04/03/2026
BetterFast Lifestyle
India's Simplest Lifestyle Program We have Doctors, Diabetologists, Certified Clinical Dieticians, Nutrition Specialists and Lifestyle Experts in our team.
OUR TEAM
Betterfast is a team of experienced professionals working in the field of Health and Nutrition for more than 15 years. OUR CLIENTS
We have clients from all over the world. Not only from Maharashtra, but outside of India like, Dubai, Bahrain, Africa, England too. Among our clients are Doctors, Police Personnel, IT & Software Employees, Govt Employees, etc. Disclaimer:
The materials and
04/03/2026
अविनाश: “अरे, तो बेटरफास्ट लाइफस्टाइल प्रोग्राम ऐकला का?”
सारंग: “हो, पण नीट कळलं नाही अजून. नेमकं आहे तरी काय?”
अविनाश : “साधंय रे. हा इंटरमिटंट फास्टिंगवर बेस्ड आहे. म्हणजे दिवसातले काही तास काही खायचं नाही, बाकीच्या वेळेला नेहमीसारखं जेवायचं.”
सारंग : “म्हणजे डाएट टाईप काहीतरी आहे का?”
अविनाश : “नाही रे, फक्त खाण्याचा टाइम कंट्रोल करायचा. जेवणात सगळं नॉर्मल, भाजी, भात, चपाती सगळं चालतं. पण खाण्याची वेळ ठरवलेली असते.”
सारंग : “बरं… मग त्याचा फायदा काय होतो?”
अविनाश : “फायदा भारी आहे. आपल्याला वाटतं की उपास आहे, पण खरं म्हणजे पचनसंस्थेला आराम दिल्यासारखं आहे. जेव्हा शरीराला बाहेरून उर्जा मिळत नाही, तेव्हा ते आतली साठवलेली चरबी वापरायला लागतं. त्यामुळे वजन आपोआप कमी होऊ लागतं.”
सारंग : “ओह, म्हणजे जिम न करताही फरक दिसतो?”
अविनाश : “हो, आणि फक्त वजनच नाही. शरीरात अनावश्यक साठून राहिलेले घटक, घातक बॅक्टेरिया, जुन्या पेशी सगळं निघून जाऊ लागतं. त्वचा ताजीतवानी दिसते, मूड चांगला राहतो, हॉर्मोन्स नीट होतात, बरेच आजार सुधरायला लागतात.”
सारंग : “भारी! हे म्हणजे शरीर स्वतःची साफसफाई करतंय असं झालं ना?”
अविनाश : “अगदी! ह्याला ऑटोफॅजी म्हणतात. आणि गंमत काय माहितीय? या ऑटोफॅजी विषयाबद्दलच्या संशोधनाला नोबेल पारितोषिक मिळालंय.”
सारंग : “मग तर नक्की सॉलिड आहे.”
अविनाश : “हो, आणि डायबिटीज, बीपी, पीसीओडी, कॅन्सर यासारख्या आजारांवर याचे काय फायदे होतात यावर जगभरात अभ्यास सुरू आहेत. “
"डॉक्टर,या कंबरदुखीचा काहीतरी उपाय सांगाच!!"
"डॉक्टर,आज हिला जबरदस्तीनेच घेऊन आलोय.गेली कित्येक वर्षं हिची सतत कंबर दुखते,पण तुमच्याकडे यायलाच तयार नव्हती..असं होतंच सगळ्या बायकांना असं तिचं म्हणणं आहे. मला पटलं नाही म्हणून घेऊन आलोय तुमच्याकडे" इति पेशंटचा वैतागलेला पण प्रेमळ नवरा..
'घरोघरी मातीच्या चुली'या धर्तीवर' घरोघरी कंबरदुखी ' असं म्हणता येईल एवढी कंबरदुखी ही कॉमन गोष्ट आहे.आणि त्याबरोबरच याबद्दल असलेले अगणित गैरसमज ,वेळप्रसंगी अंधश्रद्धा सुद्धा आपल्या समाजात दिसतात.
सर्वात मोठा प्रचलित गैरसमज म्हणजे कंबरदुखी सिझेरियन च्या वेळी पाठीत दिलेल्या इंजेक्शन मुळे सुरू होते हा आहे.सिझेरियन च्या वेळी spinal anaesthesia म्हणजे मणक्याच्या एका आवरणात इंजेक्शन देऊन भूल दिली जाते.यामध्ये कमरेखालचा भाग साधारणपणे 2 तासांपर्यंत पूर्ण बधिर होतो.ही भूल स्त्री आणि बाळ दोघांकरताही अतिशय सुरक्षित असते.या भुलेमुळे बाळ बाहेर येताना पेशंट पूर्ण जागी असते.तिला बाळ लगेच दाखवले जाते आणि बाळाला स्तनपान सुद्धा ऑपरेशन टेबल वर असतानाच सुरू करता येते
भूलेची इंजेक्शन्स आयुष्यभर दुखतात हे म्हणणे म्हणजे लहान बाळांना दिलेल्या लसी आयुष्यभर दुखतात असे म्हणण्याइतकेच अशास्त्रीय आणि अतार्किक आहे.
महत्त्वाचा मुद्दा हाही आहे की भारतीय स्त्रिया स्त्रीरोगतज्ज्ञांनी कितीही आवर्जून सांगितले तरीही नियमित कॅल्शियम च्या गोळ्या घेत नाहीत.त्यामध्ये सुद्धा पूर्वीच्या पिढीत कॅलशियम च्या गोळ्या घेतल्या तर बाळाचं वजन खूप वाढतं आणि नॉर्मल डिलिव्हरी होत नाही असा गैरसमज खरंतर अंधश्रद्धा च होती.ही पिढी अजूनही अशा अशास्त्रीय आणि कधी कधी धोकादायक गोष्टी तरुण स्त्रियांच्या मनावर बिंबवत असतात.एखादी प्रसूती झालेली स्त्री सुद्धा स्वतःला याबाबतीत एक्सपर्ट समजते आणि आजूबाजूच्या सगळ्या कोवळ्या मुलींना सल्ले देत सुटते.बऱ्याच तरुण मुलींचे अशा चुकीच्या सल्ल्यांमुळे आयुष्यभराचे नुकसान होऊ शकते.
आपल्या समाजात काही स्तरात अजूनही मुलींना लहानपणापासून पोषक आहार मिळत नाही .कुपोषणाची सुरवात तिथूनच होते .मग लहान वयात लग्न,लगेच मुलं,एकापाठोपाठ बाळंतपणे असं शुक्लकाष्ठ लागतं त्यांच्यामागे.या सगळ्यामध्ये तिच्या शरीराच्या पोषणाचा विचार कोणीही करत नाही.चार पाच महिने झाल्याशिवाय गर्भवतीला डॉक्टरकडेही घेऊन जाण्याची तसदी न घेणारी खूप कुटुंबे आहेत.तरी बरं सगळ्या गर्भवतींना सरकारी दवाखान्यांमध्ये रक्तवाढीच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या फुकट दिल्या जातात .बऱ्याच वेळा तर ती बिचारी आधीच्या बाळाला स्तनपान पण देत असते.कॅल्शियम च्या गोळ्यांचा कुठेच पत्ता नसतो .अशा परिस्थितीत तिच्या शरीरातील सगळं कॅल्शियम संपलं नाही तरच नवल!!
आर्थिक स्तर चांगला असलेल्या गर्भवती सुद्धा केवळ कंटाळा म्हणून कॅल्शियम घ्यायची टाळाटाळ करतात.कॅल्शियम हे गर्भारपणात होणाऱ्या बऱ्याच गुंतागुंतींना उदा.गर्भारपणात वाढणारा रक्तदाब इत्यादी टाळण्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे.
आता याच स्त्रिया बाळंतपणानंतर एकदोन वर्षात कंबरदुखी ची तक्रार करू लागतात.आणि घरचे,बाहेरचे त्यांना सर्रास हे डिलिव्हरी च्या वेळच्या इंजेक्शन मुळे आहे आणि यावर काही उपाय नाही असं सांगून मोकळे होतात.एव्हाना यातल्या काही स्त्रियांचे वजन वाढलेले असते.घरच्या व्यापामुळे व्यायाम हा शब्द हद्दपार झालेला असतो.मानसिक ताणामुळे ही कंबरदुखी अजूनच वाढत जाते.मग अशास्त्रीय उपायांकडे मोर्चा वळवला जातो.
नव्वद टक्के कंबरदुखी असलेल्या स्त्रियांना नियमित व्यायाम,कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी च्या गोळ्यांनी खूप फरक पडू शकतो.एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे नुसत्या कॅल्शियम च्या गोळ्या घेऊन नियमित व्यायाम केला नाही तर ते कॅल्शियम हाडांमध्ये सामावले जात नाही त्यामुळे नियमित व्यायाम अत्यंत महत्वाचा आहे.आहारामध्ये दूध व दुधाचे पदार्थ,नाचणी,कोबी,ब्रोकोली यासारख्या भाज्या यांचा समावेश असावा.
अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कंबरदुखी इतरही काही आजारांमध्ये असू शकते.मणक्याचे वेगवेगळे आजार,संधिवात,मज्जासंस्थेचे विकार,क्वचित गर्भाशयाला किंवा ओटीपोटात असलेल्या गाठी यामुळेही कंबरदुखी असू शकते.साध्या उपायांनी बरे न वाटल्यास,असह्य वेदना असल्यास,पायांना मुंग्या येणे,पायांची ताकद कमी झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे असल्यास लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
तर मग मैत्रिणींनो पुढच्या वेळी तुमच्या गप्पांमध्ये कंबरदुखी हा विषय आला की या सगळ्या गोष्टींची चर्चा नक्की करा आणि तुमच्या सख्यांना प्रेमाचा योग्य सल्ला द्या.खरंतर प्रेमाने ओथंबलेले शब्द निम्मी कंबरदुखी बरी करूच शकतात ..हो ना?
-डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ञ
कोथरूड
पुणे.
**
सणवार आले की आपली बायकांची बरीच धावपळ दगदग होते. आता आता पर्यंत मला त्याच फारस काही वाटायचं नाही, भराभर उरकायचे कामं. गेल्या एक दोन वर्षात उत्साह खूप असला तरी पूर्वी सारखं सगळं करणं होत नव्हतं. खूप थकवा यायचा, चिडचिड व्हायची. अशाच दगदगीमुळे एकदा आजारी पडले म्हणून चेक अप केलं तर बीपी हाय, कॉलेस्ट्रॉल बॉर्डर लाईन, प्रीडायबेटिक अस सगळंच आपल्या मागे लागलं आहे हे कळलं. आता आपलं कसं होणार या भीतीने जरा जास्तच टेन्शन आलेलं.
माझ्या मिस्टरांनी बेटरफास्ट बद्दल खूप वाचलं होतं म्हणून त्यांनी मला बेटरफास्टचा प्रोग्रॅम जॉइन करायला सांगितलं. ऑनलाईन प्रोग्रॅमने काय होणार असा डाऊट माझ्या मनात होताच पण माझ्या कोच सोबतच्या पहिल्या कॉल मध्येच माझे सगळे डाऊट क्लिअर झाले. कोचनी मला खूप छान समजावून सांगितलं. पुढचे सगळे फॉलो अप कॉल मी अगदी न चुकता बुक करून वेळेत पूर्ण केले, कोचनी सांगितल्या प्रमाणे रूटीन नीट फॉलो केलं आणि त्याचा मला चांगलाच फायदा झाला. टप्याटप्याने माझे रिपोर्ट सुधारले, थकवा पळून गेला, इंच लॉस छानच झाला आणि माझा आत्मविश्वास वाढला. 😊
बेटरफास्टची आवडलेली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांच्या क्लायंटची प्रायव्हसी जपतात. वाढलेलं वजन किंवा कोणतेही आजार ही आपली खूप पर्सनल गोष्ट आहे. त्यामुळे आपले before after फोटो कुठेही पब्लिकली पोस्ट होणार नाहीत हे माहित असल्याने मला बेटरफास्ट अजून जास्तच आवडलं. 😊
शलाका, मुंबई.
REAL PEOPLE REAL RESULTS
माझी पाठ, कंबर, पाय, टाचा कायम दुखायचे आणि अंग आखडल्यासारखं वाटत राहायचं. डॉक्टरांनी एक्सरे वगैरे काढून चेक करून सांगितलं की बाकी सगळं नॉर्मल आहे पण वजन कमी करा. बेटरफास्टचे अनेक अनुभव वाचले होते म्हणून बेटरफास्टचा ऑनलाईन प्रोग्रॅम जॉइन केला.
पहिला महिना सगळं सुरळीत सुरू होतं आणि एक दिवस पाय घसरून पडले, पाय मुरगळला. पुढचा दीड महिना मला चालता येत नव्हतं. वर्क फ्रॉम होम असल्याने निदान ऑफिसला जाण्याची दगदग नव्हती आणि घरात हाऊसहेल्प असल्याने घरच्या कामाची ही काळजी नव्हती. पण आता सतत एकाजागी बसून वजन अजून वाढेल अशी भीती वाटत होती. सगळ पूर्ववत व्हायला जवळपास दोन महिने गेले. पण या संपूर्णकाळात बेटरफास्टनी मला खूप साथ दिली. माझं मोराल डाऊन होऊ दिलं नाही. सतत घरात एका ठिकाणी बसून होणारी चिडचिड आणि त्यात वजन कमी करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात आता ही नव्याने आलेली अडचण या सगळ्याने येणार डिप्रेशन हे सगळं नीट समजून घेऊन बेटरफास्टनी या कठीण काळातून बाहेर पडायला मला खूप मदत केली. त्यांच्या गाईडन्समुळे माझं वजन याकाळातही हळूहळू का होईना पण कमी झालं, अजिबात वाढलं नाही. जो माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. त्यानंतर पुढच्या तीन महिन्यात मी माझं टार्गेट गाठलंच. माझं वजन कमी झालं, भरपूर इंच लॉस झाला आणि महत्त्वाचं म्हणजे माझी मूळ अंगदुखी ची तक्रार दूर झाली. आता शरीर छान हलकं आणि मोकळं झालं. स्वतःच्या या नवीन वर्जन वर मी खूप खुश आहे. माझ्या या ट्रान्सफॉर्मेशन जर्नी मधल्या सपोर्टसाठी बेटरफास्टचे खूप खूप आभार.
🙏🙏🙏😊
पल्लवी, पुणे
REAL PEOPLE REAL RESULTS
गेल्या वर्षी रक्षाबंधनाला मी माझ्या ताईला एक अनोखी भेट दिली. 🙂 जे तिच्यासाठी नक्कीच मोठे सरप्राईज होते.
कपडे, ऍक्सेसरीज, दागिने आणि इतर अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आपण नेहमीच देतो. पण त्यावर्षी अशाच एका छोट्या गिफ्ट सोबतच मी ताईला बेटरफास्ट लाइफस्टाइलचा ३ महिन्यांचा प्रोग्रॅम गिफ्ट केला.🙂
गेली वर्ष-दोन वर्ष ती सतत उदास असायची. तिला काहीच करायचा उत्साह उरला नव्हता. प्रत्येक गोष्टीत चिडचिड करायची. काही हेल्थ प्रॉब्लेम्स सुद्धा सुरु झालेले. पण माझी ताई पूर्वी अशी कधीच नव्हती. ती आमच्या घरातली सगळ्यात ऍक्टिव्ह मेम्बर. सण आले की तिचा उत्साह तर अजून दहा पट वाढायचा. पण आता ती ताई कुठे तरी हरवली होती.
गेल्या वर्षी तिलाच फेसबुकवर बेटरफास्ट बद्दल समजले होते. बेटरफास्टचा प्रोग्रॅम जॉईन करण्याचा ती विचार करत होती पण तिच्या तेव्हाच्या स्वभावानुसार निगेटिव्हिटीनेच उचल खाल्ली आणि ती बेटरफास्ट प्रोग्रॅम जॉईन करायचं टाळत राहिली. एकंदरीत परिस्थिती बघता मीच तिच्यासाठी बेटरफास्टशी संपर्क साधला आणि ताईला तिच्या या बॅड पॅच मधून बाहेर काढण्यासाठी रक्षाबंधनाला हा प्रोग्रॅम गिफ्ट केला.
बेटरफास्टनी, बेटरफास्ट कोचनी जणू जादू केली आणि माझी ताई पुन्हा पूर्वी सारखी हसती खेळती झाली. ताईचे हेल्थ प्रॉब्लेम्स संपले, तीच वजन कमी झालं. ती पुन्हा पूर्वी सारखी गोड, हसतमुख दिसायला लागली. या रक्षाबंधनाला एक वर्ष पूर्ण झालं. पूर्वी प्रमाणेच ताईने तिच्या खास पद्धतीने या लॉन्ग विकेंडचा धमाल प्लॅन तयार केला आणि आम्ही सगळ्यांनी तो खूप एन्जॉय सुद्धा केला. बेटरफास्टमुळे आम्हाला आमच्या कुटुंबातला उत्साहाने सळसळणारा झरा पुन्हा परत मिळाला. आजच्या दिवशी हा फिडबॅक देताना होणारा आनंद इतक्या मोजक्या शब्दात लिहीण माझ्यासाठी खरच कठीण आहे. बेटरफास्टचे आभार मानण्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत.
वैभव, पुणे
REAL PEOPLE REAL RESULTS
मध्य रात्री साडे तीन - चार वाजता झोपणं आणि सकाळी साडे 9 - 10 वाजता उठण हे आमच्या अख्ख्या कुटुंबाचं रूटीन झालेलं गेली 3- 4 वर्ष. माझी मोठी लेक वय वर्ष सहा आणि लहान मुलगा वय वर्ष तीन हे सुद्धा 1- 2 वाजता झोपायचे. ते उशिरा झोपतात म्हणून आम्हाला अजून उशीर होत होता. त्यामुळे सकाळी उठायला उशीर आणि पुढे सगळंच शेड्युल फार विचित्र होतं. म्हणजे भारतात राहून आम्ही काहीस युरोपियन वेळेत जगत होतो. 😄
झोपेची वेळ आणि खाण्यापिण्याच बिघडलेलं ताळतंत्र, कामाचा स्ट्रेस या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम आमच्या दोघांच्याही तब्येतीवर झालाच. वाढलेलं वजन, बीपी, कोलेस्टेरॉल, Hba1c हे पाहून डॉक्टरांनी आम्हाला 3- 4 महिन्यात सगळं सुधारण्याचा सल्ला दिला. इतक्या कमी वेळात वर्षांच्या सवयी कशा सुधारणार हा प्रश्नच होता. पण बेटरफास्टने आमची यात खूप मदत केली.
बेटरफास्टच्या गायडन्स मुळे आमच्या सोबत आमच्या मुलांचंही रूटीन, खाणंपिणं सुधारलं. पहिल्या 4 महिन्यात आमच्या टेस्ट रिपोर्ट मध्ये चांगली इम्प्रुवमेंट झाली. पुढच्या 2 महिन्यात आम्ही जे गोल सेट केलेलं ते ही अचिव्ह केलं. बेटरफास्ट मुळे आमच्या कुटुंबाच आयुष्यच बदलून गेलं जे आम्हाला काही महिन्यांपूर्वी अशक्य वाटत होतं. बेटरफास्टचे खूप खूप आभार. 🙏🙏🙏
ऋषिकेश, पुणे
REAL PEOPLE REAL RESULTS
मी मूळची पुण्यातली असले तरी आता गेली बरीच वर्ष अमेरिकेत आहे. इथे नोकरी, घर, मुलं सगळं सांभाळताना स्वतःकडे जरा दुर्लक्षच झालं. पॅनडॅमिक पासून तर अजूनच वजन वाढत गेलेलं, प्रीडायबेटीक स्टेज मध्ये पोहोचले. थकवा, कामाचा कंटाळा, चिडचिड या सगळ्यांच प्रमाण वाढत चालेल. स्किन बद्दल तर बोलायलाच नको अशी स्थिती होती.
बेटरफास्ट बद्दल वाचलं होतं पण खरंच ऑनलाईन प्रोग्रॅमचा फायदा होईल का हे माझं मलाच समजत नव्हतं. सुरुवात केली आणि पहिल्या दोन कॉल्स मध्येच मला खूप हायस वाटलं. महत्वाच म्हणजे कोणीतरी आपल्याशी नीट आपल्या मायभाषेतून बोलतय, आपल्या भाषेत आपल्याला समजावून देतंय आणि आपल्या महाराष्ट्रीयन खाण्यापिण्याच्या सवयींचा विचार करून त्यानुसार सगळ आखून देत आहे या सगळ्याचाच मला खूप आधार वाटला. हे सगळं आपलंस वाटलं. 😊
“Home cooked food” च्या नावाखाली कोणतीही अवास्तव पथ्य, बंधन किंवा so called super food खाण्याची जबरदस्ती केली नाही हे ही माझ्यासाठी फारच महत्वाच होतं.
माझं वजन ही कमी झालं आणि इतर त्रास ही बंद झाले. स्किन तजेलदार दिसायला लागली. मी बेटरफास्ट ची खरंच खूप आभारी आहे.
प्राजक्ता, अमेरिका
REAL PEOPLE REAL RESULTS
मी दिवसभरात किमान 6-7 चहा प्यायचो. चहा घेतला की जरा बरं वाटायचं, डोळ्यावरची झापड दूर व्हायची. त्यामुळे सकाळचे 8 असोत की रात्रीचे 10, मी कोणत्याही वेळी चहा प्यायचो. जेवण अवेळीच व्हायचं कारण कामातून वेळच नाही मिळायचा. डिनर तर रात्री 11-12 असा कधीही व्हायचा कारण ऑफिसमधून घरी यायलाच उशीर व्हायचा. गेली काही वर्ष हे असंच सुरु होतं आणि मला यात काहीच चुकीचं वाटत नव्हतं कारण मी एकदम ठणठणीत होतो. खात्यापित्या घरचा दिसायचो.
पण मग पोट खूप सुटायला लागल. ऍसिडिटी, हेडेक तर रोजचेच झाले. वजन पण नव्वद पार गेलं. ब्लड टेस्ट केल्या तेव्हा प्रिडायबेटिक असल्याचं समजलं. प्रिडायबेटिक स्टेज साठी बेटरफास्टमध्ये बेस्ट प्रोग्रॅम आहेत हे समजलं आणि मी तीन महिन्यांचा प्रोग्रॅम जॉईन केला. कोणतीही गोळ्या औषधं न घेता पहिल्या पंधरा दिवसातच मला माझ्यात खूप पॉझिटिव्ह बदल जाणवले. नुसतं खाण्यापिण्यात थोडे बदल केल्याने इतका फरक पडू शकतो हे पाहून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं.
दोन महिन्यात माझं 7 किलो वजन कमी झालंय. बाकी त्रास सुद्धा बंद झालेत. खूप खूप धन्यवाद बेटरफास्ट. बेटरफास्टशिवाय हे शक्यच नसतं झालं. बेटरफास्टनी मला माझा आत्मविश्वास परत मिळवून दिला.
उदय, बंगलोर.
REAL PEOPLE REAL RESULTS
मला फार लवकर म्हणजे तीस वर्षांची असतानाच हाय बीपी साठी गोळ्या सुरू झाल्या. इतक्या लहान वयात हा त्रास सुरू झाल्याने मी अजूनच डिप्रेशन मध्ये चालले होते.
फेसबुकवर मी बेटरफास्टचे रिव्यू वाचले होते. म्हणून मग बेटरफास्टच्या तीन महिन्यांच्या प्रोग्रॅम साठी एन्रोल केलं.
काही दिवसातच मला खूप चांगले रिझल्ट्स दिसू लागले. माझ्या बीपीच्या गोळीचा डोस दिवसाला दोन गोळ्यांवरून एक गोळी वर आला आणि पुढच्या काही दिवसात त्या एका गोळीची पॉवर सुद्धा डॉक्टरांनी कमी केली. माझं वजन सुद्धा ओव्हरवेट कॅटेगरीतून नॉर्मल मध्ये आलं. मी बेटरफास्टची खूप आभारी आहे. 🙏🙂 त्यांच्यामुळेच आज मी हे शक्य करू शकले.
स्नेहा, पुणे
REAL PEOPLE REAL RESULTS
काहीही खाल्लं तरी असं छातीत अडकल्या सारखं वाटायचं. छातीत जळजळ होणं तर रोजचं झालेलं. काही दिवसात constipation ही सुरु झाल. त्यामुळे तर अस्वस्थपणात अजूनच भर पडली. बरेच औषधोपचार करूनही आराम पडत नव्हता. भूक लागायची पण त्रास होईल या भीतीने जेवावसं वाटत नव्हतं.
बेटरफास्टच्या कोचनी सांगितलेले पथ्य पाळले आणि खाण्यापिण्यात आणि रुटीनमध्ये काही चेंजेस केले आणि दोन महिन्यांत सगळं सुरळीत झालं. आता आनंदाने सगळ व्यवस्थित खाऊ शकते, ते ही कोणतीही औषधं न घेता.
- रोहिणी (लंडन)
REAL PEOPLE REAL RESULTS
Betterfast.in
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the school
Telephone
Website
Address
Kothrud
Pune
411038
Opening Hours
| Monday | 9am - 8pm |
| Tuesday | 9am - 8pm |
| Wednesday | 9am - 8pm |
| Thursday | 9am - 8pm |
| Friday | 9am - 8pm |
| Saturday | 9am - 8pm |
| Sunday | 9am - 8pm |