Milind M. Kshirsagar

Milind M. Kshirsagar

Share

Work and Education:
Loyola High School, Pune, India
Physical Education Instructor(Jun 1993 to present)
Shri Shivaji Preparatory Military School , Pune

Photos from Milind M. Kshirsagar's post 11/10/2024

#दौरा_नियोजन_संस्था
***************** #ट्रॅव्हल्स_एन्ड_टूर्स

साधारण चार महिन्या पूर्व........

`व्हिएटनाम :`
व्हियेतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. व्हिएतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहेत. २०२० नुसार, सुमारे ९.७८ कोटी लोकसंख्या असलेला व्हिएतनामचा ह्या बाबतीत जगात १३ वा तर आशिया खंडात आठवा क्रमांक आहे. *हनोईही* व्हिएतनामची राजधानी तर हो चि मिन्ह सिटी (जुने नाव: साईगोन) हे येथील सर्वात मोठे शहर आहे. बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून देशाची ८५% (८.३१ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध आहे.

- चीनपासून स्वातंत्र्य इ.स. ९३८
- फ्रान्सपासून स्वातंत्र्य २ सप्टेंबर १९४५
- एकत्रीकरण २ जुलै १९७६
- संविधान १५ एप्रिल १९९३

महायान बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून देशाची ८५% (८.३१ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध धर्माची अनुयायी आहे. चीन व जपान नंतर व्हिएतनाम हा सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आज या देशात ७.५ कोटी बौद्ध आहेत. याखेरीज निधर्मी, हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन सुद्धा येथे अल्पप्रमाणात आढळतात.

साधारण पाने आठ किल्ले आहेत
नवे व्हिएतनामी भाषेत आहेत त्याचे इंग्लिश भाषांतर

* Citadel of Bien Hoa
* Co Loa Citadel
* D**g Hoi Citadel
* Hung Hoa
* Imperial Citadel of Thang Long
* Citadel of Saigon
* Citadel of the Lake Dynasty
* Tran Binh Dai

मराठीकरण....
* बिएन होआ प्राचीन किल्ला
* को लोआ किल्ला
* डोंग होई प्राचीन किल्ला
* हंग हो
* थांग लाँगचा शाही किल्ला
* सायगॉन प्राचीन किल्ला
* हो त्रियु प्राचीन किल्ला
* ट्रॅन बिन्ह दाई*

ज्या देशाची भाषा इतकी जड आहे त्या देशात गेल्यावर कसे होणार आपले, त्यासाठी आपल्याला ओळखणारा, आपली आवड जाणणारा, आपल्याला नक्की काय हवे ते समजून घेऊन आपल्याला आवडे असे नियोजन करून देणारी व्यक्ती एकाच असू शकते जी तुम्हाला खूप वर्षांपासून ओळखते, तुमचा मुलगा, पुतण्या, भाचा, मित्राचा मुलगा आथवा तुमच्या विद्यार्थी.

शेखर एलुर माझ्या विद्यार्थी आहे, तो मला १९९९ पासून पाहत आला आहे म्हणजे त्याच्या इयत्ता पहिली पासून मला पाहत आला आहे, त्यात विषय शिक्षक बदलत त्यांचा संबंध जर कमी प्रमाणात येतो पण शालेय्य काळात शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणजे मुलांचा आवडता शिक्षक असतो, भले शिक्षक कसाही असो मुलांना जुळवून घ्यायवेच लागते नाहीतर वर्षभर शाळेत खेळत येणे कठीण आहे.

दुसरी बाब म्हणजे शेखर माझ्या मुलाच्या वर्गात शिकत असे त्यामुळे त्याला माझी ओळख वजा माहिती जास्त असणारच. शेखरने ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्र निवडले हे मला आधी पासून माहीत होये, त्याने बऱ्याच वेळेला बुकिंग करून दिली होती, मागच्या वर्षी गुरुवायूर ची ट्रिप पण त्यानेच माझ्या हिशोबाने प्लॅन करून दिली होती त्यामुळे मला जास्त विचार करावा लागला नाही. मी शेखरला फोन करून बोलावून घेतले व चर्चा केली आणि हळू हळू एक एक नियोजन होऊ लागले. सर्वात आधी तारखा निश्चित करण्यात आल्या, त्यानंतर जाण्याचे व येण्याचे विमानाचे तिकीट काढले, नंतर मी त्याला किल्ल्याची यादी दिली व सूनबाईने भटकण्याची यादी शेखर सोबत निश्चीत केली व नियोजन हळूहळू रूप घेई लागले . व्हिसा साठी कागदपत्रे सादर झाली, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट व्हेरिफिकेशन झाले आणि ठीक आठ दिवस आधी सगळी कागदपत्रे घेऊन शेखर घरी आला, त्याने दोन प्रती मध्ये सगळी महत्वाची लागणारी कागदपत्रे दिली. महत्वाचे भ्रमणध्वनी क्रमांक दिले, त्याच सोबर त्याने जाण्या आधी एक व्हाट्सअप्प ग्रुप केला ज्यात व्हिएतनाम मधील संयोजक आयोजक व दौरा नियंत्रण करणारी सगळी मंडळी हाती.

एका बाजूला कागदपत्रांची तयारी चालू होती तर दुसऱ्या बाजूला बायको व सून टूर साठी लागणाऱ्या कपड्याची खरेदी करत बॅग भरत होते. शेखरने दिलेली कागद पत्रे दोन वेळा मी चाळली पण व्हिएतनाम मध्ये जुने कपडे घातले चालत नाहीत असे कुठेही नोंद केलेले न्हवते.

आपली खात्री करून बिंधास संपर्क करा
`शेखर एलुर. +919657981709`
Shekhar Ellur
दौऱ्याची खरेदी.......

#क्रमशः

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


LOYOLA STAFF QTRS PASHAN Road
Pune
411008