30/04/2018
प्रतिनिधी पुणे- शिक्षण हे आयुष्याचा अविभ्याज्य घटक आहे. आपल्या लहानपणीचे अनेक शिक्षक आपल्याला आठवतात. पण एरवी आता तसे शिक्षण राहिले नाही, जसे आपल्या लहानपणी होते, अशी चर्चा अगदी प्रत्येक घरात रंगत असते. परंतु आजही असे अनेक शिक्षक, व्यक्ती आणि संस्था आहेत ज्यांनी समाज घडविण्याचा जणू विडा उचलेला आहे. अशा २१ महानुभवांचा सन्मान नुकत्याच पार पडलेल्या “विद्या सेवा पुरस्कार सोहळा २०१८” मध्ये पुण्यात करण्यात आला.
सुपर ब्रेन्स इंडिया आयोजित इम्पेल कोर्प व जहांगीर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वरील सोहळा थाटामाटात संपन्न झाला. शैक्षणिक क्षेत्रातील हा पुरस्कार एक मानाचा असा पुरस्कार ठरला आहे. ह्या वर्षी पुणे व पिंपरी चिंचवड मधील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना देण्यात आला. ह्या पुरस्कारासाठी १०० पेक्षा जास्त अर्ज स्वीकारले गेले होते. त्यातून निवडक ५० लोकांचा प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. ह्यातून योग्य अश्या २१ पुरस्कार्थी निवडण्यात आले होते.
हा पुरस्कार एकूण ४ विभागात घेण्यात आला आहे. त्यात पहिला प्रशाशकीय विभागासाठी “विद्या भुषण पुरस्कार” २ व्यक्तींना प्रदान आला ज्यात
मा. शिवाजी दौंडकर, प्रशासकीय अधिकारी, प्रार्थमिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका
आणि मा. संतोष जंगम, केंद्र समन्वयक, शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
असे सन्मानार्थी आहेत. ह्यांनी त्यांचा चौकटी पलीकडे जावून शिक्षण संवर्धनाचे काम केले आहे. शाशकीय सेवेत असून असे कार्य करणे उल्लेखनीय आहे म्हणून ते समाजासाठी जणू भुषणच आहेत.
दुसरा वैयक्तिक विभागासाठी “विद्या प्रेरणा पुरस्कार २०१८” एकूण ४ व्यक्तींना प्रदान करण्यात आला. त्यामध्ये मा. शिवाजी खांडेकर, मा. नकुल काटे, डॉ. प्रवीण पारगावकर, मा. विना व प्रकाश नाशिककर ह्यांना सन्मानित करण्यात आले. ह्या सर्वांनी शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठ्या स्वरुपात दिले आहेत. स्वतः प्रेरित राहून इतरांना प्रेरणा देण्याचा यांच्या संवेदनेने लाखो विद्यार्थ्यांचे जीवन बदललेले आहे. आपल्या समाजासाठी एक नवी प्रेरणा ह्या व्यक्तींनी निर्माण केली आहे.
तिसरा विभाग शालेय विभागासाठी “विद्या सेवा पुरस्कार २०१८” एकूण ५ शाळांना प्रदान करण्यात आला. ज्यामध्ये
ज्ञानदीप विद्यालय-निगडी,
छत्रपती शिवाजी विद्यालय-मुळशी,
उत्कर्ष शिक्षण कला आणि क्रीडा मंडळ- आंबेगांव,
बालाजी माध्यमिक विद्यालय-धनकवडी,
सुंदरबाई मराठे विद्यालय-खराडी पुणे
ह्यांचा सन्मान करण्यात आला. ह्या सर्व शाळांचे नाविन्यपूर्ण उपक्रम व विद्यार्थी विकासाची तळमळ खास प्रेरक ठरली आहे. नोकरी नुसती न करता त्यात सेवा भाव नाक्की महत्वाचा आहे. अशा समर्पित सेवा भाव असणाऱ्या शाळांना ह्या पुरस्काराने गौरविण्यात आहे आहे.
चौथा विभाग क्लासेस विभागासाठी “विद्या गौरव पुरस्कार” एकूण १० क्लासेसना त्यांचा उत्कृट कार्यासाठी प्रदान करण्यात आला ज्यामध्ये
चाटे कोचिंग क्लास-विश्रांतवाडी,
जीवन क्लासेस-मयूर कॉलोनी,
सिद्धये क्लासेस-सदाशिव पेठ,
प्रथम कोचीन क्लासेस-पाषाण,
मराठे मेरीट क्लासेस-नारायण पेठ,
ज्ञानांकुर क्लासेस- थेरगाव,
उत्कर्ष क्लासेस-निगडी,
एक्सेल कोचिंग क्लासेस-येरवडा,
प्रायमा क्लासेस-कोथरूड,
स्पेक्ट्रम एजुकेशन-फातिमा नगर, पुणे.
हे सर्व नुसतेच क्लासेस नसून एक संस्कृती जपणारी माणसे आहेत. ह्यांचे कार्य जरी कामर्सियल तरी समर्पणाने ते करत आहेत. जीव ओतून कार्य करणाऱ्या ह्या सर्व महानुभवांचा गौरव झालाच पाहिजे म्हणून वरील पुरस्कार ह्यांना देण्यात आला आहे.
पुण्याचा शैक्षणिक क्षेत्रातील हा पुरस्कार सोहळा फारच हटके ठरला आहे कारण शिक्षण व्यवस्थेतले अनेक मान्यवर पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर जमली होती. हा एक ऐतिहासिक सोहळा ठरला आहे.
ह्या सोहळ्यासाठी २ अतिशय उल्लेखनीय कार्य करणारी हृदय स्पर्शी मानसे प्रमुख अतिथी म्हणून लाभलीत ज्यात जहांगीर शेख सर, सायंटीस्ट, जे ३ इडियट मुवी फेम रिअल लाईफ रँचो आहेत. जे फक्त १ ली शिकले आहेत पण ३५ पेक्षा जास्त शोध आज त्यांचा नावे आहेत, आपल्या दोन्ही राष्ट्रपतींनी त्यांना शाबासकी प्रदान केलेली आहे. दुसरे मान्यवर मा. अनिल गुंजाळ सर जे उपशिक्षण अधिकारी असून सोबत कवी व निवेदकही आहेत. ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मार्दर्शन केले आहे. तसेच सुपर ब्रेन्स इंडिया व इम्पेल कोर्पचे चे संस्थापक मा. युवराज लांबोळे व गायत्री लांबोळे, जहांगीर फाऊंडेशनचे मा. विशाल सर व संपूर्ण टीमने ह्या पुरस्कार सोहळ्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
ह्या विद्या सेवा पुरस्काराचा निवड प्रक्रियेमध्ये मुख्य मुलाखतकार म्हणून सुपर ब्रेन्सचे ब्रेन पॉवर कोच व मास्टर ट्रेनर श्रीकांत लांबोळे यांनी योगदान दिले आहे. तसेच समुपदेशक गौरव जैसवाल, अक्षय बेंद्रे आणि मनीषा ह्यांनी योगदान दिले आहे.
ह्या सोहळ्यात प्रचंड मोठी प्रेरणा सगळ्यांना मिळाली आहे. या सोहळ्याचे नियोजन सुपर ब्रेन्स टीम श्रीकांत लांबोळे, अक्षय बेंद्रे, गौरव जैसवाल, मनीषा ससाणे, आदित्य, मयूर कदम, संपदा दरपेल्ली, अंजली सिलोकर आदी लोकांनी केले आहे.
सोहळ्याचे सूत्रसंचालन अंजली झलके तर आभार सुपर ब्रेन्सच्या संस्थापिका व ब्रेन पॉवर कोच गायत्री लांबोळे ह्यांनी व्यक्त केले.