08/04/2024
PES Modern High School, Shivaji Nagar, Pune
PES Modern High School, located at Jangli Maharaj Road (aka J.M Road), Pune - 411005, this school is one of the Pune's oldest educational institutions. S.R. V. T.
Progressive Education Society's, Modern High School Pune- 411005 is one of the premier education institutions in Pune. It was established in the year 1934 by an eminent educationist Prof. Kanitkar. He was ably assisted by such young and dedicated teachers of proven excellence as Shri. Tatake, Shri. G.G. Damle and Shri. Koparkar etc. Late Shri. S. R. Kanitkar was the fountain head of inspiration o
08/04/2024
मित्रांनो,
आपल्याच शाळेतील एका माजी विद्यार्थ्याने एक नवीन छान असा उपक्रम हाती घेतला आहे, ज्यामध्ये आपल्या भारत देशात जे काही चांगलं आहे, चांगलं घडत आहे, नवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत, आपली संस्कृती असो, ईतिहास, वारसा असो ज्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात आदर आणि अभिमान आहे, अश्या सगळ्या चांगल्या गोष्टी एकमेकां बरोबर शेअर करण्या करीता एक सहज सोपं असं व्यासपीठ सुरू केले आहे, ज्याचे नाव आहे "Advantage Bharat".
हे सर्व करताना कुठेही राजकारण किंवा कुठलीही राजकीय संस्था ह्याचा कुठेही हस्तक्षेप हा कटाक्षाने टाळला जाणार आहे. फक्त आणि फक्त आपला भारत देश आणि सकारात्मकता ह्यावर भर दिला जाणार आहे.
विविध विषय जसे, business, finance, startups, infrastructure, Indian govt initiatives, healthcare, sports, art forms, culture, असे अनेक विषय हाताळले जाणार आहेत.
हे सर्व Statistics, बातम्या, माहिती ही प्रस्थापित आणि नावाजलेल्या अश्या शासकीय, निम शासकीय, वृत्त संस्थांच्या मार्फत प्रमाणित केलेली असणार आहे.
एक अभिमानी भारतीय म्हणून, कृपया खाली दिलेल्या Instagram, Facebook आणि YouTube चॅनल्स ना follow, subscribe आणि Share नक्की करा. आणि आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सुध्दा Follow, Like आणि Share करायला नक्की सांगा.
- https://www.facebook.com/AdvantageBharat
- https://www.instagram.com/advantage_bharat/
- https://www.youtube.com/
Follow, Subscribe केल्यावर, आपल्याला ही संकल्पना कशी वाटते हे नक्की कळवा.
- मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
Advantage Bharat Putting India First with Advantage Bharat
19/04/2023
Forwarded as received.
27/01/2023
काल पार पडलेल्या मॉडर्न माजी विद्यार्थी महामेळाव्यातील एक क्षण, सर्व ऋषितुल्य शिक्षक वर्गाला माजी विद्यार्थ्यांकडून विनम्र अभिवादन. 🙏
लक्षात आहे ना?
मॉडर्न माजी विद्यार्थी महामेळावा आज, संध्याकाळी
ठीक 5:30 वाजता. भेटूया 👍
(Forwarded as received)
प्रति माननीय संपादक
*** कृपया प्रसिद्धीसाठी ***
मॉडर्न माजी विद्यार्थी मित्र मंडळाच्या वतीने येत्या 26 जानेवारी रोजी मॉर्डन माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
शाळेतील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, क्रिडा, व शिक्षणासाठी मदत करण्याचे काम मॉडर्न माजी विद्यार्थी मंडळाकडून गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे.
गुरूवार दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता (५:३० वाजता) मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे-5 शाळेच्या मैदानावर हा मेळावा संपन्न होणार आहे.
या महामेळाव्या मध्ये 'मा.ॲड. श्रीकांतभाऊ शिरोळे' माजी विद्यार्थी मॉडर्न हायस्कूल, यांच्या शुभहस्ते 'डॉ.गजानन एकबोटे' व दोन माजी शिक्षक व दोन माजी शिक्षिका यांना 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे, त्याच बरोबर इतर शिक्षक, शिपाई, सफाई कामगार, व काही विशेष सत्कार देखील करण्यात येणार आहे. तसेच शाळेतील 5 विद्यार्थी यांना 'स्व.माजी आमदार विनायक शेठ निम्हण' यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
या शाळेत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या स्नेह मेळाव्यात उपस्थित राहावे असे आवाहन माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहिती करिता संपर्क
- 9011191919
- 9763804053
- 9325525183
आपला नम्र
उदय प्रमोद महाले
अध्यक्ष: मॉडर्न माजी विद्यार्थी मित्र मंडळ
मॉडर्न हायस्कुल, शिवाजी नगर
पुणे ४११००५
24/01/2023
(Forwarded as received)
नमस्कार सर्व मित्र मैत्रिणींनो,
आता या आपल्या शाळेच्या फेसबुक page ची लिंक share करायला आणखी सोपी झाली आहे.
fb.me/pesmodernhs
आपल्या शाळेतल्या मित्र मैत्रिणींच्या सोबत ही लिंक नक्की share करा. आणि जे अजून जॉईन झाले नाहीत त्यांना जॉईन व्हायला सांगा.
मॉडर्न हायस्कुल – आठवणींचे “बाईट्स”
©️ सुनील गोडसे
हल्लीच्या टीव्ही च्या न्यूज चॅनेलच्या भाषेत एखाद्या घटनेचे / प्रसंगाचे बाईट घेण्याची पद्धत आहे . हे बाईट्स म्हणजे खरे तर प्रतिक्रिया ! “आपली शाळा “ असं कुणी नुसतं म्हटलं ना , तरी कुणीही न विचारताच मनातल्या मनात आपले बाईट्स तयार होऊ लागतात.. म्हणजे असं की :
संभाजी पार्क ओलांडून झाशीच्या राणीचा पुतळा ओलांडून जंगली महाराज रोडवरुन सरळ जंगली महाराज मंदिराकडे जायला लागलं की डावीकडे आधी एक पेट्रोल पंप. मग थोडासा खडकाळ भाग. त्याच्या अलीकडे जोगळेकरांचं स्टेशनरीचं दुकान. त्याच्या पुढे गेलं की सेलेक्स कॉर्पोरेशन आणि मदाने एन्टरप्रायजेस या शेजारी शेजारी असणाऱ्या दोन मोठ्या शो रूम्स . त्यावर डॉ टेपन यांचा दवाखाना.
आणि त्यानंतर शाळेचं मोठं दार !
दारातच चन्यामन्या बोरं विकणारी एक म्हातारी. तिच्याकडे बोरांशिवाय आवळे, चिंचा, अशा गोष्टीही मिळायच्या. "आजी अजून द्या कि थोडी बोरं " म्हटलं कि दोन चार बोरं जास्त देऊन वर मीठ टाकुन तो पूडा हलवून द्यायची. सगळं मीठ सगळ्या बोरांना बरोबर लागायचं. तिथल्या रेलिंगजवळ गाडीवरच्या कुल्फीचा बॉक्स लाल कापडाने झाकून उभा असणारा कुल्फीवाला.
मग दारातून आत गेलं की सिमेंटचा रस्ता. डावीकडे एक मोठं कडुलिंबाचे झाड आणि त्याला असणारा पार. थोडंसं पुढे गेलं कि जंगलजीम. त्याच्या मागच्या बाजूला भय्याची कोठी. त्या कोठीच्या अंधाऱ्या बोळकांडीत भय्या लीमलेटच्या गोळ्या , पाटीवरच्या पेन्सिली , खोड रबर इ . विकायचा. त्या कोठीच्या पलीकडेच पाण्याची टाकी.
मग पुढे गेलं कि मोठा चौक. जिथे मधल्या सुट्टीत शिवाशिवी, जोडीसाखळी, रुमालपाणी असे खेळ रंगायचे. नंतर या चौकात कायमस्वरूपी स्टेज बांधलं गेलं आणि जोडीसाखळी खेळाची जागा कमी झाली.
डावीकडच्या तिरक्या दगडी पायऱ्या चढून गेलं कि तिथेच पुढे वर जाण्याचा जिना.तसाच तळघरात जाण्याच्या जिन्याचा पॅसेज .जो पुढे सायकल स्टॅन्ड कडे जायचा.
जिना चढून वर गेल्यावर डावीकडे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांचे ऑफिस. त्याच्या दाराशीच मोठी पेटी असायची ज्यावर शिपाई मंडळी बसायची आणि तिथेच मोठी पितळी घंटा टांगलेली .
ऑफिसच्या दारातून समोर पाहिलं की उजवीकडे कोपर्यात स्टाफरूम होती. त्या स्टाफ रूम मध्ये साधारण दीड दोन फूट उंचीचा प्लॅटफॉर्म होता. ज्यावर गादीची बैठक आणि टेकायला लोड .
पहिल्या मजल्यानंतर वरती दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर डावीकडे वळायचे. आणि मग शेवट्पर्यंत चालत जायचे. तिथे शेवटी एक लोखंडी दार. त्यापलीकडे टेरेस. ( नंतर तिथे एक मोठा हॉल बांधला गेला ) . या टेरेसला फरशी नव्हती . कोबा करून त्यावर टाईल्सचे तुकडे बसवलेले.
या बाजूचा मोठा चौक आणि तसाच पलीकडच्या बाजूचा मोठा चौक यांच्या बरोबर मध्ये जी इमारत होती ती म्हणजे जणू शाळेचा अॅड्मिन ब्लॉक ! कारण तिथे खालच्या मजल्यावर टीचर्स रूम होती.
बहुतेक सर्व शिक्षक शाळेत सायकलवर येत असत. टीचर्स रूमच्या बाहेर ते सायकली लावत. त्यातल्या त्यात गणिताच्या शिक्षकांच्या सायकली कुठल्या हे तर नक्की पाठ व्हायचं आणि मग वर्गात जातानाच सायकल पाहून आज तास होणार की नाही हे कळायचं.
या टीचर्स रूम च्या बरोबर वर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांचं ऑफिस. त्या ऑफिसच्या समोर ऊन येऊ नाही म्हणून एक मोठं पार्टिशनच बसवलेलं आणि त्यातच चौकोनी जागा करून मध्यभागी मोठी पितळी घंटा. तिथं मुख्याध्यापकांना भेटायला आलेल्यांसाठी बसायला एक मोठा बाक.
या ऑफिसला जायचा रस्ता टीचर्स रूमच्या उजव्या बाजूच्या जिन्याने. या जिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या मिडलँडिंगच्या भिंतीवर चित्रकार जयंत खरे यांनी काढलेली महाभारतातील दोन मोठी चित्रे. पण तिथे कायम अंधार असल्यामुळे ती म्हणावी अशी "प्रकाशात" कधीच नाही आली.
पहिला मजला चढून आलं की समोरच मोठी लायब्ररी. दुसऱ्या मजल्यावर (लायब्ररीच्या बरोबर वर) एक छोटा हॉल. जिथे टीव्ही ठेवलेला. दूरदर्शनवरचे काही शालेय कार्यक्रम पाहायला कधी कधी तिथे नेले जात असे. याच हॉल मधल्या उंच काचेच्या कपाटात मोठ्या काचेच्या बाटल्यांत फोर्मालीनमध्ये ठेवलेले जीवशास्त्रातले अभ्यासासाठीचे जतन केलेले प्राणी, त्यांचे अवयव बघायला मिळायचे.
मुख्याध्यापकांच्या ऑफिसला दोन दरवाजे होते. एक मेन पॅसेज मधून जिथे शाळेची घंटा होती. तिथेही पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे मुख्य दारापाशी दोन छोटे स्विंग दरवाजे आणि दुसरा त्याच्या बरोबर समोर. तिथून बाहेर आले पलीकडचा चौक दिसायचा. त्याच मजल्यावर समोर कोपर्यात मोठा ड्रॉइंग हॉल.आणि त्यावर छान रचलेली कौलं !
पलीकडच्या चौकात उजव्या बाजूला प्रयोगशाळा होती . तिथे पूर्ण टक्कल असलेले कायम पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट मधले सर हे प्रयोगशाळेत असायचे. अल्क-आम्ल असल्या गोष्टी बरोबर जमल्या नाहीत कि मदतही करायचे. त्यांची सायकल मात्र प्रयोगशाळेच्या भिंतीलाच लावलेली असायची.
प्रयोगशाळेकडे पाठ करून समोर पाहिलं की एक मोठा मोकळा पॅसेज. जवळ जवळ एक वर्ग तिथे भरू शकला असता एवढा मोठा. त्याला लागून विद्यार्थी भांडार..
त्या मोठ्या पॅसेजमधून पलीकडे गेलं की समोर हॉस्टेलची भिंत. चार पायर्या चढून उजवीकडे एक मोठं झाड. तिथून डावीकडे मुलींच्या शाळेकडे जाण्याचा रस्ता तर उजवीकडे शाळेबाहेर पडण्याचं दार....
“आपली शाळा” म्हटली की एखाद्या चित्रपटासारख्या या सगळ्या प्रतिमा डोळ्यासमोरून सरकत राहातात.
तसं पाहायला गेलं तर हे केवळ “आपल्या शाळेचं “ फक्त वर्णन झालं. पण यातल्या प्रत्येक वळणावर , कोपर्यावर, पायरीवर तिथल्या अकरा वर्षातली कुठली न कुठली तरी आठवण रेंगाळतीय .
कधी धडपडणं, कधी ठेच लागणं, कधी कौतुकाचे शब्द , कधी भांडणं तर कधी दिलजमाई , कधी शिक्षा तर कधी शाबासकी !
दहावीचं वर्ष संपल्यावर “कॉलेजात” जायची हुरहूर... आणि तरीही आता “इथे” आपण परत रोज येणार नाही या जाणिवेनं मनही भरून आलेलं ..
दारातली चन्यामन्या बोरं विकणारी म्हातारी ते तासाची घंटा देणारा शिपाई आणि वर्गात शेजारी बसणारा मित्र ते या सगळ्या प्रवासात भेटलेले वेगवेगळे शिक्षक आणि शिक्षिका यांच्याबद्दलच्या आठवणींचे असंख्य “बाईट्स” आपोआप मनात तयार होत जातात...
- बाहेर धूमशान पाऊस पडत असावा. निवांत वेळ असावा. मोबाइल आणि इंटरनेट बंद असावं . आणि कुणीतरी “आपल्या शाळेचा” विषय काढावा... पहिल्या एकदोन पावसानंतर वैराण माळ बघता बघता हिरवागार होऊन जावा तसं शाळेतल्या आठवणींच्या बाईट्सनी मनही हिरवंगार होऊन जायला लागतं आणि बाहेरचा पाऊस मनात शिरतो , आपल्याही नकळत !
©️ सुनील गोडसे
(As received on WhatsApp)
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Address
Jangli Maharaj Road, (J. M. Road) Shivaji Nagar, Pune/
Pune
411005