Camp Education Society's High School

Camp Education Society's High School ही आवडते मज मनापासून शाळा..

तुम्हाला १९९३ सालचा हा फोटो आठवतो का? सुदान मध्ये काढलेल्या या फोटोमध्ये एक गिधाड त्या भुकेलेल्या लहान मुलीच्या मरणाची व...
23/04/2021

तुम्हाला १९९३ सालचा हा फोटो आठवतो का? सुदान मध्ये काढलेल्या या फोटोमध्ये एक गिधाड त्या भुकेलेल्या लहान मुलीच्या मरणाची वाट पाहत आहे. या फोटोचे शीर्षक होतं "द व्हलचर अँड द लिटल गर्ल" फोटोग्राफर होता साउथ आफ्रिकेचा केविन कार्टर...! त्या वर्षीचा पुलित्झर प्राईस विजेता..!!

असे असून देखील त्याने आपल्या वयाच्या केवळ ३३ व्या वर्षी आत्महत्या केली.... कारण काय तर... एकाने फोनवर त्याला प्रश्न विचारला की: "त्या मुलीचे शेवटी काय झाले?" कार्टर म्हणाला 'मला माहित नाही, मी खूप घाई गडबडीत होतो आणि मला विमानपण पकडायचे होते'.
समोरच्या माणसाने दुसरा प्रश्न विचारला, "तिथे किती गिधाडे होती?" कार्टर म्हणाला 'मला वाटतं बहुतेक एकच गिधाड तेथे होते'

फोनवरील माणसाने अत्यंत तुच्छतेने कार्टरला सांगितले "मी तुला सांगतो त्यादिवशी तेथे एक नाही तर दोन गिधाडे होती, एक फोटोमध्ये असलेले आणि दुसरे कॅमेरॅ मागे असलेलं"

या शब्दांचे महत्त्व समजून घेत कार्टर अस्वस्थ झाला आणि शेवटी त्याने आत्महत्या केली. कार्टर आज जिवंत असता जर त्याने उपासमार झालेल्या बाळाला फक्त १/२ मैलांच्या अंतरावर असलेल्या युनायटेड मिशनच्या आहार केंद्रात नेले असते, किंवा जर त्या भुकेल्या मुलीकडे जाण्याचा प्रयत्न केला असता तर...

आज, 26 वर्षांनंतर, गिधाडे अजूनही संपूर्ण भारतातून हातात कॅमेरे घेऊन सर्वत्र परतत आहेत, हजारो किलोमीटर चालत आलेल्या कामगारांचे फोटो घेण्यात व्यस्त आहेत.

ही गिधाडे कामगारांच्या मृत्यूबद्दल चिंता करण्यापेक्षा टीआरपी वाढविणार्या बातम्यांविषयी अधिक काळजी घेतात. मृत कामगार आणि मुलांच्या शरीरावर मसाले ओतून ते ब्रेकिंग न्यूज गोळा करण्यात व्यस्त आहेत.

केव्हिन कार्टर यांचा स्वाभिमान होता, म्हणून त्याने आत्महत्या केली. परंतु या पत्रकाराच्या नावाखालील ही गिधाडे सन्मानाने ब्रेकिंग न्यूज बनविण्यात व्यस्त आहेत.

14/04/2021
सर्वच देशांकडे आपल्या शत्रू राष्ट्राला आणि पृथ्वीला नष्ट करता येईल एवढा प्रचंड शस्त्रसाठा, दारुगोळा, अणुबॉम्ब, लढावू विम...
12/04/2021

सर्वच देशांकडे आपल्या शत्रू राष्ट्राला आणि पृथ्वीला नष्ट करता येईल एवढा प्रचंड शस्त्रसाठा, दारुगोळा, अणुबॉम्ब, लढावू विमाने आहेत

पण...

कोणत्याही राष्ट्राकडे आपल्या नागरिकांना वाचवता येईल एवढी पुरेशी औषधे, उपकरणे, व्हेंटिलेटर्स, डाॅक्टर व नर्सेस नाहीत.

माणूस म्हणून आपला प्राधान्यक्रम चुकलाय....!!

26/11/2020
13/11/2020

🎊💥🎁 *शुभ दीपावली* 🎁💥🎊
*तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.*

*सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.*
🎊🎊 *शुभ दीपावली* 🎊🎊
🏮🏮🏮
🎁🎇💥☄⚡🔥💫🍱🍫🎆🎁

परिस्थिती आडवी झाली तरी तिला  #कडवी_झुंज देणार्यांनाच  #यश भरभरून मिळत असत.!!!
02/11/2020

परिस्थिती आडवी झाली तरी तिला #कडवी_झुंज देणार्यांनाच #यश भरभरून मिळत असत.!!!

पहिल्या  #बाकावर_बसून यशपुर्तीची  #स्वप्नं पाहता येतात,पण  #अपयशाला समोर कसं जावं...हे  #शेवटचा_बाकच शिकवतो.!!!
31/10/2020

पहिल्या #बाकावर_बसून यशपुर्तीची #स्वप्नं पाहता येतात,
पण #अपयशाला समोर कसं जावं...
हे #शेवटचा_बाकच शिकवतो.!!!

28/10/2020

🪔🏮एक अतिशय नम्र विनंती

मित्रांनो आणि मैत्रिणीनो
कोरोना पीडितांना श्वास घेताना सर्वात जास्त त्रास होतो.🪔🪔🪔🪔 फुफ्फुसांशी संबंधित असा कोरोना आहे. फार थकवा जाणवतो . कोरोनामधून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी खूप वेळ लागतो.
आता सर्वत्र कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे आणि म्हणूनच, आपण सर्वानी शपथ घ्यावी की यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आणि आमचे संपूर्ण परिवार सदस्य दीपावलीत फटाके उडवणार वा फोडणार नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे
आपापल्या परिसरातील प्रत्येक सुजाण नागरिकाला समजावून सांगायचा प्रयत्न करा आणि कमितकमी यंदा तरी तुम्ही फटाक्यांपासून दूर रहा अशी आग्रहाची विनंती करा.

या साथीच्या रोगात, फटाकयांच्यामुळे तयार होणारे विषारी वायू घरी विलागिकरणात ( होम क्वारंटाईनमध्ये ) राहणा-या रूग्णांसाठी अतिशय प्राणघातक ठरू शकतात.
वरिष्ठ डॉक्टरांच्या अहवालानुसार कोरोना कालावधीत फटाक्यांचा धूर प्राणघातक ठरु शकतो.
तेव्हा दीपावली मध्ये आपला परीसर पर्यायाने शहर फटाक्यांच्या विषारी वायू पासून वाचवायचेच आहे, ज्यायोगे संघर्ष करीत असलेल्या किंवा कोरोनामुळे ग्रस्त झालेल्या रुग्णांना याचा उपयोग होईल.

* ठरल तर यंदाची दिवाळी
फटाके विरहित दिवाळी *
🏮🪔🪔🏮

Address

Babajan Chowk
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Camp Education Society's High School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category