*आयुर्वेद आणि त्यातील औषधांची ओळख*
आज काल आयुर्वेदाच्या नावाखाली बऱ्याच कंपन्या आपले बनवलेलं प्रॉडक्ट नागरिकांची दिशाभूल करून विकत आहेत. या बद्दल आता जागरूक होणे गरजेचे आहे, म्हणून हा लेख जरूर वाचा.
*आसव-अरिष्ट*
आसव अरिष्ट करण्यासाठी प्रथम एक मातीचे स्वच्छ मडके घेऊन त्यात आवश्यक त्या औषधी वनस्पती, पाणी व इतर सहाय्यक वनस्पतींचा रस या गोष्टी भरल्या जातात. त्यामध्ये आवश्यक प्रमाणात गूळ, साखर, मध व अन्य सुगंधी पदार्थ टाकतात. त्यानंतर त्यात धायटीची फुले किंवा यीस्ट मिसळून झाकण लावून त्याला पंधरा ते पंचवीस दिवस समशीतोष्ण (साधारण तापमानाला) खोलीमध्ये स्थिर ठेवतात. यानंतर त्यामध्ये संधान (मद्यनिर्मितीची) प्रक्रिया सुरू होते. संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला गाळून जो द्रवपदार्थ प्राप्त होतो त्याला ‘आसव’ असे म्हणतात. औषधी वनस्पतींचे भरड चूर्ण करून त्यापासून काढा बनवून त्यानंतर वरीलप्रमाणे संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला गाळून जो मद्ययुक्त द्रव पदार्थ तयार होतो, त्यास अरिष्ट असे म्हणतात. आसव बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जात नाही, तर अरिष्ट बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जाते.
आसव हे शरीर व भूक वाढविणारे, निद्रानाश, वेदना व तोंडाचा बेचवपणा दूर करणारे व मनाला प्रसन्न करणारे असे असते; तर अरिष्ट हे शरीर कृश किंवा रोड होणे, मूळव्याध, पचनाचे जुने विकार इत्यादी प्रकारच्या रोगांमध्ये लाभदायक असून अन्नाची चव वाढविणारे, कफापासून उत्पन्न होणारे रोग कमी करणारे असते. वाळा, अफू, कोरफड, चंदन इत्यादी औषधांपासून आसव; तर अशोक, गुळवेल, अश्वगंधा, द्राक्ष इत्यादींपासून अरिष्ट बनविले जाते. आसव-अरिष्टे जितकी जुनी तितकी अधिक गुणकारी असतात.
*काढा*
ज्या पदार्थांचा काढा करावयाचा असेल ते घटकपदार्थ घेतात व त्यावर पदार्थांच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी एक अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळवताtत, हे पाणी गाळून घेतल्यावर बनलेल्या द्रवपदार्थाला त्या घटकपदार्थातील मुख्य घटकाचा काढा म्हणतात..
*घन*
यात औषधाची पूड करून मग त्यात पातळ पदार्थ जसे पाणी, तूप इत्यादी मिसळून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यालाच घनवटी/वटी (गोळ्या ) असे म्हणतात.
*चूर्ण*
चूर्ण :- म्हणजे त्या वनस्पतीला / तिच्या सालीला/फळाला वाळवून नंतर त्याला कुटून बारीक करणे. (चूर्ण करणे)
हे चूर्ण पाणी, तूप, मध किंवा गुळासोबत औषध म्हणून घेतात.
*चाटण/लेह*
पुष्कळ औषधी उगाळून किंवा कुटून चाटण्यासाठी जे गोड रसायन बनवितात ते; लेह; चाटण्याचे औषध
*प्राश*
प्राशन करण्यासाठी बनविलेले गोड व घन आयुर्वेदिक रसायन. च्यवनऋषींने बनवले ते च्यवनप्राश. असेच कवचप्राश, कफप्राश, केशरी बदाम प्राश, त्रिफळाप्राश, त्रिफला पंचकोल प्राश, बदामप्राश, शिलाजितप्राश, सुवर्णप्राश, वगैरे
*तैल*
*अमृत*
मुलांची सर्वांगीण वाढ व्हावी, यासाथीचे गोड सरबत. उदा० बालामृत : यात मुलेठी, अतीस, काकडाश्रृंगी, नागर मोथा, अनंतमूल ,विडंग, हरड़ ,ओवा, चूर्णोदक, साखर, गंधक, सल्फर, तुवरक तेल, कापूृर इत्यादि घटक द्रव्ये असतात. असेच अमृत तुलसी, अमृतारिष्ट, वगैरे.
*तैल*
यात काही वनस्पती मोहरी, एरंड, तीळ आदि तेलात मिसळून त्याला उकळून मग त्याचा वापर मालिश करणे, हळुवार चोळणे याकरिता करतात.
आपले आरोग्य
आपल्या आरोग्यसाठी उपयुक्त अश्या सर्व
हे पेज आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे सांगणारे आहे. भारतातील आरोग्याची स्थिती, जीवन निरोगी राहण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती, आरोग्यदायी कार्यक्रम कोणते आहेत यांची माहिती, आरोग्यसेवेची ओळख, आरोग्य तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, प्रसाशन अशा खूप काही गोष्टींची माहिती या पेजवर मिळेल.
01/10/2023
*जेष्ठ नागरिकांनी घ्यावी ही काळजी...*👨🏼🦳👨🏼🦳👨🏼🦳
१ ऑक्टोबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन म्हणून साजरा केला असून या दिवशी जेष्ठ नागरिकांचा आदरपूर्वक सन्मान केला जातो, सध्य स्थतीत बहुतेक जेष्ठ नागरिक अनुभवी असले तरीही कोणतीही व्यक्ती त्यांचा हेतू किंवा सल्ला स्वीकारत नाही म्हणूनच, "आम्ही निराधार आहोत" असे वृद्ध नागरिकांना वाटते. वृद्धापकाळात जेष्ठ नागरिक खूप दुखी असल्याचे दिसून येते म्हणून त्यांच्या विषयी आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात येते.
वयोमानानुसार शरीर साथ देत नाही हे खरंच. परंतु, जर शरीराला हव्या त्या पोषक गोष्टी मिळाल्या तर शरीर चांगली सोबत करेल. परंतु, त्यासाठी वृद्धापकाळात वृद्ध व्यक्तींंनी काही गोष्टींचे काटेकोर पालन करायला हवे. रोजच्या जीवनशैलीत महत्त्वाचे बदल केल्यास शरीरास हवी तशी ऊर्जा मिळून शरीरमन निरोगी राहते.
वय वाढत जाते तसे शारीरिक आणि मानसिक बदल होत जातात. तारुण्यात वाटणारा उत्साह वृद्धापकाळात नाहीसा होऊन शरीराला जडलेल्या आजारपणाने निरुत्साही वाटायला लागते. थकवा, अशक्तपणा, एकटेपणा जाणवू लागतो. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊन छोटे-मोठे आजार सतत त्रास देत राहतात.
रोजच्या जीवनशैलीत पुढील महत्त्वाचे बदल केल्यास शरीरास हवी तशी ऊर्जा मिळून शरीरमन निरोगी राहते. शरीराची भूक भागली की मानसिक स्वास्थ्य अबाधित राहायला मदत होईल.
*हलके अन्न घ्यावे :*
या वयात पचनसंस्था विस्कळीत झालेली असते. पोट साफ न होणे, पोट गच्च राहणे, अवेळी, चार चौघात गॅसेसच्या त्रासाने लाजिरवाणी अवस्था होणे. अशा समस्या दूर करण्यासाठी पचायला हलका आहार घ्यावा. तेलकट, मसालेदार, बेकरी पदार्थ टाळावेत. पालेभाज्या, दूध, फळे यांचा समावेश करावा.
*संतुलित आहार :*
पालेभाज्या, फळे, दूध, दही, ताक, अंडी, मांसाहार, मोड आलेली कडधान्ये असा परिपूर्ण संतुलित आहार घ्यावा. संतुलित आहारामुळे आवश्यक ती सगळी पोषक तत्त्वे शरीरास मिळतात आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
*पाणी भरपूर पिणे :*
पचनासंबंधित विकारांवर रामबाण उपाय म्हणजे योग्य मात्रेत, योग्य वेळी पाणी पिणे. मलावष्टंभ, अजीर्ण, अरुची, अपचन, गॅसेस या सगळ्यांसोबत मूळव्याध उद्भवतो. वारंवार उन्हाळी लागणे, पोट दुखणे, लघवी साफ न होणे या समस्या उद्भवतात. या सगळ्या आजारांवर पाणी उत्तम औषध आहे.
*कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3, बी 12 :*
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होणे, सांधेदुखी, स्त्रियांमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी हे त्रास सुरू होतात. अंडी, मांसाहार, दूध आणि संतुलित आहारातून कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3, प्रोटिन्स शरीरास मिळतात. तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3 वा बी 12 च्या गोळ्या घ्याव्यात.
*लोह :*
भूक लागत नाही, अरूची निर्माण होते. दिवस दिवस जेवणाची इच्छा होत नाही. सणासुदीचा किंवा आठवड्यातला एखादा वार अशा प्रकारचे उपवास करणे. यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. म्हणून सतत थकवा, निरुत्साही, अशक्त वाटणे, चक्कर येणे, उगाचच चिडचिड होणे अशी लक्षणे दिसू लागतात. लोहाचे शरीरातले प्रमाण वाढण्यासाठी गाजर, सफरचंद, केळी, पालक, भेंडी, बीट, दूध, अंडी, मासे, गुळशेंगदाणे लाडू, डिंक लाडू, काळे मनुका, खजूर अशा पदार्थांचे सेवन करावे. वृद्धापकाळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तवाढीच्या गोळ्या वा भूक वाढीचे औषध घ्यावे.
*फायबरयुक्त पदार्थ खावेत :*
हिरव्या पालेभाज्या, सर्व प्रकारची फळे खावीत. फायबरयुक्त आहारामुळे पचनविकार दूर होऊन वजन नियंत्रित राहायला मदत होते. रोज अर्धा किंवा एक तास चाला. योगा, प्राणायाम करा. ताणतणावापासून दूर राहा.
आनंदी राहायचा प्रयत्न करा. छान, आवडीची पुस्तके वाचा. छंद जोपासा. आपला वेळ आवडत्या गोष्टींमध्ये घालवा. नवीन मित्र जोडा. जुन्या मित्रांसोबत बोला. लहान मुलांसोबत वेळ घालवा. यामुळे मन गुंतून राहते आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहते.
27/09/2023
*आपल्या घरातील गणपतीवर विश्वास ठेवा*
'घरातल्या आणि घरी आणून पूजलेल्या गणपतीला कमी लेखून दुसरे "राजे" पुजायला जाऊ नका.
वाचा आणि सहमत असाल तर अंमलात आणा.
घरात गणपतीची मूर्ती किंवा तसबीर नाही असं आस्तिकाचं एकही घर सापडायचं नाही. पण गणपती जवळ आले की त्या घरातल्या मूर्तीवरचा विश्वास उडतो का काय होतं माहित नाही. पण घरातली मंडळी पहाटे उठून, वशिले लावून, व्हीआयपी दर्शनासाठी पैसे मोजून वगैरे # # #चा राजा, तमुक बादशहा, अमुक सम्राट गणपतीच्या दर्शनाला जातात. का तर म्हणे तो जागरूक आहे.
घरातला गणपती जागरूक नाही.....???
अहो, गणपती म्हणजे देव एकच असतो. जागरूक, निद्रिस्त वगैरे प्रकार का मानता तुम्ही......???
तो एकच आहे. तुमची श्रद्धाही एक असू द्या. जागरूक म्हणून स्पेशल श्रद्धा, घरातला निद्रिस्त म्हणून त्यावरची श्रद्धा गुंडाळायची असं करू नका.
बहुसंख्य मंडळी घरात चांगली मूर्ती आणतात, मनोभावे पूजाअर्चा, आरत्या, नैवेद्य सगळं करतात.
पण
तिथे # # ्या राजाच्या माजलेल्या कार्यकर्त्यांकडून डोकं आपटून, त्यांचे धक्के खायला आणि अपमान करून घ्यायला का जातात कळत नाही. तो समोरचा वीस फुटी राजा जागरूक असता तर पहिल्यांदा त्याने त्या माजोरी कार्यकर्त्यांना वठणीवर आणलं असतं.
हे कार्यकर्ते का कोण ते बायकांना ढकलून देतात, पाया पडू देत नाहीत, पुढे चला पुढे चला असं भिकाऱ्यांना हाकलल्यासारखं भक्तांना हाकलतात. तरी लोक तिथे का जातात हा खरच संशोधनाचा विषय आहे.
तुमच्या घरचा गणपती कमी जागरूक समजू नका. त्यावर श्रद्धा ठेवा. पावायचा तर तोही पावेल. उगाच राजाच्या मंडपातली गर्दी, आणि तिथल्या कार्यकर्त्यांचा माज वाढवू नका.
शांतपणे हे सारे मुद्दे लक्षात घ्या. विचार करा.
अहो गणपतीचं आपल्या घरी येतो, मग आपण का जायचे बाहेर.
आमच्या घरचा गणपती बाप्पा आम्हाला पावतो. आमचा विश्वास आहे घरच्या गणपतीवर.
आपल्या घराच्याच गणपतीवर विश्वास ठेऊन,मनोभावे दर्शन घ्यायचे. बघा पावतो का नाहीं. त्याच्यावर अविश्वास दाखवला तर तो कसा पावेल हो.
🥑🍋🍑केस गळतीची कारणे🍌🍉🍇
1 केस गळतो ही आपण वापरत असलेल्या अयोग्य साबण यात प्राप्त सर्व कंपनीच्या अंगाचा केसांच्या साबण तसेच शाम्पू ही केस गळतीची मुख्य सोर्स आहेत यानंतर
2 आपण वापरत असलेल्या विविध प्रकारची तेल सुवासिक तेल यामध्ये असलेल्या केमिकल मुळे केस गळती होते
3 अतिशय जास्त शार असलेले पाणी अंघोळीसाठी आंघोCळीसाठी वापरले जात असेल तर या यामुळेही केस गळती होते
4 आहारात वापरत असलेले केमिकलयुक्त रिफायनरी खाद्यतेल
5 व्हिटॅमिन च्या कमकरते मुले
वरीलप्रमाणे केस गळतीची करणे आहेत आपण स्वतः शोधा वरील पैकी कोणत्या कारणामुळे आपले केस गळतात
🌲🌲🌲आरोग्य हेच जीवन🌲🌲🌲
उपाय
1 शुद्ध तेल केसांना लावणे याचा वास उग्र असतो तसेच खाण्याचे तेल सुध्दा 100% ओरिजनल वापरणे कोणत्याही जाहिरात करणाऱ्या कंपनी च्या जाहिरातीस बळी पडू नये
2 केसांना स्वतः बनविलेली शकाकाई वापरणे
3 सर्व पिवळी व लाल रंगाची फळे यातून आवश्यक व्हिटॅमिन मिळतात त्यामुळे आहारात नियमित फळें विविध ठेवणें
4 आवळा रस नियमित घेणे
कढीपत्ता : भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एक सुंदर आणि साधे औषध आहे ...पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे झाड बर्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते .. जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो ...त्याला बर्याचदा बिया लागलेल्या सापडतात या बिया गोळा करून अंगणात लावल्या कि फार चांगल्या पद्धतीने रुजतात ....आणि झाड मोठे झाले कि त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात .....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे आहार आणि औषध अशा अनुषंगाने उपयोग पाहूया :🐚🐋🌾
१) कढीपत्ता आपण आहारात एक विशिष्ट सुंगंधी चव यावी यासाठी वापरतो ... प्रत्यक्षात कढीपत्त्या मध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते ... त्यामुळे जेवण रुचकर लागते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
२) जुलाब लागले असता कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप पिला कि पोटातल्या वेदना आणि जुलाबाचे वेग वेगाने नियंत्रणात येतात ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो ज्यांना अजीरणाचा सारखा त्रास होतो , जेवल्यावर अस्वस्थ वाटते , पोटात ग्यास पकडतो ....त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे .... नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
५) मधुमेही रुग्णांनी कढी पत्त्याची दहा बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
७) कोलेस्टेरॉल वाढले असेल कढीपत्त्याची अनशापोटी वीस पाने चावून खावीत ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत ...केस पांढरे होत नाहीत ...शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
९) कर्करोगाने पिडीत रुग्ण केमो आणि रेडियो थेरपी घेत असताना त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवर सुद्धा फार घातक परीणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते .... अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखर सोबत चावून खायला लावावीत ... रुग्णाला बराच आराम मिळतो
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१०) सर्दी खोकल्या सारखे आजार सारखे होत असतील तर अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे अमृत आहे ... कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर कढीपत्त्याची पोटातून कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर डोळ्यांचे विकार कमी होतात ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१५) आणि सर्वात महत्वाचा फायदा हा कि कढीपत्ता टाकून न देता त्यासहित आहार घेणाऱ्या व्यक्तीला मूत्रपिंडाचे विकार जवळपास होणारच नाहीत.
कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे ... असा हा बहुगुणी आणि आरोग्यसंपन्न कढीपत्ता आहारात नियमित ठेवा ... कच्चा चावून खा .... आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.
*आवळा वृक्ष - अमृत*-
फळांचा राजा तर आंबा असेल तर सम्राट आहे आवळा. आवळा एक सर्वगुणसंपन्न फळ आहे, आरोग्य, आनंद आणि संपन्नता देणारे. आरोग्यलक्ष्मीने संपन्न तोच खरा श्रीमंत, देश जर महासत्ता होणार असेल तर इथल्या लोकांचे आरोग्य उत्तम असायला हवे. आवळा आरोग्य देतो, आरोग्याचे रक्षण करतो आणि वर्धनही करतो. एका छोट्या फळात स्वास्थाचे सार सामावलेले आहे. सोंदर्य आणि तारुण्य देणारा आवळा व त्याचे गुणवर्णन करताना शब्द अपुरे पडतात. देशात आवळा जीवनशैली, आवळा संस्कृती जर विकसित झाली तर औषधाचे कारखाने, पंचतारांकित दवाखाने बंद पडतील. संपूर्ण जगाला निरायम, रोगमुक्त करण्याचे सामर्थ्य आवळ्यामध्ये आहे. शक्ती,. स्फूर्ती आणि तेज देणारा आवळा अनंत हस्ते द्यायला तयार आहेत!
आवळ्यांची संस्कृत नवे पाहिली तर आवळ्यांचे महत्व प्राचीन काळी कसे वैज्ञानी जाणले होते हे समजते. आवळ्यांच्या झाडाला लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी पूजनात आवळा पूजेत असतो, लक्ष्मीला तो प्रिय असतो. आवळ्याचे झाड कधीही तोडत नाहीत. आवळा वृक्ष हा कल्पवृक्ष आहे. आवळ्याला अमृतफळ म्हणतात. ते अमरत्व देणारे आहे, अमलक म्हणजे मळ दूर करणारे आहे, आवळ्याला पंचरस म्हणतात. त्यात मधुर तिक्त, कशाय, कटू, आम्ल असे पाच रस असतात. आवळ्याला धरती मत म्हणतात. मातेप्रमाणे आवळा आपले पालनपोषण करतो. आवळ्याला तृष्णा म्हणतात. त्याने तहान भागते. शिव म्हणतात, ते कल्याणकारी पवित्र फळ आहे. आवळ्याला रोचनी, दिव्या, शक्ती, साधू फळ अशी त्याच्या महान गुणांना अनुसरून नवे आहेत. आवळ्याला वयस्थ म्हणतात. कारण ते बाल्य, तारुण्य टिकवते. त्याला कायस्थ म्हणतात. कारण त्याने शरीर सतेज सुदृढ होते. आवळा अमृतफळ अमरत्व देणारा आहे. आवळा सर्व काही देणारा आहे.
क जीवनसत्वाचा आवळा खजिना आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. सर्व फळांमध्ये क जीवनसत्व संपन्न आहे. रक्त तयार करणारे व शुद्ध करणारे लोह, हाडे, दात मजबूत करणारे, कयल्शियम, बुद्धी स्मरणशक्ती वाढविणारे फॉस्फरस डोळ्यांच्या आरोग्यासाठी सिलिकॉन, रक्त मास, हाडे, स्वच्छ करण्यासाठी क्लोरीन, रोगप्रतीकारासाठी पोटयशियम, प्रतिकारशक्ती, वाढविणारी जीवनतत्वे क ब त्यात असतात. ग्लुकोजचे जोम, उत्साह वाढतो. आवळा उत्तम अल्कली आहे. तो तंतुमय, रसमय असतो. अत्यंत स्वच्छ नेटक्या सुंदर आकाराचे फळ. तारुण्य माणसाच्या जीवनातील सर्वात सुंदर अवस्था पण चिरतारुण्य अशक्यच आपले जीवन ही वार्धक्याकडे जाणारी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तारुण्य म्हणजे उमेद, उत्साह, तेजस्वी डोळे, सुंदर केस, गुलाबी त्वचा, च्यवन ऋषींनी आवळयापासून च्यवनप्राश वयाच्या सत्तराव्या वर्षी तयार केले. त्याच्या सेवनाने ते तरुण झाले. आधी दूर झाल्या. बुद्धी, स्मृती, कांती, शांती विकसित झाली.
नको रे बाबा ते वार्धक्य ! तोंडाचे बोलके, नन्ना वाढणारी मान, डोक्यावरचे शेत पिकलेले किंवा उजाड झालेले, छातीत कफ दाटलेला, हातापायात प्राण नाही. सुरकुतलेला चेहरा, हातात काठी, कंपवात वाटणारा आवाज, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकु येत नाही, त्यात परावलंबित्व, वृद्धावस्था म्हणजे न केलेल्या गुन्हाची सजाच. मृत्यूची चाहूल. वार्धक्याचे संशोधन जगभर चालू आहे. पेशींचा नाश होतो. विभजनाचा वेग मंदावतो. प्रतिकारशक्ती कमी होतो. अनेक रोगींचे आश्रयस्थान शरीर होते. झीज होते. शरीर म्हणजे म्हाताऱ्या पेशींची कचरापेटी होते. लवचिकपणा जातो, सर्व संस्था अकार्यक्ष म होतात. मेंदूतील पेशी मेल्याने स्मरणशक्तीचा र्ह्यास होतो. तोल संभावना येत नाही. मेंदूचे वजन कमी होते. स्नायू अकार्यक्षम होतात. हाडे ठिसूळ होतात. फुप्फुसाची कार्यक्षमता कमी झाल्याने प्राणवायू अपुरा पडतो. जरी कान आणि डोळे ठीक असले तरी त्यांना रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे त्यांचे कार्य ठप्प होते.दंताजीचे ठाणे उठल्याने बोबडे शब्द येतात. पण आवळा चिरतारुण्य देऊ शकतो. मानसिक आरोग्य तर वृद्धापकाळात फारच ढा सळते. कफ, वात, पित्त तीनही विकारांचा त्रास होतो. रोज काहीना काही दुखते. एक वृद्ध तर म्हणाले – ज्या दिवशी आपले काही दुखदार नाही त्या दिवशी आपण खुशाल समजावे की आपण मेलो आहोत. रोगांची मालिका मागे लागते, ते सगळे राक्षस सगळे तुटून पडतात. संधिवात मधुमेह, पक्षाघात, काचबिंदू, हृदयविकार, मानसिक रोग, कर्करोग, अल्झायमर, स्मृतिभंग वगैरे तर फार भयानक, मेंदुवरच्या सुरकुत्या कमी होत जातात. आश्चर्य आणि अतिशयोक्ती वाटेल पण खरोखर आवळा या सर्वांपासून आपले रक्षण करतो. डोक्याच्या केसापासून पायांच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाचे आरोग्य त्याचा रक्षक आहे. आवळा पित्तामुळे उलटी, ओकारी होत असेल तर मध, आवळा चाटण उपयुक्त ठरते. मधुमेह या किचकट विकारात आवळा, हळद चूर्ण घ्यावे. त्यामुळे इन्शुलिनची मात्रा वाढते, इ न्जक्शनचे प्रमाण कमी होते. रक्तशर्करा घटते. डोकेदुखी अनेक कारणांनी प्रत्येकाला भेटते. त्यावर आवळा गुणकारी आहे. विषबाधा, व्यसनाचे दुष्परिणाम आवळ्याने कमी होतात. लठ्ठपणावर आवळा उपयुक्त आहे. आवळा कायापलट करून तुम्हाला नवतारुण्य देईल.
स्त्रियांची गर्भावस्था, बाळंतपण, ऋतुमती अवस्था, पाठदुखी, मेनोपॉज सगळ्यात आवळा गुणकारी असून मातेच्या ममतेने तिचे रक्षण करतो. अंगाला खाज सुटल्यावरही उपयुक्त आहे. लहान बाळालाही आवळा रस द्यावा. आवाज बसला असेल तर आवळ्याचे पाणी प्यावे. आवळ्याचे झाड्याचे सालही कित्येक रोगांवर उपयुक्त आहे. तोंडाची चव,अन्नावरची वासना गेली असेल तर आवळा खावा. अगदी एड्स, क्यन्सरवरही आवळा पूरक उपचार आहे. मानसिक आजार, फिट्स येण्यावरही आवळा मदतीला येतो. सर्व प्रकारचे मूत्रविकार तो दूर करतो. पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ट दूर करतो. ग्यसेस होऊ देत नाहीमेंदू ताजातवाना करतो. डोके ठिकाणावर ठेवायला आवळा उपयुक्त आहे. जंत, कृमी, जंतुसंसर्ग आवल्यामुळे कमी होतो. वार्ध्यक्याची विकृती, विकलांगता आवळ्याने दूर होते, चोर पावलांनी वार्ध्यक्य येते यावर आवळा नियंत्रण ठेवतो. आवळा हा एकट्याने युद्ध लढणारा सरसेनापती आहे. झीज भरून काढणे, चयापचयाला चालना देण्याचे काम तो करतो. प्रतिकारशक्ती वाढते.
निषिद्ध आहार, सुस्त जीवनशैली, कृत्रिम जीवनमान यामुळे तारुण्याला वृद्धत्व येत आहे. लहान मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, बैठक नसते, वृत्ती चंचल असते, मन एकाग्र होत नाही, त्यावर त्यांनी सकाळला मोरावळा खायला द्यावा. तुम्ही फक्त आवळ्यावर विश्वास ठेवायला हवा. आयुर्वेदात तर आवळा बांधून त्यात निवासाचा उपाय दिला आहे. बालदमा, श्वास लागणे, सर्दी, कफ, उलट्या, जुलाब, दात देणे या सर्वांवर आवळा उपयोगी आहे. आवळा अलर्जोक प्रक्तुती कमी करतो. दिव्यदृष्टी सतेज कांती देणारा आवळा उंची वाढवितो, शरीर दणकट, कणखर करतो.
एका आवळ्यात सगळे ब्युटी पार्लर सामावलेले आहे. तुम्हाला तरुण तर आवळा करेलच पण अनोखे सौंदर्य, व्यक्तीत्वही देईल. तेही कुठलेही साईडइ फेक्ट्स नाहीत अगदी स्वस्तात. चेहऱ्याची डागडुजी रंगरंगोटी करण्याची वेळ येणार नाही. आवळा कमालीचा सफाई कामगार आहे. तो रक्तशुद्धी आणि वृद्धी करतो. त्वचा स्वच्छ व सुंदर बनवितो, शरीरातील घाण निपटून टाकतो. शरीरातील घाण निपटून टाकतो. शरीरातून. हलकासा सुगंध बाहेर पडेल. ती क्रीमस, ती परफ्युमस, ती लाली हे महागडे काहीही नको. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, काळी वर्तुळे आवळा दूर करतो, केस काळेभोर, चमकणारे,लांबसडक,दाट, मऊसूद करतो, ते गळत नाही.तुमचे दात तुमची शान असते. दंतविहीन सुंदर व्यक्ती कुरूप वाटते. दातांना येणारी दुर्गंधी, कीड, सूज, कीटण यापासून आवळा तुम्हाला मुक्त ठेवतो. आवळा पावडरने दात घासले तर मुखवासाची गरज नाही. निरोगी, शुभ्र, चमकणारे दात होतील. वेदना होणार नाही. डेंटिस्टचा भयानक खुर्चीवर बसायची वेळ येणार नाही. आवळे चावून खाणे. त्याचा काढा पिणे, आवळ्याच्या रसाने मालिश, पाण्याने गुळण्या आवळा चूर्ण खाण्याने दात निरोगी होतात. देशाचे रक्षण करण्याऱ्या जवानांना ताज्या फळे मिळत नाही. त्यांना स्कव्र्ही रोग होते. अशावेळी आवळ्याचे चूर्ण काम करते, तोंड येणे, कडू होणे, चेहऱ्यावर मुरूम येणे, उचकी, तहान लागले, उलटी, मळमळ, खोकला, सर्दी सर्वांसाठी आवळा उपयोगी आहे. केसाला टक्कल पडले तर आवळा रसाने मॉलिश करा. उवा झाल्या तर आवळाचूर्ण+लिंबू+मेंदीची पाने वाटून लावा. लोखंडी भांड्यात ठेवून सकाळी लावा. त्यात जास्वंद पावडर, मंडुर पूड घाला आणखी गुण येईल. आवळा केशतेलाने हे काळे केस तुम्ही चमकदार ठेऊ शकता. सर्व सोंदर्य प्रसाधनात आवळा हा असतोच. कुठलीही जखम झाल्यास आवळा उत्तम जंतुनाशक आहे. कोडासाखरा त्वचाविकारही आवळ्याने बरा होतो. निस्तेज त्वचा असेल तर तीळाच्या तेलात आवळा पावडर कालवून टाका. या ना त्या कारणाने ताप आल्यास आवळाचूर्ण, काढा गुणकारी ठरतात. अकाली वृद्धत्वावर आवळा रामबाण उपाय आहे. रक्ताततले दोष आवल्याने दूर वाटणारे आजार मृत्युदूत होतात, त्यावरही आवळा उपयुक्त आहे. परीक्षेला जाताना मोरावळा खाल्लाने पोटात खड्डा करणे, ब्लंक होणे, धडधडणे कमी होते. हिरडा, बेहडा, आवळा यांचे त्रिफळाचूर्ण तर वैधच आहे. शल्यचिकित्सेत जखमा भरून येणे, हाडे सांधणे, रक्त वाढविणे, त्वचा पूर्ववत करणे. अशा कामात आवळा मित्र मदत करतो. आंबट असल्याने वात नष्ट होतो. मधुर रस पित्ताचा नाश होतो. मधुर रस पित्ताचा नाश करतो, कटू तूरट रसकफाचा नाश करतात. थकवा, मरगळ, ग्लानी आवळा दूर करतो. अन्नपचनासाठी तर आवळा उत्कृष्ट आहे. आवळ्याचे झाड पर्यावरण शुद्ध करते. सत्त्व, रज, तम हे मनोबुद्धीचे गुणदोष आहेत. त्यांचा समतोल आवळा राखतो. शरीरव्याधीतून मनाची व्याधी असे चक्र आहे. आवळी भोजनाला महत्व आहे. आवळ्याच्या वनात शुद्ध हवा असे असते. जीवजंतूना कित्येक कोस दूर पळवते. अल्झायमर, पार्किन्सन्स या रोगांवर आधुनिक वैधकाला उपाय सापडलेला नाही. पण आवळ्यावर संशोधन केल्यास तो उपाय होऊ शकेल.
आहार नियंत्रण, विहार नियमित असणे, सतत व्यस्त राहणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. रोज एक आवळा खाणे म्हणजे आरोग्य धनात भर तोकनेच आहे. शरीरातले विष, न पचलेले पदार्थ आवळा बाहेर टाळतो. झोप, गुंगी आवळा दूर करतो. वार्धक्यात जीवनेच्छा वाढवितो. आवळ्याचे अवलेह कल्प, चूर्ण, रसायन, धृत असे प्रकार असते. ते घरीही करता येतात. च्यवनप्राशमध्ये सर्व औषधी, साजूक तूप, उत्तम प्रतीचा आवळा नसतो, सुकलेले आवळे वापरतात. डोळ्यातील मोतीबिंदू, रातआंधळेपणावर आवळा उपयोगी आहे. आवळ्याचे चूर्ण जखमेवर टाकल्याने रक्तस्त्राव थांबतो, टाके लवकर भरून येतात. दारूचे व्यसन सोडवायला आवळा उपयोगी असतो. वंध्यत्व, गर्भालयातील दोष, गर्भपात यावरही आवळयासंकट तयार केलेले फळधृत उपयोगी ठरलेले आहे. संजीवनी वटी, त्रिफळा मोदक, काढा, सप्तगुण तेल ही आवळ्यापासून तयार केलेले औषधे उपयुक्त आहेत. आवळा आहाराचा पर्यायाने जीवनाचा भाग व्हावा यासाठी विविध प्रकारे आवळ्याचा उपयोग रोजच्या स्वयंपाकात पाककृतीत करता येतो. आवळा मित्र आहे, धोबी आहे ,परोपकारी संत आहे, जादुगार आहे, आवळ्याला आपलेले केले तर तो आरोग्य, यश, ज्ञान, चैतन्य सर्व देईल. ताणतणाव, भय, असुरक्षितता दूर करेल. आवळा रोगप्रतिबंधक आहे. रोग झाल्यास रोगमुक्ती देणारा आहे. रोग बरा झाल्यावर शक्ती देतो.
आवळ्याचे झाड शेकडो वर्ष आवळे देत राहते. ते स्वतः दीर्घायुषी, चीततरून असते. एकावेळी कित्येक क्विंटल आवळे येतात, सर्व प्रकारच्या जमिनीत आवळा येतो, हवामानाचीही फारशी अट नाही, परदेशात फक्त आवळ्याचाच शास्त्रशुद्ध अभ्यास होऊन स्वीकार झाला आहे. आवळा शिजवला, वालवळा तरी त्यातले सी व्हिटयमिन नष्ट होत नाही. महागडी औषधे त्यांचे साईड इफेकट्स सहन करण्यापेक्षा आवळा कितीतरी श्रेष्ठ, मृत्युंजय आवळा आरोग्यदायक जीवन आणि मरणही देतो, शरीररूपी चादर न मळ्वता, झिजवता आपल्याला परत द्यायची आहे.
निरोगी, अव्यंग शरीर,बऱ्यावाईटाचा विवेक असलेली बुद्धी परमेश्वराने दिली आहे या देणग्या लाख मोलाच्या आहेत. आवळ्यात अलिबाबाच्या गुहेतला खजिना लपला आहे, निसर्ग फार उदार आहे, शरीर निसर्गाचा भाग आहे. त्याला निसर्गातील औषधांचाच उपयोग होतो. अंघोळीच्या पाण्यातला आवळा, साबणाचे काम नैसर्गिकरित्या करतो. आवळा उटणे वापरावे. आवळा वागवून, खारवून(मीठ लावून) पाकवून, रसायनांचा वापर करून, निर्जंतुक करून, पाश्चराइज करून निर्जंतुक, टिकावू करता येतो. पूर्वी मातीच्या भांड्यात वर्षानुवर्ष पदार्थ टिकत असते, आता आधुनिक पद्धतीचा वापर करायला हवा. आवळा व्रत घ्यायला हवे.
आवळ्याच्या मोरावळा तीन – चार प्रचारांनी करता येतो, आवळा जेली, ज्यूस, सरबत, लस्सी करता येते. आवळा लोणचे चार – पाच प्रकारचे होऊ शकते, चटणीही नारळ,धने मेथ्या वगैरे घालून तीन – चार प्रकारची असते. आपण स्वतः प्रयोगाने त्यात भर घालू शकतो. आवळा चोकलेट, क्यंडी करता येते. आवळा सुपारी करता येतो. उकडून – वाळवून, किसून आले कीस मिसळून होते. आवळा लाडू, बर्फी, खोबऱ्यात घालून करता येते. गुलकंदात आवळा घालता येतो, गुळाचा मुरंबा, पाचकवडी करता येते. गुलकंदात आवळा घालता येतो, गुळाचा मुरंबा, पाचकवडी करता येते, सॉस, कोशिंबीर इतकेच नाही तर आवळा पुलाव, पापड, बटाटा मिव मिक्स, भाजी छोले, आवळा चहा, आवळा सूप, थंड पेये, अगदी आवळा चिवडाही करता येतो. आवळामय जीवन हे निरामय ,सुखी जीवन असेल.
१ ते ३५ सर्व औषधी ०. ०४०(काष्टोषधीतून आणाव्यात) मधूमेह्यासाठी मध, खडीसाखर न घालता च्यवनप्राश करता येतो.
कृती:आवळे ताजे, पांढरी रेष, पिवळ्या रंगाचे, घट्ट, गोल आकाराचे निवडावे. सर्व वनस्पति थोड्या कुटून स्टीलच्या भांड्यात वीस लिटर पाण्यात भिजत ठेवाव्यात. पातेले चुलीवर ठेवावे, पातळ पण मजबूत पिशवीत आवळे ठेवून पिशवीचे तोंड बांधून ती पातेल्यात टाकून सर्व चांगले शिजवावे. पाणी शिल्लक राहिल्या व आवळे ठेवून पिशवीचे तोंड बांधून ती पातेल्यात टाकून सर्व चांगले शिजवावे. पाणी शिल्लक राहिल्या व आवळे बाजूला घ्यावे. बाकीचा काढा गालावा. आवळ्यातल्या बिया काढून गर तूप व तिळाचे तेलात परतावा, त्यात गाळून ठेवलेल्या काढा घालावा, त्यात गडीसाखर टाकून मिश्रण आटावावे, घट्ट झाल्यावर उतरवून निवल्यावर त्यात वंशलोचन, पिंपळी, दालचीनी, वेलची, तमालपत्र, नागकेशराचे वस्त्रगाळ चूर्ण टाकावे, एकजीव होईपर्यंत घोटावे म्हणजे च्यवनप्राश तयार होईल.
मधुमेह नसल्यास साखरेचे प्रमाण वाढवल्याने च्यवनप्राश जास्त चविष्ट होईल. च्यवनप्राश रोज चमचाभर अनशापोटी गाईचे दुधाबरोबर घ्यावा नंतर दोन तास काहीही खाऊ नये.
08/09/2016
***अपचन ***
अपचन झाल्यास थोडीशी बडीशेप किंवा जिरे, ताजे आले आणि कडीपत्ता गरम पाण्यात घाला. थोडा वेळ पाणी तसेच ठेवा. नंतर या पाण्यात १ कप पाणी घालून गाळून घ्या.
पोटात कृमी झाल्यास लसणाच्या ३-४ पाकळ्या काही दिवस सकाळी खाव्यात.
घसा बसल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा उत्तम उपाय आहे.
रात्री नाक चोंदल्यास नाकाच्या बाहेरील बाजूने राईचे तेल चोळल्याने श्वास घेणे सुलभ होते.
घश्यात खवखवत असल्यास किंवा खोकल्याची उबळ येत असल्यास एखाद दुसरी काळी मिरी तोंडात ठेवावी.
घामोळ्यामुळे कंड सुटल्यास शरीरावर दही चोळावं. १५ मिनीटानंतर धुवून टाकावं. हा उपचार काही दिवस चालू ठेवावा.
उन्हाळ्यात खूप उष्मा वाढू लागल्यास शरीर थंड ठेवण्यासाठी २ ग्लास पाण्यात १ टीस्पून बडीशेप घालून उकळून हे पाणी सकाळ-संध्याकाळ काही दिवस घ्यावे.
अतिसारावर घरगुती उपाय म्हणजे चमचाभर आल्याच्या रसात चिमूटभर मीठ घालून प्यावे. यामुळे वेदना थांबून अतिसार काबूत येतो.
नागीण किंवा इतर त्वचारोगांवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे तुळस. तुळशीची पाने वाटून किंवा पानाचा रस बाधीत त्वचेवर चोळावे.
27/09/2014
प्लास्टिकच्या पत्रावळ्या ठरल्या गुरांसाठी प्राणघातक
Plastic Pollution and Municipal Solid Waste(documentary).mpg A Documentary about Plastic Pollution and its Effects,and information about the Municipal Solid Waste and its Effects over the Nature. The environment should...
27/09/2014
मानसिक आरोग्य आणि आजार
घनकचरा व्यवस्थापन
घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेला निरुपयोगी पदार्थ. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून निघणारा घनकचरा व त्याची विल्हेवाट ही जगापुढील एक मोठी समस्या आहे. पूर्वीच्या काळी घनकचरा विल्हेवाटीची फार समस्या नव्हती; कारण लोकसंख्या कमी होती आणि घनकचरा टाकण्यासाठी जमीन मोठया प्रमाणात उपलब्ध होती. परंतु आता लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचरा मोठया प्रमाणात तयार होतो व जमीन पूर्वी होती तेवढीच आहे. घनकचरा मोठया प्रमाणात निर्माण होण्याचे कारण म्हणजे शहरीकरण, औद्योगीकरण, प्लास्टिक वस्तू, उंचावलेले राहणीमान आणि त्यासाठी लागणा-या वेगवेगळया प्रकारच्या वस्तू, वाढलेल्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी शेतातील वाढलेले उत्पादन व त्यापासून निघणारा घनकचरा. या सर्व घनकच-याचे व्यवस्थापन करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. घनकचरा प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे.
भारतात दरमाणशी दर दिवसाला 0.4 कि.ग्रॅ एवढा घनकचरा तयार होतो. यावरुन घनकचरा प्रदूषणाची कल्पना आपण करु शकतो. शेतातून किंवा घरातून निघालेला घनकचरा उघडयावर टाकला जातो, तो कुजतो व त्यापासून दुर्गंधी सुटते याबरोबर कीटकांची उत्पत्ती होऊन आरोग्यास हानी पोहोचते. फार पूर्वीपासून घनकचरा जाळूनच त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु त्यामुळे हवेचे प्रदूषण होते व पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात येते.
अर्थव्यवस्था सुधारते तसे कचरा जास्त निर्माण होतो. कच-याचे प्रकारही वाढत जातात. हा अनेक प्रकारचा कचरा वेगवेगळया समस्या निर्माण करतो. आजार, प्रदूषण,सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच घनकचरा व्यवस्थापन करताना काही उद्दिष्टे आपण लक्षात ठेवायला पाहिजेत.
- आरोग्य-संरक्षण, जीवनाची गुणवत्ता सुधारणे.
- पर्यावरण प्रदूषण टाळणे, परिसर स्वच्छता.
- भंगार-कच-यावर पुनर्प्रक्रिया होण्यासाठी चालना देणे.
- जैविक-कच-यातून ऊर्जा निर्माण करून इंधन वाचवणे.
- या सगळयातून काही रोजगार निर्मिती करणे.
संपूर्ण स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या केरकच-यात विविध पदार्थ असतात; त्यात वर्गवारी करावी लागते. वर्गवारी केल्याशिवाय घनकचरा व्यवस्थापन चांगल होऊ शकणार नाही. यासाठी पुढीलप्रमाणे वर्गवारी करता येईल.
27/09/2014
मानसिक आरोग्य आणि आजार
जसे एखाद्याच्या पोटात दुखते तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक आजारांपेक्षा मानसिक आजारांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी वेगळी असते. मानसिक आजारांबद्दल गूढतेचे, भीतीचे, करणी-जारणमरण, इत्यादींचे वलय असते. सर्वसाधारण वैद्यकीय वर्तुळातही याबद्दल फार माहिती नसते. त्यामुळे पोटदुखी, कानदुखीकरता जसे आपण चटकन डॉक्टरकडे जातो तसे मानसिक आजाराबद्दल जात नाही. यावरचे वैद्यकीय उपचार म्हणजे विजेचे शॉक, मनोरुग्णालयात दाखल करणे, इत्यादी भीतीदायक कल्पना असतात. त्यामुळे मानसिक आजारांच्या बाबतीत वैद्यकीय सल्ला न घेता काही जण मांत्रिकाकडे जातात. शहरांत आणि खेडयांतही ब-याच किरकोळ मानसिक आजारांमध्ये काही लोक मांत्रिक-गुरु यांची मदत मागतात. आपले दुखणे कोणीतरी 'दैवी'माणूस नीट ऐकून घेतो आहे असे पाहून, थोडाफार फरक पडतो. यामुळे काही जणांना समाधान मिळते. पण मारझोड, बांधून ठेवणे, धुरी देणे, उपाशी ठेवणे, इत्यादी अघोरी प्रकारही केले जातात. अनेकवेळा यात रुग्ण दगावण्याची उदाहरणे आहेत.
घरातल्या, गावातल्या शांत, वडीलधा-या, प्रेमळ माणसाने दुखणे ऐकून घेणे व धीर देत राहणे याने किरकोळ मानसिक दुखण्यांचा विसर पडतो. हा एक प्रकारचा समुपदेशन उपचारच आहे. मात्र गंभीर प्रकारच्या दुखण्यांत वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. वेळीच उपचार झाले तर इतर शारीरिक आजारांप्रमाणेच काही मानसिक रुग्णही बरे होऊ शकतात.
गंभीर मानसिक आजारांचे प्रमाण आपल्या समाजामध्ये सुमारे एक टक्का इतके आहे. म्हणजेच प्रत्येक गावात पाच-दहा तरी मनोरुग्ण असण्याची शक्यता आहे. याशिवाय सौम्य मनोविकार असलेल्यांची संख्या दहा टक्के इतकी असते. मात्र ब-याच वेळा यावर फार काही उपाय केला जात नाही. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लवकर निदान, तज्ज्ञांकडून उपचार आणि पाठपुरावा व आधार देणे एवढया गोष्टी आपण करू शकतो.
मानसिक आजाराचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते. या पुस्तकात सोपी पध्दत वापरलेली आहे.
जीवशास्त्रातल्या अनेक गोष्टी आणि घटनांसंबंधी, 'अमुक इथपर्यंत योग्य, तिथून पुढे वाईट' अशा मर्यादा आखता येत नाहीत. उदा. 140 पुढे रक्तदाब असेल तर तो'अतिरक्तदाब' आहे असा शिक्का मारला जातो, पण 139 असेल तर तो योग्यच आहे आणि 141 असेल तर जास्तच आहे अशी काटेकोर भूमिका घेणे अशक्य असते. तसेच रक्तदाब असणे ही गोष्ट आवश्यक व नैसर्गिक आहे आणि जास्त असणे आजार आहे. मानसिक आजारांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. योग्यप्रमाणात भावभावना असणे नैसर्गिक आहे. उदा. 'संताप' हा घटक घेऊ या. थोडा संताप असणे संरक्षणासाठी आवश्यक आहे. पण अकारण, अवाजवी संताप हे मानसिक दोषांत मोडेल. आनंदी स्वभाव चांगला खरा, पण सतत 'हवेत असणे' मानसिक दौर्बल्याचे लक्षण आहे. दुःख असणे स्वाभाविक, पण सतत खूप दुःखी असणे 'मनोविकार' म्हणता येईल.
गुणदोषांची थोडी जास्त मात्रा कधीकधी प्रगतीही साधू शकते. उदा. नादिष्ट,छंदिष्टपणातून कलानिर्मिती व शास्त्रीय प्रगती होऊ शकते. सर्वसाधारणपणे टोकाच्या प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून समाजातील बदलाची पावले पडू शकतात. असे असले तरी मानसिक दोष जास्त असेल तर मात्र उपचाराची गरज लागते.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
महाराष्ट्र
Pune
1111