13/10/2022
DMR Next (०२ ऑक्टोबर, २०२२)
१. विद्यार्थ्यांसाठी वेळ,
अर्ज करणे - संध्याकाळी ७ ते सकाळी ९
प्रवेश घेणे - सकाळी १० ते संध्याकाळी ५.
२. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा पुढील दिवसाच्या फेरीसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.
(भाग-२ नवीन, अनलॉक तसेच संपादित करण्यासाठी, अर्ज करण्याच्या वेळेत परवानगी असेल)
३. प्रवेशासाठी निवड होऊनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयासाठी पूर्ण DMR दरम्यान प्रतिबंधित केले जाईल.
४. प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्या महाविद्यालयासाठी प्रतिबंधित केले जाईल.
५. यापुढे प्रवेश रद्द करण्याची परवानगी असणार नाही.
६. नवीन विद्यार्थी नोंदणी, नवीन अर्ज भाग-1 भरणे आणि त्यामध्ये बदल करण्यासाठी अर्ज अनलॉक करणे दिनांक. ४ ऑक्टोबर, २०२२ पासून बंद होईल.
७. अर्ज पडताळणी फक्त शि.उ.सं. लॉगिनवरूनच केली जाऊ शकेल. ३ ऑक्टोबर, २०२२ पासून मार्गदर्शन केंद्र लॉगिन बंद होतील.
८. कोणताही नवीन अर्ज आपोआप प्रमाणित होणार नाही. प्रत्येक नवीन नोंदणी शि.उ.सं. यांनी तपासणी केलेनंतरच पूर्ण होईल.
९. DMR Next. ही फेरी दिनांक १५ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत सुरू राहील. (दैनंदिन प्रवेश दिनचर्या नियमानुसार)
१०. दैनंदिन दिनचर्या शालेय कामकाजाच्या दिवशी चालू राहील, सुट्टीचे दिवस केवळ अर्ज करण्यासाठी वापरले जातील.
११. कोटा आणि द्विलक्षी प्रवेश प्रक्रिया देखील नेहमीप्रमाणे सुरू असतील.
१२. ११वी तून ११वी मध्ये प्रवेशाची परवानगी दिली जाणार नाही. अर्ज प्रमाणित करताना शि.उ.सं. यांनी तपासून याबाबत निर्णय घ्यावा.
टीप - दुबार प्रवेश घेणारे अथवा जाणीवपूर्वक जागा अडवून ठेवत असेलचे निदर्शनास आल्यास त्याबाबत कडक कारवाई केली जाईल.
DE