Shivshri Shrimant kokate Sir (शिवश्री श्रीमंत कोकाटे)

  • Home
  • India
  • Pune
  • Shivshri Shrimant kokate Sir (शिवश्री श्रीमंत कोकाटे)

Shivshri Shrimant kokate Sir (शिवश्री श्रीमंत कोकाटे) डाॅ.श्रीमंत कोकाटे पुणे विभाग पदवीधर ?

*गुढीपाडवा - समज / गैरसमज,* या विषयावर मि लिहणार नव्हतो,पण दररोज चालू असलेल्या वादानंतर लिहावेसे वाटले….गुढी पाडवा या सण...
27/03/2024

*गुढीपाडवा - समज / गैरसमज,*

या विषयावर मि लिहणार नव्हतो,पण दररोज चालू असलेल्या वादानंतर लिहावेसे वाटले….

गुढी पाडवा या सणाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युशी संबंध असा येतो की

संभाजी महाराजाचां मूर्त्यूच्या दूसर्या दिवशी महाराष्ट्रात गुढ्या उभारल्या,माझे तर अगदी स्पष्ट मत आहे,आज जि गुढी उभारली जाते ति

संभाजी महाराजाच्यां मूर्त्यूनंतरच उभारण्यात आली आहे,

‘गुढी’ या शब्दाचा मराठी वांड्मयातील शब्दश अर्थ

“विजयाची भगवी पताका “
पंढरपुरच्या विठोबाचे निशाणही भगवी पताकाच आहे त्यामुळे हा वरील अर्थ तंतोतंत जुळतो.त्यामुळे बरयाच संतानी गुढी शब्द भगवी पताका या अर्थाने वापरला आहे.

साडी,उलटा तांब्या याचा उलगडा स्वत:स पंडित समजणारयानी समाजापुढे करावा.

‘गुढी’ हा शब्द इसवी सनाच्या १३व्या,१४व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते.

संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे,

टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।

संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे
प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)

●अभंगाचा अर्थ:-

गुढी उभारून पंढरीस जावे,मराठी महीन्यात गुढी चैञात उभारली जाते,
आणी पंढरीची वारी आषाढ महीन्यात असते,
यात तब्बल 2 महीन्याचा फरक आहे,
घरोघर गुढ्या उभारून लोक पंढरीस जात असतील तर गुढी ही आषाढात उभारली जात असावी….

●कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळामधी आनंद आनंद झाला आणि त्याभरात लोकांनी गुढ्या उभारल्या.

गोकुळीच्या सुखा | अंतपार नाही लेखा ॥
बाळकृष्ण नंदा घरीं | आनंदल्या नरनारी ॥
गुढिया तोरणे | करिती कथा गाती गाणे ॥ २८३९.१-४ ॥

●निट वाचा या तूकाराम महाराजाच्यां अभंगानूसार

गोकूळात गोकूळाष्टमीला गुढ्या उभारल्याचा उल्लेख आहे,गोकूळाष्टामी ही चैञात नसते,

■गुढीपाडवा खरच मराठी नववर्ष आहे का ?

सातवाहनाच्या काळात शालिवहन या राजाने शक निर्माण केला त्या शालिवहन शकानूसार चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस ठरवला जातो.गुढीपाडवा सोडता शालिवहन या राजाचां कूठे उल्लेखच आढळत नाही,

छञपती शिवाजी महाराजानीं स्वःताचा शिवशक चालू केला,किती जणानां माहीत आहे ?

त्या शिवशकानूसार येणारा शिवराज्याभिषेक दिन हा मराठी नववर्ष म्हणून का साजरा केला जात नाही

,उन्हाळ्यातील पाडव्याला झाडाला पानही राहत नाही,वादळी वातावरम असते

,राज्याभिषेक दिनी जून महीन्यात माॅन्सून वारे वाहू लागतात,शेतकरी आनंदमयी होतो आणी खर्या अर्थाने वातावरणात बदल होतो,जमिनीत अंकूर फूल लागतो,शेतकर्याच्यां नववर्षाची सुरवात होते,

त्यामूळे शालिवहनाचे नववर्ष मानायचे की छञपती शिवाजी महाराजाच्यां शिवशकानूसार राज्याभिषेक दिनी नववर्ष साजरे करावे,याबद्दल गांभिर्याने विचार करावा

●पाडव्याबद्दल अजून ऐक कथा सांगितली जाते,

राम आणि सीता वनवासावरून ते अयोध्यात त्या वेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज-पताका उभारल्याचे रामायणाने म्हटले आहे.
ध्वज-पताका उभारल्या,म्हणजेच अयोध्येतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या,असा होतो.

●वरिल परिष्छेद निट वाचा,यामधे गुढी म्हणून फक्त ध्वज पताका लावल्या असा उल्लेख आहे,

आज आपण जी साडी-लोटा अडकवतो असे नाही,

तसेच अयोध्यात त्याच दिवशी पताका उभारल्या,दरवर्षी त्याची पुनरावृत्ती न झाल्यामूळेच

आज अयोध्यात एकही गुढी उभारली जात नाही..

पूर्वी ज्या ज्या वेळी लोकांना आनंद झाला,त्या त्या वेळी त्यानीं ध्वजपताका लाऊन गुढी उभारली,विशीष्ट अशा एका दिवशी नाही,आणी

आज जे गुढीचे स्वरूप आहे साडी-लोटा लावला जातो तो शंभूराजाच्यां मूर्त्यूनंतरच चालू झालेला आहे,

खरं तर या दु:खद घटने नंतर आपण आनंदाने गोडधोड करून खाणे,

हा तर शंभू महाराजाच्यां अंगावर लागलेल्या प्रतेक जखमेवर मिठ चोळण्यातला प्रकार आहे,

या दिवशी घरावर साडी-लोट्याच्या गुढीऐवजी शंभूप्रतिक म्हणून मराठ्याचें विजयी प्रतिक ध्वजपताका लावावी,
आनंदोत्सव साजरा करू नयेच,आणी तिथि पुरस्कर्त्यां लोकांनी काल दुःख पाळून आज पंचपक्वानाचे अन्न झोडणे म्हणजे दूतोंडी मांडूळासारखे वागणे होय
,पहा..

आणी याही नंतरच काही शिंदळीच्या औलादी आनंदोत्सव साजरा करणार असतील तर करू द्या,मि तर असे समजेल त्या काळात शिवाजी महाराजानां ज्या मराठ्यानीं विरोध केला त्याच्येंच वशंज आज शंभूच्या बलिदानावर आनंदोत्सव साजरा करत आहोत….

( सत्य हे मिरची सारखे असते,झोंबले तरी काही फरक पडणार नाही )
#संकलीत

मरणाआधी राहिलो मरुनी, मग केले मनी होते तैसे... धर्मपिठाने तुकाराम महाराजांना सजा फर्मावली. त्यांचे सर्व अभंग इंद्रायणीत ...
27/03/2024

मरणाआधी राहिलो मरुनी, मग केले मनी होते तैसे...

धर्मपिठाने तुकाराम महाराजांना सजा फर्मावली. त्यांचे सर्व अभंग इंद्रायणीत बुडवण्याची ! नष्ट करण्याची. तुकाराम महाराजांचे अभंग हा त्यांचा हृदयाचा हुंकार होता. ते बुडवणं म्हणजे त्यांच्या हृदयावर घाव घालणंच होतं. अभंगात त्यांनी प्राण ओतले होते. अभंग नष्ट करणं म्हणजे त्यांचे प्राण हरण करणंच होतं. एक एकाकी योद्धा, चहूबाजूंनी घेरला गेला होता. कोणाकडे दाद मागावी अशी परिस्थिती नव्हती. तुकाराम महाराजांच्या घरादारावर जप्ती आणण्यात आली. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला.

'कोपला पाटील गावचे हे लोक ।
आता घाली भिक मज कोण ।।'

अशी वेळ आली. त्यांचे शिष्य, सज्जन मित्र धर्मपिठापुढे हतबल झाले होते. अत्यंत दुःखद अंतकरणाने त्यांनी अभंगांच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. हा पराकोटीचा अन्याय होता. आपण असहाय्य आहोत, आपले हात बांधले गेले आहेत. हे न्यायपीठ नाही अन्यायपीठ आहे. ही अमानुषता आहे. धर्ममार्तंडांचा हा घाव त्यांच्या वर्मी बसला होता. तो सहन करणं त्यांना असह्य झालं. त्यांनी अन्नपाणी सोडलं. तिथेच धरणं धरलं. सतरा दिवस तुकाराम महाराज अन्नपाण्याविन तिथेच पडून होते. तेराव्या दिवशीची त्यांची मानसिकता त्यांनी एका अभंगातून मांडली आहे. तुकाराम महाराज म्हणतात,

'तेरा दिवस जाले निश्चक्र करितां ।
न पवसी अनंता मायबापा ।।
पाषाणाची खोळ घेऊन बैसलासी।
काय ऋषिकेशा जाले तुज ।।
तुजवर आता प्राण मी त्यजीन।
हत्या मी घालीन पांडुरंगा ।।
फार विठाबाई धरिली तुझी आस।
करीन जीवा नाश पांडुरंगा ।।
तुका म्हणे आता मांडिले निर्वाण।
प्राण हा सांडीन तुजवरी ।।'

मला जर माझं जीवितकार्य करता येत नसेल तर मग मला जगायचंच नाही अशी ही सत्याग्रही भूमिका होती. असं सांगतात की सतरा दिवसांनी या वह्या डोहातून वर आल्या त्या कोरड्याच्या कोरड्या होत्या. हा चमत्कार शेकडो वर्षे सांगितला जात आहे. पण स्वतः तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं आहे,

'जाणो नेदी जडीबुटी ।
चमत्कार उठाउठी ।।
त्याचा आम्हांसी कंटाळा ।
पाहो नावडती मना ।।'

ज्यांचा चमत्काराला विरोध आहे, ज्यांना चमत्कार आवडत नाहीत, त्यांच्याच नावावर चमत्कार खपवणं हा त्यांचा अपमान आहे. एकवीसाव्या शतकात आपण असा विचार करू शकत नाहीत. पण अभंग तरले हे खरं. हे अभंग लोकगंगेने तारले असं म्हटलं जातं.

तुकाराम महाराजांवर खटला चालला..

#संकलीत

 #संत_तुकोबाराय_अन_धुळवडलावुनी कोलीत । माझा करतील घात ।।ऐसे बहुताचे संधी । सापडलो खोळेमंधी ।। संत तुकाराम गाथा अभंग क्रं...
27/03/2024

#संत_तुकोबाराय_अन_धुळवड
लावुनी कोलीत । माझा करतील घात ।।
ऐसे बहुताचे संधी । सापडलो खोळेमंधी ।। संत तुकाराम गाथा अभंग क्रं.९८३
संत तुकोबारायांना आपला एक ना एक दिवस घात होणार हे निश्चीत माहीत होते.त्यामुळेच त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातुन सांगुन ठेवले होते की,हे धर्माचे ठेकेदार,गावातील काही लोकं कोलीत लावुन,सापळा रचुन एक ना एक दिवस माझा नक्कीच घात करतील.मला संपवतील.असे अनेकजन मला खोळेत धरण्याची संधी शोधत आहेत.संधीची वाट पाहत आहेत.
ही संधी बरोबर धुलिवंदनाच्या दिवशी साधली.संत तुकोबाराय भंडारयाच्या डोंगरावर होते.तेथुन धर्ममार्तंडानी तुकोबारायांना धुळ खेळण्याच्या निमीत्ताने ईंद्रायणी नदी काठी आणले.आणि तुकोबारायांचा घात करून सदेह वैकुंठाला गेल्याची बोंब ठोकली.
आज सर्वांनाच प्रश्न पडतो की,तुकोबाराय सदेह वैकुंठाला कसे गेले? खरच त्या काळी विमान होते का? फक्त तुकोबारायांनाच विमान का आले? ईतर संतांना का नाही आले ? हे विमान फक्त सालोमालो,मंबाजी,रामेश्वर भट्ट या सारख्या ब्राम्हणांनाच कसे दिसले.असे अनेक प्रश्न तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमना विषयी पडतात.त्याची ऊत्तरे मिळत नाहीत.त्यामुळे साहजीकच तुकोबारायांच्या घातपाताला बळकटी मिळते.
एवढे माञ नक्की की धुळवडच्या दिवशी बरोबर हेरून डाव साधुन तुकोबारायांना सदेह वैकुंठाला बळजबरीने पाठवले गेले.
# संकलीत

"प्राच्यविद्या पंडित शरद पाटील यांच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजी महाराज"  हा लेख अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेने प्रकाश...
19/05/2023

"प्राच्यविद्या पंडित शरद पाटील यांच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजी महाराज" हा लेख अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेने प्रकाशित केला, आवर्जून वाचा ही विनंती!

*रौंदळ चित्रपट : ऊस उत्पादक शेतकत्यांची व्यथा !*---------------------------डॉ. श्रीमंत कोकाटे---------------------------...
14/03/2023

*रौंदळ चित्रपट : ऊस उत्पादक शेतकत्यांची व्यथा !*

---------------------------
डॉ. श्रीमंत कोकाटे
---------------------------

ऊस हे भारतातील महत्त्वाचे नसले तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात ऊसाचे क्षेत्र अधिक आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, नगर, नाशिक इत्यादी भागाच्या राजकारण, समाजकारण, अर्थव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्था यावर उसाचा मोठा प्रभाव आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत. उसामुळे सहकार वृद्धिंगत झाला. जीवनात कायापालट झाला, सायकलची जागा मोटारसायकलने घेतली, कांहीं प्रमाणात चार चाकी गाडीने घेतली, पण याचे प्रमाण किती?

सर्वसामान्य शेतकरी आजही झगडत आहे. त्याचा संघर्ष रौंदल या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आहे. या चित्रपटातील गीत, संगीत, नेपथ्य, अभिनय या अंगाने समीक्षक विश्लेषण करतीलच. मी आशयाच्या अंगाने थोडी चर्चा करणार आहे. सर्वात महत्त्वाचे यातील सौंदर्यशास्त्र भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रकृतीला अत्यंत अनुरूप आहे. यातील भाषा सहज आहे. अभिनेता, अभिनेत्री डेक्कन प्लेटोशी सुसंगत आहे.

चित्रपटात गावगाडा, गावाचे बेरकी, डावपेचांचे राजकारण, शेतातील घर, रस्ता, गोठा अगदी हुबेहूब आहे. विशेषतः शिवाच्या आजोबांचे संवाद उत्तम आहेत. त्यातील खटकणारी एक बाब म्हणजे जेंव्हा शिवा पोलीस भरतीत अपात्र ठरतो आणि तो निराश होतो तेंव्हा शिवाचे आजोबा म्हणतात असा बायकासरखा काय रडतोस?. हे वाक्य लिंगभेद करणारे आहे. स्त्रियांना कमी लेखणारे आहे. गावगाड्यात महिला देखील हिमतीने घरात शेतात काम करतात. आज तर राजकारण, पोलीस, मिलिटरी, शिक्षण, माध्यम, वाहतूक इत्यादी क्षेत्रात महिला हिमतीने काम करतात. याच चित्रपटात शिवाची आई हिमतीने काम करताना दिसते.

शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल नाही, त्याच्या घामाला दाम नाही, त्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव नाही, हे या चित्रपटात दाखवले आहे. शिवा मिरच्या घेवून बाजारात जातो, तेंव्हा त्याला व्यापारी भाव पाडून मागतात, शिवा संतापाने मिरच्या परत घेवून येतो, ही वस्तुस्थिती आहे. आज खताच्या, बियाणांच्या किमती वाढल्या, मजुरी वाढली, लाईटबिल वाढले, वाहतूक खर्च, पेट्रोलचे भाव वाढले त्या प्रमाणात शेतीमालाचे भाव वाढले नाहीत. शेतकरी परिवारातील सदस्यांच्या श्रमाला तर मोलचं नाही, चित्रपटातील हिंसक दृश्य कमी करून हे वाढवता आले असते.

बहुतांश ग्रामीण भागातील राजकारण उसाभोवती फिरते, हे अगदी बरोबर आहे. मतदान नाही केले तर उस वाहतुकीला वाट द्यायची नाही, ऊस न्यायचा नाही, नेला तर उशिरा न्यायचा, म्हणजे वजन कमी भरून साखर कारखानदारांचा फायदा आणि शेतकऱ्यांचा तोटा. अपवाद वगळता बहुतांश कारखानदार शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण करतात. हे जे चित्रपटात मांडले आहे, ते वस्तुस्थितीला धरून आहे.

काटा मारणे हे तर समीकरणच झाले आहे. अपवाद वगळता बहुतांश कारखानदार काटा मारतात. बाहेर वजन करून आलेला ऊस घ्यायची हिम्मत कारखानदार का दाखवत नाहीत. दहा तनामागे सुमारे एक टन याचा अर्थ शंभर टनामागे दहा टन काटा मारला जातो असे दबक्या आवाजात शेतकरी बोलतात. अग्रीकल्चर सर्वे ऑफ महाराष्ट्र नुसार राज्यात सुमारे नव्वद टक्के शेतकरी अत्यल्पभूधारक आहेत, म्हणजे सुमारे दीड एकर जमीनधारक आहेत. एकरी जर सरासरी पन्नास टन ऊस होत असेल तर दीड एकरात सुमारे पंच्याहत्तर टन होतो, त्यातील सुमारे आठ टन उसाचा जर काटा मारला जात असेल तर, काटा मारणारे कारखानदार सामान्य शेतकऱ्यांच्या ऊसाच्या रसापासून नव्हे तर त्यांच्या शरीरातील रक्तापासून साखर काढतात. याविरुद्ध रौदळ आवाज उठवतो, याबद्दल त्याचे कौतुक केले पाहिजे. काटा न मारणारांना वाईट वाटायचे कारण नाही.

संसदीय लोकशाहीतून आलेले नवसरंजामदार यांनी सहकारी साखर कारखाने मोडून ते खाजगी करून ताब्यात घेतले आहेत. ज्याप्रमाणे अदानी-अंबानी राष्ट्रीय स्तरावर करत आहेत, तेच हे तालुका जिल्हा स्तरावर करत आहेत. ऊसातून पैसा त्यातून सत्ता सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे दुष्टचक्र आज शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रावर राज्य करत आहे, याला कोणताही बडा राजकीय पक्ष अपवाद नाही. निवडणूक आली की महापुरुषांचे नाव घ्यायचे आणि निवडून आले की प्रजेला लुटायचे असे अत्यंत विषारी राजकारण सुरू आहे.

कांहीं कारखानदारांनी शेतकरी सभासदांच्या नावावर बँकांचे कोट्यावधी रुपये कर्ज उचलले, त्यावर कारखाना उभारला, शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. प्रत्यक्ष फायदा कारखानदारांच्या झाला. शेतकऱ्यांना एक नया पैसा मिळाला नाही. याचा पुसटसा उल्लेख रौंदालमध्ये आलेला आहे. सामान्य शेतकऱ्यांचा ऊस नाही नेल्यावर त्याच्या कुटुंबाची कशी ससेहोलपट होते, गोड ऊसाची ही कडू कहाणीच आहे, हे प्रभावीपणे मांडले आहे.

चित्रपटाची मर्यादा - चित्रपटात पाणी प्रश्न, लाईटचा प्रश्न, मजुरांचा प्रश्न, खत-बियान यांच्या वाढलेल्या किंमती यावर चर्चा नाही, ती असायला हवी होती. नायकाने हातात शस्त्र घेवून चेअरमन आणि संस्थापकाला मारणे हे वस्तुस्थितीला आणि संसदीय लोकशाही मुल्याला धरून नाही, ब्राझीलमध्ये प्रतिटन सुमारे आठ हजार रुपये भाव मिळत असेल तर तो आपल्या देशात का मिळत नाही? ऊसापासून असंख्य उत्पादन घेतली जातात. तो पैसा जातो कुठे? सभासदाला किती वाटा मिळतो? काटा माराल्याला ऊस कोणाच्या नावावर जातो? यावर चर्चा पाहिजे होती . या ठिकाणी शेतकरी संघटना आवाज उठवते व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देते, हे दाखवले असते तर चित्रपट अजून खूप यशस्वी झाला असता. कारण आज जो कांहीं थोडाफार भाव मिळतोय त्याचे श्रेय राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेच पाहिजे. नायकाने एकट्याने चिडून हा प्रश्न सुटणार नाही, सामुदायिक आंदोलनाचा चित्रपटात अभाव आहे. तरीही गरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रौंदळ आणला त्याबद्दल पडोल आणि भाऊ शिंदे यांचे अभिनंदन!

*डॉ.श्रीमंत कोकाटे*

आज सायंकाळी पाच वाजता, बालगंधर्व रंगमंदिर शिवाजी नगर पुणे येथे प्रकाशन सोहळा. आवर्जून उपस्थित राहावे, ही विनंती!
10/02/2023

आज सायंकाळी पाच वाजता, बालगंधर्व रंगमंदिर शिवाजी नगर पुणे येथे प्रकाशन सोहळा. आवर्जून उपस्थित राहावे, ही विनंती!

It's my humble and earnest request to attend the program.  Your presence  would be a great source of inspiration.
09/02/2023

It's my humble and earnest request to attend the program. Your presence would be a great source of inspiration.

छत्रपती शिवाजी महाराज (सचित्र) इंग्रजी आवृत्ती या डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा......नामवंत चित्रपट नि...
09/02/2023

छत्रपती शिवाजी महाराज (सचित्र) इंग्रजी आवृत्ती या डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा......

नामवंत चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते येत्या १० तारखेला मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

स्वागाध्यक्ष:- रविदादा ढमढेरे, गिरिप्रेमी ग्रुप, महाराष्ट्र

स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
वेळ : सायंकाळी ०५ : ०० वा.
दिनांक १० फेब्रुवारी २०२३

राज ठाकरेंच्या भेटीबाबत इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार सरांची भूमिका!
01/12/2022

राज ठाकरेंच्या भेटीबाबत इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार सरांची भूमिका!

01/12/2022

उपरती येऊन राज ठाकरे जर वस्तुनिष्ठ इतिहासकारांच्या भेटी घेत असतील तर त्यांचे स्वागत आहे!

30/11/2022

शिवाजीराजांची तुलना मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी करणे, ही लोढाची विकृती!

राज्यस्तरीय महात्मा फुले सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न!
28/11/2022

राज्यस्तरीय महात्मा फुले सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न!

Address

Pune

Telephone

+918600655703

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivshri Shrimant kokate Sir (शिवश्री श्रीमंत कोकाटे) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category