29/07/2026
#गुरुपौर्णिमा
Wellness & life coach igniting your potential. Let's thrive together! #Wellnesscoach #lifeempower I believe that leadership is a drive that comes from within.
I am Dr. Dinesh Lalwani, although I am a medical practitioner, I have always believed that good health is only a byproduct of good mental health. I had always wanted to create awareness among people that, there is something beyond expensive medicines. Since my childhood, I had always stood up for the rights of my friends and people. As a result, I used to hold a leadership position in my school as
29/07/2026
#गुरुपौर्णिमा
25/07/2026
08/07/2026
आमिर खान : कलाकार, चतुर नवरा की नव्या सामाजिक प्रवाहाचा / रणनीतीचा चेहरा ?
आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाने अनेक विचारवंतांना पार बुचकळ्यात टाकलंय.
आता याला नेमकं काय म्हणावं ? प्रेमाचा विजय म्हणावा, चतुर नवरा म्हणावं की अत्यंत हुशारीने स्वतःची प्रतिमा सांभाळणारा धूर्त पुरुष म्हणावं ?
हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या विचारसरणीनुसार सोडवावा.
एका बाजूला देशभरात आंतरधर्मीय विवाह, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ या विषयावर आंदोलने होतात. हिंदू संघटना तरुणींना सावध राहण्याचे आवाहन करतात . ( ते योग्यहि आहे .) कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात. आणि दुसऱ्या बाजूला एक मोठा सुपरस्टार आपल्या वैयक्तिक आयुष्यात असे निर्णय घेत पुढे जातो की त्यावर टीका करणाऱ्यांची अवस्था ‘रडता येईना अन सांगता येईना’ अशी झाली आहे .
या सगळ्यात खरी कमाल आमिरच्या प्रतिमा व्यवस्थापनाची वाटते. तोडकं-मोडकं मराठी बोललं की मराठी माणूस खूश.
कपाळावर लाल टिळा लावला की हिंदू प्रेक्षक खूश.
पुरोगामी भूमिका घेतली की लिबरल मंडळी खूश. आणि वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांकडे पाहून आणखी एक वेगळा वर्ग खूश.😉😜
म्हणजे प्रत्येकासाठी वेगळा आमिर...!
पडद्यावरचा आमिर खान उत्तम कलाकार आहे, याबद्दल वादच नाही. पण पडद्याबाहेरही स्वतःची प्रतिमा कधी, कुठे आणि कशी सादर करायची, याची कला त्याला तितकीच उत्तम अवगत आहे, असं म्हणायला जागा आहे. म्हणूनच प्रश्न केवळ त्याच्या तिसऱ्या लग्नाचा राहत नाही. प्रश्न असा आहे की सेलिब्रिटींच्या वैयक्तिक निर्णयांचा समाजावर नेमका किती प्रभाव पडतो ?
सामान्य माणसाच्या आंतरधर्मीय विवाहाकडे संशयाने पाहणारा समाज सेलिब्रिटींच्या बाबतीत मात्र त्याला ‘प्रेम’, ‘वैयक्तिक स्वातंत्र्य’ आणि ‘प्रोग्रेसिव्ह विचार’ म्हणतो. हा विरोधाभास नाही का ?
आणि शेवटी एक अस्वस्थ करणारा प्रश्न उरतोच. हे सगळं केवळ वैयक्तिक आयुष्य आहे की नव्या पिढीसमोर अत्यंत आकर्षक पॅकेजिंगमध्ये मांडला जाणारा एखादा व्यापक सामाजिक-सांस्कृतिक प्रवाह का छुपी रणनीती ?
उत्तर प्रत्येकाने स्वतः शोधायचं आहे.
कारण पडद्यावरचा अभिनय ओळखणं सोपं असतं, पण वास्तविक जीवनातील भूमिका ओळखण्यासाठी सद्सदविवेकबुद्धी जागरूक अन डोळे उघडे ठेवावे लागतात.
डॉ दिनेश ललवाणी
राजकीय मार्गदर्शक आणि रणनीतीकार
21/06/2026
बोला एक मुखानं 🙋♂️
या शरीराचं करायचं काय ??
खाली मुंडकं वर पाय 🤸♀️😉
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
21/06/2026
Music is like therapy it plays a very important role in our lives. I hope you’re enjoying your day with some good music.
Wishing all the musicians, singers, songwriters, and everyone who loves music a very Happy World Music Day!
I’m truly thankful to all the musicians and singers for adding joy and meaning to every moment of my life.
Dr Dinesh Lalwani
Coach Author Poet Freethinker ThoughtLeader
05/06/2026
कॉक्रोच: ज्याला घरातून हाकलण्यासाठी फवारणी करावी लागते, तोच आज सोशल मीडियावर लाखो लोकांना आकर्षित करतोय!
13/05/2026
01/05/2026
मी जपलंय माझं मराठीपण माझ्या संस्कृतीतून
मी जपलंय माझं मराठीपण माझ्या रक्तातून
मी जपलंय माझं मराठीपण छत्रपतींच्या विचारांतून
मी जपलंय माझं मराठीपण ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी सांप्रदायातून
मी जपलंय माझं मराठीपण पेहराव भाषा अन सणावारातून
मी जपलंय माझं मराठीपण माझ्या शिक्षणातून वाचनातून लेखणीतून
मी जपलंय माझं मराठीपण माझ्या वागण्या-बोलण्यातून
होय मी जपलंय माझं मराठीपण माझ्या हट्टी स्वभावांतून
होय मी जपलंय माझं मराठीपण माझ्या मराठी गर्वातून
म्हणून सांगतोय...
दगड झालो तर सह्याद्रीचा होईल
माती झालो तर महाराष्ट्राची होईल
तलवार झालो तर शिवबाची होईल
अन मानव जन्म पुन्हा मिळाला तर आई शपथ !
मराठीच होईल .
अन होय म्हणून माझं आव्हान आहे त्या प्रत्येक प्रांतवादी षंड विचारसरणीने बरबटलेल्या लोकांना, धमक असेल तर माझ्यासारखं जगा मराठी अन वागा मराठी ..
डॉ दिनेश ललवाणी
लीड इंडिया