Cosmic Panacea, Pune.

Cosmic Panacea, Pune.

Share

Motivational orator & spiritual guide Professional Anchor, Motivational Orator, Events Manager, Trainer, Counselor, Writer, Columnist, Spiritual guide....Pune

28/01/2022
05/06/2020

🙏

18/05/2020

अनुपम खेरचा इंटरव्ह्यू ऐकला होता.
त्यात त्यांनी एक प्रसंग सांगितला, मनाला खूप भावला..
'आखरी रास्ता' ची शूटिंग चालू होती. अनुपम खेर तयार होत होते. सेट वर एसी नव्हता..प्रचंड गर्मी होत होती. मी इतका मोठा कलाकार आणि आणि माझ्यासाठी एसी नाही, ह्या भावनेने त्यांचा इगो दुखावला गेला.
त्यांनी व्यवस्थापन कमिटीला धाऱ्यावर धरलं.
खूप काही ऐकवलं.
थोड्या वेळाने त्यांचं लक्ष एका कोपऱ्यात गेलं..तिथे अमिताभ बच्चन एका खुर्चीवर पुस्तक वाचत बसले होते. त्यांचं ते दाढीचा गेटअप, अंगावर शॉल आणि त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही त्रास दिसत नव्हता.

ते उठले आणि अमितजी कडे गेले..
ते बोलले..
"सर..बहुत गर्मी है.."
"हं" असं म्हणून त्यांनी पुन्हा पुस्तकात डोकं घातलं..
"आपको नही हो रही गर्मी सर?"
अमितजी ने डोकं वर केलं आणि बोलले..
"गर्मी के बारे में सोचता हूँ, तो होती है..वरना नही होती.."

ह्या एका वाक्यात जीवनाचा सार सांगितला आहे त्यांनी..
आज सगळीकडे भयावह परिस्थिती आहे..पुढे काय होईल ह्याची चिंता आहे..
पण रात्र नंतर सकाळ अटळ आहे..ह्याच्या आधीही खूप संकट आले आहेत मानवजातीवर पण त्यावर आपण मात केलं आहे..
आज बऱ्याच लोकांमध्ये नैराश्य येत आहे..मानसिक संतुलन जात आहे..
हे काही अंत नाही..ह्यातून बाहेर पडणारच आहोत आपण..
आपण ह्या परिस्थितीकडे कोणत्या स्वरूपात पाहतो, त्यावर आपल्याला त्रास होणार का आपण आनंदी राहणार हे ठरलेलं आहे.

ह्या काळात मी न घाबरता जगलो, आनंदी होतो,लोकांसाठी जितकं शक्य तितकं केलं..ह्या आठवणी बनवायचे आहेत का मी सतत घाबरत, रडत, सहानुभूती घेत दिवस काढले अशा आठवणी करायचे आहेत हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे.

So cheer up..हसा,आई वडिलांना बोला,त्यांचं ऐकून घ्या,बायकोला लव्ह यू म्हणा..मुलांसोबत खेळा..आपल्या परिचिताना कॉल करा..ज्यांना मदत करता येते, करा..

'रुक जाना नही, तू कही हार के..'

😊😊

संग्रहित

12/06/2018

एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.
अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार. त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,

"This too shall pass "
म्हणजे
"हाही क्षण निघून जाईल"

केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला. विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले,
" महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये,

This too shall pass !
हे क्षणही निघून जातील.
ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.

संग्रहित
ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा.

10/05/2018

ऊत्पन्न
जास्त नसेल तर "खर्चावर"
आणि
माहिती जास्त नसेल
तर "शब्दांवर" नियंत्रण ठेवलं पाहिजे

03/05/2018

अध्यापनाची खरी पद्धत...

एकदा शिक्षकांचे असेच एक प्रशिक्षण होते. त्यात एक निवृत्त शिक्षक पण आले होते.

सर्वजन दिवसभर

व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे?

स्पेलिंग पाठ करावेत की नाही?

कविता कशी शिकवायची?

अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे?

याचा काथ्याकूट करीत होतो

संध्याकाळी ५ वाजले. सर्वांना जाण्याची घाई होती.
सर्वजन उठू लागताच ते निवृत्त शिक्षक बोलायला उठले आणि म्हणाले, _"मी फक्त ३ मिनीटे बोलणार आहे."

वैतागाने सारे खाली बसलो. ते शिक्षक म्हणाले,

"दिवसभर तुमची सर्व चर्चा मी ऐकली
मी एक छोटे उदाहरण सांगतो. ते जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुम्ही चांगले शिक्षक व्हाल."

*आता आणखी काय उपदेश ऐकायचा' अशा भावनेने सर्व ऐकू लागले...

ते म्हणाले की,

"एका डोंगराच्या पोटाला एक झोपडी आहे तिथे एक ,आदिवासी नवरा बायको राहतात. त्यांना एक ६ महिन्याचं मूल आहे. आजूबाजूला एक ही घर नाही एकदा संध्याकाळी नवर्‍याला अचानक गावाला जावे लागले
पत्नी आणि मूल एकटेच आहेत. रात्री दोघे झोपले आणि अचानक मध्यरात्री ते मूल किंचाळून रडायला लागले

ती आई काय करेल?

_सांगा ना काय करेल?_"

ते आम्हाला विचारू लागले.

आम्ही सारे शांत झालो.

कुणीच काही बोलेना.

ते शिक्षक पुन्हा आम्हाला विचारू लागले,

"ती आई बालमानसशास्त्राची पुस्तके उघडून पाहील का?

की मुलांना कसे हाताळावे याच्या वेबसाईट उघडून पाहील?"

_"सांगा ना... काय करेल यातलं?"_

आम्हाला मुद्दा कळला होता.

ते किंचित हसले आणि पुढे म्हणाले,

_"ती यातले काहीच करणार नाही
ती तिला जे सुचेल ते करील. ती त्याला कडेवर घेईल. छातीशी कवटाळेल... त्याच्यापुढे ताटली आणि चमचा वाजवेल, त्याच्यापुढे नाचून दाखवील, गाणी म्हणेल, त्याला दूध पाजील, त्याला झोपडीबाहेर आणून चंद्र दाखविल. हे सारं सारं ती तिथपर्यंत करील की जोपर्यंत ते मूल शांत होत नाही."

ते पुढे म्हणाले की,

"हे सारे ती का करील?"

_"हे तिला सारे का सुचेल?"_

"कारण ते तिचे मूल आहे म्हणून...!!!"

त्या शिक्षकांनी क्षणभर सगळीकडे बघितले बोलताना क्षणभर थांबले आणि म्हणाले,

_"त्या बाईसारखे तुमच्यासमोर बसलेले मूल तुम्हाला तुमचे वाटते आहे का? तितके प्रेम तुम्हाला जर त्याच्याबद्दल वाटणार असेल तर माझ्या मित्रांनो, तुम्ही जे काही वर्गात कराल, तेच उपक्रम असतील, तीच अध्यापनाची पद्धती असेल. तुम्ही हातात जे काही घ्याल तेच शैक्षणिक साहित्य असेल आणि तुम्ही जो विचार कराल तेच शैक्षणिक तत्वज्ञान असेल."

"यापलीकडे शिक्षण नावाचे काहीही नसते...!"

आणि ते शिक्षक शांतपणे खाली बसले.

आम्ही थक्क झालो...

सुन्न झालो...!

सूचना :- हीपोस्टआपल्या परिचयातील सर्व शिक्षकांना पाठवा, ही विनंती🙏🙏🙏

30/04/2018

चुकीचा रस्ता..
चुकीची माणसं..
वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..
हे अत्यंत गरजेचे आहेत
कारण..
यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की "
काय आणि कोण योग्य आहे.!!

18/03/2018

https://youtu.be/Yf8xdkdFLfg

खुशहाल जीवनशैली समझने हेतू
..............................सबस्क्राईब किजीए

Motivational Cosmic Panacea

Motivetional Cosmic Panacea ... आनंदमय जीवनशैली 001 मनुष्य का चेहरा उसकी आंतरिक जीवनशैली का प्रतिबिंब है ... आंतरिक जीवनशैली अभ्यासद्वारा आनंदमयी हो सकती है .... शानू पं....

15/11/2017

Good night

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune