School Pune

School Pune पर अरे दुग्ध

22/09/2024

संस्कार स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व नेतृत्वगुणांचा विकास होण्यासाठी SLC चे आयोजन
दिनांक 20 सप्टेंबर शुक्रवार रोजी लीड स्कूल SLC आयोजन करण्यात आले. एस एल सी म्हणजे 'स्टुडन्ट लेड कॉन्फरन्स 'यात विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचे प्रकल्प बनवून ते पालकांपुढे सादर केले.
यात नर्सरी सेक्शन ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्वच विद्यार्थ्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने आपापल्या प्रोजेक्टचे सादरीकरण केले .
भाषेचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचन, शब्द तयार करणे, स्वर ,व्यंजन, वाक्य तयार करणे, चित्रावरून गोष्ट तयार करणे ,वाचन तसेच गणिताचे पाढे तयार करण्याच्या विविध पद्धती, बेरीज, वजाबाकी, लसावी, मसावी, विविध शेप्स ,कम्पॅरिझन, विज्ञानाचे सोलर एक्लिप, घरांचे प्रकार, कलर ,फळे, पक्षी, गुड टच बॅड टच, गुड मॅनर्स ,सेन्स ऑर्गन्स , बॉडी पार्ट्स ,इत्यादी
सर्व शिक्षकांच्या साह्याने या एसएलसी आयोजन मुख्याध्यापक स्नेहा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या ssc चा मुख्य उद्देश मुलांचा सर्वांगीण विकास व आपले मुले शाळेमध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेतात हे पालकांना दाखवणे हा होता मोठ्या संख्येने आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी पालक उपस्थित होते. पालकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कारण एवढे लहान विद्यार्थी इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी बनवलेल्या प्रकल्पांचे स्पष्टीकरण व सादरीकरण करत होते .

15/09/2024

संस्कार स्कूलच्या बापांचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात संपन्न
संस्कार स्कूल पिरंगुट येथे मुख्य आकर्षण गणपती बाप्पांचा देखावा 'मुळशी ची शान ' बैलगाडी तसेच कृषी संपन्न मुळशी असा करण्यात आला होता. बैलगाडीत विराजमान बाप्पांचं ढोल ताशाच्या गजरात शाळेत पदार्पण झाले .आणि सगळे वातावरण जणू काही सकारात्मक ऊर्जेने भरून गेले .
दररोज मुलांचे अथर्वशीर्ष पठण, गणपती स्तोत्र, आरती रांगोळी ,इको गणपती बनवणे स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, संस्कृत श्लोक सत्यनारायण पूजा अशा विविध उपक्रमात बाप्पांचे स्वागत आणि शेवटी अगदी जड अंतकरणाने बापांकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेऊन त्यांची उत्साहात विसर्जन मिरवणूक,
हे सात दिवस अगदी पटकन कसे निघून गेले कळलेच नाही.
शिक्षकांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी प्रबोधन पर पोस्टर्स पेंटिंग करून गणपती बाप्पांकडे सर्व समाजाला सुबुद्धी देऊन सर्वांना सुख-समृद्धी आरोग्याची मनोकामना बाप्पांकडे केली सर्व शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अगदी आनंदी उत्साही वातावरणात हा गणपती उत्सव मुख्याध्यापक स्नेहा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

संस्कार स्कूलच्या बापांचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात संपन्न संस्कार स्कूल पिरंगुट येथे मुख्य आकर्षण गण...
15/09/2024

संस्कार स्कूलच्या बापांचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात संपन्न
संस्कार स्कूल पिरंगुट येथे मुख्य आकर्षण गणपती बाप्पांचा देखावा 'मुळशी ची शान ' बैलगाडी तसेच कृषी संपन्न मुळशी असा करण्यात आला होता. बैलगाडीत विराजमान बाप्पांचं ढोल ताशाच्या गजरात शाळेत पदार्पण झाले .आणि सगळे वातावरण जणू काही सकारात्मक ऊर्जेने भरून गेले .
दररोज मुलांचे अथर्वशीर्ष पठण, गणपती स्तोत्र, आरती रांगोळी ,इको गणपती बनवणे स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, संस्कृत श्लोक सत्यनारायण पूजा अशा विविध उपक्रमात बाप्पांचे स्वागत आणि शेवटी अगदी जड अंतकरणाने बापांकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेऊन त्यांची उत्साहात विसर्जन मिरवणूक,
हे सात दिवस अगदी पटकन कसे निघून गेले कळलेच नाही.
शिक्षकांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी प्रबोधन पर पोस्टर्स पेंटिंग करून गणपती बाप्पांकडे सर्व समाजाला सुबुद्धी देऊन सर्वांना सुख-समृद्धी आरोग्याची मनोकामना बाप्पांकडे केली सर्व शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अगदी आनंदी उत्साही वातावरणात हा गणपती उत्सव मुख्याध्यापक स्नेहा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

19/08/2024
Independence Day celebration at Sanskar English Medium School, Pirangut.
18/08/2023

Independence Day celebration at Sanskar English Medium School, Pirangut.

Sahaja Yoga Meditation today in Sanskar English Medium School Today on Saturday 9.30am to 10:30am Dr. Anil Pise sir and ...
05/08/2023

Sahaja Yoga Meditation today in Sanskar English Medium School
Today on Saturday 9.30am to 10:30am Dr. Anil Pise sir and his team gave information about Sahaja Yoga Meditation and meditation was done by teachers and students. Everyone had a great experience today. In the age of stress, concentration and beautification of our life is the most important task and Sir explained it very well.If you want to tell the information of sir ,Dr.Anil Pise sir is a research scholarship and Senior Data scientist with demonstrated track record of utilizing Al and machine Learning in a range of domains and leading small to mid size Data science teams for several years.He is a Google cloud platform expert,as well as an expert in SQL,Oracle Database,python shala,R, Azure,AWS,and La Tex.He has published research paper and book chapter in a variety of Journals and gave presentations on deep learning.
The entire program was organized under the guidance of Principal Sneha Sathe All the teachers and students performed in a beautiful manner throughout the program Dr. Anil Pise and All his entire team Thank you very much from Sanskar English Medium School.

आज सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांचा 'ग्रॅज्युएशन डे'  मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाला सर्व पिरंगुट मधील  ब्युटी...
01/04/2023

आज सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांचा 'ग्रॅज्युएशन डे' मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाला सर्व पिरंगुट मधील ब्युटी पार्लर क्वीनस गेस्ट म्हणून बोलवण्यात आल्या होत्या . डॉक्टर मीनाक्षी जाधव , सौ. सुजाता कुंभार, सौ. वैशाली सनस , सौ.शारदा चांदेरे , सौ.सारिका अमोघे सौ.स्वप्नाली पवळे, सौ. कोमल नांदे, सौ शितल गवाले, सौ. रेखा निकटे, सौ शामल शेलार, सौ. स्वाती कलकोटे, सौ. मनीषा गोळे, सौ. वर्षा भोसले , सौ.वनिता राऊत व सौ.सुप्रिया वरुते या उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन डे बद्दल भाषण दिले त्याचबरोबर नृत्य , ड्रामा सादर करून सर्व गेस्ट व पालकांचे लक्ष वेधून घेतले आणि"'अच्छा चलता हु" या गीतावरती सर्व बालचमू नी नृत्य सादर केले हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. विद्यार्थी हे नृत्य सादर करत असताना शिक्षक व मुख्याध्यापिका मॅडम ह्या भावूक झाल्या होत्या . विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन डे चे सर्टिफिकेट व मेडल देऊन गौरवण्यात आले. बऱ्याच पालकांनी शाळेबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले . पालक म्हणाले की संस्कार शाळा ही फक्त मुलं घडवत नाही किंवा आपली विद्यार्थी घडवत नाहीत तर पिढी घडवून संस्कार स्कूल आपल्या देशासाठी एक मोठे योगदान देत आहे. वैशाली सनस ह्या स्वतः एक स्कूल चालवतात व त्या भूगाव च्या माजी सरपंच होत्या . तरी त्यांचा छंद जोपासून त्या अतिशय उत्तम अशा ब्युटीशियन आहेत. त्यांनी पालकांना घरगुती ब्युटी टिप्स दिल्या. डॉक्टर मीनाक्षी जाधव यांनी अतिशय सुंदर अशा महिला पालकांना ब्युटी टिप्स दिल्यात . आपल्या संस्कार शाळेचा चौदा वर्षाचा प्रवास हा कसा झाला हे अतिशय सुंदर शब्दांमध्ये सौ. सुमीना राणा मॅडम यांनी सांगितले . या कार्यक्रमातून परत एकदा दिसून आले की संस्कार शाळेचे आणि पालकांचे नाते किती घट्ट आहे व किती आपुलकीची आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे सौ.लता मुगवणे मॅडम यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा साठे मॅडम यांनी सुद्धा अतिशय सुंदर असे भाषण दिले त्यांनी भाषणात सांगितले तुमची मुलं आता लहान आहेत तुम्ही मुलांना जसे घडवाल तसे तुमचे मुल घडतील. तुमच्या मुलांना चांगले संस्कार हे त्यांच्या भविष्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे पालकांना पटवून दिले व त्या म्हणाल्या तुम्हा पालकांना कोणत्याही गोष्टीची अडचण असेल तर मी तुमच्यासाठी केव्हाही उपलब्ध असेल त्यांच्या या शब्दाला ऐकून सर्व पालक भारावून गेले . व नेहमीप्रमाणे त्यांनी सर्वांचे मन जिंकली. कार्यक्रमाची सांगता सौ. शोभा गोळे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून केली.

*संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन व विज्ञान प्रदर्शन संपन्न**पुणे वैभव पिरंगुट प्रतिनिधी - स्नेहा सा...
01/03/2023

*संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन व विज्ञान प्रदर्शन संपन्न*

*पुणे वैभव पिरंगुट प्रतिनिधी - स्नेहा साठे*

संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिवस आणि विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोज कुमार यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रमेश गायकवाड हे होते. मुलांनी विविध प्रकारचे २८० प्रकल्पांचे सादरीकरण केले. यात टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवले. पोषण आहार, जलचक्र, सोलर सिस्टिम, मॅग्नेटिक फिल्ड, स्मार्ट सिटी, वाहतुकीची साधने, गणितीय संबोध आणि प्रमेय, हायड्रोलिक लिफ्ट, थर्मल पॉवर, प्लांट, व्हॅक्युम क्लिनर, स्मोक डिटेक्टर, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ग्लोबल वॉर्मिंग, रूम हीटर, विंडमिल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आन्सर डिटेक्टर, थ्रीडी होलोग्रम, थ्रीडी मोबाईल प्रिंटर, फ्लोअर मिल, थ्रीडी मॉडेल ऑफ ॲटम, एलिमेंट्स अँड कंपाउंड, रक्ताभिसरण संस्था, डायव्हर्सिटी, फूड चेन, ड्रिप इरिगेशन, स्वच्छ भारत अभियान, फेजेस ऑफ मून, फोटोसिंथेसिस, भूकंप मापक यंत्र, एक्लिप्स ,फ्लोट हाऊस फोर फ्लड डिटेक्टर, इफेक्ट्स ऑफ जंक फूड, सेफ्टी ऑन रोड, लाइफ सायकल अशा विविध प्रकल्पांचे विद्यार्थ्यांनी आलेले पाहुणे व पालक यांच्यापुढे स्पष्टीकरण केले. यावेळी एपीआय गायकवाड सर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या व अशाच नवनवीन संकल्पना मुलांनी प्रत्यक्षात उतरवल्या पाहिजेत असे वक्तव्य केले. सर्वांच्या प्रकल्पांचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा साठे यांनी मराठी राजभाषा दिवस व विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा देत ज्या उद्देशाने आपण या कार्यक्रमांचे आयोजन करत असतो तो उद्देश मुलांनी नक्कीच पूर्ण केला पाहिजे. तुम्ही सर्व विद्यार्थीच उद्याचे लेखक, कवी, वैज्ञानिक होणार आहात. त्यामुळे चांगले शिक्षण घेऊन शिक्षकांनी व आई-वडिलांनी जे संस्कार दिले आहेत त्या संस्कारांचा नक्कीच अंमल करावा. कार्यक्रमाचे आणखीन एक प्रमुख आकर्षण म्हणजे रोल नंबर नुसार इयत्ता सातवी डिसेंबर, इयत्ता आठवी जानेवारी, व इयत्ता नववी फेब्रुवारी महिन्यातील संशोधक जन्म व मृत्यू नुसार यांची माहिती यांचे बॅजेस बनवण्यात आले. मुलांनी ते आपल्या युनिफॉर्मवर लावले. इयत्ता सातवी, आठवी व नवीच्या विद्यार्थिनींनी विविध विज्ञान विषयक रांगोळ्यांचे सादरीकरण केले. विज्ञान दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रयोग शाळेचे उद्घाटन करण्यात आले. सर्व विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांनी कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला मुख्याध्यापक स्नेहा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. देविका कांबळे आणि सौ. सुरेखा शेळके मॅडम यांनी केले.

Address

Pune
412115

Opening Hours

Monday 9am - 4pm
Tuesday 9am - 4pm
Wednesday 9am - 4pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 4pm
Saturday 9am - 4pm

Telephone

9764552915

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when School Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category