Pune District Mallakhamb Association

Pune District Mallakhamb Association PDMA is pune district mallakhamb association. The various activities undertaken in Pune District in mallakhamb field are run under PDMA.

09/08/2026

पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकॅडमी आयोजीत जिल्हास्तरीय निमंत्रित आढ्या व उड्या स्पर्धा २०२६.

#मल्लखांब #आढ्या #उड्या #स्पर्धा

मल्लखांब कौशल्यांचा नवा अध्याय! 🤸‍♂️ पुणे जिल्हा मल्लखांब संघटना, शिवाजी उदय मंडळ, चिंचवड व ड्रॅगन मल्टी स्पोर्ट्स फाउंड...
16/05/2026

मल्लखांब कौशल्यांचा नवा अध्याय! 🤸‍♂️

पुणे जिल्हा मल्लखांब संघटना, शिवाजी उदय मंडळ, चिंचवड व ड्रॅगन मल्टी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षक कार्यशाळा उत्साहात.

दिनांक १५ मे २०२६ रोजी पुणे जिल्हा मल्लखांब संघटना व ड्रॅगन मल्टी स्पोर्ट्स फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी उदय मंडळ चिंचवड येथे मल्लखांब प्रशिक्षक कार्यशाळा आयोजन करण्यात आले होते उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे उपाध्यक्ष श्री चिन्मय पाटील , श्री शिवाजी उदय मंडळ सचिव श्री राहुल कापसे , पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे सहसचिव श्री संगमेश्वर खुरपे , कार्यकारणी सदस्य श्री सचिन लखाशे व पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे तांत्रिक समिती अध्यक्ष श्री ऋषिकेश अरणकल्ले (शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते) उपस्थित होते तसेच समारोप समारंभ प्रसंगी श्री संजय सुकळकर वर्धा जिल्हा मल्लखांब संघटना अध्यक्ष उपस्थित होते
सदर कार्यशाळे मध्ये ४ पुरुष प्रशिक्षक व ६ महिला प्रशिक्षक सहभागी झाले होते.

प्रथम कै. श्री धनंजय दामले चषक जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा दिनांक २५, २६ एप्रिल महाराष्ट्रीय मंडळ, टिळक रोड येथे पार प...
28/04/2026

प्रथम कै. श्री धनंजय दामले चषक जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा दिनांक २५, २६ एप्रिल महाराष्ट्रीय मंडळ, टिळक रोड येथे पार पडल्या.सदर स्पर्धा संस्कृती कलाविष्कार आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धचे उदघाट्न मल्लखांबातील प्रथम "अर्जुन पुरस्कार "विजेते खेळाडू श्री सागर ओव्हाळकर यांच्या हस्ते करण्यात आले, सदर प्रसंगी संस्कृती कलाविष्कार संस्थेच्या अध्यक्षा -श्रीमती प्रज्ञा चिवटे आणि सचिव श्रीमती मोनिष्का बत्तूला, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र खरे, उपाध्यक्ष - श्री चिन्मय पाटील, उपाध्यक्षा - सौ स्वाती सातपुते, श्री सचिन लखाशे-सदस्य , तांत्रिक समिती अध्यक्ष -श्री ऋषिकेश अरणकल्ले उपस्थित होते, स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा महाराष्ट्रीय मंडळाचे सरकार्यवाह -श्री रोहनजी दामले यांच्या हस्ते पारितोषिक पार पडला, यावेळी संघटनेचे कार्यध्यक्ष श्री दिलीप भिकूले, उपाध्यक्ष श्री निलेश धावडे, सदस्य -श्री समीर शिंदे, वरिष्ठ प्रशिक्षक श्री रविंद्र पेठे, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना तांत्रिक समिती अध्यक्ष -श्री मोहन झुंजेपाटील उपस्थित होते.सदर स्पर्धेवेळी पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेमार्फत घेण्यात आलेल्या पंच परीक्षेतील उत्तीर्ण पंचांनाही प्रमाणपत्रे देण्यात आली.सदर स्पर्धेत एकूण २१५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune District Mallakhamb Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category