19/06/2026
महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०२३ साठीचा वसंतराव नाईक कृषिमित्र पुरस्कार लातूर विभागासाठी ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राला जाहीर झाला आहे.
The institute has been located in Nigdi Pradhikaran area on a land measuring 4-5 acres. Similarly two science laboratories have been developed.
The camps has a separate building for high school, technical education unit, Balbhavan, Gymnasium, Commercial Training centre, Matrumandir trust. A playground measuring 2.5 acres is made available for physical development of the students. Similarly essential sport material is made available; as a result the students are acquiring proficiency in various games. Separate section for study of geograph
19/06/2026
महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०२३ साठीचा वसंतराव नाईक कृषिमित्र पुरस्कार लातूर विभागासाठी ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राला जाहीर झाला आहे.
08/06/2026
Jnana Prabodhini Educational Resource Centre Certificate Programme in Data Science & AI (Online Course)
Are you ready to enhance your skills and stay ahead in the digital era?
This course is specially designed for students who want to gain practical knowledge, real-world experience, and industry-relevant skills.
🎓 If you are a student from Grade 6 to 9, this is your opportunity to confidently step into the world of Data Science and AI. Learn through hands-on practice and develop analytical thinking skills.
The course will commence from 4th July 2026, on every Saturday, Timing: 1:00 p..m. to 3:00 p.m.
Fee :₹ 15000/-
👉 Register now https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfnzAA79Atv26qwmZY2RrOoplVkAcHU6i87Qs1w4d7x2KaXkw/viewform?usp=dialog
📞 Contact: +91 89560 11545 / +91 99233 12597
(Office hours: 11:00 AM to 5:00 PM)
04/06/2026
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात एनसीसी शिबिराचे आयोजन🇮🇳
दि. २५ मे ते ३ जून या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ३७५ छात्रांचा एनसीसी कॅम्प ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
शिबिर समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कर्नल आर. के. चौहान सर यांच्या शुभहस्ते विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळकृष्ण धुमाळ सर यांनी ही प्रतिमा सन्मानपूर्वक स्वीकारली.
या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, देशप्रेम आणि संघभावना यांचा विकास होण्यास मोठी मदत झाली.
#ज्ञानप्रबोधिनी #देशप्रेम
23/05/2026
🚩 विष्णु सहस्रनाम पठण 🚩
अधिक महिन्याच्या पवित्र निमित्ताने मातृमंदिर (ज्ञान प्रबोधिनी, निगडी) येथे विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे सामूहिक पठण भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
यावेळी मा. जयश्रीताई पद्मनाभन यांनी त्यांच्या अनुभवातून विष्णु सहस्रनाम पठणाचे महत्त्व तसेच त्या संदर्भाने सुरू केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांसमोर प्रेरणादायी पद्धतीने मांडली.
कार्यक्रमाला युवा व प्रौढ गटातील साधारण ६५ ते ७० जणांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. गटपठणास अनुकूल गती, स्पष्ट व शुद्ध उच्चार आणि सहभागींचा उत्साह यांमुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न व भक्तिमय झाले.
✨ श्रद्धा, साधना आणि सामूहिकतेचा सुंदर अनुभव देणारा हा कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला. ✨
#ज्ञानप्रबोधिनी #विष्णुसहस्रनाम #अधिकमहिना #मातृमंदिर #सामूहिकपठण #भक्तिमय_क्षण
22/05/2026
🚩ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्रात, अधिक महिन्या निमित्त विष्णुसहस्त्रनाम पठण
#ज्ञानप्रबोधिनी
18/05/2026
गावाकडच्या मैदानातून राष्ट्रीय स्वप्नांकडे! 🇮🇳
ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील स्वप्नांची दिशा देणारा एक प्रेरणादायी प्रवास सुरू झाला आहे! 💫
ज्ञानप्रबोधिनी निगडी क्रीडाकुल येथे ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्पांतर्गत उन्हाळी क्रीडा शिबिराचा उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. टाटा ट्रस्ट्स आणि ज्ञानप्रबोधिनी निगडी क्रीडाकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे शिबिर १ मे ते १० मे २०२६ या कालावधीत पार पडले.
महाराष्ट्रातील चिपळूण, मावळ, हराळी आणि बारामती येथील सुमारे २० गावांमधील ७५ निवडक खेळाडू या शिबिरात सहभागी झाले होते. कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो आणि ऍथलेटिक्स या खेळांमध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून वैज्ञानिक पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे. 🏅
या शिबिरातून खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत नियोजनबद्ध प्रशिक्षण, आरोग्य मार्गदर्शन, जीवनकौशल्य उपक्रम आणि मानसिक तयारी यांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना एक नवी दिशा मिळत आहे.
✨ आजचे हे छोटे पाऊल… उद्याच्या राष्ट्रीय यशाची भक्कम पायाभरणी!हेच खेळाडू उद्या राज्य आणि देशाचे प्रतिनिधित्व करतील, या विश्वासाने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
#ज्ञानप्रबोधिनी #क्रीडाकुल #खेळाडूविकसन #राष्ट्रीयस्वप्न
15/05/2026
We Are Hiring! 🚀
We are looking for talented and passionate individuals to join our growing team! If you are hardworking, eager to learn, and ready for a new challenge, we want to hear from you.
Come be a part of a great work environment where you can grow and make an impact.
more details - https://jpnvnigdi.org/career/
#ज्ञानप्रबोधिनी
14/05/2026
सुवर्णसंधी – समाजाभिमुख नवकल्पनांच्या क्षेत्रात करिअर!
ज्ञान प्रबोधिनी इनोव्हेशन फाउंडेशनच्या
Atal Community Incubation Centre (ACIC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
🔹 CEO
🔹 Incubation Manager
🔹 Young Professional
🔹 Lab Assistant
ग्रामीण उद्योजकता, स्टार्टअप्स, नवकल्पना आणि सामाजिक परिवर्तन यामध्ये काम करण्याची आवड असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी.
📍 ठिकाण : पुणे (ग्रामीण भागात प्रवास आवश्यक)
📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ मे २०२६
📧 For CV : [email protected]
नवकल्पनांच्या माध्यमातून समाजघडणीच्या प्रवासात सहभागी व्हा! 🚀
#ज्ञानप्रबोधिनी
09/05/2026
💐अभिनंदन...💐
ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र
१० वी शालांत परीक्षा निकाल २०२५ - २६
#ज्ञानप्रबोधिनी
01/05/2026
आज सौर वैशाख ११, शके १९४८ अर्थात १ मे महाराष्ट्र दिन आणि तारखेनुसार कै. भाऊंची जयंती आजच्या दिवशी निगडी केंद्राचे औपचारिक शिक्षण प्रमुख शिवराज पिंपुडे लिखित अन् पारिजातक हसला या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाली. निगडी केंद्राची माजी विद्यार्थिनी प्रणिताताई वालावलकर हिने हे भाषांतर केले आहे. भाषांतरासाठी मृणालताई मायदेव, विद्यालयाच्या माजी प्राचार्या सुमनताई शेनॉय यांचीही मोलाची मदत झाली आहे. प्रबोधिनीच्या विस्ताराच्या कामासाठी प्रबोधिनीचे काही साहित्य भाषांतरित करण्याचे काम सुरू आहे त्यातीलच हे पुस्तक!!!