17/03/2023
आयटीआय (ITI) कोर्स ची संपूर्ण माहिती
आयटीआय कोर्स काय आहे हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडत असेल. मुख्यतः दहावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांना, कारण हे विद्यार्थी करिअर चे मार्ग शोधत असतात आणि त्याबद्दल माहिती मिळवत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते कि आपण चांगल्या कोर्स ला ऍडमिशन घ्यावे, चांगली नोकरी मिळवावी, स्वतः चा व्यवसाय सुरु करावा, आणि यासाठी तो अभ्यास करत असतो. कोणत्याही कोर्स ला प्रवेश घेण्याअगोदर त्या कोर्स बद्दल पूर्ण माहिती असणे खूप आवश्यक असते, कारण हा प्रश्न स्वतः च्या भविष्याचा असतो. या बाबतीत कोणीही जोखीम घेण्यास तयार नसते.
आयटीआय कोर्स म्हणजे काय?
आयटीआय (ITI) हा एक औद्योगिक प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. ITI चा Full Form हा “Industrial Training Institute” असा होतो, याला मराठीत “औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे म्हणतात. आयटीआय हि शासनाची मान्यताप्राप्त संस्था आहे जी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील विविध तांत्रिक आणि विना तांत्रिक विषयांवर शिक्षण देते. या कोर्स मध्ये पुस्तकी ज्ञान कमी आणि व्यवहारिक म्हणजेच प्रॅक्टिकल ज्ञान जास्त शिकवले जाते. आयटीआय कोर्स शिकवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सरकारी व खाजगी प्रशिक्षण कॉलेज आहेत. यांद्वारे दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात.
महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या वाढीमुळे हा आयटीआय कोर्स खूप लोकप्रिय आहे, दरवर्षी लाखो विद्यार्थी यातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. ITI मध्ये फिटर, इलेकट्रीशियन, वेल्डर, वायरमन, टर्नर, असे अनेक ट्रेड्स असतात. ट्रेड नुसार विद्यार्थ्याला त्या-त्या गोष्टीचे प्रॅक्टिकल नॉलेज शिकवले जाते. प्रवेश घेताना विद्यार्थ्याला ट्रेड निवडण्याचा पर्याय असतो. आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया DVET महाराष्ट्र च्या सरकारी वेबसाईट वर ऑनलाईन घेतली जाते, यात विध्यार्थी आपल्या आवडीनुसार कॉलेज व ट्रेड निवडून प्रवेश अर्ज करू शकतो.
आयटीआय ट्रेड्स चे प्रकार कोणते आहेत?
इंजिनीअरिंग मध्ये ज्याप्रमाणे विविध ब्रॅंचेस असतात अगदी त्याचप्रमाणे आयटीआय मध्ये अनेक ट्रेड असतात. प्रत्येकजण आवडीनुसार ट्रेड निवडू शकतो. आयटीआय मधील या ट्रेडस ला दोन टाइप्समध्ये विभाजले गेले आहे.
1,इंजिनीरिंग ट्रेड्स
यामध्ये सर्व तांत्रिक ट्रेड असतात. गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाशी संबंधित ट्रेड यामध्ये येतात. तंत्रज्ञान, संगणक, अश्या विषयांमध्ये आवड असणारे विद्यार्थी हे ट्रेड निवडतात
२) नॉन-इंजिनीरिंग ट्रेड्स
आयटीआय च्या या प्रकारात सर्व नॉन तांत्रिक ट्रेड असतात. यामध्ये तांत्रिक विषय नसतात, त्यामुळे याना नॉन टेक्निकल ट्रेड असे म्हणतात. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि वैज्ञानिक विषयात आवड नाही त्यांद्वारे हे ट्रेड निवडले जातात
आयटीआय कोर्स किती वर्षाचा असतो?
कोर्स चा अवधी सर्व ट्रेड साठी सारखा नसतो. या कोर्स चा Duration ६ महिने ते २ वर्षापर्यंत असू शकतो. ट्रेड नुसार कोर्स चा अवधी वेगळा असतो. फिटर, इलेकट्रीशियन, वायरमन या ट्रेड चा कालावधी २ वर्षाचा असतो, तर Sewing, Plumber, Welder हे ट्रेड १ वर्षाचे असतात. इंजिनीअरिंग मध्ये सर्व ब्रॅंचेस साठी कालावधी ४ वर्षाचा असतो परंतु आयटीआय मध्ये असे नसून ट्रेड्स नुसार कोर्स चा कालावधी वेगळा असतो.
आयटीआय कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय आहे?
आयटीआय ला प्रवेश घेण्याच्या तयारीत असाल तर आपल्याला ITI Course Eligibility माहित असायला हवी. म्हणजे भविष्यात काही अडचण यायला नको. तर आपल्याला जर आयटीआय कोर्स ला प्रवेश घेण्याचा असेल तर आपले वय १४ वर्ष असणे आवश्यक आहे व उमेदवाराचे वय ४० वर्षाच्या आत असायला हवे. यासोबतच आयटीआय साठी Education Eligibility सुद्धा लागते.
ITI साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी दहावी आणि बारावी उत्तीर्ण असावा, व किमान मार्कांची कोणतीही अट नाही. बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा आयटीआय ला प्रवेश घेऊ शकतो. जर विद्यार्थी बारावी मध्ये अनुत्तीर्ण असेल तर तो दहावीच्या गुणांवर प्रवेश मिळवू शकतो.
आयटीआय कोर्स झाल्यानंतर काय करावे?
विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न नक्की असतो की आयटीआय झाल्यावर पुढे काय करावे? आयटीआय चे शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी Engineering आणि Diploma अभ्यासक्रम उपलब्ध आहेत त्यातून आपण पुढे शिक्षण सुरू ठेऊ शकता. ज्यादाकरून विद्यार्थी आयटीआय झाल्यावर नोकरी करतात. यामध्ये पण दोन प्रकार पडतात, पहिली सरकारी नोकरी आणि दुसरी जी खाजगी कंपनी मध्ये करतात ती Private Job.
आयटीआय झाल्यावर नोकरीसाठी Technical Sector आणि Non-Technical Sector च्या नोकऱ्या असतात. आयटीआय विद्यार्थ्यांसाठी MIDC मध्ये जास्त नोकऱ्या असतात. विद्यार्थ्यांच्या ट्रेड नुसार सेक्टर विद्यार्थ्यांना मिळतो, आणि त्यात ते नोकरी करतात. ITI Course Information in Marathi यासोबतच आपल्याकडे स्वतः चा व्यवसाय सुरू करण्याची संधी असते. यात वेल्डर, इलेक्ट्रीशियन चे स्वतः दुकान टाकू शकता. याप्रमाणे आपल्यासमोर नोकरी, व्यवसाय किंवा पुढील शिक्षण हे पर्याय उपलब्ध असतात.
अधिक माहिती साठीसंपर्क
विठ्ठलराव थोरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) भिगवण.
फोन - 02118246074/9766066830
YouTube -
https://youtube.com/
Facebook -
https://www.facebook.com/iti.bhigwan?mibextid=ZbWKwL
Bhigwan विठ्ठलराव थोरात आयटीआय भिगवण मध्ये फिटर, इलेक्ट्रिशन, वेल्डर, मेकॅनिक डिझेल व ड्राफ्ट्समन मेकॅनिकल इत्यादी ...