04/02/2024
Walk in Interview..... Urgent Requirement
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swaraj College of Commerce, College & University, Gurudatt Society, H. No 600, Pune/Satara Road, Behind Khushbu Hotel, Balaji Nagar, Pune, Pune.
04/02/2024
Walk in Interview..... Urgent Requirement
16/12/2023
क्रीऐटीव्ह एज्युकेशनल फौंडेशन संचलित स्वराज कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स, बालाजी नगर, पुणे च्या सेक्रेटरी सौ प्राची गोपाल खंडारे यांना दी 15 /12/2023 रोजी, मेयर हॉल मुंबई येथे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संगठना यांच्या द्वारे आयोजित नारी शक्ती गौरव सन्मान 2023, ने शैक्षणिक व सामाजिक कार्यात उत्कृष्ट योगदान केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले, आयोजकांचे आभार 🙏🏻व मॅडम यांना शुभेच्छा 💐💐
Media Cell
01/07/2023
*स्वराज कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स ची शैक्षणिक क्षेत्रात उत्युंग भरारी.....*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त क्रीऐटीव्ह एज्युकेशनल फॉउंडेशन संचलित स्वराज कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स, बालाजी नगर, पुणे हे अल्पावधीत प्रसिद्धीस आलेले महाविद्यालय आज शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता सांभाळत अग्रगण्य ठरले आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स अशा सर्व विद्याशाखांमधून UG व PG चे विविध अभ्यासक्रम चालू आहेत.
त्यामध्ये BA,B.Com,B.Sc., B.Sc IT, BCS, BCA, BBA ( Innovation & Entrepreneurship) इत्यादी UG कोर्सेस आहेत व MA,M. Com., M.Sc.Computer Sci., M.Sc.Computer Application इत्यादी PG कोर्सेस आहेत. हे महाविद्यालय सर्व सुख सुविधांनी समृद्ध असून उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग कार्यरत आहेत.
बँकिंग,फायनान्स, CA, CS मध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी B.Com व M.Com हे उपयुक्त अभ्यासक्रम असून, IT, Computer व Corporate क्षेत्रात करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी BCA, BCS, B.Sc IT, MCS, M.Sc. Computer Application इत्यादी अभ्यासक्रम आहेत. तसेच औद्योगिक,व्यावसायिक क्षेत्रात करियर करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी BBA Innovation & Enterprenuarship हा अभ्यासक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे.
नोकरवर्ग,व्यावसायिक व गृहिणींसाठी पार्ट टाइम कोर्सेस यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे BA, B.Com, M. Com, MBA सुद्धा उपलब्ध आहेत.
तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा अशी माहिती 'स्वराज कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स' चे प्राचार्य डॉ.भारत जिंतूरकर व उपप्राचार्य सौ.प्राची खंडारे यांनी दिली. अधिक माहितीसाठी 90 11 55 77 00 या क्रमांकावर संपर्क करावा.
26/04/2023
क्रिएटिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनचे स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स (खुशबू हॉटेलच्या मागे, पुणे-सातारा रोड, बालाजी नगर, पुणे-43) येथे youth महोत्सवात बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली, तिला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
25/04/2023
क्रीऐटीव्ह एज्युकेशनल फौंडेशन, संचलित स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स, बालाजी नगर, धनकवडी, पुणे -43 द्वारा आयोजित युवा महोत्सव 2023 YOUTH FESTIVAL 2023, सम्पन्न, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या कॉलेज मध्ये 23 व 24 एप्रिल 2023 ला दोन दिवस युवा महोत्सव उत्साहात साजरा झाला👍🏻, या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा श्री भिकाजी खंडारे यांनी भूषवले, या कार्यक्रमाला विविध मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत,मा श्री दत्ताभाऊ धनकवडे, मा महापौर व विद्यमान नगरसेवक पुणे मनपा, मा. सौ राणीताई रायबा भोसले नगरसेविका पुणे मनपा,मा श्री रायबाशेठ भोसले सा. का., मा सौ वर्षाताई भीमराव साठे नगरसेविका पुणे मनपा,मा श्री राजाभाऊ पासलकर, मा श्री विजय पायगुडे, मा श्री सचिन काटकर, मा श्री विजय पायगुडे, मा श्री सुभाष कडू, मा श्री अनिलभाऊ म्हस्के, मा श्री विरुशेठ किराड, मा श्री गजाननभाऊ किराड, मा श्री सुहास गायकवाड मा श्री छबुराव बेरड API, मा श्री ऍड. भास्करराव जगदाळे, मा श्री दीपक जगताप इत्यादी मान्यवरांनी उपस्थित दर्शवली व विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले 🙏🏻🙏🏻
संस्थेचे अध्यक्ष श्री गोपाल खंडारे, सौ प्राची खंडारे सेक्रेटरी व उपप्राचार्या, डॉ भारत जिंतूरकर प्राचार्य, श्री संजय पन्हाळकर, डॉ मिनाक्षी जाधव, श्री अजय मिस्त्री,श्री सुभाष वाघ,सौ मंजिरी भोगले,श्री रामदास सरकटे, श्री सुयश पाटणकर, श्री विशाल डावरे, श्री विशाल जाधव, सौ पूनम खुटवड, सौ अरुणा पाटील, सौ छाया शिंदे सौ चांदणी चौहान इत्यादी संस्थेचा परिवार उपस्थित होता.
या दोन दिवशीय युवा महोत्सव 2023 मध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत, त्यामध्ये, ग्रुप डान्स, सोलो डान्स, लावणी नृत्य व विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या 🙏🏻
अशा प्रकारे स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये युवा महोत्सव 2023 उत्साहात व जल्लषात साजरा करण्यात आला 🙏🏻
Media cell
24/04/2023
क्रिएटिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनचे स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स (खुशबू हॉटेलच्या मागे, पुणे-सातारा रोड, बालाजी नगर, पुणे-43) येथे black and white day अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
21/04/2023
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा क्रीऐटिव्ह एज्युकेशनल फॉउंडेशन संचलित स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स, बालाजी नगर, पुणे -43, मध्ये YOUTH FESTIVAL 2023- युवा महोत्सव 2023, दोन दिवस आयोजन केलेले आहे. यामध्ये संगीत, नृत्य, क्रीडा, मनोरंजन इत्यादी कार्यक्रम असणार आहेत, तसेच गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात येणार आहेत, या कार्यक्रमा विविध मान्यवरांची उपस्थिती असेल, तरी सर्वांना सस्नेह निमंत्रण 🙏🏻🙏🏻🙏🏻
Media cell
14/04/2023
क्रिएटिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनचे स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स (खुशबू हॉटेलच्या मागे, पुणे-सातारा रोड, बालाजी नगर, पुणे-43) येथे 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
13/04/2023
क्रिएटिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनचे स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स (खुशबू हॉटेलच्या मागे, पुणे-सातारा रोड, बालाजी नगर, पुणे-43) येथे 11 एप्रिल 2023 रोजी महान समाजसुधारक महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
13/04/2023
क्रिएटिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनचे स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स (खुशबू हॉटेलच्या मागे, पुणे-सातारा रोड, बालाजी नगर, पुणे-43) आणि Knowlathon IT Services Pvt. Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने Job Fair आयोजित करण्यात आले होते. 11 निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच दिवशी appointment letter देण्यात आले.
18/03/2023
क्रीऐटीव्ह एज्युकेशनल फौंडेशन संचलित स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स, बालाजी नगर पुणे 43. येथे आज दि 18/03/2023 रोजी, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, च्या पूर्ण वेळ पद भरती करिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 17 मान्यवरांची निवड समिती उपस्थित होती, त्यामध्ये विविध विषयांचे कुलगुरू प्रतिनिधी व विषय तज्ञ् उपस्थित होते, डॉ पराग काळकर अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापण, SPPU, व डॉ देविदास वायदंडे सदस्य व्यवस्थापन परिषद SPPU हे कुलगुरू प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते 🙏🏻 या सर्वांनी कॅन्डीडेट च्या मुलाखती घेऊन ऐकून 8 पैकी 8 पद भरण्यात आलेत 👍🏻
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री गोपाल खंडारे, सेक्रेटरी सौ प्राची खंडारे, प्राचार्य डॉ भारत जिंतूरकर व व्यवस्थापन सदस्य श्री संजय पन्हाळकर तसेच सर्व शिक्षक, स्टाफ व इतर कर्मचारी उपस्थित होते. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Media cell