24/04/2026
कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सकाळ NIE उपक्रमांतर्गत तंत्र कौशल्य व व्यक्तिमत्व विकास या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती.
विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा भविष्यातील वाटचालीस मोठा फायदा होऊ शकतो असे प्रतिपादन जय हिंद कॉम्प्रेसिव्ह इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक डॉक्टर किरण पैठणकर यांनी केले
13/03/2026
कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या आयटीआय मध्ये नामांकित कंपनीच्या मुलाखती शिकाऊ उमेदवारी करिता आयोजित करण्यात आल्या होत्या, मुलाखतीकरिता पुण्यातल्या विविध आयटीआय प्रशिक्षणार्थी मुलाखतीकरिता उपस्थित होते.
01/01/2026
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं,
नव्या आशा, नवी उमेद व नावीन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू.
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांक्षा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
05/09/2025
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨📚
कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त
💐शिक्षक दिन साजरा केला💐
"ज्ञानाचा दिवा लावून मार्गदर्शन करणारे,
संस्काराची शिदोरी देणारे,
आयुष्याचा पाया मजबूत करणारे
आपले शिक्षकच खरे प्रेरणादायी मार्गदर्शक आहेत."
🙏🌸 सर्व शिक्षकांना मनःपूर्वक नमन! 🌸🙏
04/08/2025
ड्राफ्ट्समन मेकॅनिकल व वेल्डर या ट्रेड करता जागा शिल्लक आहे.
जे प्रवेशा करिता इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा.
ज्यांनी ऑनलाइन फॉर्म भरला नसेल ते सुद्धा दहा ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरून प्रवेश घेऊ शकतील.
26/07/2025
29 जुलै कारगिल विजय दिवस निमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विजय दिवसाबद्दल माहिती श्री हनुमंत सावंत (वीजतंत्री निदेशक) यांनी सांगितली.