MES Boys High School (भावे हायस्कूल) Pune

  • Home
  • India
  • Pune
  • MES Boys High School (भावे हायस्कूल) Pune

MES Boys High School (भावे हायस्कूल) Pune An Educational Institute

किर्लोस्कर फाउंडेशन - स्वच्छता पारितोषिक
13/02/2017

किर्लोस्कर फाउंडेशन - स्वच्छता पारितोषिक

शिवशाहिरांनी व्यक्त केली शाळेविषयी कृतज्ञता'पुन्हा जन्माला आलो तर पुण्यातच जन्म घेईन आणि शिक्षणासाठी भावे हायस्कूलमध्येच...
31/07/2016

शिवशाहिरांनी व्यक्त केली शाळेविषयी कृतज्ञता

'पुन्हा जन्माला आलो तर पुण्यातच जन्म घेईन आणि शिक्षणासाठी भावे हायस्कूलमध्येच दाखल होईन... या शाळेने आणि शिक्षकांनी जे शिकवलं..त्यामुळेच मी घडू शकलो,' अशी भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. 'माझ्या नातवंडांनो,खूप शिका, अभ्यास करा, मस्ती करा, भरपूर खेळा,' असा संदेश विद्यार्थ्यांना देऊन बाबासाहेब पुन्हा शालेय आठवणींमध्ये रममाण झाले.महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेल्या बाबासाहेबांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते. या वेळी थोर पुरुषांच्या वेशभूषा साकारलेल्या चिमुकल्यांनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिवशहिरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मुख्याध्यापक के. एन. अर्नाळे उपस्थित होते.'माझ्या शाळेच्यावतीने होणारा हा सन्मान थक्क करणारा आहे. सन्मानामुळे मी भारावून गेलो आहे. एका वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटत आहे. या वेळी मला शाळेत केलेल्या गमतीजमती, शिक्षकांचा मार आणि स्नेहसंमेलन आठवत आहे. लक्ष्मण फाटक, दत्तोपंत माजगावकर, बी. व्ही. या शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी आजही चांगल्याच लक्षात आहेत. शाळेने आणि शिक्षकांनी केलेल्या संस्कारामुळेच मी घडू शकलो आणि यशस्वी होऊ शकलो. विद्यार्थ्यांनो खूप शिका, खूप अभ्यास करा, मस्ती करा, खेळा अनगमतीजमती करा आणि मोठे व्हा. सोबतच शिवचरित्रावर प्रेम करायला शिका,' या शब्दांत पुरंदरे यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.तत्पूर्वी भालचंद्र पुरंदरे, गौरी पुरंदरे, गायत्री जवळीकर, स्मिता खरात, प्रमिला सातपुते, अतुल दळवी यांनी अभिवाचनाद्वारे रायगडच्या हिरकणी बुरुजाची कहाणी सांगितली.शिक्षक संघटनेचे पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी देखील बाबासाहेबांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या............'हल्लीचे सर मारतच नाहीत'आमच्या वेळी सर आणि मॅडम आम्ही एखादी चूक केल्यास मारायचे आणि मगच समजावून सांगायचे. मात्र, आजकाल मॅडम किंवा सर विद्यार्थ्यांना अजिबातच मारत नाहीत, हे ऐकून फार वाईट वाटते, असेही बाबासाहेब म्हणाले.

विश्वास ! विश्वास ! स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर विश्वास. महानतेचे रहस्य हेच पुरणात वर्णिलेल्या तेहतीस कोटी देवांवर व पर...
12/01/2016

विश्वास ! विश्वास ! स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर विश्वास. महानतेचे रहस्य हेच पुरणात वर्णिलेल्या तेहतीस कोटी देवांवर व परकियांनी वेळोवेळी तुमच्यामध्ये रुढ केलेल्या समस्त देवतांवर तुमचा विश्वास असला पण स्वतःवर मात्र नसला तर तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, तो अढळ राहुदया आणि शक्तिशाली बना. - स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

यंदाच्या अल्पोपहाराची क्षणचित्रे
19/12/2015

यंदाच्या अल्पोपहाराची क्षणचित्रे

आग्रहाचे निमंत्रण
14/12/2015

आग्रहाचे निमंत्रण

30/04/2015

शाळा सोडताना....
खरं म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं,
शाळा सोडण्यात एवढ़ं काय विशेष होतं;

खरं तर डोळ्यातलं पाणी लपवताना आमची ही गोची झाली
होती;
एकमेकांकडे पाहुन लगेच सावरलं आम्ही स्वत:ला,
मनाशीच म्हटलं आता उगीच रडायाचं कशाला?
भले शाळेतली काही जुनी 'नाती' तुटतील,
त्यात काय एवढं कॉलेज मध्ये 'नवीन' भेटतील...
दिवस, वर्षं कशी जातील कळणार नाहीत,
पुन्हा कधी पावलं इथे वळणार नाहीत...
रडावसं वाटत होतं पण कुणीच रडलं नाही,
शाळेतुन बाहेर पडताना वळुन ही पाहिलं नाहीं....
पण आता मात्र मनापासून शाळेत जावसं वाटतंय,
शेवटच्या बाकावर बसावसं वाटतंय...
शाळेतल्या तासांपेक्षा सुट्टीचीच सर्वाना ओढ़ असायची,
कारण तेव्हाच सर्वांना 'आपली माणसं' भेटायची....
आज मात्र बरोबर कुणीच नसतं,शाळेच्या आठवणीने रडताना; असं
वाटतं तेव्हाच रडायला हवं होतं;शाळा सोडताना........

आज स्वातंत्र्यवीर वि.दा. तथा तात्याराव सावरकर यांची पुण्यतिथी त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्व आणि देशप्रेमास वंदन
26/02/2015

आज स्वातंत्र्यवीर वि.दा. तथा तात्याराव सावरकर यांची पुण्यतिथी त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्व आणि देशप्रेमास वंदन

हिंदुतेज स्वामी विवेकानंद जयंतीच्या सर्व विश्वातिल हिंदु बंधु आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
12/01/2015

हिंदुतेज स्वामी विवेकानंद जयंतीच्या सर्व विश्वातिल हिंदु बंधु आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

अटलबिहारी वाजपेयी आणि मदनमोहन मालवीय यांना 'भारतरत्न' जाहीरभारत सरकारचे जाहीर आभारअटलबिहारी वाजपेयी यांचा अल्पपरिचय-25 ड...
24/12/2014

अटलबिहारी वाजपेयी आणि मदनमोहन मालवीय यांना 'भारतरत्न' जाहीर

भारत सरकारचे जाहीर आभार

अटलबिहारी वाजपेयी यांचा अल्पपरिचय-

25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेरमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला.

श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांचे ते शिष्य आहेत.

भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यापैकी ते एक आहेत.

1968 ते 1973 या काळात अटल बिहारी वाजपेयींनी जनसंघाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यसह विविध माध्यमात त्यांनी पत्रकारिताही केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते पूर्णवेळ प्रचारक होते तसंच ते आजन्म अविवाहित राहिले आहेत.

पहिल्या बिगर काँग्रेसी सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

अटलबिहारी हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात दोन वेळा पंतप्रधानही राहिले आहेत.

अणू चाचणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे काम त्यांनी केले.

सुवर्ण चतुष्कोन या रस्ते विकास प्रकल्पाचे ते प्रणेते आहेत.

दिल्ली-लाहोर बस यात्रा सुरू करून भारत-पाक संबंध सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानला वाजपेयींच्या काळातच धूळ चारली होती.

उत्कृष्ट वक्ता आणि कवी मनाचा नेता अशी त्यांची ओळख राहिली आहे.

पंडित मदनमोहन मालवीय यांचा अल्पपरिचय-

25 सप्टेंबर 1861 रोजी अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला

संस्कृत हिंदी भाषेत त्यांनी विपूल लेखन केले आहे. तसंच त्यांना पंडित हि उपाधी दिली गेली आहे.

कोलकाता विद्यापीठातून पदवी प्रात्प केली

मालवीय यांनी बनारस विद्यापीठाची स्थापना केली

मालावीय हे चार वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिले आहेत.

हिंदू महासभेची स्थापना त्यांनी केली आहे.

1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता.

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीच 12 नोव्हेंबर 1946 मध्ये त्यांचे निधन झाले.

विनायक नरहरी भावे (विनोबा भावे) ह्यांचा जन्म ११ सप्टेंबर,१८९५ रोजी, गागोडे गाव, कुलाबा जिल्हा, महाराष्ट्र येथे एका धार्म...
15/11/2014

विनायक नरहरी भावे (विनोबा भावे) ह्यांचा जन्म ११ सप्टेंबर,१८९५ रोजी, गागोडे गाव, कुलाबा जिल्हा, महाराष्ट्र येथे एका धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे बालपण बडोदा येथे गेले. त्यांच्यावर लहानपणी भगवद्‌गीता, महाभारत, रामायण यांचा प्रभाव पडला. त्यांचे वडील नरहरी शंभूदास भावे आणि आई रघुमाईदेवी यांनी त्यांची मानसिक वृत्ती घडवली. त्यांच्या आठवणींमध्ये भावे म्हणतात “माझ्या मनाला आकार देण्यात आईएवढी दुसऱ्या कशाचीही भूमिका नाही.” १९२१ मध्ये वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची एक शाखा निघाली, तेव्हा तिचे नेतृत्व गांधीजींनी विनोबावर सोपवले होते. व्यासंग आणि आचार शुद्धता यामुळे विनोबांना ‘आचार्य’ ही पदवी देण्यात आली. गांधीकुलाचे ते आचार्य होते. विनोबा हे गांधीजींचे अध्यामिक वारसदार होते.

हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये ‘छोडो भारत’ आंदोलनात झाले. पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सन १९३२मध्ये त्यांना तुरुंगवास घडला.

ते समाज नेतृत्वासाठी दिल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले मानकरी होत. त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

आज आचार्यांची पुण्यतिथी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

आद्यक्रांतिकारक वासुदेवराव बळवंतराव फडके यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यां...
04/11/2014

आद्यक्रांतिकारक वासुदेवराव बळवंतराव फडके यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यांच्या नावाचा ब्रिटिशांनी, अन्यायी सावकारांनी धसका घेतला होता, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे वासुदेव बळवंत फडके! दुष्काळाच्या काळात गरिबांची कष्टाची कमाई हिरावून घेणार्‍या सावकार-धनिकांच्या घरांवर झडप घालून, त्यांच्याकडील लुटीचा विनियोग सशस्त्र क्रांतिकार्यासाठी करणारे आद्य क्रांतिकारक म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे होत.

शिरढोणच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार असलेल्या अनंत रामचंद्र फडके यांच्या मुलाच्या पोटी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. शिरढोणमध्ये त्या वेळी शिक्षणाची सोय नसल्यामुळे वासुदेवराव शिक्षणासाठी कल्याण व नंतर उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे या ठिकाणी राहिले. या काळात त्यांनी इंग्रजीवरही प्रभुत्व मिळवले. पण पुढे नोकरी करण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी अंतिम परीक्षा न देताच शाळा सोडली. याच काळात १८५७ चे स्वातंत्र्यसमर सुरू झाले होते. त्यातील अनेक घटनांचा त्यांच्या मनावर दूरगामी परिणाम होत होता.

फेब्रुवारी,१८६० मध्ये वासुदेवरावांचे लग्न झाले. आर्थिक अडचणींमुळे त्यांना नोकरी करणे भाग पडले. म्हणून मुंबईमध्ये प्रथम मिलिटरी अकाउंट्‌स विभागात व त्यानंतर ग्रॅंट मेडिकल कॉलेजात त्यांनी नोकरी केली, पण याच काळात ते अचानकपणे आजारी पडले. त्यांना प्रचंड ज्वराने ग्रासले होते. त्यांना मुंबईची हवा मानवत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. त्यामुळे पुढे ते पुणे येथे नोकरी करू लागले. ही नोकरी करत असताना, १८६५ साली त्यांना त्यांची आई अंथरुणाला खिळल्याचे कळाले, त्यांनी वरिष्ठांकडे रजेचा अर्ज केला, पण तो त्यांनी नामंजूर केला. तरी आईच्या ओढीने ते आपल्या गावी, शिरढोणला पोहोचले. पण तत्पूर्वीच त्यांच्या आईने या जगाचा निरोप घेतला होता. इथेच त्यांच्या मनात असंतोषाची पहिली ठिणगी पडली. पुढील वर्षी आईच्या वर्षश्राद्धालाही रजा नाकारल्याने उद्विग्न अवस्थेत त्यांनी याचा प्रतिशोध घेण्याचे ठरवले.

दरम्यानच्या काळात न्यायमूर्ती रानडे यांच्या स्वदेशीवरील व्याख्यानाचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला व त्यांच्यातील देशभक्तीचा अंगार अधिकच फुलू लागला. ते स्वदेशीच्या प्रचारासाठी फिरू लागले, व्याख्याने देऊ लागले. याच काळात त्यांनी आपली आध्यात्मिक साधनाही सुरू केली होती. त्यांना काही काळ अक्कलकोट स्वामींचा सहवासही लाभला. स्वदेशप्राप्तीसाठी नुसती भाषणं व व्याख्यानं ही पूरक माध्यमं नसून त्यासाठी बालपणापासूनच विद्यार्थ्यांवर तसे संस्कार होणे गरजेचे आहे, असा विचार करून त्यांनी १८७४ मध्ये पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना केली. यातूनच त्यांनी पुढे पुण्याचे सुप्रसिद्ध भावे विद्यालय सुरू केले. या पद्धतीने राष्ट्रीय शिक्षणाचा पायाच जणू त्यांनी घातला .

दरम्यान महाराष्ट्राला दुष्काळाने घेरले. विहिरी, नद्या, नाले सुकून गेले. गावंच्या गावं ओस पडली. परिस्थिती इतकी विकोपाला गेली की, प्रेतांच्या अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने कुत्र्या-गिधाडांसाठी प्रेतं ठेवून लोकांना पुढं जावं लागे. यातच देवीच्या साथीची भर पडली आणि इंग्रजांच्या छळालाही सीमा उरली नाही. त्यातूनच पुढे त्यांनी सरकारच्या विरोधात काहीतरी करायचा निर्णय घेतला. या काळात वासुदेवराव लहुजी वस्तादांकडे दांडपट्टा, इतर शस्त्रे, मल्लविद्या व घोडेस्वारी शिकण्यास जात होते.

या काळातच त्यांनी रामोशी समाजाला संघटित केले. रामोशी जमातीच्या बहुसंख्य लोकांकडे पूर्वी प्रामुख्याने गडरक्षणाचे काम होते. पण गड व किल्ले इंग्रजांनी खालसा केल्यामुळे ते रानोमाळ भटकत असत. या रामोशी समाजाला (तसेच काही भिल्ल लोकांनाही) सोबत घेऊनच त्यांनी सशस्त्र बंडाची तयारी सुरू केली. जे धनिक, सावकार गरिबांचे शोषण करून धनाढ्य झाले होते, त्यांच्याकडून स्वराज्यप्राप्तीसाठी पैसे-परतीच्या बोलीवर- घ्यायचे आणि जर त्यांनी दिले नाहीत, तर ते लुटायचे-अशा मार्गाचा अवलंब करीत त्यांनी आपल्या बंडाचे पहिले निशाण धामारी या गावी २३ फेब्रुवारी, १८७९ रोजी फडकवले. त्यानंतर जवळजवळ ४-५ वर्षे बंडाचे कार्य नियमितपणे -प्रामुख्याने पुणे व सातारा जिल्ह्यात -सुरू होते. या बंडामुळे फडकेंचे नाव लंडनपर्यंत पोहोचले होते. हे बंड करत असताना त्यांनी ब्रिटिशविरोधी जाहीरनामाच प्रसिद्ध केला होता.

त्यांचा बंदोबस्त करण्यासठी सरकारने मेजर डॅनियल याची नेमणूक केली. त्याला वासुदेवरावांनी निम्म्या महाराष्ट्रभर फिरवलं. पुढे त्यांनी गाणगापूर येथे काशीकरबुवा या नावाने काही काळ भूमिगतपणे काम केले. आपली अध्यात्मसाधना सुरूच ठेवली होती. या ठिकाणीच त्यांनी रोहिल्यांना एकत्र करून, त्यांची भाडोत्री सेना घेऊन इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रयत्नही केला. ब्रिटिश त्यांचा पाठलाग हर तर्‍हेने, येथील फितुरांचा, स्थानिक पोलिसांचा आधार घेत करतच होते. वासुदेवरावांनी पोलिसांना अक्षरश: झुंजवले , पण अखेर त्यांना बेळगाव व कोल्हापूर यांच्या मध्ये असलेल्या कदलगी येथे अटक झाली. त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जानेवारी, १८८० मध्ये एडन येथे स्थानबद्ध करण्यात आले.

एडनमध्ये असताना त्यांना पाणी चामड्याच्या पखालीने पुरवले जाई. याविरुद्धही वासुदेवरावांनी आवाज उठवला. त्यानंतर त्यांना कोलू फिरवून २५ पौंड तेल गाळून घेण्याचे काम दिले गेले. अशा अवस्थेतून त्यांची सुटण्याची धडपड सुरू होतीच. त्यातच दि. १२ ऑक्टोबर, १८८० रोजी ते बेड्या तोडून तुरुंगातून पळाले. पण लवकरच त्यांना पुन्हा पकडण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी एकांतवासात झाली. या काळातच त्यांना क्षयरोगानेही ग्रासले. पुढे या आजारात तुरुंगातच त्यांचे दु:खद निधन झाले.

सशस्त्र क्रांतीचा मंत्र देत, बहुजन समाजाला सोबत घेऊन, आपल्या अतुल पराक्रमाने इंग्रजी साम्राज्याला शह देणार्‍या वासुदेवरावांनी जणू शिवछत्रपतींप्रमाणे स्वराज्यप्राप्तीचा यथाशक्ति प्रयत्न केला. यांच्या कार्यातूनच व बलिदानातून असंख्य क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसेनानींनी प्रेरणा घेतली व पुढील काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले.

आपल्या मनात कोणत्याही रावण प्रव्रूत्तिला थारा देऊ नकाविजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
03/10/2014

आपल्या मनात कोणत्याही रावण प्रव्रूत्तिला थारा देऊ नका
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

Address

S No 1214/1215, Sadashiv Peth, Pune/
Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MES Boys High School (भावे हायस्कूल) Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MES Boys High School (भावे हायस्कूल) Pune:

Shortcuts

Share

Category