09/12/2025
भावपूर्ण श्रद्धांजली !
श्रमिकांसाठी झटणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या श्रमिक आणि सामाजिक चळवळीचे आधारस्तंभ अशी त्यांची ओळख होती. हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुर अशा कष्टकऱ्यांसाठी संघटना उभारून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी बाबा आढावा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं होतं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील एक अढळ तारा निखळला आहे. डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली !