आधार कार्ड आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र खाली दिलेल्या गूगल फॉर्म च्या लिंक मध्ये जोडणे बंधनकारक आहे.
६} स्पर्धकाचे वय २५ पेक्षा अधिक नसावे.
७} महाविद्यालयांनी २ विद्यार्थ्यांचा एक किंवा अधिक संघ पाठवून सहकार्य करावे.
८}बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांनी दोन दिवस अगोदर संपर्क साधावा.
९} दुपारच्या जेवणाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येईल.
१०} प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ५० स्पर्धकांनाच स्पर्धेत सहभागी केले जाईल.
११}सर्व स्पर्धकांनी आपल्या महाविद्यालयाचे संमतीपत्र व ओळखपत्र सोबत आणावे.
१२} स्पर्धेबाबतची पुढील माहिती What's app द्वारे कळवण्यात येईल.
१३} स्पर्धेच्या नियमात ऐनवेळी बदल करण्याचे हक्क संयोजकांकडे राखून ठेवलेले आहेत.
*️⃣ *प्रवेश मूल्य*-*️⃣
प्रतिव्यक्ती - १०० रुपये
संघ (दोन व्यक्ती) - १५० रुपये
📆 *दिनांक* : ४ मार्च २०२३
⏰ *वेळ*: सकाळी दहा वाजेपासून.
📍 *स्थळ* : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर, पुणे- ४११००५
💠 *नावनोंदणीसाठी*
https://forms.gle/Kp5wAySs1QqkM6jM7
01/02/2023
कधी शारदा तू... कधी लक्ष्मी तू...
कधी भाविनी वा कधी रागिणी
सहस्त्रावधी.. सूर्य झुकतात जेथे
स्वयंभू अशी.. दिव्य सौदामिनी...
प्राचीन काळापासूनच भारतीय समाजाने स्त्रीचं दाक्षिण्य मान्य केलंय. पण याच समाजाने वेळोवेळी तिची अवहेलना करून तिला कायम दुय्यमच स्थान दिलंय, मग ते महाभारतात असो वा रामायणात.
वरकरणी स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या या दांभिक आणि दिखाऊ समाजाला उद्देशून आपल्या लेखणीतून आपले विचार व्यक्त करतोय SY MTech चा ओमकार कोपनर.
01/02/2023
आपल्या अंतिम श्वासापर्यंत भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणारे भारतमातेचे थोर सुपुत्र म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. डोळ्यांत आशेचे स्वप्न आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ असा त्यांचा क्रांतिकारी बाणा होता. आपल्या क्रांतिकारी चळवळींनी त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा दाखला देणारा त्यांच्या जीवनातील एक प्रसंग आपल्या लेखणीतून सादर करत आहे SY Mechanical ची सानिया सुतार.
01/02/2023
सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला करावा
शिवबाआधी दंडवत जिजामातेस असावा!
ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं त्या राजमाता जिजाऊ. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना सुसंस्कारांचे बाळकडू त्यांनी दिले. आजच्या अंधश्रद्धाळू समाजाला त्यांच्या महान कार्याचा परिचय करवून देत त्या विनम्र स्मृतीस आपल्या लेखणीतून अभिवादन करीत आहे SY Electrical ची साक्षी गाडेकर.
01/02/2023
सूर्यासारखे तेज, चंद्रासारखी शीतलता, आभाळालाही हेवा वाटेल असे विशाल मन आणि अपार युद्ध कौशल्य असणाऱ्या महाभारतातील राधेयाची समर्पक शब्दांतील जीवनी म्हणजे 'मृत्युंजय'.... त्याचीच थोडक्यात ग्रंथ समीक्षा अर्थात book review मांडत आहे SY Mechanical चा वैभव नारखेडे