Palakatva

Palakatva PALAKATVA invites you to be part of a movement that is redefining success through compassion and collaboration.

Whether you are an individual seeking support, a business interested in partnership, or a community leader eager to make a difference, there is

02/02/2022

डिजिटल संवाद हा अनैसर्गिक संवाद प्रकार आहे. कारण यामध्ये होत जाणाऱ्या संवादातून ऊर्जा उत्पन्न होत नाही. ऊर्जा ही कोणत्याही गोष्टीला नैसर्गिक अंग देण्याचे काम करते. इतर काही कारणांमुळे डिजिटल संवाद अधिक जवळचा वाटतो आहे पण तो व्यक्ती व्यक्ती मधील अंतर वाढविणारा ही आहे. तुम्हाला कसे वाटते, "डिजिटल संवाद" या विषयाचे शिक्षण शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले पाहिजे?

28/11/2021

अचाट शिक्षण.

फिनलँड उत्तर युरोपातला एक देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे. इथली शिक्षणव्यवस्था जगावेगळी आहे. जगातली ती सर्वात चांगली शिक्षणव्यवस्था मानली जाते.
फिनलँड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वात जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. त्यांच्यात नापास होण्याचं प्रमाण जवळ जवळ शून्य असतं. पीआयएसए (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) नावाची संस्था जगातल्या पंधरा वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगानं परीक्षण करते, तर त्या संस्थेच्या निकषांत फिनलँडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात.
या देशात शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. सर्वांसाठी ते उपलब्ध आहे आणि अनिवार्यसुद्धा आहे. या देशातला प्रत्येक विद्यार्थी आपलं संपूर्ण शिक्षण फुकट घेतो. त्यासाठी त्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याला लागणारी सर्व पुस्तकं आणि लागणारं सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जातं. देशातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं तिथलं सरकार चालवतं आणि सर्व खर्च सरकार उचलतं. या देशात एकही शाळा खाजगी नाही.
या शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलांना दुपारचं जेवणही दिलं जातं. ते मोफत तर असतंच, पण अतिशय उच्च दर्जाचं असतं.
इथलं कोणतंही मूल सात वर्षांचं होईपर्यंत शाळेत जात नाही. सात वर्षांच्या आधी मुलांना शाळेत 'टाकणं' हा गुन्हा समजला जातो. सात वर्षापर्यंत मुलांनी आपलं बालपण जगून घेतलं पाहिजे, असं तिथं मानलं जातं. अर्थात सात वर्षांच्या आतल्या मुलांना सांभाळण्यासाठी सरकारी संस्था असतात आणि सहा वर्षांच्या मुलांसाठी शाळेत प्रवेश करण्याआधीच्या संस्था असतात. पण तिथंही मुलांना पुस्तकी शिक्षण दिलं जात नाही, तर तिथं त्यांना खेळणं, मोकळेपणानं जगणं, इतरांशी मैत्री करणं, नवे मित्र मिळवणं, दुसऱ्या मुलांना समजून घेणं, परस्पर सहकार्याची भावना त्यांच्यात निर्माण होईल हे पाहणं, अशा गोष्टी त्यांच्या शाळेत जाण्याची पूर्वतयारी म्हणून शिकवल्या जातात. त्यानंतर सात ते सोळा या वयोगटासाठी तिथं शिक्षण अनिवार्य आहे. त्यानंतर एकाही मुलाला शाळा शिकणार नाही, हे म्हणायची सोय नाही.
इथं प्रत्येक वर्गातली पटसंख्याही छोटी असते. फक्त वीस मुलांना एका वर्गात ठेवलं जातं. शाळेचा वेळही अगदी कमी असतो. दिवसातले फक्त चार तास. त्यातच दुपारची जेवणाची सुट्टीही असते. आणि घरी जाताना मुलांना गृहपाठ अजिबात दिला जात नाही. त्यांनी आपल्या घरी अभ्यास करावा, असं तिथल्या शाळांना, सरकारला आणि त्यांच्या घरच्यांनाही वाटत नाही.
अर्थात तिथंही काही मुलं अभ्यासात कमकुवत असतात. पण अशा मुलांना कुणी नावं ठेवत नाही, हिडिसफिडिस करत नाही. अशा मुलांवर शिक्षक आणि शाळा विशेष लक्ष देतात. त्यामुळं अभ्यासाची एक सरासरी ते गाठतात, पण फारच गरज वाटली तर अशा मुलांना विशेष वर्गात पाठवलं जातं.
फिनलँडमध्ये शिक्षक होणं हे फारच महत्वाचं आणि मानाचं समजलं जातं. समाजात शिक्षकांना मोठ्या विशेषत्वानं आणि सन्मानानं वागवलं जातं. अर्थात शिक्षक होण्याची संधी सर्वांनाच मिळते असं नाही, तर काही निवडक आणि पारखून घेतलेल्या लोकांनाच शिक्षक केलं जातं. शिक्षक होण्यासाठी पदविकेपर्यंत शिक्षण लागतं, पण सोबत इतरही सवयी, वर्तणुकी योग्य असाव्या लागतात. सगळ्या गोष्टींची नीट पारख करून आणि पारखण्यात कसलीही हयगय न करता मगच निवड केली जाते. ज्यांना भविष्यात शिक्षक व्हायचंय, त्यांचं वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच शिक्षक होण्याचं प्रशिक्षण सुरू केलं जातं. बाकीच्या शिक्षणाबरोबरच त्यांना शिक्षक होण्याचा वेगळा आणि विशेष अभ्यास करावा लागतो. मग पदविकेपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची शिक्षक होण्याची परीक्षा घेतली जाते. त्यात अभ्यासूपणा, कल्पकता, ज्ञान, नाविन्याची ओढ आणि विद्यार्थ्यांशी वागण्याचा स्वभाव तपासला जातो.
सर्वात महत्वाचं म्हणजे या देशात प्रत्येक शिक्षकानं स्वतःचे शैक्षणिक प्रयोग करण्यासाठी पूर्ण मुभा दिली जाते. उलट प्रत्येक शिक्षकाकडून तीच मोठी अपेक्षा केली जाते की, जुन्या गोष्टींचा घाण्याचा बैल होण्यापेक्षा प्रत्येक शिक्षकानं अभ्यासात, शिकवण्याच्या पद्धतीत, शिकवायच्या विषयांत सतत नाविन्य आणावं, नव्या नव्या गोष्टी कराव्यात आणि नियमितपणे काळाच्या पुढं राहावं. एका अर्थानं तिथला प्रत्येक शिक्षक हा संशोधकच असतो.
फिनलँडच्या शिक्षणव्यवस्थेत मुलांची परीक्षा घेण्याची पद्धत नाही. त्यामुळं मुलांवर परीक्षेचा ताण अजिबात नसतो. तिथं मुलांनी शिकणं महत्वाचं मानलं जातं, परीक्षा देणं नाही. आपलं नऊ वर्षांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या सोळाव्या वर्षी प्रत्येक मुलाची राष्ट्रीय स्तरावर एक चाचणी घेतली जाते. त्या मुलाला पुढच्या शिक्षणात प्रवेश घेता येण्यासाठी ही चाचणी महत्वाची असते, आणि तिच्यात उत्तीर्ण व्हावं लागतं. त्या चाचणीत सहसा कुणी अनुत्तीर्ण होत नाही. पण पुढं मूल कोणत्या क्षेत्रात जाणार हे या चाचणीत ठरतं.
इथल्या शाळांमध्ये आणि शिक्षणात ज्ञान आणि इतरांशी सहकार्याची भावना या गोष्टींवर भर दिला जातो. मुलांना आपापसात स्पर्धा करू दिली जात नाही. शिक्षणव्यवस्थाच अशी आहे की, मुलं एकमेकांशी स्पर्धा करण्यापासून दूर राहतात. सोबतच मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष जगण्यातल्या आणि व्यवहारी गोष्टी शिकवल्या जातात. धर्म, परमेश्वर अशा गोष्टींचा लेशही त्यांच्या शाळांमध्ये आणि शिक्षणात नसतो. इथली शिक्षणपद्धती मुलांना नुसतं शिक्षित बनवत नाही, तर सुशिक्षित बनवते आणि त्याबरोबर प्रत्येक मूल चांगलं माणूस होईल, आदर्श जगेल-वागेल, हेही शिकवते. इथल्या शिक्षणात जास्त जोर असतो तो गणित आणि विज्ञानात. त्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो आणि शिक्षक विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणिताच्या बाबतीत आधुनिक राहिले पाहिजेत याची दक्षता घेतली जाते. सोबत त्यांनी मुलांना शिकवण्याच्या नव्या नव्या पद्धती शोधल्या पाहिजेत, हेही अपेक्षित केलं जातं.
या देशात चांगल्या शाळा आणि खराब शाळा असा प्रकार फारसा नाही. चांगल्या शाळा आणि खराब शाळा यांच्या गुणवत्तेत अगदी रेषभर अंतर असतं.
इथल्या शाळांमध्ये मुलांना वेळेचं बंधनही नसतं. वर्गातल्या अभ्यासाचे तासही बंधनकारक नसतात. कोणतंही मूल त्याला हवा तेवढा वेळ वर्गात बसू शकतं. त्याला वाटलं, वर्गाच्या बाहेर जावं, खेळावं किंवा मस्त आराम करावा, तर ते मूल ते करू शकतं. शाळा त्याला त्या सोयी पुरवते. सर्व शाळांमध्ये मुलांच्या अभ्यास सोडून खेळण्याच्या किंवा आराम करण्याच्या सोयी असतात.
प्रत्येक वर्गात दर पंचेचाळीस मिनिटांनंतर मुलांना पंधरा मिनिटांची सुट्टी दिली जाते. मुलं त्या वेळात खेळू-बागडू शकतात, शाळेच्या बागेत फेरफटका मारू शकतात, हवं ते करू शकतात. अर्थात वर्ग चालू असतानाही मुलं हवं ते करू शकतात आणि बाहेरही जाऊ शकतात. वर्गात शिक्षकांशी किंवा इतर मुलांशी गप्पाही मारू शकतात.
वर्गात मुलांची आणि शिक्षकांची बसण्याची व्यवस्थाही मजेशीर असते. शिक्षक सहसा टेबल-खुर्ची वापरत नाहीत. मुलंही स्वतःला हवं तिथं बसतात. त्यांनी बाकड्यांवरच बसलं पाहिजे असं बंधन नाही. त्यांना वाटलं तर ते त्यांच्या खुर्चीत बसतात, जमिनीवर बसतात, पाय पसरतात किंवा चामड्याच्या बिनचेअरवर रेलून बसतात. वर्गाला वाटलं तर वर्ग शिक्षकांच्या भोवती गोल करून जमिनीवर बसतो. शिक्षकही मुलांमध्ये जमिनीवर बसतात. कधी कधी वर्ग शाळेच्या गच्चीत किंवा बागेतही बसतो. मुलं आणि शिक्षक मित्र होऊन ती गोष्ट ठरवतात. त्यात मुलांच्या इच्छेला पहिला मान.
सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षक मुलांचे चांगले मित्र असतात.
अशी ही शिक्षणव्यवस्था आजच्या जगात पहिल्या क्रमांकाची मानली जाते. १९७० साली त्यांनी शिक्षणाचा हा प्रयोग सुरू केला आणि १९९० पासून तोच पक्का केला.
आज फिनलँड श्रीमंत देशांमध्ये खूप वरच्या स्थानावर आहे. नागरिकशास्त्रामध्ये क्रमांक एकवर आहे. स्त्रीपुरुष समानतेच्या बाबतीत जगात क्रमांक एकवर आहे, शांत आणि सुखी जगण्याच्या बाबतीतही क्रमांक एकवर आहे आणि तुम्ही ते ऐकलंच असेल की, जगात सर्वात आनंदी देशांमध्येही फिनलँड क्रमांक एकवर आहे.

29/04/2020

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे आहे काय?
1. संयम
2. रोगप्रतिकार शक्ती
3. औषधोपचार
4. इतर पर्याय
पाहूया.....

अस म्हणतात की, या पंचत्त्वांपासून मानवी शरीराची उत्त्पती झाली आहे. असे असेल तर सृष्टीच्या या पाच तत्वांचा समतोल बिघडल्यास जीव सृष्टीला धोका आहे हे नक्की होते. हे सर्व माहित असून ही आज कोरोनाविरुद्धच्या लढाईत माणूस नेमक काय करतो आहे. पाहणे गमतीशीर आहे.

मानवी विकासाच्या नावाखाली प्रदुषणाचा डोंगर उभा करणारा माणूस आज स्वत:ला कोरोना पासून कसं वाचवायचं, त्यानंतर कसं जगायचं आणि आर्थिक विषमता कशी दूर करायची यामध्ये गुरफटून गेला आहे.

डॉक्टर म्हणतात, औषध शोधले जाई पर्यंत लोकांनी आपल्या जीवन शैलीमध्ये बदल करायला हवा. जसे की, मास्क वापरा, हात साबणाने स्वच्छ धुवा, प्रत्येकामध्ये ३ फुट अंतर ठेवा, रोग प्रतिकार शक्ती वाढवा, प्राणायम-योगा करा, मानसिक स्वास्थ चांगले ठेवा इत्यादी. याच गोष्टींचे पालन करण्यासाठी जगातील प्रत्येक शासन लोकांना घरातून बाहेर पडू देत नाही. हे सर्व उत्तम आहे. पण काय हे पुरेसे आहे?

जिथे माणसला जगविणाऱ्या पृथ्वीची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाली आहे तिथे माणसाची रोग प्रतिकार शक्ती किती तग धरेल? त्यापुढे जाऊन पाहूया आपल्याकडे आज ही माहिती नाहीये की, आपल्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. आपल्याकडे बहुतेक लोक हे फक्त जगण्यासाठी अन्न खात असतात. तेच अन्न त्यांना मिळेल की नाही असा प्रश्न असताना रोगप्रतिकार शक्ती सारख नाटक त्यांनी कसे कराव?

आज आपण मागील ३०-४० दिवसात ढासळलेली अर्थ व्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी उद्योग-धंदे कसे चालू करता येतील यावर विचार विनिमय करत आहे. असे केले नाही तर कोरोना होऊ न होऊ लोक उपासमारीने किंवा अन्य कारणाने मरतील. हे सगळ बरोबर आहे... पण काय निसर्गाची रोग प्रतिकार शक्ती आपण चांगली ठेवली असती तर आज हे सर्व प्रश्न निर्माण झाले असते का?

ज्याप्रमाणे मानवी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काम केले गेले पाहिजे असे म्हणतो त्याउलट आपण जर निसर्गाची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी निसर्गाला सहकार्य करूया असे म्हटल्यास आपोआपच मानवी रोगप्रतिकार शक्ती वाढेल हे नक्की.

परंतु, हे करायचे कसे....?

हवा आणि पाणी प्रदूषण काहीही झाले तरी होणार नाही यासाठी कडक धोरण आखणे व प्रत्यक्षात उतरविणे.

नैसर्गिक साधन संपत्तीचे चक्र तसेच लोकसंख्या व्यवस्थापन व त्यांचे आरोग्य या गोष्टी विचारात घेऊन/समजून घेऊन त्याआधारे उद्योग धंद्यांचे नियोजन करणे.

आज जर या गोष्टींचा कोणताही विचार न करता आहे तसेच सर्व उद्योग धंदे पुन्हा चालू केल्यास आपणच आपल्या मृत्यूस जबाबदार आहोत असेच म्हणावे लागेल.

09/04/2020

पालकत्व म्हणजे काय?
आपल्या समाजातील जे लोक काहीतरी करू इच्छित आहेत, ज्यांच्याकडे काहीतरी करून दाखविण्याची क्षमता आहे, जे लोक स्वतःशी प्रामाणिक आहेत अशा लोकांना आपल्याच समाजातील अनुभवी लोकांनी काही काळापुरता आधार देण.... आता हा आधार कसा असावा ते पाहूया.... ज्या लोकांकडे ज्ञान आहे त्यांनी ज्ञान द्यावे, ज्या लोकांकडे अनुभव आहे त्यांनी किमान नियोजन कसे करावे ते सांगावे, ज्या लोकांकडे आर्थिक क्षमता आहे त्यांनी ठराविक काळासाठी आर्थिक सहकार्य करावे.... असे केले तरच भारतीय अर्थव्यस्थेला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. आज आपल्या ग्रामीण भागात असे अनेक लोक आहेत ज्यांनी जन्म गरिबीच्या काळोखात घेतला आहे, परंतु या लोकांना निसर्गाने आपल्या पेक्षा नक्कीच मोठी स्वप्न दिली आहेत. नुसती स्वप्न दिली नहीत तर त्या स्वप्नांचा पाठ पुरावा करण्याच पाठबळ ही दिल आहे. अशा लोकांच्या आयुष्यातील वेळ हा आफाट प्रयत्नांच्या जोरावर संपू द्यायचा नसेल आणि त्या स्वप्नामुळे या विश्वातील दारिद्र दूर करायचे असेल तर मात्र आपल्या समाजातील अनुभवी लोकांनी विचार केला पाहिजे.... की, आपण आपली सामाजिक बांधिलकी म्हणून काय केले पाहिजे?
पालकत्व अस व्यासपीठ आहे जेथे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीस आवश्यक असलेल त्रिकुट म्हणजे अनुभव, ज्ञान, अर्थ यांचा एकत्रित सहयोग मिळतो. जेव्हा समाज अशा प्रकारे काम करायला सुरुवात करतो तेव्हा शासन स्वत:हून काम करायला लागते.
आज खूप लोक आहेत जे अतिशय सुंदर पणे शिकवतात की, एखाद्या व्यवसायाची नेमकी सुरुवात कशी करायची..... तरीही उद्योग विश्वामध्ये बहुतांश स्टार्टअप व्यवसाय असंख्य अडचणीला का सामोरे जातात? कारण सोप आहे... आज ज्या प्रमाणे कोरोनच मुळ संपविण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याप्रमाणे व्यवसायात उतरू पाहणाऱ्या असंख्य स्वप्नांना घेऊन प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येणाऱ्या अडचणींचे मूळ संपविण्याचा प्रयत्न केला जात नाही.
मान्य आहे परीक्षा प्रत्येकाला द्यावी लागते... परंतु प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी लागते.

05/09/2019
Let's salute the nation "HAPPY INDEPENDENCE DAY"
15/08/2019

Let's salute the nation "HAPPY INDEPENDENCE DAY"

19/06/2019

सातारा जिल्ह्यातील विविध गावांत जाऊन मान्सूनचा आनंद चित्रकलेच्या अभ्यासातून घेण्यासाठी, चित्रकलेची जनजागृती करण्यासाठी ज्या चित्रकार मित्र-मैत्रिणीना अभ्यासक म्हणून जाण्याची इच्छा आहे. अशा उत्साही चित्रकार मित्र-मैत्रिणीनी आपले नाव व मोबाईल नंबर (9423482110) या नंबरवर पाठवावे. अभ्यासक म्हणून जाण्या-येण्यासाठी होणारा प्रवास खर्च हा पालकत्व कडून केला जाणार आहे. तसेच अभ्यासक जाणार असलेल्या गावांमध्ये 1 ते 2 दिवस राहण्याची व जेवणाची व्यवस्था ही संबंधित गावातील लोक करणार आहेत.

पालक हा फक्त आधार देण्याचे काम करीत असतो.
15/06/2019

पालक हा फक्त आधार देण्याचे काम करीत असतो.

आपल्या राष्ट्रातील कलेला अजून समृद्ध करण्यासाठी येणार्‍या पिढीला कलेचे बाळ कडू देण्याची प्रत्येक कलाकाराची जबाबदारी आहे....
06/02/2019

आपल्या राष्ट्रातील कलेला अजून समृद्ध करण्यासाठी येणार्‍या पिढीला कलेचे बाळ कडू देण्याची प्रत्येक कलाकाराची जबाबदारी आहे. त्याच गोष्टीला लक्षात घेऊन, आम्ही केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. Ganesh K Kalaskar

पालकत्व हा विचार सहज आहे.
11/12/2018

पालकत्व हा विचार सहज आहे.

29/08/2017

Address

Pune
415004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palakatva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Palakatva:

Shortcuts

Share