18/05/2020
This video we are sharing the brave story of the soldiers of the Indian Army who laid down their lives in the Handwara Encounter in Jammu & Kashmir’s Kupwada district.
The Indian Army’s mission was to rescue the family who was being held hostage inside the house and seek out the hiding terrorists of Lashkar-e-Toiba. The team was led by Colonel Ashutosh Sharma and included Major Anuj Sood, Naik Rajesh, Lance Naik Dinesh and Sub Inspector Sageer Ahmad Pathan of the Jammu Kashmir Police Department.
The team of brave warriors managed to rescue the family and kill 2 terrorists but unfortunately, they were martyred in this mission.
We salute the bravery of our soldiers and their love for our motherland. They truly are a rare, one-of-a-kind species who live selflessly for the “Nation First”. Thank you for your service and we will never forget your sacrifice.
मित्रांनो, आजच्या Monday motivation
दिनांक २ मे २०२० या दिवशी जम्मु काश्मीर मधील कुपवरा जिल्ह्यातील हंडवरा भागातील झालेल्या अतिरेक्यांच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानां ची शौर्य कथा आहे.
अतिरेक्यांनी एका कुटुंबाला ओलीस ठेवले होते, त्यांना सोडविण्यासाठी कर्नल आशुतोष शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मेजर अनुज सुद, नायक राजेश, लान्स नायक दिनेश आणि पोलिस सब इन्स्पेक्टर शकील काझी यांनी अतिशय धाडसाने वीस तास झुंज देत होते. रात्रीची वेळ होती, जोराचा पाऊस पडत होता, कम्युनिकेशन यंत्रणा बंद पडली होती. अतिरेकी घरातून लपून गोळीबार करत होते, त्याला प्रत्युत्तर देत ते घरात घुसले आणि ओलीस ठेवलेल्या कुटुंबातील सदस्याला सुखरूप बाहेर काढले. दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. आणखी अतिरेकी अजूनही गोळीबार करत होते, त्यांचा खात्मा करण्यासाठी ते आणखी आत घुसले, त्यांच्याशी सामना करताना आपल्या पाच नव जवानांना वीरमरण आले.
मातृभूमीचे रक्षण करताना ते पाचही जण शहीद झाले.
या शूरवीर सैनिकांना आमचे कोटी कोटी प्रणाम.
मित्रांनो या शौरयगाथा तून तीन मोटिवेशन मुद्दे मला सांगावे वाटतात.
१. पॅशनेट व्हा... फौजी सारखेच. देशप्रेम, देशासाठी प्राण पणाने लढू... कधीही खचनार नाही, कधीही प्रयत्न करायला मागे हटणार नाही... जिंकू किंवा मरू...
२. शौर्याने प्रत्येक संकटाशी सामना करू... कुठल्याही संकटाला, अडचणीला धैर्याने सामना करू, कुठल्याही संकटाला शौर्याने लढा देऊ... प्राण गेले तरी बेहत्तर.
३.देशप्रेम हे चोवीस तास वर्ष भर करू....
फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी पुरत च देशप्रेम दाखवायचे...असे न करता आम्ही रस्त्यावरचे सिग्नलचे नियम कायम पाळू. कोविड १९ च्या काळात सोशल डिस्त न्सिग पाळू, घरीच थांबुन कोरोनाशी लढा देऊ. वेळच्या वेळी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू.
या तिन्ही मुद्दे आपल्याला मोटिवेट नक्कीच करतील. प्रत्येकाने हे मुद्दे आपल्या ध्येय निश्चित पणे गाठण्यासाठी वापरले तर ते नक्की यशस्वी होतील अशी मला खात्री आहे.
ज्यांना इंडियन आर्मी मध्ये करिअर करायचे असेल त्यांनी त्या संबंधीचा व्हिडिओ गुरुवारी नक्की बघा.
हा मोटिवेशनाल व्हिडिओ करण्याची प्रेरणा मला ब्रिगेडियर जय सापटनेकर ह्यांनी सुचविले होते. त्यांनी मला तरुण मित्रांसाठी इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअर फोर्स मध्ये करिअर कसे करायचे, कुठल्या परीक्षा द्यायच्या, परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, शैक्षणिक पात्रता, वय, उंची, याची माहिती देण्यास सांगितले आहे. ती आम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये सादर करणार आहोत.
ती बघायला विसरू नका. शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.
PLEASE CLICK “CC” FOR ENGLISH SUBTITLES Special thanks to Brigadier Jayprakash Sapatnekar for the insights and inspiration on this video. This ...