04/02/2026
‘माझा वर्ग मूल्यवर्धित वर्ग’ उपक्रमातून विद्यार्थी गिरवताहेत मूल्यांचे धडे!
दि. २७ जानेवारी २०२६
जिल्हा परिषद शाळा, हादगाव (बु.) ता. पाथरी, जि. #परभणी या शाळेत #मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमांतर्गत ‘माझा वर्ग मूल्यवर्धित #वर्ग’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. यामुळे शिक्षक-विद्यार्थ्यांच्या सहभागातून वर्गात सकारात्मक वातावरणनिर्मिती होत असून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टी, जबाबदारी आणि मूल्यांची जाणीव दृढ होत आहे.
‘मराठा संदेश’ या स्थानिक दैनिकाने उपक्रमाची दखल घेऊन बातमी प्रसिद्ध केली आहे.
26/01/2026
This Republic Day, we celebrate more than a moment in history.
We celebrate the Constitution that guides us, and the values we nurture through education—so they live on in everyday actions.
~Shantilal Muttha Foundation
12/01/2026
𝗦𝘄𝗮𝗺𝗶 𝗩𝗶𝘃𝗲𝗸𝗮𝗻𝗮𝗻𝗱 𝗯𝗲𝗹𝗶𝗲𝘃𝗲𝗱 in transformative potential within every young mind... We see that potential realised in classrooms every day.
𝗛𝗮𝗽𝗽𝘆 𝗡𝗮𝘁𝗶𝗼𝗻𝗮𝗹 𝗬𝗼𝘂𝘁𝗵 𝗗𝗮𝘆!
[ShantilalMutthaFoundation, Mulyavardhan, TransformativePotential]
30/12/2025
सर्जनशीलतेतून उमटणारी मूल्यांची चित्रभाषा
#सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, आष्टा नं. १४ येथील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु. तन्वी मंगेश कांबळे हिने काळजी घेणाऱ्या कुटुंबाचे अतिशय समर्पक आणि #सुंदर चित्र रेखाटले आहे.
शाळेत राबविण्यात येणाऱ्या #मूल्यवर्धन कार्यक्रमातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवे धुमारे फुटत असल्याचे या चित्रातून स्पष्टपणे दिसून येते.
#मूल्यशिक्षण #मूल्ये #शाळा #शिक्षक #विद्यार्थी
29/12/2025
बीडच्या शिक्षणाधिकार्यांची #मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षणास भेट
१६ डिसेंबर २०२५
बीड : मूल्यवर्धन ३.० तालुकास्तरीय प्रशिक्षणास #बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती किरण कंवर यांनी भेट देऊन उपस्थित शिक्षकांशी मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी संवाद साधला.
या प्रसंगी गट शिक्षणाधिकारी श्री. समंदर खान, विस्ताराधिकारी श्री. माटे आदी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
#मूल्यशिक्षण #मूल्ये #शाळा #शिक्षक #विद्यार्थी
24/12/2025
मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात #चंद्रपूर जिल्ह्यातल्या इंदिरा ग्रामीण विद्यालय, #पांढरकवडा या शाळेच्या शिक्षक व मूख्याध्यापक यांच्याशी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या प्रतिनिधी सोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
#मूल्यशिक्षण #मूल्ये #शाळा #शिक्षक #विद्यार्थी #मूल्यवर्धन
23/12/2025
शाळेच्या भिंती बोलू लागल्या…
जिल्हा परिषद शाळा, लोणाडी (ता. नेर, जि. #यवतमाळ) येथील सर्व शिक्षक-मुख्याध्यापक यांनी शाळा व्यवस्थापन समितीला सोबत घेऊन वर्ग नियम आणि दैनंदिन दिनचर्या यांचे सुंदर पेंटिंग शाळेच्या भिंतीवर रेखाटण्यात आले आहे.
अशा उपक्रमांमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये एकंदरीत उत्साह दिसून येतो.
#मूल्यशिक्षण #मूल्ये #शाळा #शिक्षक #विद्यार्थी
22/12/2025
पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. संजय नाईकडे यांनी दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी #पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातल्या मांजरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थी-शिक्षकांशी संवाद साधला. शिवाय #मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन केले.
#मूल्यशिक्षण #मूल्ये #शाळा #शिक्षक #विद्यार्थी