Mitra Mandal Education Society

Mitra Mandal Education Society Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mitra Mandal Education Society, Nursery, 484/107A, Mitra Mandal Colony, Pune.

15/03/2026
10/03/2026

सायबर सुरक्षित जीवनशैली आणि या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी या विषयावरील महत्वपूर्ण व्याख्यान...

जरूर सहभागी व्हावे....

व्याख्यान सर्वांसाठी खुले..

शनिवार, 14 मार्च 2026, सायंकाळी 6 ते 8

स्थान: सौ सुंदर देवी राठी हायस्कूल, मित्रमंडळ एज्युकेशन सोसायटी, 4 था मजला, पर्वती पुणे 411009

Mahesh Dabi
Jyoti Kemkar
Bhagyashree Supanekar
Dilip Bapat
Mitra Mandal Education Society
Dhruv Academy

विज्ञान दिनानिमित्त सरिता विद्यालय व सौ सुंदर देवी राठी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी बनवलेले विज्ञानाचे सुंदर प्रयोग व ...
01/03/2026

विज्ञान दिनानिमित्त सरिता विद्यालय व सौ सुंदर देवी राठी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी बनवलेले विज्ञानाचे सुंदर प्रयोग व प्रकल्प

‘सजगता आणि स्वनियंत्रणासह एआयचा वापर केला तर तो मानवजातीसाठी वरदान’ — प्रसाद शिरगावकरपुणे, दि. १४ फेब्रुवारी: मित्र मंडळ...
14/02/2026

‘सजगता आणि स्वनियंत्रणासह एआयचा वापर केला तर तो मानवजातीसाठी वरदान’ — प्रसाद शिरगावकर
पुणे, दि. १४ फेब्रुवारी: मित्र मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित स्वर्गीय आशा मोहनलाल शर्मा व्यवसाय केंद्र येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)’ या विषयावरील मार्गदर्शक व्याख्यान उत्साहात पार पडले. शनिवारी (दि. १४) सायंकाळी ६ ते ८ या वेळेत आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक व संगणक तज्ज्ञ मा. श्री प्रसादजी शिरगावकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना संबोधित केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रभावाचा आढावा घेताना शिरगावकर यांनी चीन व युरोपमधील स्वयंचलित रोबोट्सच्या वापराची उदाहरणे सादर केली. उद्योग, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात एआयमुळे कार्यक्षमता व अचूकता कशी वाढते, याचे विश्लेषण त्यांनी केले. तसेच भविष्यातील ऑटोनॉमस (स्वयंचलित) वाहन तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता व्यक्त करताना संबंधित तांत्रिक बाबी सोप्या भाषेत स्पष्ट केल्या.
एआयच्या विविध अ‍ॅप्लिकेशन्सचा ऊहापोह करताना लेखन, मराठी लघुकथा निर्मिती, सारांश लेखन, व्हिडिओ निर्मिती, प्रोग्रामिंग आदी क्षेत्रांतील उपयुक्तता त्यांनी अधोरेखित केली. रोजगार, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, नातेसंबंध आणि आत्मविकास या क्षेत्रांमध्ये एआयचा सकारात्मक व परिणामकारक वापर कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे उद्भवू शकणाऱ्या नैतिक व सामाजिक आव्हानांकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व केंद्राची माहिती श्री अमोघ परांजपे यांनी दिली. संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्वाती भावे, श्री दिलीप बापट, डॉ अरुणा शिवराम, श्री रमेश श्रीगौड, श्री शिरीष सुमंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राच्या निर्मितीमागील प्रेरणास्थान श्री सुरेश शर्मा, श्री सुरेश बापट तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, संस्थापक तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ.भाग्यश्री सुपनेकर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

AI क्षेत्रात व्यवसायाच्या संधीव्याख्यान सर्वांसाठी खुले...आवर्जुन उपस्थित रहावे...14 फेब्रुवारी 2026सायंकाळी 6.30 वाजताम...
07/02/2026

AI क्षेत्रात व्यवसायाच्या संधी
व्याख्यान सर्वांसाठी खुले...
आवर्जुन उपस्थित रहावे...
14 फेब्रुवारी 2026
सायंकाळी 6.30 वाजता
मित्रमंडळ एज्युकेशन सोसायटी
बर्वे सभागृह
पर्वती गाव
पुणे.
Neha Gore
Bhagyashree Supanekar
Nitali Hargude
Sujit Jagtap

Hurry up.....Register your name.Courses starting from 15th July 2025
02/07/2025

Hurry up.....Register your name.

Courses starting from 15th July 2025

25/06/2025

मित्रमंडळ एज्युकेशन सोसायटीचे,
सौ. सुंदरदेवी राठी हायस्कूल
मित्रमंडळ, पर्वती , पुणे- 9
Urgent requirement -
B.sc M. sc, B. Ed
संस्थेतर्फे अपॉइंटमेंट
साधारण वेतन -: १२०००
मुख्याध्यापिका :- सौ भाग्यश्री सुपनेकर
9822916755

24/03/2025
 #आनंदीमुलं  आपल्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला पुरेशा असतात..साधेपणातही सौंदर्य अस...
19/12/2024

#आनंदीमुलं


आपल्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला पुरेशा असतात..
साधेपणातही सौंदर्य असतं की..

हेच बघा ना..
आमच्या मित्रमंडळ एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या कला शिक्षिका नीताली यांनी बालवाडीच्या स्नेहसंमेलनासाठी तयार केलेली कार्यक्रम पत्रिका.. आणि बॅकड्रॉप..⛵🌞🌴

ना झगमगाट..
ना चकचकाट..
नको ग्राफिक्स..
नको AI..

या सगळ्याला आक्षेप मुळीच नाही पण कुठे काय शोभतं याचं भान असलेल्या आमच्या नीताली हरगुडे..
परदेशी मुलांच्या रेडिमेड इमेज आणि फ्लेक्सच्या जमान्यात निरागस मुलांचे निरागस भाव नीतालीने हाताने सहजपणे कागदावर आणि वातावरण निर्मिती करणाऱ्या बॅकड्रॉपवर उतरवलेत...

मुलांचं भावविश्व जाणणारा शिक्षकच हे करू शकतो ..
या आज कार्यक्रम बघायला आणि मुलांचं कौतुक करायला..,🤗🤗🤩

👼👼👯🌞🌛🌟🐰

ज्योती केमकर

Address

484/107A, Mitra Mandal Colony
Pune
411009

Opening Hours

Monday 7:30am - 5pm
Tuesday 7:30am - 5pm
Wednesday 7:30am - 5pm
Thursday 7:30am - 5pm
Friday 7:30am - 5pm
Saturday 7:30am - 3pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mitra Mandal Education Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category