मराठा क्रांती महाराष्ट्र

मराठा क्रांती महाराष्ट्र

Share

जाग्या झालेल्या मराठा समाजाला त्याच्या अस्तित्वाची झलक दखवान्यासाठी..
एक मराठा लाख मराठा

Photos 18/11/2018

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर संभाजी पाटील यांचे आमरण उपोषण
मे २०१६
संभाजी पाटील आणि त्यांचे सहकारी याच आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. तेव्हा आमदार नितेश राणे वगळता एकही पुढारी आझाद मैदानावर फिरकला नव्हता. आंदोलनकर्त्या मराठा बांधवांची विचारपूस एकमेव नेते आमदार नितेश राणे यांनी केली होती.
नोव्हेंबर २०१८
संभाजी पाटील आणि मराठा बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत. आमदार नितेश राणे यांनी आज उपोषणकर्त्या मराठा बांधवांची भेट घेतली. २०१६ साली संभाजी पाटील यांच्या आंदोलनाची इतर कोणत्याही नेत्याने या दखल घेतली नव्हती. यावेळेस मात्र अजितदादा पवार, सुभाष देशमुख, राधाकृष्ण विखे पाटील अशा बड्या नेत्यांनी उपोषणाची दखल घेतली आहे.
मराठा बांधवांची विचारपूस करणारे आणि सदैव साथ देणारे एकमेव आमदार नितेशजी राणे

Photos 17/11/2018

आमदार नितेश राणे यांची रामभाऊ गायकवाड यांनी घेतली भेट
मराठा आरक्षणासाठी तुरुंगवास भोगून अलीकडेच जामिनावर सुटका झालेले रामभाऊ गायकवाड यांनी युवानेते आमदार नितेशजी राणे यांची शुक्रवारी पुण्यात सदिच्छा भेट घेतली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांन
ा विठ्ठलपूजेपासून रोखल्यांतर सरकारच्या निशाण्यावर आलेल्या रामभाऊ गायकवाड यांना सरकारने विविध गुन्ह्यात अडकवत ८४ दिवस तुरुंगवासात ठेवलं होतं. तीन महिन्यांचा प्रदीर्घ तुरुंगवासानंतर नुकतीच त्यांची जामिनावर सुटका झाली. मराठा आरक्षणासाठी सर्वाधिक काळ रामभाऊ गायकवाड यांनी तुरुंगवास भोगला. परंतु या कठीण काळात रामभाऊ गायकवाड यांच्या पाठीशी असंख्य मराठा मावळ्यांसोबत सावली सारखे उभे राहिले ते फक्त आमदार नितेश राणे.. रामभाऊंच्या सुटकेसाठी सतीश मानेशिंदे यांच्यासारखा नामवंत वकील नियुक्त करून सतत पाठपुरावा करणारे मराठा नेते आमदार नितेशजी राणे यांनी रामभाऊ गायकवाड यांना खंबीर साथ दिली.
रामभाऊ गायकवाड आणी आ.नितेश राणे यांना मराठा समाज कधीही विसरू शकणार नाही... दोघांना मानाचा मुजरा
जयोस्तु मराठा

Photos 30/10/2018

सातारा: दसऱ्याच्या दिवशी भव्यदिव्य स्वरूपात सीमोल्लंघन झाले. श्री भवानी मातेचे मंत्र उच्चाराने पूजन केले.व शस्त्र पूजन झाले.या सर्व शही मिरवणुकीत विरप्रतापसिंह यांची तरूणाई मध्ये लोकप्रियता सातारकरांनी अनुभवायला मिळाली.”बाप से बेटा सवाई” या वाक्याला अनुसरूनच विरप्रतापसिंहराजे पण कमी आत्ताच नाहीत हे सिद्ध झाले.
अवघ्या महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार आपल्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील तरुणांच्या मानामनात राज्य गाजवणारे छत्रपती उदयनराजे भोसले यांना सामान्य जनतेत मिसळण्याची कला चांगली माहीत आहे.दसऱ्याच्या शाही मिरवणुकीत विरप्रतापसिंहराजे यांना बालपणापासून जनतेत मिसळण्याची कला अवगत झाली आहे असे वाटत होते.तरुणांनी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्याची झुंबड उडवली.काही दिवसांपूर्वी वीरप्रतापसिंह उदयनराजे भोसले यांनीं पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पला राजमाता दयमांतीराजे भोसले यांच्या सोबत भेट दिली.त्यानंतर ते चांगलेच प्रकाश झोतात आले.

Photos 11/09/2016
07/09/2016

प्रति,
मा.साहेब/दादा/काका/मालक/बाॅस/पाटील/भाऊ/अण्णा/
वाघ/छावा/लोकनेता/कार्यसम्राट/भाग्यविधाता/
शिक्षणमहर्षी/ताई/बाई/मॅडम/मुलूख मैदानी तोफ/सरकार/
सावकार/नेते/काळीज/ह्या गल्लीची शान/त्या गल्लीची
शान/ढाण्यावाघ/वारनेचा वाघ....
विषय- जातीसाठी मातीवर येणे बाबत...
महोदय/महोदया....
मराठा समाजाच्या नगर जिल्हयातील उपरोक्त सर्व उपाधी
धारक मान्यवरांनी जातीसाठी थोडा वेळ द्यावा.अशी
सकल मराठा समाजाची अपेक्षा आहे.समाजाला आपल्या
अमुल्य वेळातला वेळ देऊन आरक्षण व मराठा समाजहिताच्या
ईतर मागण्या मान्य करवुन घेण्यासाठी व समाजाला
आम्हीपण तुमच्या समवेत आहोत हे सांगण्यासाठी
मोर्चात सहभागी व्हावे..
सहकार्य करावे....19 सप्टेंबर 2016 ला
आपला- ऐक मराठा
!!समस्त मराठा समाज!!

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Satara
Pune
411021