"Soul Of Act" या संस्थेतर्फे कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी नाट्यशास्त्र,मराठी रंगभूमी तसेच पाश्चात्य आणि पौर्वात्य रंगभूमी या विषयांवर आधारित नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. संस्थेने गेल्या काही वर्षात अनेक विद्यार्थ्यांना अभिनयाचे प्रात्यक्षिकांसह तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले.भावनांचे आविष्करण करतांना शरीराच्या अवयवांचे परिणामकारक समन्वयन कसे साधावे याचेही प्रात्यक्षिक धडे दिले
गेले. नाट्यनिर्मितीचे अंदाजपत्रक कसे आखावे,कथा लेखक,दिग्दर्शक, अभिनेता,अभिनेत्री,नेपथ्यकार, वेशभूषाकार,रंगभूषाकार व इतर सर्व जबाबदारी तसेच विपणन विषयक तपशील त्यांना देण्यात आला. भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथावर आजपर्यंत खूप लिखाण केले गेले आहे. अभ्यास केला आहे. पण नाट्य प्रयोग करण्याच्या दृष्टीने व अभिनय करण्याच्या दृष्टीने याचा कमी प्रमाणात विचार व वापर केला गेला. म्हणून संस्थेच्या अभ्यासक्रमामध्ये काही महत्वाचे विषय शिकविण्यात येतात. अनेक संस्थांमधून ज्या गोष्टी शिकविण्यात येतात त्याच गोष्टी आमच्या इथेही शिकविण्यात येतात पण हे सर्व विषय शिकविताना गरीबातल्या गरीब मुला-मुलींनाही या कलाक्षेत्रात प्रवेश करण सोप जाव, यासाठी त्यांच्या खिशाला परवडेल एवढ्या किमान शुल्कात हे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण आणि निम् शहरी भागातील प्रशिक्षित नवोदित कलाकारांना प्रथम स्थानिक पातळीवर स्वतःच्या कलेचे सादरीकरण करणे सहज शक्य व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.