15/08/2026
🇮🇳 रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा…
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा…
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा…
दिन हा स्वातंत्र्याचा चिरायू व्हावा! 🇮🇳
अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, पुणे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा! 🇮🇳✨
दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रशालेत देशभक्तीपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याने सामूहिक गायन झाले. राष्ट्रगीत, राज्यगीत व झेंडा गीताने कार्यक्रमाची शोभा वाढली.
राजा श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्रीमती सायली केरीपाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. बँड पथक व विद्यार्थिनींनी मानवंदना दिली. 🇮🇳
प्रमुख पाहुण्या श्रीमती सायली केरीपाळे यांनी “स्वतःवर विश्वास ठेवा, यश नक्की मिळेल” असा प्रेरणादायी संदेश दिला व क्रीडा क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शालेय समिती अध्यक्षा डॉ. प्रीती अभ्यंकर , मा. मुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, मा. उपमुख्याध्यापक सुरेश वरगंटीवार, मा. पर्यवेक्षिका स्वाती जज्जल तसेच शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थिनी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
🇮🇳 स्वातंत्र्याचा अभिमान… देशभक्तीचा संकल्प! 🇮🇳
#अहिल्यादेवीहायस्कूलफॉरगर्ल्सपुणे #डेक्कनएज्युकेशनसोसायटीपुणे
#वंदेमातरम्