YogMaitrav

YogMaitrav

Share

Meditative Yoga International Foundation...
Yoga, Meditation, Spirituality, Life, Research and Beyond...

youtube.com/meditativeyoga

Certified Corporate Yogi Course 30/07/2020

Come, come let's become the Corporate Yogi to make our life more healthy & harmonious... Yes, together we can...

Certified Corporate Yogi Course Become Your Own Yoga Master

15/12/2018

Come Let's become a "Certified Coscipreneur"
14 Hours - Conscipreneur Certification Course
fb.me/Conscipreneur
(2 days - 7 hours each day or 14 days - daily 1 hour)
MeditativeYoga.in, [email protected]

Conscipreneur Entrepreneurship with Consciousness...
Come! Let's join hands together to lead humanity towards divine unknown...

25/10/2018

L = KE2

Meditative Yoga @ Workplace for IT Professionals 04/02/2018

for physical, physiological & psychological balance

Meditative Yoga for Security Officers @ Corporate 04/02/2018

For Strength, Elasticity & Balance...

26/11/2017

Yoga Meditation Teacher Training Course - Free for All
: MeditativeYoga.in

04/11/2017

लेख: योगा करण्या अगोदर जाणून घ्यायलाच हव्यात अश्या काही महत्वपूर्ण गोष्टी -
Article: "Most Important Things to Know before Practicing Yoga"
:Author - YogMaitrav, Twitter.com/YogMaitrav

योग: कर्मसु कौशलम !
योग या समृद्ध जीवनशैलीने महान कर्म करण्यासाठी नक्कीच कुशलता प्राप्त होते.
त्यामुळे जीवन जगताना आपल्याला अनेक अपयश, दुःख, संघर्ष, नैराश्य या व अश्या अडगळींनी व्यापलं असेल किंवा आपण सर्व प्रयत्न करूनही आयुष्याचा सूर सापडत नसेल तर एकदा "योग" या प्रगल्भतेलाही अनुभवून पहा म्हणून "अथ योगानुशासनम", होय आता इथून पुढे योग या जीवनशैलीचे अनुशासन.

परंतु या दोन्हीही गोष्टींवर लगेच विश्वास ठेवून त्या मानन्याची गरज नाही, कारण योग हे शुद्ध विज्ञान आहे असचं ते घ्यावं. मग एखादा विषय जर विज्ञान म्हणून घेतला तर त्यात नक्कीच परिवर्तन होत राहणार.
आणि जर योग हे विज्ञान असेल तर आपल्याला त्याचे अध्ययन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनच ठेवावा लागेल.

योग व योगा :
योग या मूळ संज्ञेचा अपभ्रंश होऊन योगा हा शब्द आपल्याकडेही प्रचलित झाला. परंतु मूळ उच्चारण योग हेच आहे. जसे बुध्द, कृष्ण हे मूळ शब्द आहेत परंतु इंग्रजीमध्ये त्या शब्दांना बुद्धा, कृष्णा असे संबोधले जाऊ लागले.
परंतु योगा म्हणले तरी चालेल पण त्यामुळे या शब्दापलीकडे दडलेला मूळ गाभा अध्ययनापासून वंचित राहू नये एव्हढीच अपेक्षा.

योग हा प्रकार शारीरिक व्यायाम म्हणून किंवा मानसिक शांती मिळविण्यासाठीचा मुळीच नाही, हो, परंतु या साधना मार्गावर चालताना आपल्याला शारीरिक व मानसिक स्वास्थ्य नक्कीच लाभते. म्हणजे फिजिकल व मेंटल हेल्थ ही आपल्याला बाय-प्रोडक्ट मिळत असते.
परंतु एखाद्याने शरीर स्वास्थ्यासाठी किंवा मानसिक आरोग्यासाठीच जरी योग अभ्यास केला तरीही चालेल व नक्कीच शारीरिक व मानसिक आरोग्य लाभू शकेल.
परंतु एका पातळीवर योग ही स्वतःचा शोध घेण्याची व स्वतःमध्ये स्थित होण्याची वैज्ञानिकतेतुन प्रवाहित होणारी एक आध्यात्मिक कला आहे.
परंतु आपण जर शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी जरी योग अभ्यास करण्याचे ठरवले तरीही काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.

पंचसूत्रीचे पालन : इंटेन्शन, इंटेन्सिटी, कन्सिस्टन्सी, साईन्टिफिक ऍप्रोच, ग्रॅज्युअल वे :
योग अभ्यास करताना प्रमुख पाच सूत्र लक्षात ठेवणं महत्वपूर्ण आहे. या पाच गोष्टींमुळे योग अभ्यासाचा नक्कीच अधिक लाभ मिळेल.
प्रथम म्हणजे, आपले इंटेंशन म्हणजे आपला या विषयाप्रतीचा "भाव" चांगला असणे महत्वपूर्ण आहे, नकारात्मक दृष्टिकोनातून किंवा कुतूहलापोटी करायचंय म्हणून करायचंय ठरवलं तर जास्त लाभ मिळणार नाही. निस्वार्थ सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच लाभदायक ठरेल.

दुसरे चरण म्हणजे, इंटेन्सिटी, म्हणजे त्या विषयाप्रती असणारी तीव्रता, फक्त कुणीतरी सांगितलंय म्हणून किंवा काहीतरी करायचंय म्हणून कमी ऊर्जागतीने योग साधना केली तर योग्य लाभ मिळणार नाही पण जर करायचचं ठरवलं तर पूर्ण मनाने योग करण्यामध्ये काय हरकत आहे. जर एखादी गोष्ट करायची असेल तर दोनच पर्याय असतात, एकतर पूर्ण मनाने ती गोष्ट करायची किंवा मग करायचीच नाही, मधेच थांबून जास्त लाभ होणार नाही. खरं तर एखादी गोष्ट करायचं ठरवल्यावर ती अशी करायला हवी कि आपल्या जीवन मरणाचा प्रश्न बनली पाहिजे.
लँगर म्हणजे 'लॅक ऑफ एनर्जी ' किंवा 'लो एनर्जी ', कमी उर्जेनिशी एखादी गोष्ट करणे असफलतेकडे घेऊन जात असते. मनाची सकारात्मकता ठेऊन पूर्ण श्रद्धेने व शक्तीनिशी जर एखादी गोष्ट केली तर नक्कीच तिचा लाभ अनेक पटीने वाढत असतो.

तिसरे चरण आहे, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य; फक्त एक दोन दिवस योगाभ्यास करून लाभ होणार नाही किंवा अनियमित सरावही लाभदायक ठरणार नाही. निरंतर योग साधना हीच यातील यशाची गुरुकिल्ली आहे.
कधी योगाभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला नाही तर थोडा वेळ मागे पुढे झाला तरी चालेल पण जिथे असाल तिथे दहा मिनिटे जरी प्राणायाम व ताडासन, कटीचक्रासन सारखे आसन प्रकार केले तरी चालतील. योगाभ्यासातील नियमितता फार महत्वपूर्ण आहे.

चौथे चरण आहे, साइंटिफिक ऍप्रोच म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. कारण योग हे शुद्ध विज्ञान आहे. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊनच आपण योग साधनेद्वारे दैवी अज्ञातात समृद्ध गती करू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व्यक्ती ना या पक्षात असते ना त्या. ती व्यक्ती आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने व संवेदना जागृत ठेवत अगोदर प्रयोगात्मक अनुभव घेऊन पाहते व नंतर जो निष्कर्ष येईल त्यावर ठाम राहते. तसेच कोणत्याही पूर्वाग्रहाने दूषीत होऊन किंवा प्रेरित होऊन योग साधना न करता प्रयोगातून त्या प्रति श्रद्धा वाढवावी.

सूत्रातील पाचवे चरण आहे, "ग्रॅजुएल वे" म्हणजे नैसर्गिक व हळुवारपणे बदल घडवत जाणे. जसा आपल्या लहानपणीच्या व आताच्या शरीरामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. परंतु आपल्या शरीरात हा बदल कसा होत गेला याची तीव्रता कधी आपल्याला जाणवलीही नाही तसच योग अभ्यास करताना शरीराला व मनाला योग साधनेची अनुकूलता जाणवली पाहिजे.
म्हणजे सुरुवातीला सोप्या आसनांनी योग अभ्यासाची सुरुवात करत जमेल तेव्हढ्या प्रमाणातच व्यायाम करावा आणि वेळही सुरुवातीला अगदी दहा ते पंधरा मिनिटे ठेवली तरी चालेल व नंतर कालांतराने जसजसा सराव वाढत जाईल त्यापद्धतीने आसनांची क्लिष्टता व वेळही वाढवावा.

त्रिसूत्रीचे पालन- संतुलित आहार, व्यायाम व निद्रा :
ज्ञात करून घेण्याची पुढील गोष्ट म्हणजे, संतुलित आहार, संतुलित व्यायाम व संतुलित निद्रा ही त्रिसूत्री होय. (Balanced Diet, Exercise & Sleep)
पूर्वी व्यायाम या शब्दाला पूरक शब्द होता श्रम, परंतु आता जीवनपद्धती फार बदलली आहे म्हणून श्रम हा अनमोल ठेवा नाहीसा होत चालला आहे व म्हणून त्याची जागा व्यायामाला घ्यावी लागली. व्यायामामध्ये प्रामुख्याने योगासन व प्राणायाम यांचा समावेश होईल. पहाटे, सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा स्वच्छ व खेळत्या हवेच्या ठिकाणी आपण योग साधना करू शकतो. आपल्या धावपळीच्या जीवनशैली नुसार कमीतकमी १५ मिनिटे व जास्तीत जास्त १ तास जरी योगाभ्यास केला तरी पुरेसा आहे. परंतु यात सातत्य ठेवून व मन लावून सराव केल्याने निश्चितच लाभ होईल.

संतुलित आहार ही संज्ञा फार व्यापक आहे, आपण जो तोंडाद्वारे आहार ग्रहण करतो तो आहार या संज्ञेमधील फक्त दहा टक्के आहार आहे. बाकीचा नव्वद टक्के आहार आपण आपल्या इंद्रियांद्वारे ग्रहण करत असतो म्हणजे डोळ्यांद्वारे व कानांद्वारे आपण सर्वात जास्त चांगला वाईट आहार ग्रहण करत असतो. म्हणून आहार हा विषय फार मोठा आहे, याप्रती तुमची जिज्ञासा जागृत व्हावी एव्हढीच प्रामाणिक अपेक्षा.
आहार, व्यायाम व निद्रा संतुलित ठेवूनच आपण शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळवू शकतो व ते निश्चितच टिकवूनही ठेऊ शकतो.
आहारामध्ये अल्पोपहार व उपवास या संज्ञाही फार महत्वपूर्ण आहेत. आठवड्यातून एक दिवस जरी उपवास केला तरीही आपले शरीर संतुलित ठेवण्यास निश्चितच मदत होऊ शकते. जेवणाच्या वेळेची निश्चिती किंवा भूक लागेल तेव्हा जेवणे या गोष्टी बदलत्या जीवनशैलीमुळे कमी झाल्या आहेत. जेवणाच्या वेळेसोबतच जेवण करताना जेवणावर लक्ष देत ध्यानपूर्वक जेवण करणे हेही महत्वाचे आहे. योगाभ्यासामध्ये व जेवणात किमान अर्धा तास व कमाल २ तासांचे अंतर हवे. आपण जर जास्त प्रमाणात व्यायाम करणार नसू तर बदलत्या जीवनशैलीनुसार अर्ध्या तासाचे अंतर पुरेसे आहे.योगाभ्यासाच्या व जेवणाच्या दरम्यान पाणी पिणे टाळावे. पाणी पितानाही जेवणाअगोदर व नंतर अर्ध्या तासाचे अंतर हवे पण जर शक्य नाहीच झालं तर किमान १५ मिनिटे जरी थांबले तरी पाचनक्रिया संतुलित होण्यास मदत होईल.

रात्रीचे जेवण अल्पोपहार ठेवत लवकर म्हणजे किमान सात किंवा आठ वाजेपर्यंत केले तर गुणवत्तायुक्त झोप येण्यास निश्चितच मदत होईल. खरेतर आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण वर्ज्य किंवा सुर्यप्रकाश असतानाच करायला हवे परंतु धावपळीच्या जीवनशैलीमुळे सर्वांनाच हे शक्य होणार नाही. योगनिद्रा या योगप्रकाराचा अभ्यास करत किंवा काही ध्यानविधींचा अभ्यास करत झोप गुणवत्तायुक्त करण्यास निश्चितच मदत होईल.

साध्य-लवचिकता, सशक्तता व संतुलन :
योगसाधनेद्वारे प्रामुख्याने ज्या तीन गोष्टी साध्य होणार आहेत त्या म्हणजे लवचिकता, सशक्तता व संतुलन होय. (Strength, Elasticity & Balance)
परंतु या वरील तीनही अवस्था आपल्याला प्राप्त होणार आहेत त्या 'आपल्याला' म्हणजे प्रथमदर्शी तरी स्वतःला ओळखणे गरजेचे आहे.
तसे योगदृष्टीतून प्रामुख्याने आपली पुढील पाच कोषांमध्ये वर्गीकरण होते, अन्नमयकोष, प्राणमयकोष, मनोमयकोष, विज्ञानमयकोष, व आनंदमयकोष.
हे पाच प्रकार सहज समजण्याजोगे आहेत पण तरीही आपण थोडं आणखीन समजेल अश्या पद्धतीतीने शरीराचे वर्गीकरण केले तर ते पुढील प्रमाणे असेल.
शरीराचे प्रकार :
शारीरिक शरीर, कोषिका शरीर, मानस शरीर, ऊर्जा शरीर (Physical Body, Physiological (Cell) Body, Psychological (Mental) Body, Energy Body)
असे चार प्रमुख प्रकार अध्ययन करून योगसाधना केली तर आपण आपले आरोग्य व आपल्या स्वतःला अधिक सशक्त लवचिक व संतुलित करू शकतो. प्रामुख्याने शरीराचे व मनाचे संतुलन, सशक्तता व लवचिकपणा वृद्धिंगत करू शकतो.

महर्षी पतंजली रचित अष्टांग योग :
बऱ्याच वेळा असं समजलं जातं कि योगासन म्हणजे योगा होय किंवा आसन व प्राणायाम म्हणजे योगा होय.
परंतु योगा ही संज्ञा फार व्यापक आहे व योग ही संज्ञा तर फारच व्यापक आहे असं म्हणलं तरी वावगं होणार नाही.
साधारणतः योगा मध्ये अष्टांग योगाचा समावेश करून योगा उल्लेखले तरी चालू शकेल. तसा आसन म्हणजेही योगाच होतो पण फक्त आसन म्हणजे योगा नव्हे.
महर्षी पतंजली रचित अष्टांग योग या योग पद्धतीमध्ये प्रमुख आठ अंग आहेत.
"यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी" असे हे आठ प्रकार आहेत.
त्यामुळे योगा मध्ये फक्त आसन व प्राणायामच येत नसून यम, नियम, प्रत्याहार, धारणा ,ध्यान व समाधी या अंगांचाही समावेश आहे.

यम व नियम म्हणजे योगअभ्यास करतांना काय करावे व काय करू नये याची अनुशासनयुक्त नियमावलीच होय.
या अनुशासनांचे पालन नाही केले तरी एखादी व्यक्ती निश्चितच आसन व प्राणायाम करू शकते परंतु योगसाधनेच्या अंतरंगातील गाभ्यापर्यन्त पोहोचणे फार अवघड होऊन जाईल.
यम मधील बोध प्रकार आहेत, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, अहिंसा व ब्रह्मचर्य.
नियम मधील बोध प्रकार आहेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान.

आसन म्हणजे वेगवेगळ्या शारीरिक अवस्थांमध्ये शरीर स्थित करण्याची क्रिया ज्या अनुषंगाने मन व स्वत्व ही स्थित व अकंप होऊ शकेल यासाठीची शरीराच्या माध्यमातून सुरु केलेली अष्टांग योगाची साधना होय.

प्राणायाम ही संज्ञा प्राण व आयाम या शब्दांची संधी आहे. योगशास्त्रानुसार प्राण म्हणजे जीवन ऊर्जा (Vital Energy Force) आयाम म्हणजे त्या जीवन ऊर्जेचा परीघ किंवा आवाका वाढवणे, कमी करणे किंवा नियंत्रित करणे होय.
प्राण म्हणजे ऑक्सिजन नव्हे पण चैतन्यशील जीवन ऊर्जा होय. श्वासासोबत नक्कीच ऑक्सिजन घेतला जाईल व कार्बनडायऑक्साईड बाहेर सोडला जाईल पण योगशास्त्रानुसार श्वासाची व्याप्ती फार मोठी आहे. परंतु नियमित प्राणायाम केल्याने शरीरातील सर्व अंतर्गत संस्था निश्चितच आरोग्यमय राहतील. उदाहरणार्थ श्वसनसंस्था, पाचनसंस्था ग्रंथीयसंस्था इ.
विशेषतः काही प्राणायामांमध्ये ओम या ध्वनिस्वराचे उच्चारण केले जाते. जसे उदगीत प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम. ओम हा शब्द मूळ तीन अक्षरांची संधी आहे; अ, ऊ, म. या शब्दामागे अनेक आध्यात्मिक मतमतांतर आहेत, परंतु सर्वच धर्मात सकारात्मक दृष्टिकोनातूनच या ध्वनीला महत्व आहे. भारतीय आध्यात्मात जसे जैनिजम, बुद्धिजम, शिखिजम हिंदुइजम यांमध्ये तर ओम चे उच्चारण महत्वपूर्ण आहेच परंतु इस्लाम वा इसाईयतमध्ये ही "आमीन" सारखा "ओम" च्याच ध्वनींशी मिळताजुळता शब्दप्रयोग महत्वपूर्ण आहे. तसे पाहता "ओम" हा ध्वनिनाद कोणत्याही एका धर्माशी संबंधित असूच शकत नाही किंवा तो सर्वच धर्मियांचा असू शकतो, ग्रॅव्हिटी फोर्सचा शोध न्यूटनने लावला मग आपण असे म्हणणार का कि गुरुत्वाकर्षणाचा नियम हा ख्रिश्चियानिटीमध्ये येतो. नासा या अमेरिकन अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या काही वैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानुसार जेव्हा सखोल अंतरिक्ष मध्ये सूर्याचा ध्वनी नमूद करण्यात आला तेव्हा त्याचा नाद हा ओम च्या ध्वनिनादाशी मिळताजुळताच आढळून आला. परंतु हा रिपोर्ट अनधिकृत आहे कारण गूगल व युट्युब वर असा रिपोर्ट सापडतो परंतु नासाच्या अधिकृत कोणत्याही साईटवर हे नमूद नाही म्हणून ही भ्रांतच आहे असं समजायलाही काही हरकत नाही, परंतु आपण प्रयोगातून ओम या ध्वनिनादाचा प्रभाव नक्कीच योग्य कि अयोग्य ते सिद्ध करू शकतो आणि असे प्रयोगात्मक अनेक अधिकृत रिपोर्ट आहेत जे आपण "गूगल स्कॉलर" या वेबसाईटवरही पाहू शकतो. ज्यात शारीरिक आरोग्य व मानसिक शांतीसाठी ओम या ध्वनी नादाचा सकारात्मक परिणाम दिसून आलेला आहे. म्हणून ओम या शब्दाच्या ध्वनी नादाने निश्चितच न्यूरोसेल्स व ग्रंथीय संस्थेवर सकारात्मक व आरोग्यदायी परिणाम होतो असे प्रयोगातून सिद्ध झालेले आहे. मानसिक स्वास्थ्यासाठीही ओम या ध्वनिनादाचे उच्चारण लाभदायकच सिद्ध झालेले आहे. मग ओम हा शब्द भौतिकशास्त्र किंवा मानसशास्त्राचाही एक प्रयोगात्मक सिद्धांत आहे असंही आपण म्हणू शकतो.

प्रत्याहार म्हणजे पंचेंद्रीयांवर नियंत्रण मिळवत त्यांच्यापासून ऊर्जा बाहेर न प्रवाहित होता ती आध्यात्मिक अभ्यासाकडे अंतरप्रवाहाकडे वळविण्याची क्रिया. थोडक्यात ऊर्जेचं बजेटिंग करण्याची साधना पद्धती होय.

धारणा म्हणजे धारणाविधीच्या (Concentration Techniques) विविध क्रियांद्वारे मनाची एकाग्रता साध्य करण्याची साधनापद्धती होय.

ध्यान हे अष्टांगयोगातील एक फार व्यापक व महत्वपूर्ण चरण आहे. परंतु मेडिटेशन हा ध्यानाचा एक प्रकार आहे संपूर्ण ध्यान नव्हे, आपण साधारणतः सर्वच ध्यानाला मेडिटेशन असेच संबोधतो. परंतु पाश्चात्य मेडिटेशनचा अर्थ व भारतीय ध्यानाचा अर्थ फार वेगळा आहे. मेडिटेशनला आपण एकवेळ निदिध्यासन असे संबोधू शकतो पण ध्यान हे मेडिटेशनच्या पुढे घेऊ जाणारे विज्ञान आहे.
ध्यानाला इंग्रजीत दुसरा कोणता शब्द नसल्यामुळे त्याच्या जवळपास असणारा मेडिटेशन हा शब्दप्रयोग प्रचलित झालेला आहे.
ध्यानाच्या अनेक विविध पद्धती प्रचलित झालेल्या आहेत परंतु त्या सर्व प्री-मेडिटेशन टेक्निक्स किंवा गाईडेड मेडिटेशन आहेत मूळ ध्यान या क्रिया संपल्यानंतर सुरु होत असते. जसं आपण झोप करू शकत नाही पण झोपेची तयारी करतो व झोप लागते तसेच आपण ध्यान करू शकत नाही पण ध्यानासाठीची तयारी नक्कीच करू शकतो व नंतर ध्यान ते परिपक्व झाल्यावर लागते. ध्यान घटित होण्याची वेळ प्रत्येकाच्या साधनेवर व साधनेच्या निष्कामकर्मयुक्त तीव्रतेवर अवलंबून असते.
बऱ्याच वेळा लोक धारणा विधी म्हणजे एकाग्रतेच्या क्रिया करत असतात व त्यालाच ते ध्यान करत आहे असे संबोधतात.

समाधी हे मोक्षत्वाकडे किंवा परमात्मप्राप्तीकडे जाण्याच्या किंवा स्वतःची विधिवत उकल होण्याच्या प्रवासातील शेवटची अवस्था आहे असे नमूद केलेले आहे. हे संपूर्णतः आत्मिक वा आध्यात्मिक चरण आहे.

प्रमुख योग प्रकार :
तसे योग संकल्पनेचे प्रमुखतः चार व्यापक प्रकार पडतात, सांख्ययोग किंवा ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग आणि चौथा म्हणजे राजयोग किंवा साधनायोग .

सांख्ययोग म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाला अनुभवांतून व अध्ययनातुन जाणण्याचा वैराग्य व अभ्यासपूर्ण मार्ग होय.

भक्तियोग म्हणजे वेदांतातील द्वैत मार्गच, भक्त व परमात्मा या दोन संकल्पना यामार्गातून स्पष्ट होतात. अल्लाह व अल्लाहचा बंदा किंवा वारकरी व वारकऱ्यांचा विठुराया असे अनेक भक्तिमार्ग भक्तीयोगाचेच रूपक आहेत.

कर्मयोग या अद्वितीय जीवनमार्गात निष्काम कर्मभावाने वैराग्य व अभ्यासासोबत आपली सद्सद्विवेकबुद्धी व संवेदना उपयोगात आणत सेवाभाव व निस्वार्थभाव ठेवत अथकपणे सृष्टिचक्राला अभिप्रेत असलेले कर्म करत राहतो तोच खरा कर्मयोगी सिद्ध होऊ शकतो.

राजयोग किंवा त्याला आपण साधनायोगही म्हणू शकतो कारण यात साधक वैज्ञानिक दृष्टी ठेवून निरंतर आध्यात्मियक साधना करत असतो. ज्ञानेश्वरांचा, बुद्धांचा वा महावीरांचा मार्ग हा साधनायोगचेच दर्शन घडवतो.

याच योगमार्गात महर्षी पतंजलींचा अष्टांग योगही समाविष्ट होतो. मग या अष्टांगयोगातील आपण जो योगा करत असतो त्याला "हट योगा" असेही संबोधले जाते. म्हणजे योगासन व प्राणायाम करणे याला आपण हट योगा म्हणू शकतो.

विविध आसने एका एकामागून एक आणि एका लयात व प्रवाहात करण्याच्या क्रियेला विन्यासा योगा असे संबोधले जाते, यालाच पाश्चात्त्य लोक "पॉवर योगा" असे म्हणतात.
अश्याप्रकारचे हट योगासंबंधीचे अनेक योगा प्रकार प्रचलित आहेत. योगा ट्रेनर, योगा इंस्ट्रक्टर, योगा टीचर अश्या संज्ञा अधिक करुन हट योगा अथवा पॉवर योगाशीच संबंधित आहेत.
कारण योगा टीचर म्हणलं कि योगासनांद्वारे शारीरिक व्यायाम करून घेणारा अथवा शिकविणारा प्रशिक्षक होय अशीच साधारणतः समजूत आहे व अनेक योग शिक्षकही योग अध्ययनाच्या बाबतीत फक्त आसन-प्राणायामाद्वारे शारीरिक व्यायामावरच थांबलेले आहेत. आणि असे बरेच शिक्षक स्वतःला "योगी" म्हणवून घेण्यातही अग्रेसर असतात. परंतु "प्रस्थानत्रयी" या तीन ग्रंथांच्या समूहानुसार म्हणजे भगवदगीता, उपनिषद व ब्रह्मसूत्रनुसार योगी ही संज्ञा फारच व्यापक आहे.
योगाभ्यास सुरु करताना प्रमुखतः प्रस्थानत्रयी सोबतच पतंजली योग सूत्र, हटयोग प्रदीपिका, घेरण्ड संहिता, शिव संहिता या पुस्तकांचा अभ्यास सर्वोपयोगी सिद्ध होतो.

तसं योग, योगा व योगसाधने बद्दलच्या भ्रांती, तथ्य व अकल्पितां बद्दल जाणण्यासारखे अगणित आहे. परंतु काही ठराविक गोष्टी जाणून योगअभ्यास सुरु केला तर निश्चितच लाभ मिळू शकेल.

:लेखक- योगमैत्रव,
रिसर्चर व योग माएस्ट्रो - मेडिटेटिव्ह योगा इंटरनॅशनल फाऊंडेशन,
MeditativeYoga.in, [email protected], +91 7040038881
Facebook | Twitter | Youtube | Linkedin / MeditativeYoga
Facebook | Twitter | Youtube | Linkedin / about.me /YogMaitrav

04/11/2017

लेख: योगा करण्या अगोदर जाणून घ्यायलाच हव्यात अश्या काही महत्वपूर्ण गोष्टी -
Article: "Most Important Things to Know before Practicing Yoga"
:Author- YogMaitrav, Twitter.com/YogMaitrav

योग: कर्मसु कौशलम !
योग या समृद्ध जीवनशैलीने महान कर्म करण्यासाठी नक्कीच कुशलता प्राप्त होते.
त्यामुळे जीवन जगताना आपल्याला अनेक अपयश, दुःख, संघर्ष, नैराश्य या व अश्या अडगळींनी व्यापलं असेल किंवा आपण सर्व प्रयत्न करूनही आयुष्याचा सूर सापडत नसेल तर एकदा "योग" या प्रगल्भतेलाही अनुभवून पहा म्हणून "अथ योगानुशासनम", होय आता इथून पुढे योग या जीवनशैलीचे अनुशासन.

परंतु या दोन्हीही गोष्टींवर लगेच विश्वास ठेवून त्या मानन्याची गरज नाही, कारण योग हे शुद्ध विज्ञान आहे असचं ते घ्यावं. मग एखादा विषय जर विज्ञान म्हणून घेतला तर त्यात नक्कीच परिवर्तन होत राहणार.
आणि जर योग हे विज्ञान असेल तर आपल्याला त्याचे अध्ययन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनच ठेवावा लागेल.

योग व योगा :
योग या मूळ संज्ञेचा अपभ्रंश होऊन योगा हा शब्द आपल्याकडेही प्रचलित झाला. परंतु मूळ उच्चारण योग हेच आहे. जसे बुध्द, कृष्ण हे मूळ शब्द आहेत परंतु इंग्रजीमध्ये त्या शब्दांना बुद्धा, कृष्णा असे संबोधले जाऊ लागले.
परंतु योगा म्हणले तरी चालेल पण त्यामुळे या शब्दापलीकडे दडलेला मूळ गाभा अध्ययनापासून वंचित राहू नये एव्हढीच अपेक्षा.

योग हा प्रकार शारीरिक व्यायाम म्हणून किंवा मानसिक शांती मिळविण्यासाठीचा मुळीच नाही, हो, परंतु या साधना मार्गावर चालताना आपल्याला शारीरिक व मानसिक स्वास्थ्य नक्कीच लाभते. म्हणजे फिजिकल व मेंटल हेल्थ ही आपल्याला बाय-प्रोडक्ट मिळत असते.
परंतु एखाद्याने शरीर स्वास्थ्यासाठी किंवा मानसिक आरोग्यासाठीच जरी योग अभ्यास केला तरीही चालेल व नक्कीच शारीरिक व मानसिक आरोग्य लाभू शकेल.
परंतु एका पातळीवर योग ही स्वतःचा शोध घेण्याची व स्वतःमध्ये स्थित होण्याची वैज्ञानिकतेतुन प्रवाहित होणारी एक आध्यात्मिक कला आहे.
परंतु आपण जर शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी जरी योग अभ्यास करण्याचे ठरवले तरीही काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.

पंचसूत्रीचे पालन : इंटेन्शन, इंटेन्सिटी, कन्सिस्टन्सी, साईन्टिफिक ऍप्रोच, ग्रॅज्युअल वे :
योग अभ्यास करताना प्रमुख पाच सूत्र लक्षात ठेवणं महत्वपूर्ण आहे. या पाच गोष्टींमुळे योग अभ्यासाचा नक्कीच अधिक लाभ मिळेल.
प्रथम म्हणजे, आपले इंटेंशन म्हणजे आपला या विषयाप्रतीचा "भाव" चांगला असणे महत्वपूर्ण आहे, नकारात्मक दृष्टिकोनातून किंवा कुतूहलापोटी करायचंय म्हणून करायचंय ठरवलं तर जास्त लाभ मिळणार नाही. निस्वार्थ सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच लाभदायक ठरेल.

दुसरे चरण म्हणजे, इंटेन्सिटी, म्हणजे त्या विषयाप्रती असणारी तीव्रता, फक्त कुणीतरी सांगितलंय म्हणून किंवा काहीतरी करायचंय म्हणून कमी ऊर्जागतीने योग साधना केली तर योग्य लाभ मिळणार नाही पण जर करायचचं ठरवलं तर पूर्ण मनाने योग करण्यामध्ये काय हरकत आहे. जर एखादी गोष्ट करायची असेल तर दोनच पर्याय असतात, एकतर पूर्ण मनाने ती गोष्ट करायची किंवा मग करायचीच नाही, मधेच थांबून जास्त लाभ होणार नाही. खरं तर एखादी गोष्ट करायचं ठरवल्यावर ती अशी करायला हवी कि आपल्या जीवन मरणाचा प्रश्न बनली पाहिजे.
लँगर म्हणजे 'लॅक ऑफ एनर्जी ' किंवा 'लो एनर्जी ', कमी उर्जेनिशी एखादी गोष्ट करणे असफलतेकडे घेऊन जात असते. मनाची सकारात्मकता ठेऊन पूर्ण श्रद्धेने व शक्तीनिशी जर एखादी गोष्ट केली तर नक्कीच तिचा लाभ अनेक पटीने वाढत असतो.

तिसरे चरण आहे, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य; फक्त एक दोन दिवस योगाभ्यास करून लाभ होणार नाही किंवा अनियमित सरावही लाभदायक ठरणार नाही. निरंतर योग साधना हीच यातील यशाची गुरुकिल्ली आहे.
कधी योगाभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला नाही तर थोडा वेळ मागे पुढे झाला तरी चालेल पण जिथे असाल तिथे दहा मिनिटे जरी प्राणायाम व ताडासन, कटीचक्रासन सारखे आसन प्रकार केले तरी चालतील. योगाभ्यासातील नियमितता फार महत्वपूर्ण आहे.

चौथे चरण आहे, साइंटिफिक ऍप्रोच म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. कारण योग हे शुद्ध विज्ञान आहे. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊनच आपण योग साधनेद्वारे दैवी अज्ञातात समृद्ध गती करू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व्यक्ती ना या पक्षात असते ना त्या. ती व्यक्ती आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने व संवेदना जागृत ठेवत अगोदर प्रयोगात्मक अनुभव घेऊन पाहते व नंतर जो निष्कर्ष येईल त्यावर ठाम राहते. तसेच कोणत्याही पूर्वाग्रहाने दूषीत होऊन किंवा प्रेरित होऊन योग साधना न करता प्रयोगातून त्या प्रति श्रद्धा वाढवावी.

सूत्रातील पाचवे चरण आहे, "ग्रॅजुएल वे" म्हणजे नैसर्गिक व हळुवारपणे बदल घडवत जाणे. जसा आपल्या लहानपणीच्या व आताच्या शरीरामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. परंतु आपल्या शरीरात हा बदल कसा होत गेला याची तीव्रता कधी आपल्याला जाणवलीही नाही तसच योग अभ्यास करताना शरीराला व मनाला योग साधनेची अनुकूलता जाणवली पाहिजे.
म्हणजे सुरुवातीला सोप्या आसनांनी योग अभ्यासाची सुरुवात करत जमेल तेव्हढ्या प्रमाणातच व्यायाम करावा आणि वेळही सुरुवातीला अगदी दहा ते पंधरा मिनिटे ठेवली तरी चालेल व नंतर कालांतराने जसजसा सराव वाढत जाईल त्यापद्धतीने आसनांची क्लिष्टता व वेळही वाढवावा.

त्रिसूत्रीचे पालन- संतुलित आहार, व्यायाम व निद्रा :
ज्ञात करून घेण्याची पुढील गोष्ट म्हणजे, संतुलित आहार, संतुलित व्यायाम व संतुलित निद्रा ही त्रिसूत्री होय. (Balanced Diet, Exercise & Sleep)
पूर्वी व्यायाम या शब्दाला पूरक शब्द होता श्रम, परंतु आता जीवनपद्धती फार बदलली आहे म्हणून श्रम हा अनमोल ठेवा नाहीसा होत चालला आहे व म्हणून त्याची जागा व्यायामाला घ्यावी लागली. व्यायामामध्ये प्रामुख्याने योगासन व प्राणायाम यांचा समावेश होईल. पहाटे, सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा स्वच्छ व खेळत्या हवेच्या ठिकाणी आपण योग साधना करू शकतो. आपल्या धावपळीच्या जीवनशैली नुसार कमीतकमी १५ मिनिटे व जास्तीत जास्त १ तास जरी योगाभ्यास केला तरी पुरेसा आहे. परंतु यात सातत्य ठेवून व मन लावून सराव केल्याने निश्चितच लाभ होईल.

संतुलित आहार ही संज्ञा फार व्यापक आहे, आपण जो तोंडाद्वारे आहार ग्रहण करतो तो आहार या संज्ञेमधील फक्त दहा टक्के आहार आहे. बाकीचा नव्वद टक्के आहार आपण आपल्या इंद्रियांद्वारे ग्रहण करत असतो म्हणजे डोळ्यांद्वारे व कानांद्वारे आपण सर्वात जास्त चांगला वाईट आहार ग्रहण करत असतो. म्हणून आहार हा विषय फार मोठा आहे, याप्रती तुमची जिज्ञासा जागृत व्हावी एव्हढीच प्रामाणिक अपेक्षा.
आहार, व्यायाम व निद्रा संतुलित ठेवूनच आपण शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळवू शकतो व ते निश्चितच टिकवूनही ठेऊ शकतो.
आहारामध्ये अल्पोपहार व उपवास या संज्ञाही फार महत्वपूर्ण आहेत. आठवड्यातून एक दिवस जरी उपवास केला तरीही आपले शरीर संतुलित ठेवण्यास निश्चितच मदत होऊ शकते. जेवणाच्या वेळेची निश्चिती किंवा भूक लागेल तेव्हा जेवणे या गोष्टी बदलत्या जीवनशैलीमुळे कमी झाल्या आहेत. जेवणाच्या वेळेसोबतच जेवण करताना जेवणावर लक्ष देत ध्यानपूर्वक जेवण करणे हेही महत्वाचे आहे. योगाभ्यासामध्ये व जेवणात किमान अर्धा तास व कमाल २ तासांचे अंतर हवे. आपण जर जास्त प्रमाणात व्यायाम करणार नसू तर बदलत्या जीवनशैलीनुसार अर्ध्या तासाचे अंतर पुरेसे आहे.योगाभ्यासाच्या व जेवणाच्या दरम्यान पाणी पिणे टाळावे. पाणी पितानाही जेवणाअगोदर व नंतर अर्ध्या तासाचे अंतर हवे पण जर शक्य नाहीच झालं तर किमान १५ मिनिटे जरी थांबले तरी पाचनक्रिया संतुलित होण्यास मदत होईल.

रात्रीचे जेवण अल्पोपहार ठेवत लवकर म्हणजे किमान सात किंवा आठ वाजेपर्यंत केले तर गुणवत्तायुक्त झोप येण्यास निश्चितच मदत होईल. खरेतर आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण वर्ज्य किंवा सुर्यप्रकाश असतानाच करायला हवे परंतु धावपळीच्या जीवनशैलीमुळे सर्वांनाच हे शक्य होणार नाही. योगनिद्रा या योगप्रकाराचा अभ्यास करत किंवा काही ध्यानविधींचा अभ्यास करत झोप गुणवत्तायुक्त करण्यास निश्चितच मदत होईल.

साध्य-लवचिकता, सशक्तता व संतुलन :
योगसाधनेद्वारे प्रामुख्याने ज्या तीन गोष्टी साध्य होणार आहेत त्या म्हणजे लवचिकता, सशक्तता व संतुलन होय. (Strength, Elasticity & Balance)
परंतु या वरील तीनही अवस्था आपल्याला प्राप्त होणार आहेत त्या 'आपल्याला' म्हणजे प्रथमदर्शी तरी स्वतःला ओळखणे गरजेचे आहे.
तसे योगदृष्टीतून प्रामुख्याने आपली पुढील पाच कोषांमध्ये वर्गीकरण होते, अन्नमयकोष, प्राणमयकोष, मनोमयकोष, विज्ञानमयकोष, व आनंदमयकोष.
हे पाच प्रकार सहज समजण्याजोगे आहेत पण तरीही आपण थोडं आणखीन समजेल अश्या पद्धतीतीने शरीराचे वर्गीकरण केले तर ते पुढील प्रमाणे असेल.
शरीराचे प्रकार :
शारीरिक शरीर, कोषिका शरीर, मानस शरीर, ऊर्जा शरीर (Physical Body, Physiological (Cell) Body, Psychological (Mental) Body, Energy Body)
असे चार प्रमुख प्रकार अध्ययन करून योगसाधना केली तर आपण आपले आरोग्य व आपल्या स्वतःला अधिक सशक्त लवचिक व संतुलित करू शकतो. प्रामुख्याने शरीराचे व मनाचे संतुलन, सशक्तता व लवचिकपणा वृद्धिंगत करू शकतो.

महर्षी पतंजली रचित अष्टांग योग :
बऱ्याच वेळा असं समजलं जातं कि योगासन म्हणजे योगा होय किंवा आसन व प्राणायाम म्हणजे योगा होय.
परंतु योगा ही संज्ञा फार व्यापक आहे व योग ही संज्ञा तर फारच व्यापक आहे असं म्हणलं तरी वावगं होणार नाही.
साधारणतः योगा मध्ये अष्टांग योगाचा समावेश करून योगा उल्लेखले तरी चालू शकेल. तसा आसन म्हणजेही योगाच होतो पण फक्त आसन म्हणजे योगा नव्हे.
महर्षी पतंजली रचित अष्टांग योग या योग पद्धतीमध्ये प्रमुख आठ अंग आहेत.
"यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी" असे हे आठ प्रकार आहेत.
त्यामुळे योगा मध्ये फक्त आसन व प्राणायामच येत नसून यम, नियम, प्रत्याहार, धारणा ,ध्यान व समाधी या अंगांचाही समावेश आहे.

यम व नियम म्हणजे योगअभ्यास करतांना काय करावे व काय करू नये याची अनुशासनयुक्त नियमावलीच होय.
या अनुशासनांचे पालन नाही केले तरी एखादी व्यक्ती निश्चितच आसन व प्राणायाम करू शकते परंतु योगसाधनेच्या अंतरंगातील गाभ्यापर्यन्त पोहोचणे फार अवघड होऊन जाईल.
यम मधील बोध प्रकार आहेत, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, अहिंसा व ब्रह्मचर्य.
नियम मधील बोध प्रकार आहेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान.

आसन म्हणजे वेगवेगळ्या शारीरिक अवस्थांमध्ये शरीर स्थित करण्याची क्रिया ज्या अनुषंगाने मन व स्वत्व ही स्थित व अकंप होऊ शकेल यासाठीची शरीराच्या माध्यमातून सुरु केलेली अष्टांग योगाची साधना होय.

प्राणायाम ही संज्ञा प्राण व आयाम या शब्दांची संधी आहे. योगशास्त्रानुसार प्राण म्हणजे जीवन ऊर्जा (Vital Energy Force) आयाम म्हणजे त्या जीवन ऊर्जेचा परीघ किंवा आवाका वाढवणे, कमी करणे किंवा नियंत्रित करणे होय.
प्राण म्हणजे ऑक्सिजन नव्हे पण चैतन्यशील जीवन ऊर्जा होय. श्वासासोबत नक्कीच ऑक्सिजन घेतला जाईल व कार्बनडायऑक्साईड बाहेर सोडला जाईल पण योगशास्त्रानुसार श्वासाची व्याप्ती फार मोठी आहे. परंतु नियमित प्राणायाम केल्याने शरीरातील सर्व अंतर्गत संस्था निश्चितच आरोग्यमय राहतील. उदाहरणार्थ श्वसनसंस्था, पाचनसंस्था ग्रंथीयसंस्था इ.
विशेषतः काही प्राणायामांमध्ये ओम या ध्वनिस्वराचे उच्चारण केले जाते. जसे उदगीत प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम. ओम हा शब्द मूळ तीन अक्षरांची संधी आहे; अ, ऊ, म. या शब्दामागे अनेक आध्यात्मिक मतमतांतर आहेत, परंतु सर्वच धर्मात सकारात्मक दृष्टिकोनातूनच या ध्वनीला महत्व आहे. भारतीय आध्यात्मात जसे जैनिजम, बुद्धिजम, शिखिजम हिंदुइजम यांमध्ये तर ओम चे उच्चारण महत्वपूर्ण आहेच परंतु इस्लाम वा इसाईयतमध्ये ही "आमीन" सारखा "ओम" च्याच ध्वनींशी मिळताजुळता शब्दप्रयोग महत्वपूर्ण आहे. तसे पाहता "ओम" हा ध्वनिनाद कोणत्याही एका धर्माशी संबंधित असूच शकत नाही किंवा तो सर्वच धर्मियांचा असू शकतो, ग्रॅव्हिटी फोर्सचा शोध न्यूटनने लावला मग आपण असे म्हणणार का कि गुरुत्वाकर्षणाचा नियम हा ख्रिश्चियानिटीमध्ये येतो. नासा या अमेरिकन अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या काही वैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानुसार जेव्हा सखोल अंतरिक्ष मध्ये सूर्याचा ध्वनी नमूद करण्यात आला तेव्हा त्याचा नाद हा ओम च्या ध्वनिनादाशी मिळताजुळताच आढळून आला. परंतु हा रिपोर्ट अनधिकृत आहे कारण गूगल व युट्युब वर असा रिपोर्ट सापडतो परंतु नासाच्या अधिकृत कोणत्याही साईटवर हे नमूद नाही म्हणून ही भ्रांतच आहे असं समजायलाही काही हरकत नाही, परंतु आपण प्रयोगातून ओम या ध्वनिनादाचा प्रभाव नक्कीच योग्य कि अयोग्य ते सिद्ध करू शकतो आणि असे प्रयोगात्मक अनेक अधिकृत रिपोर्ट आहेत जे आपण "गूगल स्कॉलर - scholar.google.com" या वेबसाईटवरही पाहू शकतो. ज्यात शारीरिक आरोग्य व मानसिक शांतीसाठी ओम या ध्वनी नादाचा सकारात्मक परिणाम दिसून आलेला आहे. म्हणून ओम या शब्दाच्या ध्वनी नादाने निश्चितच न्यूरोसेल्स व ग्रंथीय संस्थेवर सकारात्मक व आरोग्यदायी परिणाम होतो असे प्रयोगातून सिद्ध झालेले आहे. मानसिक स्वास्थ्यासाठीही ओम या ध्वनिनादाचे उच्चारण लाभदायकच सिद्ध झालेले आहे. मग ओम हा शब्द भौतिकशास्त्र किंवा मानसशास्त्राचाही एक प्रयोगात्मक सिद्धांत आहे असंही आपण म्हणू शकतो.

प्रत्याहार म्हणजे पंचेंद्रीयांवर नियंत्रण मिळवत त्यांच्यापासून ऊर्जा बाहेर न प्रवाहित होता ती आध्यात्मिक अभ्यासाकडे अंतरप्रवाहाकडे वळविण्याची क्रिया. थोडक्यात ऊर्जेचं बजेटिंग करण्याची साधना पद्धती होय.

धारणा म्हणजे धारणाविधीच्या (Concentration Techniques) विविध क्रियांद्वारे मनाची एकाग्रता साध्य करण्याची साधनापद्धती होय.

ध्यान हे अष्टांगयोगातील एक फार व्यापक व महत्वपूर्ण चरण आहे. परंतु मेडिटेशन हा ध्यानाचा एक प्रकार आहे संपूर्ण ध्यान नव्हे, आपण साधारणतः सर्वच ध्यानाला मेडिटेशन असेच संबोधतो. परंतु पाश्चात्य मेडिटेशनचा अर्थ व भारतीय ध्यानाचा अर्थ फार वेगळा आहे. मेडिटेशनला आपण एकवेळ निदिध्यासन असे संबोधू शकतो पण ध्यान हे मेडिटेशनच्या पुढे घेऊ जाणारे विज्ञान आहे.
ध्यानाला इंग्रजीत दुसरा कोणता शब्द नसल्यामुळे त्याच्या जवळपास असणारा मेडिटेशन हा शब्दप्रयोग प्रचलित झालेला आहे.
ध्यानाच्या अनेक विविध पद्धती प्रचलित झालेल्या आहेत परंतु त्या सर्व प्री-मेडिटेशन टेक्निक्स किंवा गाईडेड मेडिटेशन आहेत मूळ ध्यान या क्रिया संपल्यानंतर सुरु होत असते. जसं आपण झोप करू शकत नाही पण झोपेची तयारी करतो व झोप लागते तसेच आपण ध्यान करू शकत नाही पण ध्यानासाठीची तयारी नक्कीच करू शकतो व नंतर ध्यान ते परिपक्व झाल्यावर लागते. ध्यान घटित होण्याची वेळ प्रत्येकाच्या साधनेवर व साधनेच्या निष्कामकर्मयुक्त तीव्रतेवर अवलंबून असते.
बऱ्याच वेळा लोक धारणा विधी म्हणजे एकाग्रतेच्या क्रिया करत असतात व त्यालाच ते ध्यान करत आहे असे संबोधतात.

समाधी हे मोक्षत्वाकडे किंवा परमात्मप्राप्तीकडे जाण्याच्या किंवा स्वतःची विधिवत उकल होण्याच्या प्रवासातील शेवटची अवस्था आहे असे नमूद केलेले आहे. हे संपूर्णतः आत्मिक वा आध्यात्मिक चरण आहे.

प्रमुख योग प्रकार :
तसे योग संकल्पनेचे प्रमुखतः चार व्यापक प्रकार पडतात, सांख्ययोग किंवा ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग आणि चौथा म्हणजे राजयोग किंवा साधनायोग .

सांख्ययोग म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाला अनुभवांतून व अध्ययनातुन जाणण्याचा वैराग्य व अभ्यासपूर्ण मार्ग होय.

भक्तियोग म्हणजे वेदांतातील द्वैत मार्गच, भक्त व परमात्मा या दोन संकल्पना यामार्गातून स्पष्ट होतात. अल्लाह व अल्लाहचा बंदा किंवा वारकरी व वारकऱ्यांचा विठुराया असे अनेक भक्तिमार्ग भक्तीयोगाचेच रूपक आहेत.

कर्मयोग या अद्वितीय जीवनमार्गात निष्काम कर्मभावाने वैराग्य व अभ्यासासोबत आपली सद्सद्विवेकबुद्धी व संवेदना उपयोगात आणत सेवाभाव व निस्वार्थभाव ठेवत अथकपणे सृष्टिचक्राला अभिप्रेत असलेले कर्म करत राहतो तोच खरा कर्मयोगी सिद्ध होऊ शकतो.

राजयोग किंवा त्याला आपण साधनायोगही म्हणू शकतो कारण यात साधक वैज्ञानिक दृष्टी ठेवून निरंतर आध्यात्मियक साधना करत असतो. ज्ञानेश्वरांचा, बुद्धांचा वा महावीरांचा मार्ग हा साधनायोगचेच दर्शन घडवतो.

याच योगमार्गात महर्षी पतंजलींचा अष्टांग योगही समाविष्ट होतो. मग या अष्टांगयोगातील आपण जो योगा करत असतो त्याला "हट योगा" असेही संबोधले जाते. म्हणजे योगासन व प्राणायाम करणे याला आपण हट योगा म्हणू शकतो.

विविध आसने एका एकामागून एक आणि एका लयात व प्रवाहात करण्याच्या क्रियेला विन्यासा योगा असे संबोधले जाते, यालाच पाश्चात्त्य लोक "पॉवर योगा" असे म्हणतात.
अश्याप्रकारचे हट योगासंबंधीचे अनेक योगा प्रकार प्रचलित आहेत. योगा ट्रेनर, योगा इंस्ट्रक्टर, योगा टीचर अश्या संज्ञा अधिक करुन हट योगा अथवा पॉवर योगाशीच संबंधित आहेत.
कारण योगा टीचर म्हणलं कि योगासनांद्वारे शारीरिक व्यायाम करून घेणारा अथवा शिकविणारा प्रशिक्षक होय अशीच साधारणतः समजूत आहे व अनेक योग शिक्षकही योग अध्ययनाच्या बाबतीत फक्त आसन-प्राणायामाद्वारे शारीरिक व्यायामावरच थांबलेले आहेत. आणि असे बरेच शिक्षक स्वतःला "योगी" म्हणवून घेण्यातही अग्रेसर असतात. परंतु "प्रस्थानत्रयी" या तीन ग्रंथांच्या समूहानुसार म्हणजे भगवदगीता, उपनिषद व ब्रह्मसूत्रनुसार योगी ही संज्ञा फारच व्यापक आहे.
योगाभ्यास सुरु करताना प्रमुखतः प्रस्थानत्रयी सोबतच पतंजली योग सूत्र, हटयोग प्रदीपिका, घेरण्ड संहिता, शिव संहिता या पुस्तकांचा अभ्यास सर्वोपयोगी सिद्ध होतो.

तसं योग, योगा व योगसाधने बद्दलच्या भ्रांती, तथ्य व अकल्पितां बद्दल जाणण्यासारखे अगणित आहे. परंतु काही ठराविक गोष्टी जाणून योगअभ्यास सुरु केला तर निश्चितच लाभ मिळू शकेल.

:लेखक- योगमैत्रव,
रिसर्चर व योग माएस्ट्रो - मेडिटेटिव्ह योगा इंटरनॅशनल फाऊंडेशन,
MeditativeYoga.in, [email protected], +91 7040038881
Facebook | Twitter | Youtube | Linkedin / MeditativeYoga
Facebook | Twitter | Youtube | Linkedin / about.me /YogMaitrav

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address

Pune