*" ब्रह्मानंद "* म्हणजे शेवटी काय ?
(*१२ आनंदांची गोळाबेरीज*.)
०१▪आई होण्यापेक्षाही... आजी होण्याचा
*आनंद !*😊
०२▪नातवंडाच्या कृपेने अंगावरील कपडे ओले झाल्याचा
*वत्सल आनंद*! 😊
०३▪नातवंडानी केलेले हट्ट पुरविण्याचा
*गोड आनंद !*😊
०४▪सूनेने, न मागता आणून दिलेल्या चहाचा व औषध घेतले का..?
या प्रेमळ चौकशीचा
*सात्त्विक आनंद !*😊
०५▪वाढदिवसाला, मुलाने दिलेल्या शालीचा....
*ऊबदार आनंद* 😊
०६▪आपण कुटुंबाला हवे आहोत......
या भावनेचा
*सुप्त आनंद* 😊
०७▪दुपारी जेवणानंतर पेपर वाचता वाचता लागलेली डुलकी ...
*परमानंद !*😊
०८▪रात्रीची निरव शांतता..
आराम खुर्चीवर डोळे मिटून
पहुडलेल्या क्षणी..
आपली आवडती गझल..
रेडिओने गुणगुणावी...
*स्वर्गीय आनंद !*😊
०९▪एखादा लेख किंवा कविता
आपण पोस्ट करावी..
मित्रांनी त्याला भरभरुन
दाद द्यावी...
*साहित्यानंद !*😊
१०▪मन अशांत असतांना....
देवघरातल्या भजनामुळे निर्माण होणारा..
*कैवल्यानंद !*😊
११▪भेटलेल्या जुन्या सवंगड्यांच्या भेटीमुळे होणारा...
*अपार आनंद* 😊
१२▪नकारात्मक विचार सोडून दिले की मिळणारा....
*निर्भेळ "आनंद" !*😊
आणि या सर्व *आनंदाची बेरीज* करुन, ती मनाच्या कप्प्यात साठविली की, पडल्यापडल्या लागलेली *शांत झोप* म्हणजेच...
"*ब्रह्मानंद*" !!! 😊
🌺🌸🌺
या पोस्टला मिळालेली दाद म्हणजेच
*आनंदीआनंद* 😊😊😊
Swami Handwriting Classes स्वामी हस्ताक्षर वर्ग
हस्ताक्षर वर्ग आणि सुलेखन (calligraphy ) वर्ग.
29/07/2025
@
Satyam Prakash Luniya
माझा अत्यंत जवळचा #अक्षरमित्र चि. सत्यम, अहिल्या नगर, महाराष्ट्र ह्याने व्यक्त केलेल्या भावना.
Happy Birthday, Shriram Vaidya Sir!*
On this special day, I want to express my deepest gratitude for the incredible impact you've had on my life. Your guidance and mentorship in my calligraphy journey have been invaluable. You've taught me so much, praised my efforts, and been my unwavering moral support. Thanks a lot for being my best friend.
Your enthusiasm and dedication, even at the age of 80 +, are truly inspiring. You work with the energy and passion of a young man, and it motivates me every day. Thank you for being not just a mentor, but a beacon of inspiration and a pillar of strength in my life.
Wishing you a birthday filled with joy, health, and all the happiness you deserve. May you continue to inspire and touch the lives of many more.
With heartfelt appreciation and warmest wishes. ❤️❤️❤️❤️❤️
13/06/2024
नायकिणींच्या वाड्यात मिळाली अदिलशाही, मुघलकालीन कागदपत्रे
कागदपत्रांच्या शोधात भटकत असताना मिरजेतील नायकिणींच्या वाडयात कागदपत्रे असल्याची माहिती मिळाली. या नायकिणीं(नृत्यांगणा)ची वस्ती शनिवार पेठेत मोठ्या प्रमाणात होती. या नायकिणी श्रीमंत होत्या. त्यांचे मोठे वाडे शनिवार पेठ परिसरात होते. त्यापैकी काही वाडे पाडून तेथे आता अपार्टमेंटस् झाल्या आहेत. यापैकी काही वाड्यात मला अदिलशाही, मुघलकालीन आणि मराठाकालीन अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाली.
मिरजेच्या या नायकिणी म्हणजेच नृत्यांगणांचे वास्तव्य आदिलशाही काळापासून येथे होते. शहरातील मिरासाहेब दर्ग्यात प्रत्येक गुरुवारी आणि उरुसामध्ये नाचण्या-गाण्यासाठी बादशाहाने त्यांना इनाम जमिनी बहाल केल्या होत्या. आपण ज्या अर्थाने आज त्यांच्याकडे पाहतो, तशा त्या नव्हत्या. दर्ग्याबरोबरच अंबाबाई मंदिरात त्यांची नाचगाणी होत. सरकार दरबारीही त्यांना नाचण्याची सेवा करावी लागे. राजाच्या दरबारात कुणी पाहुणा, नंतरच्या काळात गव्हर्नर, ब्रिटीश अधिकारी आला तर त्यांच्या मनोरंजनासाठी या नायकिणींना पाचारण केलं जाई. राजघराण्यात कुणाचं लग्न असो किंवा अन्य उत्सवप्रसंगी त्यांना मिरवणूकीपुढे नाचावं लागे.
महताब नायकिण, जमनावाली नायकिण, विजापूरवाली नायकिण, कागवाडवाली नायकिण अशा अनेक नायकिणी मिरजेत होत्या. अदिलशाही आणि मुघल काळात त्यांना इनामे मिळाली होती.
या नायकिणी दानशूर होत्या. राष्ट्रप्रेमी होत्या. लोकमान्य टिळकांवर राज्यद्रोहाचा पहिला खटला जेव्हा झाला, त्यावेळी त्या खटल्यासाठी महाराष्ट्रातून मदत उभारण्यात आली. यामध्ये मिरजेच्या नायकिणींनी मोठी मदत केली होती. या नायकिणींनी मिरजेत धर्मशाळा आणि मंदिरे उभारली.
नायकिणींचे रीतीरिवाज वेगळे होते. मुलगी वयात आली की कटयारीबरोबर तिचं लग्न लावत. आणि त्यानंतर ती नाचगाण्यासाठी पात्र होई. हा लग्नविधी ३-४ दिवस चाले. या नायकिणी साक्षर होत्या. सन १८५८ मधील त्यांच्या हस्ताक्षरांची पत्रे मला मिळाली आहेत.
शनिवार पेठेतील नायकिणींच्या वाड्यात लोखंडी ट्रंकामध्ये अनेक वर्षे पडून असलेली कागदपत्रे मला मिळाली, यामध्ये अदिलशाही आणि मुघलकालीन द्वैभाषिक इनामे, नायकिणींच्या कैफियती, २५० वर्षांपूर्वी पासूनच्या त्यांच्या वंशावळी, त्यांचे विशिष्ट प्रकारचे लग्नविधी, त्यांच्याकडे असणाऱ्या दागिन्यांच्या याद्या, दर्ग्यातील नाचगाण्याची हजेरी, त्यांच्या चालीरिती सांगणारी अनेक कागदपत्रे मला मिळाली.
इतिहासाने आजवर दुर्लक्षिलेल्या आणि समाजाने वेगळ्या नजरेने पाहिलेल्या 'नायकिणी' या उपेक्षीत घटकाची माहिती या कागदपत्रांतून मला झाली.
या नायकिणींच्या सामाजिक जाणिवा अत्यंत प्रगल्भ होत्या. एकदा कुणीतरी आपल्या ६-७ वर्षांच्या मुलीचे लग्न कटयारीबरोबर लावून तिला नाचगाण्यासाठी लावणार होते. त्यावेळी मिरजेतील नायकिणी एकत्रित आल्या, त्यांनी तत्कालीन संस्थानचे अधिकाऱ्यापासून ब्रिटीश पोलीटीकल एजंटपर्यंत पत्रव्यवहार करून, 'या मुलीचं खेळण्या बागडण्याचं वय आहे, तिला जारकर्माला लावण्यापासून वाचवा', अशी आर्जवं केलेली पत्रं मला याच कागदांच्या गठ्ठयांत मिळाली.
लोकमान्यांना मदत करणाऱ्या, लहान मुलींचे बालपण हिरावू नये, म्हणून संवेदनशील असणाऱ्या, मंदिरे -धर्मशाळा बांधणाऱ्या या नायकिणींची कहाणी बोलकी करणारी कागदपत्रे माझा संग्रह खऱ्या अर्थाने समृध्द करत आहेत.
©मानसिंगराव कुमठेकर
9405066065
13/06/2024
प्रवीण फडणीस सरांची सराव पुस्तिका क्र.१ आज पूर्ण झाली.
आपणास सुद्धा अशा सराव पुस्तिका तयार करून हव्या असतील तर 9767733670 वर whatsapp message पाठवा.
श्रीराम वैद्य
हस्ताक्षर मार्गदर्शक
पुणे
097677 33670
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
FLAT NO. 104, AGASTI SOCIETY, WALVEKAR NAGAR, OFF SATARA Road
Pune
411009