SPM - Mulinchi Shishushala

SPM - Mulinchi Shishushala Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SPM - Mulinchi Shishushala, School, S. P. M English School 1658, Sadashiv Peth, S. P. College Campus, Pune.

दाणा-पाणी देईन मीतुला |घरटे देईन रहायला |रुसु नको चिऊताई, ये आमच्याशी खेळायला |बालपणापासूनची मैत्रिण असलेल्या पण सध्या द...
21/03/2024

दाणा-पाणी देईन मीतुला |घरटे देईन रहायला |
रुसु नको चिऊताई, ये आमच्याशी खेळायला |
बालपणापासूनची मैत्रिण असलेल्या पण सध्या दुर्मिळ होत चाललेल्या चिऊताईचा जागतिक दिवस, शि.प्र.मं मुलींच्या शिशुशाळेत आवर्जून साजरा केला गेला.
मु.मा.सौ.जयश्रीताई एडगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली छान उपक्रम राबविण्यात आले. चिऊची गाणी ,गोष्टीं याबरोबरच चिमणीची माहिती ,तीला होणारा त्रास, वाचवायचे प्रयत्न याबाबत पण मुलींना सांगण्यात आले. आपापल्या वयोगटानुसार त्यांनी चिमणीचे चित्र काढून रंगवणे, कटआऊट चिकटवून रंगवणे असे हस्तव्यवसाय पण केले.आणि चिऊला रोज पाणी व तांदूळ ठेवायचे प्राॅमिसही केले.

नको घासाघीस, नको वादावादीशाळेतच करू आपण मजेदार खरेदी.इतर सामान्य ज्ञानाबरोबरच , विद्यार्थिनींना व्यवहाराचे ,वस्तू विनिमय...
16/03/2024

नको घासाघीस, नको वादावादी
शाळेतच करू आपण मजेदार खरेदी.
इतर सामान्य ज्ञानाबरोबरच , विद्यार्थिनींना व्यवहाराचे ,वस्तू विनिमयाचे ज्ञान पण व्हावे म्हणून शि.प्र.मं मुलींच्या शिशुशाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.जयश्री एडगांवकर यांनी गुरुवार दि.१५\३\२४ रोजी शाळेत जागतिक ग्राहक दिन आयोजित केला .शाळेत खास खाऊचे दुकान थाटण्यात आले होते. तर ' एक दशक ' रुपये हे मुलींचे खरेदीचे बजेट होते..😊.आपापल्या वर्ग मैत्रिणींसोबत मुलींनी ,स्वतःच्या आवडीचा खाऊ शिक्षक दुकानदारांना पैसे देऊन खरेदी केला. त्याआधी ग्राहकदिनाची माहिती सांगताना खरेदी-विक्री , किंमत, वजनांची परीमाणे,व वजन करण्याचे प्रकार, चलनाची माहिती इ.गोष्टींची ओळख मुलींना करून देण्यात आली.तसेच वस्तूचे पॅकेज, एक्सपायरी डेट,गुगल पे ,ऑनलाईन खरेदी, खरेदीसाठी घरून पिशवी का न्यावी? 'याही बाबींची माहिती मुलींना मिळाली. स्वतः पैसे देऊन वस्तू विकत घेण्याचा आनंद मुलींच्या चेहेऱ्यावर खूपच छान दिसत होता.

आम्ही चालवू हा ज्ञान रूपी वसा|                     शि.प्र. मं मुलींच्या शिशुशाळेत विद्यार्थिनींना नेहमीच , क्रमिक अभ्यास...
29/02/2024

आम्ही चालवू हा ज्ञान रूपी वसा|

शि.प्र. मं मुलींच्या शिशुशाळेत विद्यार्थिनींना नेहमीच , क्रमिक अभ्यासाबरोबरच इतर चतुरस्र गोष्टींचेही ज्ञान मिळेल याची दक्षता घेतली जाते.
२७ व २८ फेब्रुवारी - मराठी राज्यभाषा दिन व विज्ञान दिनांचे औचित्य साधून विद्यार्थिनींना हटके पण मजेशीर अनुभव देण्यात आले. "शिशुशाळेतील, एकाच गटातील अनेक गोष्टींची ओळख करून देणारा मराठीतील परिचय पाठ हा उपक्रम आणि निसर्ग दर्शन, तेथील घडामोडींमागची वैज्ञानिक कारणे " या स-यांचा प्रत्यक्ष अनुभव मुलींना खुल्या व आनंदी वातावरणात मिळावा म्हणून मुख्या..मा.सौ.जयश्री एडगांवकर यांनी संभाजी उद्यान व तेथील मत्स्यालयात शैक्षणिक सहलीचे आयोजन केले. शिक्षकांबरोबर फेरफटका मारत मुलींनी विविध झाडे, पक्षी, नदी याची माहिती घेतली.मत्स्यालयातील रंगीबेरंगी ,व विविध आकारांचे,प्रजातींचे मासे बघत ,त्यांची माहिती ऐकताना तर मुली हरखून गेल्या होत्या.तसेच मराठी दिनानिमित्त त्यांना छान चित्रांची गोष्टींची पुस्तकेपण शाळेकडून भेट देण्यात आली.
प्रत्यक्ष विज्ञान दिनादिवशी शिक्षकांनी वैद्यानिक प्रयोग दाखवत, त्यामागील शास्त्रीय कारणे मुलींना समजावून सांगितली ,तसेच विज्ञान विषयावरील चित्रे त्यांच्याकडून रंगवून घेण्यात आली.

काळा ड्रेस, हलव्याचे दागिने ,घालून आज नटलो छान |साजरे करूया हळद-कुंकू, आणि ..बोरनहाण ||शि.प्र.मं मुलींच्या शिशुशाळेत आज ...
16/02/2024

काळा ड्रेस, हलव्याचे दागिने ,घालून आज नटलो छान |साजरे करूया हळद-कुंकू, आणि ..बोरनहाण ||

शि.प्र.मं मुलींच्या शिशुशाळेत आज दि.१४\२\२४ रोजी संक्रांत हळदि कुंकू व नर्सरी मुलींचे बोरनहाण संपन्न झाले. नु.म.वि मुलांच्या शिशुशाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.दीपा कुलकर्णी ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी शाळेला गोष्टीची पुस्तके भेट देण्या बरोबरच छानसे कथा कथनही केले.विद्यार्थिनींना तिळगुळ वडी,बोरनहाणाचा मेवा ,गूळपोळी असा मजेदार खाऊ देण्यात आला.मु.सौ जयश्री एडगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्तम साजरा झाला.

13/02/2024

श्रावणसर १ - नागपंचमी शि.प्र. मं मुलींच्या शिशुशाळेत रिमझिम सरी घेऊन येणारा श्रावण मासारंभ 'नागपंचमी' साजरी करुन करण्यात आला. विद्यार्थिनींकडून चिकणमातीचे व कागदाचे नाग करुन घेऊन त्यांची व नाग प्रतिमेची पूजा करण्यात आली. मुख्या. सौ जयश्रीताईंनी ' सापांचे प्रकार, त्यांचा निसर्गाला / शेतकऱ्यांना होणारा उपयोग, सर्पमित्रांचे काम, नागांविषयीच्या अंधश्रद्धा' इ. माहिती मुलींना दिली. नंतर सर्व शिक्षकांनी मुलींच्या हातावर मेंदी काढून दिली

https://youtube.com/watch?v=nZHF6GF9qMg&feature=shared

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ|बालकांच्या उन्नतीचा मार्ग चालू अखंड |                                        प्रयास फाऊं...
12/02/2024

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ|बालकांच्या उन्नतीचा मार्ग चालू अखंड | प्रयास फाऊंडेशन (चॅरिटी ट्रस्ट) व शिक्षण प्रसारक मंडळी मुलींच्या शिशुशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, शिशुशाळेतील मुलांची 'आंतरशालेय समूहगीत स्पर्धा' आज शनिवार दिनांक ११\२\२४रोजी शि.प्र.मं मुलींच्या शिशुशाळेत साजरी झाली.कॅन्सर ग्रस्त मुलांसाठी मदतनिधी पुरवणा-या प्रयास फाऊंडेशनने शैक्षणिक क्षेत्रात पण काही योगदान द्यावे म्हणून व शिशुशाळेच्या मुख्या.मा.सौ.जयश्री एडगांवकर यांनी शिशुवर्गातील मुलांना व्यासपीठ मिळावे या हेतूने संयुक्तिक पणे ह्या स्पर्धांचे आयोजन केले.सकाळ वृत्तपत्राच्या पत्रकार मा.सौ.जागृती कुलकर्णी ,कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तर परिक्षणाची जबाबदारी सौ.सुनेत्रा आफळे व सौ.स्वाती वैकर यांनी पार पाडली.
पारितोषिक मानकरी :--
प्रथम क्र.--मा.स.गोळवलकर गुरुजी विद्या
द्वितीय क्र.--मुरलीधर लोहिया मातृमंदिर
प्री प्रायमरी स्कूल.
तृतीय क्र.--एस.पी.एम इंग्लिश मिडीयम
स्कूल.
उत्तेजनार्थ--अभिनव पूर्व प्राथ.विद्यालय.
स्वरचित गीत --प्राजक्ता कुलकर्णी.
(एस पी एम पब्लिक स्कूल)

Admissions Open....
07/02/2024

Admissions Open....

https://youtu.be/2q3-BR1SAQY?feature=sharedतालावरती करु कवायत,मनोरे व योगासने| चला करु साजरा क्रीडादिन उत्साहाने|       ...
02/02/2024

https://youtu.be/2q3-BR1SAQY?feature=shared
तालावरती करु कवायत,मनोरे व योगासने| चला करु साजरा क्रीडादिन उत्साहाने| आज रविवार दि.२१\१\२४ रोजी शि.प्र.मं मुलींच्या शिशुशाळेत क्रीडादिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. 'खेळातून शिक्षण', या शाळेच्या ब्रिदानुसार मुलींच्या व पालकांच्या विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या .आईबरोबर रिंग टाकणे (एकाग्रता,साहचर्य), दिलेल्या वेळेत पालकांनी नियोजित केलेलेच भौमितिक आकार क्रमाने काढून-मुलींनी त्यात उड्या मारणे(चपळता/वेग/आकार ओळख/क्रम) पालकांनी लगोरी फोडल्यावर अंक क्रमवारीने लगोरी लवकरात लवकर लावणे (वेग/वेळ बंधन/चापल्य/अंक क्रम )अशा मजेशीर खेळातून मुलींचा विकास पण साध्य होत होता. आपल्या पालकांच्या 'पुस्तक डोक्यावर ठेवून चालणे 'स्पर्धेला तर मुलींनी मनमुराद प्रतिसाद दिला.क्रीडादिनाला प्रमुख अतिथी म्हणून कु.ईश्वरी पवार (राज्यस्तरीय तिरंदाज--सुवर्णपदक मानकरी) ही आमच्या शाळेचीच पण सध्या इ.३रीतील माजी विद्यार्थिनीं व सौ प्राची पेंडसे(ॲथलिट , खोखो खेळाडू व माजी मुख्याध्यापिका आपटे प्रशाला) उपस्थित होत्या. शि.प्र.मं.नियामक मंडळ उपाध्यक्ष, मा.श्री.श्रीकृष्ण चितळे सरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवण्यास कारणीभूत ठरली.शाळेच्या गुणवंत विद्यार्थिनीं व शिक्षकांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. मुख्या.सौ.जयश्री एडगांवकर यांनी 'मुलांच्यातले सुप्त गुण -अभ्यास/खेळ/कला- ओळखून पालक शिक्षकांनी मिळून पाल्याचा विकास करुया 'असे सांगत क्रीडादिनाचा समारोप केला .

नादातूनी ह्या घुमते नाम |श्रीराम जय राम जयजय राम|आयोध्यानगरीत होणा-या प्रभूरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सारेच रंगून...
20/01/2024

नादातूनी ह्या घुमते नाम |
श्रीराम जय राम जयजय राम|
आयोध्यानगरीत होणा-या प्रभूरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सारेच रंगून गेले असतानाच शि.प्र. मं मुलींच्या शिशुशाळेतील मुलीपण रामनामात तल्लीन झाल्या. शुक्रवार दिनांक १९/१/२४रोजी शाळेत मा.मुख्या.सौ.जयश्रीताई यांनी श्रीरामांच्या प्रतिमेचे विद्यार्थिनींबरोबर पूजन केले.मुलींना शाळेकडून ' रामरक्षा व हनुमान स्तोत्राचे ' पुस्तक भेट देण्यात आले. विद्यार्थिनी आपापल्या पालकांसोबत २२ जानेवारीला त्याचे पठण करणार आहेत.

Address

S. P. M English School 1658, Sadashiv Peth, S. P. College Campus
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when SPM - Mulinchi Shishushala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category