फर्जंद, फत्तेशिकस्त, जंगजोहर, पावनखिंड,अनेक मालिका,नाटककार यांचे सुप्रसिध्द निर्माता,दिग्दर्शक,लेखक, अभिनेता श्री. दिगपाल लांजेकर यांची "सकाळ" तर्फे झालेल्या मुलाखतीत त्यांची शाळा व शिक्षकां बद्दल त्यांनी काढलेले गौरवोदगार कृपया ऐकावे आणि पूर्ण मुलाखतही ऐका.
https://m.youtube.com/watch?v=zeRZVFb74FM&feature=youtu.be
Sheth Hiralal Saraf Prashala शेठ हिरालाल सराफ प्रशाला.
Mitranno Athvale ka kahi? Chala Tar Mug Punha tya Athvani, magchya benchvar basun kelele kide, madhl
SHETH HIRALAL SARAF PRASHALA was established in 1922 in the heart of the city . " Bharat High School " was the original name of the school when it was started and it was renamed SHETH HIRALAL SARAF PRASHALA in 1976. This school is very popular in the city because of educational systems and the well known teachers. Sensing the importance of Computer Education in years to come, SHETH HIRALAL SARAF
25/07/2021
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना.
कासेगावकर सर
26/06/2021
फतेशिकस्त ,पावनखिंड,फर्जंद आणि जंगजोहर या चित्रपटांचा लेखक आणि अभिनेता आणि शेठ हिरालाल सराफ प्रशाळेचा विद्यार्थी आणि आम्हाला सर्वाना अभिमान वाटावा असा आमचा सिनियर..
23/06/2021
तुमचा सगळ्यात आवडता विषय कुठला?
साभार - आठवणीतील पुणे
माझे हस्ताक्षर
माझी शाळा रविवार पेठेतील 'विद्या प्रसारिणी सभेची, तेव्हाची भारत हायस्कूल, सध्याची सराफ हायस्कूल'. शैक्षणिक वर्ष १९५८. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरू झाली. शाळा तीच असली तरी नवी इयत्ता, नवा वर्ग, नव्या मित्र-मैत्रिणी, नवा गणवेष, नवे विषय, नवे शिक्षक, नवी वह्या-पुस्तके, नवे दप्तर, नवी कंपासपेटी, पेन, पेन्सिली, नवे संकल्प आणि नवी स्वप्नेही!
तसा मी अभ्यासात बरा विद्यार्थी. चित्रकलेत उत्तम. ड्राँईंगच्या दोन्ही परीक्षा 'ए' ग्रेडमधे उत्तीर्ण केलेल्या. इतर उपक्रमातही माझा उत्साही सहभाग असायचा. सायन्स क्लबचा सेक्रेटरी, पी.टी. लीडर, स्काऊटचा पथकनायक, वर्गाचा प्रतिनिधी इ. पदांवर मी सहज वावरायचो. केवळ वक्तृत्व आणि वार्षिक संम्मेलनाच्या विविध गुणदर्शनात, म्हणजे नाटक, नाच, गायन, नाट्यछटा, कथाकथन इ. रंगमंचावरून सादर करण्याच्या कलांविषयी मात्र माझे 'शेपुट आत' असायचे. स्टेजवर जायची विलक्षण भीति वाटायची.
तर शाळा सुरू होऊन तीन-चार दिवस झाले होते. सर्व शिक्षक तसे परिचयाचे होते. सर्व विषयांचे शिक्षक कळले होते. विविध विषयांच्या अभ्यासाचा श्रीगणेशा झाला होता. बहुतेक विषयांच्या वह्यांची चार-पाच पाने लिहिली गेली होती.
आज पहिल्या तास मराठीचा झाला. तास संपवून शिक्षक निघून गेले. दुसरा तास इंग्रजीचा, म्हणजे श्री मुळे सरांचा होता. त्या विषयाची वह्या-पुस्तके बाकावर ठेऊन आम्ही मुले सरांची वाट पहात होतो. पाच मिनिटे झाली पण सर आले नाहीत. ही संधी मिळताच वर्गातील मुले बडबड, गडबड करू लागली. गोंगाट वाढू लागला. काहींनी आपल्या जागा सोडून इकडे तिकडे जायला, फिरायला सुरुवात केली.
तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती, वय अदमासे पंचवीस वर्षे, गौर वर्ण, गोल गुबगुबीत चेहरा, मध्यम शरीरयष्टी, अंगात बदामी रंगाचा बुशशर्ट चाँकलेटी पँट, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा, काळे कुळकुळीत केस व्यवस्थित विंचरलेले, मुखावर सात्विक भाव. ते वर्गात येऊन सरळ शिक्षकांच्या खुर्चीवर बसले. मी माँनिटर होतो वर्गाचा. कोणी अनोळखी शिक्षक आले आहेत हे माझ्या लक्षात येताच मी मुलांना खुणेने शांत व्हायला सांगू लागलो. एक दोन मिनिटात मुलांचा गोंगाट विरला. मुले आपापल्या जागेवर येऊन शांत बसली.
ती व्यक्ती हे सारं थंडपणे न्याहाळत होती. सगळा वर्ग शांत झाला. आता मुले शांत आणि ती व्यक्तीही शांत. हे कोण असावेत याचा मी अंदाज घेत होतो. पूर्वी शाळेत कधी पाहिले नव्हते त्यांना. कोणी नवीन शिक्षक असावेत. कदाचित मुळेसर आज येणार नसावेत म्हणून हे तासावर आले असतील किंवा मुळेसरांऐवजी हेच आपल्याला यापुढे इंग्रजी शिकवणार असतील. काहीही असो. पण ती शांतता आता बोचायला लागली.
मी उभा राहून उगाचंच आगाऊपणा करीत त्यांना विचारले, "सर, आपल्याला यापूर्वी आम्ही पाहिलेले नाही कधी शाळेत. मुलांना आपलं नाव समजून घ्यायची उत्सुकता आहे."
त्यांनी बसल्या बसल्या हाताने मला खाली बसाण्याची खूण केली. मी पटकन आसनस्थ झालो.
सरांनी सारा वर्ग एकदा न्यहाळला. हातातली खडूची पेटी उघडली. एक खडू उचलून त्याचे अग्र मोडून जवळच्या टोपलीत टाकले. बसल्या बसल्याच, काहीही न बोलता, मागे वळून ते फळ्यावर काही लिहू लागले. ती लिहित असलेली एकेक अक्षरे मी मनातल्या मनात वाचू लागलो. ती अशी होती..."शं. ना. नवलगुंदकर".
( हो, हेच पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शं. ना. नवलगुंदकर. 'स्वा. सावरकर' या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पुढे डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.)
एकूण सरांचे नाव वाचले, समजले. शं. ना. नवलगुंदकर. पण खरं म्हणजे मी आवाक् झालो ते सरांचे सुंदर हस्ताक्षर बघून. इतके सुरेख हस्ताक्षर ही प्रथमच पहात होतो. नावातले प्रत्येक अक्षर अत्यंत डौलदार, सम उंचीचे, वळणदार, घोटीव, जणू मोत्याची माळच! प्रत्येक अक्षरामधील अंतर समान. माथ्यावर सरळ रेषा. फळ्यावर लिहितानाची सहजता वाखाणण्यासारखी. ते हस्ताक्षर पाहून मी थक्क झालो होतो. सरांच्या हस्ताक्षराच्या तुलनेत मला माझ्या हस्ताक्षराची लाज वाटली. मी मनोमन ओशाळलो.
सर बोलू लागले. "माझं नाव शंकर नागेश नवलगुंदकर. या शाळेत मी शिक्षक म्हणून आलोय नव्याने. मी इंग्लिश आणि गणित विषय शिकवतो. आज तुमचे नेहमीचे शिक्षक श्री मुळेसर काही कारणामुळे येऊ शकत नसल्याने तुमच्या वर्गावर आलोय". येवढे प्रास्ताविक सांगून त्यांनी त्या तासाला 'दि लिटिल मँच गर्ल' हा इंग्रजी पाठ आपल्या ओघवत्या वाणीत शिकवला. सारा वर्ग भाराऊन गेला सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे. हा तास कधी संपला ते आम्हाला कळलंही नाही.
सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीपेक्षाही त्यांचे सुंदर अक्षर पाहून मी मात्र दिवसभर अस्वस्थ होतो. मधल्या सुट्टीत डबा खाण्याची आणि खेळण्याची इच्छाच झाली नाही. संध्याकाळी शाळा सुटल्यावर वाटेत कुठेही न रेंगाळता सरळ घरी आलो. मुकाट्याने रात्रीचे जेवण केले. अंरुणावर तळमळत पडलो. कधी डोळा लागला ते कळलंच नाही.
सकाळी लौकर उठलो तो काही निश्चय करूनच. सरळ सर्व विषयांच्या वह्या काढल्या आणि प्रत्येक वही पाहू लागलो. काय ते गबाळं अक्षर माझं, शीः! अगदी रडवेला झालो. क्षणभर थांबलो आणि ठरवलं, लिहिलेली सर्व पानं फाडून टाकायची आणि पुन्हा लिहायची.
मागचा पुढचा विचार न करता, बघता बघता, मी सगळ्या वह्यांमधली लिहिलेली सगळी पानं टराटरा फाडली आणि बाजूला विषयवार लाऊन ठेवली. डोळे मिटून घेतले. सरांचे ते सुंदर अक्षर अंतःचक्षूने न्यहाळू लागलो. काही क्षण गेले. डोळ्यातून अश्रु टपकू लागले.
भावनावेग काहीसा ओसरला तसा सावरलो. आता मी विद्येची देवता श्री गजाननाला आळवून म्हटले, "देवा, मी असा दुर्गुणी का झालो? माझं हस्ताक्षर इतके वाईट का रहावे?लाज वाटते मला माझ्या अक्षराची. देवा, मला सुंदर हस्ताक्षर दे. मनोहर शब्दसंग्रह दे."
काही क्षणानंतर मी डोळे पुसून उठलो. पेन उघडून त्यातील निळी शाई ओतून दिली. पेन धुतले आणि त्यात काळी शाई भरली. सतरंजीवरच लेखनासन जमवले आणि एक कोरा कागद पुढे आढून एकाग्र चित्ताने समर्थांच्या 'मनाचा श्लोका'तील पहिला श्लोक लिहिला...
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा
नमू शारदा मूळ चत्वारवाचा
गमू पंथ आनंत या राघवाचा।।
जय जय रघुवीर समर्थ!
श्लोक लिहून पूर्ण झाला आणि थांबलो. कसा लिहिला गेलाय हे पाहिले आणि काय आश्चर्य, श्लोकाच्या सर्व ओळी एकसारख्या, सुडौल अक्षरात कागदावर उतरलेल्या! सगळी अक्षरे एक सारख्या उंचीची, वर्तुळाकार, ठोस, भरीव, एकमेकांपासून सारख्याच अंतरावर लिहिलेली. श्लोकाचे चारही चरण म्हणजे चार मोत्याच्या माळाच जणू!
ते पाहून मी आश्चर्यचकित झालो. हे मी लिहिलंय यावर माझाच विश्वास बसेना. माझे हस्ताक्षर क्षणात इतके कसे सुधारले? खरंच हे मीच लिहिलंय का?
मित्रहो, त्या एका क्षणी माझे हस्ताक्षर संपूर्ण बदलले आहे, सुधारले आहे, सुंदर दिसते आहे याचा मला साक्षात्कार झाला!
मला आत्मविश्वास आला आणि पुढील काही तासात मी सर्व वह्या पुन्हा लिहून काढल्या. सर्व वह्यातील सर्व पानांवर उतरलेली सर्व अक्षरे एकसारखी तशीच सुंदर उतरली होती!
दसबोध दशक ८ समास ६ च्या आरंभी श्रोता वक्त्याला विचारतो, "सत्संग महिमा कैसी? मोक्ष लाभे कितां दिवसीं? हे मज निरोपावे।। धरिता साधूची संगती। कितां दिवसां होते मुक्ती?" त्यावर ठामपणे वक्ता उत्तरतो, "मुक्ती लाभे तत्क्षणी। विश्वासतां निरूपणीं!
मलाही माझ्या गचाळ हस्ताक्षराच्या अवगुणातून तत्क्षणी मुक्ती मिळाली, ज्याक्षणी मी समर्थांच्या 'निरूपणा'वर विश्वास ठेवला आणि मला आदरणीय गुरुवर्य श्री शं. ना. नवलगुंदकरांसारख्यांचा सत्संग मिळाला!
सर्व वह्या पुन्हा मनासारख्या लिहून झाल्यामुळे मी अत्यंत उत्साहाने, उल्हासाने, आनंदाने, आत्मविश्वासाने शाळेत गेलो. कालच्या सारखाच आजही दुसरा तास इंग्रजीचा, म्हणजे मुळे सरांचा. पण आज ते स्वतः वर्गावर आले.
मी नेहमी पहिल्या पुढच्या बाकावर बसणारा विद्यार्थी. वर्गात सरांचा प्रवेश झाला. मुलांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले आणि सारे खाली बसले. "काल वर्गावर आलेल्या नव्या शिक्षकांनी काय शिकविले रे तुम्हाला" असा प्रश्न मुलांना विचारत असताना त्यांनी सहज माझी वही उचलून चाळायला सुरवात केली. मुलांनी एका स्वरात सांगितले, "काल 'दि लिटिल मँच गर्ल' हा लेसन झाला सर." "ओ, आय सी" म्हणत, माझ्या वहीचे प्रत्येक पान सर निरखून पहू लागले. माझ्या छातीची धडधड वाढली. वही घेऊन सर वळले, खुर्चीवर बसले आणि त्यांनी आपल्या कोटाला लावलेले पेन काढून माझ्या वहीवर काहीतरी खरडले. मी नर्व्हस. त्यांनी वही पुन्हा एकदा भरभर चाळली आणि ती मिटून माझ्या हातात दिली. मी ती घेऊन मटकन् खाली बसलो आणि थरथरत्या हाताने उघडून पाहिली तो काय, त्यावर त्यांनी रिमार्क लिहिला होता, "Excellent!"
तो शेरा पाहून मी शहारलो. नुसता एकटक पहात बसलो. सर मला म्हणले, " बघत काय बसलायस नुसता. Read the remark loudly. Let the whole class know."
माझ्या तोंडून शब्द फुटेना. तशी त्यांनी माझ्या हातातून वही हिसकाऊन घेतली आणि उंच करून साऱ्या वर्गाला दाखवीत म्हणाले, "See this presentation, quality of work, handwriting, neatness. असं काम पाहिजे, असं सुबक अक्षर पाहिजे. बघा एकदा सगळ्यांनी नीट." मग माझ्या पाठीवर हात फिरवित म्हणाले, "Good job done. I am proud of you my boy. Keep it up."
मित्रहो, मला सांगायला अभिमान वाटतो कि, यानंतर पुढील आयुष्यात, विद्यार्थिदशेत, व्यावसायिक जीवनात हस्ताक्षर, सादरीकरण (presentation) यासाठी मी 'Excellent', 'outstanding', 'great', wonderful', 'उत्कृष्ट', 'अफलातून', 'वाँऊ', 'क्या बात है' या सारख्या शेऱ्यांखेरीज सहसा दुसरा कोणताही शेरा मिळवला नाही! या साऱ्याचा प्रेरणास्रोत मात्र होता माझे गुरुवर्य डॉ. शं. ना. नवलगुंदकर, माजी कुलगुरु, पुणे विद्यापीठ. त्यांचा मी सदैव ऋणी आहे.
दिवाकर बुरसे, पुणे.
कारण trend आहे.. ❤
© Rohan Bhosale
नमस्कार बाई,
काही आठवड्यांपूर्वी आपला फोन झाला तेव्हा मी तुम्हाला म्हणालेलो की तुमची फार आठवण झालेली मध्यंतरी आणि तुमची भेट घ्यावी असंही म्हणालो. आठवण झाली म्हणण्यापेक्षा आज कदाचित जिवंत आहे तुमच्यामुळे. 2 वर्षांपूर्वी जेव्हा कॅन्सर चा निदान झालं होतं आणि मी संपूर्ण निराशेच्या गर्तेत सापडलो होतो. माझ्या आजोंबाकडे कशी काय कुणास ठाऊक माझी जुनी गृहपाठाची वहीची काही पानं होती त्यांच्या फाईल मध्ये ठेवलेली, कोलम्बसचे गर्वगीत कवितेचा गृहपाठ होता तो.
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!”
माझं पूर्ण संदर्भासहित स्पष्टीकरण वाचलं आणि मग बस बाकी काही नको होतं मग मला निराशेचा माझा सूर कसा निघून गेला माझं मलाच कळालं नाही. तुम्ही ३ तास आम्हाला शिकवलेलं मला माहित नाही कसं पण पूर्ण एखादी कॅसेट रिवाइंड करावी तसं एकूण एक शब्द माझ्या मनात किती वेळा येऊन गेला असेल याची तर गिणतीच नाही . काही लहान मुलांना ओळखीची गरज वाटत नाही, अनोळखी पाहुण्याने जरी कडेवर घेण्यासाठी हात पुढे केले तरी अशी मुलं त्यांच्याकडे झेपावतात. कविता पण तशाच असतात. हात पुढे करणारा माणूस आपल्याला खांद्दयावर खेळवणारा आहे, ह्याची खात्री पटली की त्या माणसाकडे त्या कायम मुक्कामाला येतात तशाच त्या कविता ते धडे सगळे येतात मदतीला नेहमी. त्याच दिवशी ठरवलेला जसा कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतला नायक त्यांच्या सरांना येऊन सांगतो " मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हाथ ठेऊन फक्त लढा म्हणा" त्यांच्याप्रमाणेच एकदा मीही तुमच्या दारी एकदा येणार. कोविड च्या वातावरणामुळे ते काही शक्य झालं नाही अजून आणि बरेच दिवस मनात होतंच कि जर भेट नाही झाली तरी परत एकदा किमान छोटासा message तरी लिहावा. अगदी ठणठणीत नाहीये अजून पण ठणठणीत होण्याच्या जास्त दूर नाही. तुम्ही नेहमी म्हणायच्या लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती बनते. माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांना तुम्ही आकार दिलात याबद्दल सगळ्या शिक्षकांचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. अशे विचार तर बरेच आहेत लिहिताही येत नाहीत आणि व्यक्तही करता येत नाहीत फक्त अनुभवता येतात. पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार
अज्ञात
नुकतंच आपल्या या पेज ने तब्बल 1000 सदस्यांचा टप्पा पार केला
धन्यवाद मित्रहो तुमच्या प्रेमासाठी
ऍडमिन ग्रुप
अमित बारमुख
अमोल जमखंडे
राहुल छाजेड
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे २६ जानेवारी. कारण याच दिवशी भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला होता. (Republic Day 2021) कोरोना संकटामुळे २०२० या वर्षात आपल्याला अनेक सण साजरे करता आले नाही. सध्या कोरोनाची तीव्रता कमी झालेली आहे. पण असं असलं तरीही आपल्या सर्वांना सजग राहूनच प्रजासत्ताक दिन साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्याला काही नियम नक्कीच पाळावे लागणार आहेत. कोरोना संकट असल्यामुळे अद्यापही आपण एकत्र येणं शक्यतो टाळलं पाहिजे. पण असं असलं तरीही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करु शकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो.
प्रजासत्ताक दिन (Republic Day) हा दिवस २६ जानेवारी १९५० या महत्वपूर्ण दिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ज्यादिवशी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट १९३५ मागे टाकून भारताचे संविधान (Indian constitution) देशाने स्वीकारले (adopted) होते. भारताने ब्रिटिश राजवटीपासून (British governance) स्वातंत्र्य हे १९४७ सालीच इंडियन इंडिपेंडेन्स अॅक्ट 1947नुसार मिळवले, मात्र १९५० सालापर्यंत भारत हा एक सार्वभौम राष्ट्र (sovereign state) बनलेला नव्हता. याचसाठी प्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधान लागू झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करतो. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाचे सर्व मुख्य कार्यक्रम हे देशाची राजधानी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत साजरे केले जातात. राजपथावर भारताचा आणि त्याच्या विविधतेच्या गौरवार्थ एका भव्य पथसंचलनाचे आयोजन केले जाते. याशिवाय प्रत्येक राज्यातही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुरस्कार वितरण हाही या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असतो. भारताचे राष्ट्रपती यादिवशी पद्म पुरस्कारांचे वितरण करतात. यात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचा समावेश असतो
खूप वर्षांनी पुन्हा शहरात आलो.
बहिणीच्या घरी मुक्काम,
ऑफिसची खूप महत्वाची मिटिंग, थोडं टेन्शन होते,
आवराआवर चालू होती.
तरी उशीर झालाच.
भाच्याची बाईक घेऊन निघालो. ट्राफिक जाम होते,
उशीर होऊ नये म्हणून नेहमीचा रस्ता सोडून शॉटकट पकडला
पण तिथेही गर्दी.
लहानपणीच्या भटकंतीमुळे
सगळे गल्ली-बोळ माहिती होते
डोक्यात मिटिंगचाच विचार,
त्याच तंद्रीमध्ये.
रस्ते बदलत पुढे पुढे जात होतो
असंच रस्ते बदलत जाताना, ट्राफिक जाममध्ये अडकलो.
उशीर झाला होता,
आणि सहज समोर लक्ष गेले,
तर समोर ती .........
तिला पाहिले अन काय सांगू,
एकटक पाहतच राहिलो.
क्षणात विचारांची तंद्री तुटली, मिटिंग पार विसरलो
कारण तिचा महिमाच मोठा,
तिला पाहून सरसर मन मागे धावत गेले.आठवणींचे एकेक फोल्डर उघडत गेले,
आयुष्यातील निरागस,मोरपंखी, रंगबिरंगी आठवणी जाग्या झाल्या.
तिच्यासोबत घालविलेले सगळे क्षण डोळ्यासमोर आले.
तो सुवर्णकाळ दिसायला लागला
माझ्यासमोर ती इमारत होती
ती माझी शाळा होती.
वेळ कोणासाठी थांबत नसतो
दहावी पास झालो,
नंतर आयुष्य बदलत गेले
प्रायोरिटी बदलल्या,अनेक नवीन गोष्टी जोडल्या गेल्या. कॉलेज,शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न,संसार,
जबाबदाऱ्या या सगळ्यात शाळा केव्हाच मागे पडली.
विसरलो नाही पण कधी आठवण सुद्धा आली नाही.
बोलण्यातून शाळेचा उल्लेख केला जायचा,
नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात रहायला गेलो.
फेसबुक,व्हॉटसपवर शाळेतले मित्र भेटले,
पण कधी शाळेजवळ येण्याचा योग आला नव्हता.
आज घरातून महत्वाच्या कामासाठी म्हणून निघालो
आणि अचानकपणे......
थँक्यू ट्राफिक जाम.
२५ वर्षानंतर शाळेजवळ आलो
आणि ........हरवून गेलो.
क्षणाचाही विचार न करता गाडी बाजूला पार्क केली
उगीच डिस्टर्ब नको म्हणून, मोबाईल सायलेंट वर टाकला
मनाने त्या सोनेरी दिवसात जाऊन पोहचलो.पुन्हा इतक्या वर्षानंतर शाळेच्या गेटवर उभा होतो.
जबरदस्त फिलिंग होते.
एकेक पायरी चढू लागलो
तसतसा आठवणींचा खजिना उलगडू लागला.
काळ,जग,मी सगळं काही बदललं
पण माझी शाळा तशीच होती.
तिला डोळ्यात साठवत होतो.
तेवढ्यात शिपाई मामांनी विचारले
“काय पाहिजे” आवाजाने भानावर आलो
“नक्की सांगता येणार नाही,थोडा वेळ द्या,”
मामा गोंधळले,विचित्र नजरेने पाहू लागले.
“मी या शाळेतच होतो,तीस वर्षापूर्वी,ही माझीच शाळा”
नकळत बोलून गेलो पण “माझी शाळा” म्हणताना अंगावर शहारा आला.
वयस्कर शिपाईमामा छान हसले.
माझ्या मनात काय चाललंय ते त्यांना बरोब्बर कळले.
असे भरपूर अनुभव त्यांच्याकडे असणार.
“किती वर्षांनी आलात”
“पंचवीस वर्षांनी,दहावीनंतर आत्ताच,”
“सरांना,भेटा”
मुख्याध्यापकांना भेटलो.त्यांच्या परवानगीने भारावलेल्या अवस्थेत शाळेत फिरू लागलो.
वेगवेगळ्या मजल्यावर असलेलले पाचवी ते दहावीपर्यंतचे माझे वर्ग पाहिले.
पुन्हा पुन्हा पाहिले,मनात जी अवस्था त्यावेळेस होती.
ती इथे मांडता येणार नाही.
जुन्या आठवणींनी इमोशनल झालो.
“टन,टन,टन,टन,” तोच ओळखीचा घंटेचा आवाज कानावर पडला.
मधली सुट्टी झाली
इतकावेळ असलेली शांतता फुटली.
किलकिलाट सुरु झाला. जागोजागी मुलांचे थवे दिसू लागले, एकाच युनिफोर्म मधले,गळ्यात हात घालून फिरणारे,जग विसरून एकमेकांशी बोलण्यात गुंग झालेले मुले पाहून सगळे शाळकरी मित्र आठवले.
जागा मिळेल तिथे,बाकावर,गोल करून,एकट्यानेच असे सगळे डबे खाण्यात हरवले.
फार फार मस्त वाटत होते.
तळमजल्यावर असलेल्या वर्गात गेलो.तो माझा नववीचा वर्ग .
खिडकीजवळच्या माझ्या आवडत्या बाकावर बसलो.
आ हा हा फार भारी वाटलं!!!!
हळूच बाकावर काही जुन्या खाणाखुणा सापडतायत ते पाहिले.
नंतर तिथे गेलो जिथे शाळेत असताना जायला घाबरायचो
“टीचर रूम”
आज देखील तिथे जाताना मनात थोडी धाकधूक होतीच.
शिक्षकांना भेटलो,माझ्या वेळचे कोणीच नव्हते.सर्वचजण नवीन.
सर्वांना नमस्कार करून बाहेर पडलो.
लायब्ररी,प्रयोगशाळा,सायकल पार्किंग,हॉल
शाळेत असताना जिथे जायचो त्या सर्व ठिकाणी गेलो नंतर पाण्याच्या टाकी जवळ गेलो.
लहानपणी करायचो तशी हाताची ओंजळ करून पाणी पिले.
डोळ्यात आलेले पाणी तोंडावर पाणी मारून पुसून टाकले.
एकदम फ्रेश झालो.तृप्त होऊन शाळेच्या बाहेर आलो.
भारावलेल्या अवस्थेतून वास्तवात आलो.
मोबाईलवर बत्तीस मिस कॉल,एकोणीस मेसेज आले होते.
काहीच वाटले नाही कारण ते नेहमीच.
आज मी मात्र एकदम खुशीत होतो.
शाळेच्या सोबत मस्तपैकी सेल्फी काढला आणि व्हॉटसपवर पोस्ट केला सोबत कॅप्शन टाकले
वो भूली दास्तान,फिर याद आ गई
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
784 , Budhwar Peth
Pune
411002.