Abhivyakti

Abhivyakti

Share

Abhivyakti is women's group. We are ordinary girls, boys, women and men, just like you. We organise programs to create awareness on women's issues.

We need to advance our struggle to change this system, and build a new non-violent, peaceful, society, where women are able to live with dignity as human beings, which guarantees everyone the basic conditions for the fullest development of their inherent abilities. For that, we need to build a strong women's movement, which also includes in its fold sensitive men. Let us join hands to build such a

24/03/2026

पत्नी घरकाम करायला नकार देते, हा 'मानसिक छळ' असल्याचे कारण देत दाखल झालेल्या एका घटस्फोटाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच स्वागतार्ह निकाल देताना म्हटले- "तुम्ही एखाद्या मोलकरणीशी लग्न केलेले नाही, तर तुमच्या जोडीदाराशी लग्न केले आहे. त्यामुळे घरकामात आणि स्वयंपाकात पत्नीला मदत करणे हे पतीचेही कर्तव्य आहे."

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने आपल्या समाजात पिढ्यानुपिढ्या रुजलेल्या ‘बाहेरचं काम पुरुषांचं आणि घरातलं काम स्त्रियांचं’ या समीकरणावर बोट ठेवलं आहे. या निर्णयाने या प्रश्नाला वाचा फोडली आहे, की जर घर हे दोघांचे असते, तर घरकामाची जबाबदारी फक्त बाईचीच का मानली जाते? स्वयंपाक करणे, भांडी घासणे, कपडे धुणे, घर साफ करणे, मुलांची काळजी घेणे—ही सर्व कामे आपोआप बाईच्या वाट्याला का येतात? ही कामे “बाईचीच” आहेत असे आपण का गृहीत धरतो?
लहानपणापासूनच मुलींना घरकाम शिकवले जाते. “उद्या सासरी जाऊन उपयोगी पडेल” असे सांगितले जाते. पण मुलांना मात्र अशा प्रकारचे शिक्षण दिले जात नाही. उलट, घरकाम करणारा मुलगा मस्करीचे कारण बनतो.

पुरुष बाहेर जाऊन पैसे कमावतो म्हणून त्याला घरकामातून सूट दिली जाते. पण आज अनेक स्त्रिया देखील बाहेर काम करतात, पैसे कमावतात. तरीही घरकामाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच असते. म्हणजेच स्त्रियांना दुहेरी काम करावे लागते.
घरकामाला “काम” म्हणून मान्यता दिली जात नाही. त्यासाठी कोणताही पगार मिळत नाही, सुट्टी मिळत नाही, आणि त्याचे कौतुकही होत नाही. पण हे काम थांबले तर घर चालेल का? घर हे दोघांचे आहे, तर घरकामही दोघांनी मिळून करायला नको का?

पुरुषांनी घरकामात सहभागी होणे ही कमीपणााची गोष्ट नाही. उलट, ती समानतेची आणि जबाबदारीची जाणीव आहे.
मुलगा आणि मुलगी दोघांनाही घरकाम शिकवले पाहिजे. घरकाम ही केवळ स्त्रीची जबाबदारी नसून ती सर्वांची सामायिक जबाबदारी आहे, हे नवे समीकरण आता आपल्याला रुजवायला हवे.
ोघांचे_घरकाम_दोघांचे ोघांच_असतं_दोघानीं_सावरायचं_असतं #बाईपणभारीदेवा #मैत्रीणी

14/03/2026

🌹रमजान महिन्यानिमित्त ‘संविधान जागर अभियान’चे सप्रेम आवाहन 🇮🇳

🫱🏻‍🫲🏽 चला, आपल्या परिवारासह बंधुभाव आणि प्रेमाचा गोडवा समाजात पसरवूया…

🫂 या पवित्र रमजान महिन्यात आपल्या मुस्लिम बांधवांना, शेजाऱ्यांना किंवा परिचित कुटुंबियांना ‘इफ्तार’साठी (रोजा सोडण्यासाठी) आपल्या घरी सस्नेह आमंत्रित करूया.

👉🏾 वेबसाईट: https://samvidhanjagar.org

📸 (उपक्रम झाल्यावर त्या त्या उपक्रमाचे फोटो आणि थोडक्यात प्रतिक्रिया नक्की पाठवा)

🔖 संविधान जागर अभियान निमंत्रक समिती: मा. न्या. बी. जी. कोळसे पाटील, मा. न्या. अभय ठिपसे, मा. न्या. तानाजी नलावडे, तुषार गांधी, राम पुनियानी, डॉ. नितीन राऊत, धनाजी गुरव, नीरज जैन

📞 स्वप्नील फुसे: 7972345764
📞 डॉ. श्याम मुडे: 94047 08852
📞 श्रद्धा रेखा राजेंद्र: 92704 78335
📞 राजाभाऊ करवाडे: 9822202739

14/03/2026

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही
पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही
छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी
अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही
माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे
जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही
रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर
डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही
येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही
- सुरेश भट

14/03/2026

कवी विंदा करंदीकर यांना विनम्र अभिवादन!

13/03/2026

✊🏾 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 129 व्या स्मृतिदिनानिमित्त

महात्मा फुले वाड्यास भेट

आयोजक: संविधान जागर अभियान, पुणे

📅 रविवार, दि. 15 मार्च 2026
⏰ सकाळी 10:30 वा
📍 स्थळ: महात्मा फुले वाडा, गंज पेठ, पुणे

गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/BnY8BhRRTD2rAw6o7

📞 ऋषिकेश: 94235 07864
📞 वर्षा: 80876 37469

सामाजिक परिवर्तनाच्या महान चळवळीचा साक्षीदार असलेल्या फुले दाम्पत्याच्या कार्याचा प्रेरणादायी इतिहास जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांची ओळख करून घेण्यासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.
या भेटीदरम्यान सावित्रीबाई फुले यांनी 1852 साली स्थापन केलेलं महिला सेवा मंडळ, 1848 ते 1852 काळात फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या 18 शाळा, महाराष्ट्रातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह, विधवा पुनर्विवाह, सत्यशोधक समाजाचे कार्य, काव्यसंग्रह, प्लेगच्या काळातील कार्य अशा विविध पैलूंवर या प्रसंगी उजाळा देण्यात येणार आहे.

1852 मध्ये बांधलेल्या या वाड्याला 1972 मध्ये राज्य-संरक्षित वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. भारतातील स्त्रीशिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती जपणारे हे ऐतिहासिक स्थळ आज स्मारक व संग्रहालय म्हणून विकसित करण्यात आले आहे. येथे त्यांच्या जीवनकार्याशी संबंधित छायाचित्रे, वस्तू आणि ऐतिहासिक दस्तऐवज जतन केले असून, त्यातून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा समृद्ध इतिहास अनुभवता येतो.
या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा!

10/03/2026

अभिव्यक्ती आयोजित भारतीय दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय महिला दिन यावर प्रा. आशालता कांबळे यांनी मांडलेल्या विचारांना प्रसिद्धी माध्यमात मिळालेली प्रसिद्धी.

10/03/2026

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन!

08/03/2026

Sahir Ludhiyanavi

08/03/2026

✊🏾🇮🇳 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संविधान जागर अभियानाचे प्रस्ताव

तुम्हाला 8 मार्च – जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करून समानतेसाठी आपला लढा दृढ करण्याचा दिवस म्हणून जगभरात 8 मार्च हा महिला दिन म्हणून पाळला जातो.

भारतातील महिलांना सर्वप्रथम हक्क प्रदान केले ते भारतीय संविधानाने!समानता, स्वातंत्र्य व सन्मान ही केवळ संविधानातील शब्द नसून स्त्रीच्या जगण्याची मूलभूत तत्त्वे आहेत. संविधानाने महिलांना अधिकार दिले, पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव तेव्हाच येईल, जेव्हा समाज म्हणून आपण ते अधिकार मान्य करू, पाळू आणि संरक्षण करू. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, स्त्रीच्या निर्णय स्वातंत्र्याचा सन्मान करणे आणि समानतेसाठी संघटित होणे—हाच संविधानाचा खरा अर्थ आहे.

उपक्रमांचे प्रस्ताव:

⚖️ 📑🎙️ संविधानाने महिलांना दिलेले हक्क आणि अधिकार
याविषयी ठिकठिकाणी पत्रक वाटून आपण जनजागृती करू शकता.
जर आपणास यावर कुठे जाहीर व्याख्यान किंवा भाषण द्यायचे असल्यास त्यासंबंधित पीपीटी प्रेझेंटेशन आणि भाषण स्क्रिप्ट देखील वेबसाईट वर उपलब्ध आहे.

📜महिला सन्मान शपथ
आपण आपल्या सोसायटी/मोहल्ला/वस्ती मध्ये लोकांना गोळा करून शपथ देऊ शकतो. आपण जिथे काम करतो, मित्रांमध्ये शपत देऊ शकतो. तसेच शाळांमध्ये/कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शपथ देऊ शकतो. सोबत पत्रकं वाटू शकतो.

🏆 संघर्षशील महिलांचा सन्मान
संघर्षातून उभ्या राहिलेल्या – विधवा किंवा एकल महिला, प्रतिकूल परिस्थितील शिक्षण घेतलेल्या, सामाजिक जाणीव असलेल्या, घरगुती आणि लैंगिक हिंसाचाराच्या विरोधात लढलेल्या, कर्मचारी युनियनचे काम करणाऱ्या, समाजाने आखून दिलेल्या चूल व मूल ह्या चाकोरीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करणे. त्यासाठी लागणारे सन्मान प्रमाणपत्रासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता.

📕 छोटी चित्रमय पुस्तिका: महिलांचा सन्मान, भारतीय संविधान
भारतीय संविधानाने महिलांना दिलेल्या सन्मान, हक्क व समतेचा अर्थ चित्रमय पद्धतीने उलगडणारी ही पुस्तिका आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया!

🇮🇳 संविधान सभेतील 15 महिला विषयी
यावरील पोस्टर प्रदर्शन आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये लावून जनजागृती करू शकता.
यावरील पोस्टर आपण शाळा कॉलेज किंवा ऑफिसमध्ये लावू शकता.
संविधान सभेतील 15 महिलांची माहिती सांगणारा कार्यक्रम करू शकता.

🎙️"आम्ही संविधान सभेतील महिला बोलतोय"
संविधान सभेतील 15 महिलांविषयी त्या भूमिकेत जाऊन 15 महिलांना घेऊन त्यांची भूमिका आणि जीवनपट सादर करणारा कार्यक्रम करू शकता.

🎴पोस्टर प्रदर्शन लावण्याचे आवाहन
स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी महिलांवरील पोस्टर प्रदर्शन लावून जनजागृती करू शकता.
देशाच्या उभारणीमध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांवर पोस्टर प्रदर्शन लावून जनजागृती करू शकता.

🎭 नाटक
संविधान आणि महिला विषयावर स्त्री शक्तीचा जागर नाटक
संविधान आणि महिला विषयावर कॉलेज मुलींसाठी नाटक

👉🏿 शालेय विद्यार्थ्यांसाठी महिलांचे (संत, स्वातंत्र सैनिक, समाजसुधारक) लघु “आत्मचरित्र” तयार करून ते विद्यार्थ्यांना परिपाठामध्ये वाचायला देऊ शकता.
👉 प्रेरणादायी गाण्यांवर महिला व मुलींचा डान्स बसवणे.
👉🏿 स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांशी व महिलांच्या संघर्षाची गाणी व कविता यांचे सादरीकरण करू शकता.
👉 संविधान आणि महिला याविषयाला धरून नाटक/ रिल्स/ प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करु शकता.

🌐 संविधान जागर अभियान वेबसाईटवर सर्व साहित्य मोफत उपलब्ध आहे: https://samvidhanjagar.org
(कोणताही कॉपीराइट नाही, तुम्ही तुमच्या संघटनेच्या नावाने साहित्य छापून जनजागृती करू शकता.)

📸 आपण राबवलेल्या उपक्रमांचे फोटो / व्हिडिओ जरूर पाठवा.🙏🏽

🙏🏽 संविधान जागर अभियान निमंत्रक समिती: मा. न्या. बी. जी. कोळसे पाटील, तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ. नितीन राऊत, मा. न्या. अभय ठिपसे, मा. न्या. तानाजी नलावडे, धनाजी गुरव, नीरज जैन

📞 स्वप्नील फुसे: 7972345764
📞 डॉ. श्याम मुडे: 94047 08852
📞 श्रद्धा रेखा राजेंद्र: 92704 78335
📞 राजाभाऊ करवाडे: 9822202739

07/03/2026

अभिव्यक्ती आयोजित व्याख्यान: भारतीय दृष्टिकोनातून जागतिक महिला दिन.

🎙️वक्त्या: प्रा. आशालता कांबळे

Photos from Abhivyakti's post 07/03/2026

✊🏾🇮🇳 *आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संविधान जागर अभियानाचे प्रस्ताव*

तुम्हाला 8 मार्च – जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करून समानतेसाठी आपला लढा दृढ करण्याचा दिवस म्हणून जगभरात 8 मार्च हा महिला दिन म्हणून पाळला जातो.

भारतातील महिलांना सर्वप्रथम हक्क प्रदान केले ते भारतीय संविधानाने!समानता, स्वातंत्र्य व सन्मान ही केवळ संविधानातील शब्द नसून स्त्रीच्या जगण्याची मूलभूत तत्त्वे आहेत. संविधानाने महिलांना अधिकार दिले, पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव तेव्हाच येईल, जेव्हा समाज म्हणून आपण ते अधिकार मान्य करू, पाळू आणि संरक्षण करू. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, स्त्रीच्या निर्णय स्वातंत्र्याचा सन्मान करणे आणि समानतेसाठी संघटित होणे—हाच संविधानाचा खरा अर्थ आहे.

*उपक्रमांचे प्रस्ताव:*

⚖️ 📑🎙️ *संविधानाने महिलांना दिलेले हक्क आणि अधिकार*
* याविषयी ठिकठिकाणी पत्रक वाटून आपण जनजागृती करू शकता.
* जर आपणास यावर कुठे जाहीर व्याख्यान किंवा भाषण द्यायचे असल्यास त्यासंबंधित पीपीटी प्रेझेंटेशन आणि भाषण स्क्रिप्ट देखील वेबसाईट वर उपलब्ध आहे.

📜*महिला सन्मान शपथ*
आपण आपल्या सोसायटी/मोहल्ला/वस्ती मध्ये लोकांना गोळा करून शपथ देऊ शकतो. आपण जिथे काम करतो, मित्रांमध्ये शपत देऊ शकतो. तसेच शाळांमध्ये/कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शपथ देऊ शकतो. सोबत पत्रकं वाटू शकतो.

🏆 *संघर्षशील महिलांचा सन्मान*
संघर्षातून उभ्या राहिलेल्या – विधवा किंवा एकल महिला, प्रतिकूल परिस्थितील शिक्षण घेतलेल्या, सामाजिक जाणीव असलेल्या, घरगुती आणि लैंगिक हिंसाचाराच्या विरोधात लढलेल्या, कर्मचारी युनियनचे काम करणाऱ्या, समाजाने आखून दिलेल्या चूल व मूल ह्या चाकोरीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करणे. त्यासाठी लागणारे सन्मान प्रमाणपत्रासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता.

📕 *छोटी चित्रमय पुस्तिका: महिलांचा सन्मान, भारतीय संविधान*
_भारतीय संविधानाने महिलांना दिलेल्या सन्मान, हक्क व समतेचा अर्थ चित्रमय पद्धतीने उलगडणारी ही पुस्तिका आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया!_

🇮🇳 *संविधान सभेतील 15 महिला विषयी*
* यावरील पोस्टर प्रदर्शन आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये लावून जनजागृती करू शकता.


🌐 *संविधान जागर अभियान वेबसाईटवर सर्व साहित्य मोफत उपलब्ध आहे:* https://samvidhanjagar.org
_(कोणताही कॉपीराइट नाही, तुम्ही तुमच्या संघटनेच्या नावाने साहित्य छापून जनजागृती करू शकता.)_

04/03/2026

✊🏾🇮🇳 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संविधान जागर अभियानाचे प्रस्ताव

🇮🇳 संविधान सभेतील 15 महिला विषयी
यावरील पोस्टर प्रदर्शन आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये लावून जनजागृती करू शकता.
यावरील पोस्टर आपण शाळा कॉलेज किंवा ऑफिसमध्ये लावू शकता.
संविधान सभेतील 15 महिलांची माहिती सांगणारा कार्यक्रम करू शकता.

👍🏽https://www.instagram.com/p/DVbUjdsCFb6/?igsh=cnZiZTN4c2JrN3Fu

👍🏽https://www.facebook.com/share/16JEeh9iSD/

संविधानाचा जागर करण्यासाठी आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी जरूर पेज लाईक आणि शेअर करा.

🌐 संविधान संबंधित विविध उपक्रम राबवायचे साहित्य (पत्रक, पुस्तिका, महामानवांच्या विचाराचे पोस्टर/बॅनर/स्टिकर्स) तुम्हाला या वेबसाईट वर मोफत मिळेल: https://samvidhanjagar.org

📞 स्वप्नील फुसे: 7972345764
📞 डॉ. श्याम मुडे: 94047 08852
📞 श्रद्धा रेखा राजेंद्र: 92704 78335
📞 राजाभाऊ करवाडे: 9822202739

🙏🏽 संविधान जागर अभियान निमंत्रक समिती: मा. न्या. बी. जी. कोळसे पाटील, तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ. नितीन राऊत, मा. न्या. अभय ठिपसे, मा. न्या. तानाजी नलावडे, धनाजी गुरव, नीरज जैन

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Infinity, Law College Road, Below Lenovo Showroom, Opposite Syndicate Bank, Nalstop, Erandwana, Near Nirmitee Showroom
Pune
411004