MPSC & UPSC Exam Preparation

MPSC & UPSC Exam Preparation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MPSC & UPSC Exam Preparation, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे, Pune.

These Page Is Created For The People Who Whants To Give MPSC & UPSC Exams
And Also For The People Who Have Passed This Exam
U Can Share Your Experience Here Inbox

शेतात राबणाऱ्या माऊलीच्या लेकीचा दिल्लीत डंका; चासनळीची पल्लवी बनली ‘असिस्टंट कमांडंट’! 🇮🇳💐अहिल्यानगर जिल्ह्यातील चासनळी...
23/08/2026

शेतात राबणाऱ्या माऊलीच्या लेकीचा दिल्लीत डंका; चासनळीची पल्लवी बनली ‘असिस्टंट कमांडंट’! 🇮🇳💐

अहिल्यानगर जिल्ह्यातील चासनळी (ता. कोपरगाव) येथील पल्लवी बाळासाहेब आहेर हिने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) परीक्षेत संपूर्ण भारतात ९५ वा क्रमांक मिळवत ‘असिस्टंट कमांडंट’ या क्लास-वन अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

पल्लवी अवघ्या तिसरीत असतानाच तिच्या वडिलांचे छत्र हरपले. मात्र या दुःखद प्रसंगाने खचून न जाता, वडिलांच्या आठवणी आणि फोटोला प्रेरणास्थान मानत तिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाचा हा उत्तुंग टप्पा गाठला.

पल्लवीने माध्यमिक शिक्षण कोळपेवाडी येथे, तर उच्च शिक्षण फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे पूर्ण केले. सन २०२३ पासून ती CAPF परीक्षेची तयारी करत होती.

आई मनीषा आहेर आणि काका साहेबराव आहेर यांनी शेतात कष्ट करून तिच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळली. काकांनी प्रत्येक टप्प्यावर तिला मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. कौटुंबिक आणि आर्थिक अडचणींवर मात करत पल्लवीने मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे.

ग्रामीण भागातून दिल्लीपर्यंतचा पल्ला गाठणाऱ्या पल्लवीच्या जिद्दीला सलाम! तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! 🇮🇳💐

निकिता ताई अन्न व औषध निरीक्षक (Food and Drug Inspector) पदी निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!
23/08/2026

निकिता ताई अन्न व औषध निरीक्षक (Food and Drug Inspector) पदी निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!

शेतकऱ्याचा मुलगा, घरीच केला अभ्यास! एमपीएससी मार्फत थेट राज्य कर निरीक्षक पदावर निवडआलेगाव पागा, ता. शिरूर येथील कष्टकरी...
23/08/2026

शेतकऱ्याचा मुलगा, घरीच केला अभ्यास! एमपीएससी मार्फत थेट राज्य कर निरीक्षक पदावर निवड

आलेगाव पागा, ता. शिरूर येथील कष्टकरी कुटुंबातील विकास सोपान अवचिते यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 2025 मधील परीक्षेत राज्य कर निरीक्षक पदावर यश मिळवले. ग्रामीण आणि सामान्य आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या विकास यांनी कोणत्याही मोठ्या सुविधा किंवा विशेष मार्गदर्शनाशिवाय घरूनच नियमित अभ्यास केला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आलेगाव पागा येथे, तर बारावीपर्यंतचे शिक्षण न्हावरे येथील श्री. मल्लिकार्जुन माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून 2016 मध्ये कला शाखेची पदवी घेतली. पदवीच्या शिक्षणादरम्यानच त्यांना स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण झाली. आर्थिक अडचणी आणि विविध आव्हाने असतानाही त्यांनी ध्येय सोडले नाही. अखेर 2025 मध्ये MPSC परीक्षा दिल्यानंतर त्यांनी राज्य कर निरीक्षकपदाचे स्वप्न साकार केले. विकास यांचे यश त्यांच्या कुटुंबासह आलेगाव पागा परिसरासाठी अभिमानाचा विषय ठरले असून, परिस्थिती कितीही कठीण असली तरी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वासाने यश मिळवता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांच्या कामगिरीतून मिळतो.

“ऊसतोडणी कामगाराचा मुलगा एक दिवस न्यायाधीश बनला…” ही ओळ वाचायला जितकी सुंदर वाटते, तितकाच काटेरी होता ज्ञानेश्वर चव्हाण ...
23/08/2026

“ऊसतोडणी कामगाराचा मुलगा एक दिवस न्यायाधीश बनला…” ही ओळ वाचायला जितकी सुंदर वाटते, तितकाच काटेरी होता ज्ञानेश्वर चव्हाण यांचा प्रवास. परभणी जिल्ह्यातील गणेश नगर तांड्यात जन्मलेल्या ज्ञानेश्वर यांच्या आयुष्यात लहानपणापासूनच संघर्ष होता. आई-वडिलांसोबत ऊसतोडणीसाठी होणारं स्थलांतर, गरिबी, शिक्षणाच्या मर्यादित सुविधा आणि रोजच्या जगण्याची धडपड… या सगळ्यात अनेकांची स्वप्नं अर्धवट तुटतात. पण ज्ञानेश्वर यांनी परिस्थितीला नशिब मानलं नाही, तर त्यावर मात करण्याची जिद्द ठेवली. जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, आळंदीतील विद्यालय आणि पुढे पुण्यात बी.कॉम, एलएलबी-एलएलएमपर्यंतचं शिक्षण त्यांनी प्रचंड संघर्षातून पूर्ण केलं.

२०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) व JMFC परीक्षेत ते अंतिम यादीपासून थोडक्यात दूर राहिले. अनेक जण अशा अपयशानंतर हार मानतात, पण ज्ञानेश्वर यांनी पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला. मात्र नियतीची परीक्षा अजून बाकी होती. २०२३ मध्ये वडिलांचं निधन झालं आणि आयुष्याचा मोठा आधार हरपला. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, पण त्या दुःखातही त्यांनी स्वतःचं स्वप्न मरू दिलं नाही. मित्र, शिक्षक आणि कुटुंबाच्या आधाराने त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला. सोशल मीडियापासून दूर राहत, कठोर दिनचर्या पाळत आणि स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून देत त्यांनी सातत्य कायम ठेवलं.

एप्रिल २०२५ मध्ये निकाल लागला आणि त्या ऊसतोडणी कामगाराच्या मुलाने संपूर्ण महाराष्ट्रात १२ वा क्रमांक मिळवत न्यायिक अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पुढे ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांची न्यायिक संशोधक सहाय्यक पदावरही निवड झाली. ज्ञानेश्वर चव्हाण यांचा प्रवास हा फक्त एका विद्यार्थ्याच्या यशाची गोष्ट नाही, तर संघर्षात जगणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी आशेचा किरण आहे. कारण परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास असेल, तर तांड्यातून निघालेला मुलगाही एक दिवस न्याय देणाऱ्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकतो. ❤️

IPS विश्वास नागरे पाटलांचे ८ इयत्ता अ मधील मार्कशीट. बघा सर तेव्हापासूनच हुशार आणि मेहनती होते.❤️❤️
22/08/2026

IPS विश्वास नागरे पाटलांचे ८ इयत्ता अ मधील मार्कशीट. बघा सर तेव्हापासूनच हुशार आणि मेहनती होते.❤️❤️

22/08/2026

📱मोबाईल हातात असावा… पण आयुष्य हातातून निसटता कामा नये! 💔
एका मोबाईलच्या हट्टापासून सुरू झालेला वाद… आणि त्यातून एका कुटुंबाचा झालेला दुर्दैवी अंत — ही घटना मन हेलावून टाकणारी आहे.
ही घटना फक्त एक दुःखद बातमी म्हणून वाचून पुढे जाऊ नका. यातून आपण आणि आपल्या मुलांनी काहीतरी शिकण्याची गरज आहे.
आज मोबाईल आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. शिक्षण, माहिती, काम आणि संपर्कासाठी मोबाईल उपयोगी आहे. पण जेव्हा मोबाईलची गरज “हट्टात” आणि हट्ट “व्यसनात” बदलतो, तेव्हा त्याचे परिणाम कुटुंबाच्या नात्यांवर, मानसिक आरोग्यावर आणि संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतात.
👨‍👩‍👦 पालकांनी मुलांशी बोलण्यासाठी वेळ द्या.
📵 मोबाईल काढून घेण्यापेक्षा त्याच्या वापराबद्दल प्रेमाने समजावून सांगा.
❤️ मुलांच्या मनात काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
🗣️ मुलाने “माझ्याकडे दुसरा मार्ग नाही” असे म्हटले, तर त्याला रागावू नका—त्याच्याजवळ बसा, ऐका आणि मदत घ्या.
⏰ घरामध्ये मोबाईल वापरासाठी स्पष्ट वेळ आणि नियम ठरवा.
🤝 मुलांना मोबाईलपेक्षा कुटुंब, मैत्री, खेळ, शिक्षण आणि प्रत्यक्ष संवाद यांच्याशी जोडून ठेवा.
एक मोबाईल पुन्हा मिळू शकतो…
पण गेलेलं आयुष्य पुन्हा मिळत नाही.
मुलांच्या हातात मोबाईल देताना आपण त्यांच्यासोबत संवादाची, संयमाची आणि विश्वासाची दोरीही मजबूत करूया.
🙏 ही पोस्ट कोणाची निंदा करण्यासाठी नाही.
🙏 कोणत्याही कुटुंबाला अशा संकटाला सामोरे जावे लागू नये, हा एकमेव उद्देश आहे.
🙏 ही घटना एका कुटुंबाची शोकांतिका आहे; तिच्यातील तपशीलांपेक्षा त्यातून मिळणारा धडा महत्त्वाचा आहे.
आजच आपल्या मुलाशी १० मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून मनापासून बोला. कदाचित तो संवाद त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संवाद ठरू शकतो. ❤️

आईला मगरीच्या तावडीतून वाचवणारी १० वर्षांची स्वर्णी! ❤️🙏चिपळूण तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत...
22/08/2026

आईला मगरीच्या तावडीतून वाचवणारी १० वर्षांची स्वर्णी! ❤️🙏
चिपळूण तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत १० वर्षांच्या स्वर्णी पवार हिने आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेलं धैर्य कौतुकास्पद आहे.

नंदिनी पवार या वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुत असताना मगरीने अचानक त्यांच्या पायाला पकडून त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत नंदिनी यांनी नदीकाठचा दगड घट्ट पकडून ठेवला.

आई संकटात असल्याचं पाहून स्वर्णी घाबरली नाही. तिने क्षणाचाही विलंब न करता आईचा हात पकडला आणि तिला पाण्याबाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. आईच्या धैर्यासोबत लेकीच्या या प्रसंगावधानामुळे नंदिनी यांची मगरीच्या तावडीतून सुटका झाली.

या घटनेत नंदिनी यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वय अवघं १० वर्षं… पण संकटाच्या क्षणी दाखवलेलं धैर्य मात्र खूप मोठं! स्वर्णीच्या या धाडसाला मनापासून सलाम! ❤️🙏

या पठ्ठ्याने तब्बल 6 वेळा मिळवले MPSC परीक्षेत यश
22/08/2026

या पठ्ठ्याने तब्बल 6 वेळा मिळवले MPSC परीक्षेत यश

हार्दिक अभिनंदन, निकिता लोंगडे! 💐💐MPSC मार्फत Assistant Processor (राजपत्रित अधिकारी) पदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळव...
22/08/2026

हार्दिक अभिनंदन, निकिता लोंगडे! 💐💐

MPSC मार्फत Assistant Processor (राजपत्रित अधिकारी) पदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 🎉👏

तुमची मेहनत, जिद्द आणि चिकाटी खरोखरच प्रेरणादायी आहे.
नारी शक्तीचा विजय असो! 💪🏻🌸

तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐
खूप खूप अभिनंदन! 🎊👏

मैत्री म्हणजे केवळ गप्पा, मौजमजा किंवा आठवणी नसतात, तर योग्य मित्र मिळाले तर ती आपल्या स्वप्नांना बळ देणारी मोठी ताकदही ...
22/08/2026

मैत्री म्हणजे केवळ गप्पा, मौजमजा किंवा आठवणी नसतात, तर योग्य मित्र मिळाले तर ती आपल्या स्वप्नांना बळ देणारी मोठी ताकदही ठरते. अशीच प्रेरणादायी कहाणी UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तीन मित्रांची आहे. ऑनलाईन क्लासपासून सुरू झालेली त्यांची मैत्री अभ्यासाच्या प्रवासात आणखी घट्ट झाली.

देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेची तयारी करताना तिघांनी एकमेकांना सातत्याने साथ दिली, अडचणींमध्ये धीर दिला आणि ध्येयापासून दूर जाऊ दिले नाही. १६ एप्रिल २०२४ रोजी UPSC २०२३ चा निकाल जाहीर झाला आणि तिघांच्या मेहनतीला यश मिळाले. या मित्रांपैकी एक IAS, दुसरी IRS आणि तिसरा IPS अधिकारी बनला. त्यांची मैत्री आणि यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

Address

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे
Pune
411007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MPSC & UPSC Exam Preparation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share